क्लूलेस - ९

Submitted by श्रद्धा on 29 November, 2013 - 10:30

आज रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार ९ वाजता क्लूलेस ९ची लिंक अ‍ॅक्टिव्हेट होईल. ती इथे पेस्ट करते.

झालं सुरू!!!! http://klueless.in/klueless/klueless9/default.asp

नियम, पथ्यं नेहमीचीचः
१. सोपे क्लू देऊ नका. क्लूलेसची खरी मजा त्या त्या लेव्हलला स्वतः विचार करून सोडवण्यात आहे. सोपे क्लू मिळाल्यावर तुम्ही पुढे पुढे जाता, पण कुठल्याच लेव्हलचं डिझाईन, त्यात खुबीने लपवलेले क्लू हे काहीच तुम्ही अप्रिशिएट करू शकत नाही.

२. उत्तर चुकलं तर विचारांची दिशा थोडी बदलून पहा. तुम्ही कितीहीवेळा उत्तर टाकू शकता. खूप वेळ लेव्हलशी झगडल्यावर योग्य उत्तरावर बदलणारे पान दिसले की, अशक्य आनंद होतो.

३. पुढे गेलेल्यांनी इथे क्लू देताना तारतम्य बाळगा.

४. त्यांचा ऑफिशियल ब्लॉग नक्की पाहत रहा, तिथेदेखील क्लू मिळतात.

५. सगळ्यांत महत्त्वाचं, हॉऑफे वगैरे लक्ष्य ठेवण्यापेक्षाही खेळाचा आनंद घ्या.

बेस्टॉफलक!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी: त्या होस्ट कंट्रीजची URLमधल्या CAMIFS_शब्दाशी लिंक लागतेय का ते पहा! आणि हां, URL मधलं _ हे साधं गाळलेली जागा भरा आहे! तेच उत्तर आहे!

फायनली त्या सर्च परयंत पोचलो, पण हातात असलेलं सर्च करून बघितलं... काही होईना.
३अ च्या अगदी जवळ पोचलोय, पुढं रस्ता सापडंना.

३अ च अजिबातच माहित नाही!
पण ३ब साठी: क्लुलेसच्या प्रत्येक पानावर वुपलर आहे! पण वुपलरवर क्लुलेस आहे का ते पाहिलत का? Wink

दोन देश? चार चित्रं नाही मिळाली? असो! लेव्हलच्या URL आणि इमेज नेमवरुन एका कॉम्प्युटर गेमचं नाव मिळेल..त्यात काही लेव्हल्स असतात का ते पाहून घ्या!
नंदिनी वुपलर d/l करायला लागत नाही म्हणाल्या...बहुतेक त्यांनी हाच 'रोड' घेतला असावा! Wink

इमेज नेमवरुन एका कॉम्प्युटर गेमचं नाव मिळेल..त्यात काही लेव्हल्स असतात का ते पाहून घ्या!<<<< बरोबर

त्या लेव्हलसाठी रस्ता नीट पकडावा लागतो. भूगोल परफेक्ट असला की काम होतं.

हा बाफ पाहिला की हृदयात कळ उठते, दु:ख अनावर होतं इत्यादी. Sad
यंदा वेळ नसल्यानं खेळता येत नाहीये..

यावेळेसची टीम बरीच विचित्र आहे. मध्येच एखाद्या पानावर ऑलमोस्ट उत्तर दिल्यासारखे क्लू विनामॉडरेशन पब्लिश होतायत. तिसर्‍याच लेव्हलला काही लोक सोडून जायचं म्हणत होते तरी नीट क्लू त्यांनी दिले नव्हते. (मुळात वूपलर सगळ्या स्मार्टफोनांवर सर्च ऑप्शन देतंय का हे त्यांनी टेस्टही केलं नसावं.) असो.

चैर, सर्च केल्यावर दोन झेंड्यांचं पान येतंय, क्लूलेसच्या लोगोसह. त्यावरून दोन देश म्हणालो.
तुम्ही म्हणताय ते चार चित्रांचं काय/कसं शोधायचं आहे ते बघतो. नंदिनी ज्या रस्त्याने गेली तो गेम मी ओळखला आहे बहुतेक (त्या रस्त्याने एकेकाळी खूप 'रॅशे'स आणले होते अंगावर!) सुरुवातीला त्याच दिशेने जात होतो. पण नंतर सोडला. त्या गेम मध्ये प्रत्येक लेव्हलला वेगवेगळी ठिकाणे असतात, तोच ना? असेल तर, ती ठिकाणी एकेक करून टाकून बघितली होती.

यावेळेसची टीम बरीच विचित्र आहे. <<< हो. मी या लेव्हलवर पूर्ण क्लूलेस झालेलो आहे. ब्लॉगवरच्या पोस्टवर मी ३अ साठी दोन पर्याय मेन्शन केले होते. त्यातला एक त्यांनी मॉडरेट केला. आणि नंतर दुसर्‍या ठिकाणी लिहिलंय की दुसरा पर्याय आहे, जो माझ्यापोस्टमध्ये मॉडरेट केलेला नाही त्याकडे पॉईंट करतोय. आता मी आणखी पोस्टी वाचल्यावर एका युजरने दोन झेंड्यांचं पान आल्याचं लिहिलंय, पण ३अ साठी! आणि मला मॉडनी ३अ च्या अगदी जवळ पोचलोय असं सांगितलंय ते दुसर्‍याने ३ब साठी लिहिलंय! आता या ३अ आणि ३ब चा एकदाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय सुखाचे मरण यायचे नाही.

गजानन, ३ब सोडव. ३बसाठी ऑनलाईन पान पाहण्यात पॉईंट नाही. ते मोबाईल अ‍ॅपमध्ये येतं. खूप वेळ अडकून राहावं इतकी ती लेव्हल ग्रेट नाहीये. रॅशेसवर उपचार कर. Happy

श्रद्धा, ओके ओके. पण माझ्या फोनवर ते अ‍ॅप गंडतंय (सर्चचा पर्यायच येत नाही. आयफोने ५ वर) म्हणून ब्लॉगवर लिहिल्याप्रमाणे कॉम्प्युटरवर बघत होतो. Sad

कॉम्प्युटरवर बघायची लेव्हल ३अ. आणि मोबाइलावर बघायची ३ब. दोन्हीचा एकमेकाशी संबंध नाहीये. ३ब सोडव आणि पुढे जा. नाहीतर कंटाळा येईल अगदी सुरुवातीलाच.

लेव्हल २१.

श्र. वॉव.

मी अद्याप १२ वर. यंदाचे काही क्लूज मला झेपत नाहीत. दहाव्या लेवलला डॉक्युमेंट कसं काढायचं ते समजायला वेळ गेला, पण नंतर ते इमेज आणि काय ते आलंच नाही, सरळ उत्तर.

आता बारावर देशोदेशी वणवण भटकते.

अरे वा २१ ला पोचलीस, श्रद्धा!

आता माझे रॅशेशवर उपचार पुन्हा सुरू...
नंदिनी, तू भूगोलाचे ज्ञान असावे म्हणतेस?

मी १४ वर आले. नक्की काय हवंय तेच समजेना तिथे. जे उत्तर ऑब्व्हियस आहे त्याचं इतर व्हर्जन द्या असं ब्लॉगवाले म्हण्ताहेत. म्हणजे काय करू?

.

३अ फार पसरट होती. Happy

इमेजचं नाव आणि वूपलर एक फळ देतात. त्या फळात सोर्स क्लू मिसळल्यावर आणि त्यावर URL चा आकडा लावल्यावर एक इव्हेंट मिळतो. त्या इव्हेंटच्या वर्ल्ड फेमस थीमेचा ओरिजिनेटर शोधायचा.

मी २० पुर्ण करुन बंद केलंय दोन दिवस! मंगळवारी पुन्हा बसेन! Happy
पण यावर्षी काहीतरी विचित्र प्रश्न आहेत हे खरं!

Surewhynot, तुमची थीम थोडीशी चुकत असेल. तिथे दिलेल्या एवढ्या क्लूज मधून कशाचे कॉम्बिनेशन कशाशी जोडून पुढचा क्लू शोधायचा आहे, हे कळायला जरा वेळ जातो. स्टेप बाय स्टेप जा, म्हणजे बरोबर येईल.

गजानन | 1 December, 2013 - 10:03

३अ फार पसरट होती.

इमेजचं नाव आणि वूपलर एक फळ देतात. त्या फळात सोर्स क्लू मिसळल्यावर आणि त्यावर URL चा आकडा लावल्यावर एक इव्हेंट मिळतो. त्या इव्हेंटच्या वर्ल्ड फेमस थीमेचा ओरिजिनेटर शोधायचा.
>>>

३ अ काहितरीच होते आता लिहायला हरकत नाही कारण सर्व १७ / १८ वर आहेत साउथ अफ्रिका $$$$$$$$$$$ (खोडला क्लु) मी अ आणि ब २न्ही एकदमच सुटले.

Pages