क्लूलेस - ९

Submitted by श्रद्धा on 29 November, 2013 - 10:30

आज रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार ९ वाजता क्लूलेस ९ची लिंक अ‍ॅक्टिव्हेट होईल. ती इथे पेस्ट करते.

झालं सुरू!!!! http://klueless.in/klueless/klueless9/default.asp

नियम, पथ्यं नेहमीचीचः
१. सोपे क्लू देऊ नका. क्लूलेसची खरी मजा त्या त्या लेव्हलला स्वतः विचार करून सोडवण्यात आहे. सोपे क्लू मिळाल्यावर तुम्ही पुढे पुढे जाता, पण कुठल्याच लेव्हलचं डिझाईन, त्यात खुबीने लपवलेले क्लू हे काहीच तुम्ही अप्रिशिएट करू शकत नाही.

२. उत्तर चुकलं तर विचारांची दिशा थोडी बदलून पहा. तुम्ही कितीहीवेळा उत्तर टाकू शकता. खूप वेळ लेव्हलशी झगडल्यावर योग्य उत्तरावर बदलणारे पान दिसले की, अशक्य आनंद होतो.

३. पुढे गेलेल्यांनी इथे क्लू देताना तारतम्य बाळगा.

४. त्यांचा ऑफिशियल ब्लॉग नक्की पाहत रहा, तिथेदेखील क्लू मिळतात.

५. सगळ्यांत महत्त्वाचं, हॉऑफे वगैरे लक्ष्य ठेवण्यापेक्षाही खेळाचा आनंद घ्या.

बेस्टॉफलक!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरीवर आहे का कोणी? मी सगळे पर्याय टाकून बघितले, मध्ये डॅश टाकूनही बघितले. पहिलाशब्द लघुरूपात, पूर्ण टाकून, दुसर्‍या शब्दाचे सगळे समानार्थ, आणि दोन्हींची कॉम्बिनेशन्स. पण काही गाडी पुढे जात नाही.

नंदिनी:
१. त्यांनी दिलेल्या चित्राचं नाव पहा! तो क्लू वापरून एक दुसऱ्या टाईपची इमेज फाईल शोधायचीय..कुठला टाइप ते महत्वाचं आहे!
२.आणि वर्ड फ़ाइल मिळवायला आपण .___ वापरतो नाही का?.asp च्या ऐवजी

चैर, ते coin आहे का? मी केव्हाची ट्राय करतेय. पण त्याने ही होत नाहीये.

चैर, धन्यवाद. दहावी सुटली एकदाची. पण त्यामधे दुसरा फाईल फॉर्म्टचं कनेक्शन लक्षात आलं नाही. पहिली फाईल वाचली आणि उत्तर आलं.

११वी सोप्पी आहे! चित्रातली नावं आणि चित्राचं नाव..सगळ्यांना एकत्र जोडणारी लिंक आहे! ती शोधायची आणि मग सोक्लु वापरायचा! :०

3ब साठी wooplr app स्मार्टफोनवर d/l करायचं आणि मग सोक्लू वाली हिंट वापरायची Happy

मी ३अ सोडवलीच नाही. ३ब सोडवली. वूपलर डाऊनलोड न करताच उत्तर मिळतंय, फक्त तेच उत्तर आहे हे लक्षात यायला हवंय. मला समजलं नाही. तीन तास वाया गेलेल.

हो...डाऊनलोड न करता उत्तर मिळतंय हे खरं आहे...पण समजतच नाही!
डाऊनलोड करून त्यांना अपेक्षित असणार्‍या प्रकारे उत्तर मिळालं की भारी वाटतं! Happy

उत्तर आलं नाही तर लगेच सोडून देऊ नका. कधी ए अ‍ॅन, द, वगओरे वापरून अथवा न वापरता अथवा नवाअमधेच इकडे तिकडे करून लेव्हल सुटतेय का बघा.

चैर, पण वूपलर हे सॉलिड गंडलेले प्रकरण आहे. आयफोन ५वर ते सर्च ऑप्शन दाखवतच नव्हते. अजून एकजण अँड्रॉईडवर प्रयत्न करत होती तर ते इन्स्टॉलच होत नव्ह्ते. ३अ कठीण म्हणून ३ब सोडवावी तर ते चालतच नाही अशी स्थिती होती. वूपलरला प्रायोजकत्व घेऊन असल्या सुरुवातीच्या लेव्हलमध्ये घुसण्याचा पश्चात्ताप होईल, Proud कारण मी तरी आता जन्मात वूपलर बघणार नाही. (असे फ्रस्ट्रेटेड बरेच असणार काल!) काल तीनेक तास फ्रस्ट्रेशनमध्येच गेले.

श्रद्धा....अगदी अगदी! मीसुद्धा तीनेक तास घालवलेत!! आणि वुपलर अनइस्न्टॉल पण करून झालं! पण लेव्हल सुटल्यावर! Wink

मला १२ ला अडकली आहे. होस्ट कंट्रीज मिळाल्यात. पण त्याचं पुढे काय लोणचं घालायच ते स्मजतेना.

Pages