क्लूलेस - ९

Submitted by श्रद्धा on 29 November, 2013 - 10:30

आज रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार ९ वाजता क्लूलेस ९ची लिंक अ‍ॅक्टिव्हेट होईल. ती इथे पेस्ट करते.

झालं सुरू!!!! http://klueless.in/klueless/klueless9/default.asp

नियम, पथ्यं नेहमीचीचः
१. सोपे क्लू देऊ नका. क्लूलेसची खरी मजा त्या त्या लेव्हलला स्वतः विचार करून सोडवण्यात आहे. सोपे क्लू मिळाल्यावर तुम्ही पुढे पुढे जाता, पण कुठल्याच लेव्हलचं डिझाईन, त्यात खुबीने लपवलेले क्लू हे काहीच तुम्ही अप्रिशिएट करू शकत नाही.

२. उत्तर चुकलं तर विचारांची दिशा थोडी बदलून पहा. तुम्ही कितीहीवेळा उत्तर टाकू शकता. खूप वेळ लेव्हलशी झगडल्यावर योग्य उत्तरावर बदलणारे पान दिसले की, अशक्य आनंद होतो.

३. पुढे गेलेल्यांनी इथे क्लू देताना तारतम्य बाळगा.

४. त्यांचा ऑफिशियल ब्लॉग नक्की पाहत रहा, तिथेदेखील क्लू मिळतात.

५. सगळ्यांत महत्त्वाचं, हॉऑफे वगैरे लक्ष्य ठेवण्यापेक्षाही खेळाचा आनंद घ्या.

बेस्टॉफलक!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१३ वर.

संपलं... हुश्श!! यावेळी फुटबॉल लेव्हलनी फार बोर केले.

हॉऑफेमध्ये नाव येते की नाही, त्यासाठी फिंगर्स क्रॉसली आहेत. दोनेकशे जागा आणि सध्या अपडेटेड १३०. त्यामुळे नंबर लागावा.

नंतर क्लू द्यायला येते.

सहीच श्र... Happy

अभिनंदन.. Happy

ते सगळे लेव्हल्स क्रॉस केल्यावर काय सर्टिफिकेट येतं त्याचा फोटु तरी दाखवाच..
त्याच्यावरच समाधान मानतो.. Lol

वेळ नव्हता.
चवथ आणि पाचवं बर्‍यापैकी कमी वेळेत सुटलं.
अर्थात ब्लॉगची मदत आहेच.
आता कुठे सहाव्यात हत्यारं उचलले आहेत.
बघु वेळ मिळाला तर और भी लढेंगे. Happy

६ व्यात अडकलोय राव.

हत्यारं पाहिली.
चित्राच नावं पाहिलं तर व्हिडिओ गेम.
बरह्च काही काही करत "कासव"गतीने उत्तराकडे आलोय.
पण नेमकं काय ते कळेना.
माझी गती चुकीची आहे की काय?

बरह्च काही काही करत "कासव"गतीने उत्तराकडे आलोय.>>>> आता उत्तराकडून मास्तराकडे जा. तिथे तुला मार्गदर्शन मिळेल.

मास्तर घावना की..

एक इमान असतय फायटर त्याचं नाव आलं आणि त्याचं नावाची फर्म आली.
लिन्क लागली पण मालकाच नाव घेत नाहिये.

नाय नाय. रस्ता चुकला तुमी. मी कॉपी पेस्ट केलेली ओळ परत परत वाचा. त्या विकीमास्तरांनाच मास्तर कंचा ते इच्यारा.

८वी काय आहे? थोडं वर्णन कर. क्लू देते.

ओह्ह ती. पोकेमॉन. पोकेमॉन ही आयटी कंपनी आहे असं समज. कुठल्याही एम्प्लॉयीला कंपनीत कशाने ओळखतील? तो धागा मनात ठेवून पोकेडेक्स शोध. Happy

जोड्या व्हर्टिकली जुळवा.
आणि इमेज नेम बघा.
"पळा" लवकर.. Wink

श्र क्लु बद्दल धन्यवाद.
मी काल असच ट्राय केलं होत पण जमलं नाही.
आज बघतो परत.

देवा, सातवी लेव्हल श्रमातेने अकरा सेकंदात सोडवली, इतकी सोप्पी आहे.

अजून एक भन्नाट क्लू देऊ का? ये जवानी है दिवानीचा माबोवरचा रीव्ह्यु वाच. त्यातल्या एका प्रतिसादामधे उत्तर आहे!!!

सुटली.. पहिल्यांदा फक्त इमेजचं नाव बघून केला होता हा विचार.. पण म्हंटलं हे कसं असेल.. म्हणून बघितलं पण नाही ट्राय करून.
आता गणित जमतंय का बघतो.

पहिल्यांदा फक्त इमेजचं नाव बघून केला होता हा विचार.. पण म्हंटलं हे कसं असेल.. म्हणून बघितलं पण नाही ट्राय करून.>>> सेम टु सेम Happy

पण म्हंटलं हे कसं असेल.. म्हणून बघितलं पण नाही ट्राय करून.<<<<< ऐसा सोचनेका नै... ट्राय तो करकेच देखनेका.. कितीही वेळा ट्राय केला तरी काही होत नाही.

नववी ती फळ्यावर लिहिलेली समीकरणं का? ए-१ Wink लेव्हल आहे ती.

Pages