क्लूलेस - ९

Submitted by श्रद्धा on 29 November, 2013 - 10:30

आज रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार ९ वाजता क्लूलेस ९ची लिंक अ‍ॅक्टिव्हेट होईल. ती इथे पेस्ट करते.

झालं सुरू!!!! http://klueless.in/klueless/klueless9/default.asp

नियम, पथ्यं नेहमीचीचः
१. सोपे क्लू देऊ नका. क्लूलेसची खरी मजा त्या त्या लेव्हलला स्वतः विचार करून सोडवण्यात आहे. सोपे क्लू मिळाल्यावर तुम्ही पुढे पुढे जाता, पण कुठल्याच लेव्हलचं डिझाईन, त्यात खुबीने लपवलेले क्लू हे काहीच तुम्ही अप्रिशिएट करू शकत नाही.

२. उत्तर चुकलं तर विचारांची दिशा थोडी बदलून पहा. तुम्ही कितीहीवेळा उत्तर टाकू शकता. खूप वेळ लेव्हलशी झगडल्यावर योग्य उत्तरावर बदलणारे पान दिसले की, अशक्य आनंद होतो.

३. पुढे गेलेल्यांनी इथे क्लू देताना तारतम्य बाळगा.

४. त्यांचा ऑफिशियल ब्लॉग नक्की पाहत रहा, तिथेदेखील क्लू मिळतात.

५. सगळ्यांत महत्त्वाचं, हॉऑफे वगैरे लक्ष्य ठेवण्यापेक्षाही खेळाचा आनंद घ्या.

बेस्टॉफलक!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, झालं की सुरू? Happy

मी पण अधूनमधून येत राहीन. श्रद्धा नियम १ आणि २ भारीच लिवलेस. दुसर्‍या नियमातलं दुसरं वाक्य म्हणजे तर अगदी अगदी. पान बदलताना पाहताना अगदी डोळ्याचं पारणं सरसर सरसर फिटतं. Lol

त्यांच्या ऑफिशियल ब्लॉगवरही मोडरेटरांचा रिस्पॉन्सही अगदी प्रॉम्प्ट असतो, असा माझा अनुभव आहे.

कसा खेळतात हा खेळ? मला त्या लेव्हल २ च्या चित्राखाली फक्त गुगल सर्च चा बॉक्स दिसतोय. उत्तर कुठे लिहायचं?

जिज्ञासा,

१. हा खेळ खेळायचा म्हणजे एका लेव्हल वरून दुसर्‍या लेव्हलवर जायचं.
२. पुढच्या लेव्हलवर जाण्यासाठी नक्की काय करायला लागेल हे आपल्यालाच शोधायचं असतं.
उदा. चित्रातल्या बॉक्समध्ये एखादा शब्द लिहायचा, किंवा URL बदलायचे, किंवा चित्रातल्या एखाद्या भागावर क्लिक करायचे. इ.
३. पुढे जाण्यासाठी नेमके काय करायचे आहे याचे क्लूज् त्या सध्याच्या लेव्हल वरच वेगवेगळ्या ठिकाणी (जसे URL, पेज सोर्स कोड, ब्राऊजरचे शीर्षक इ.) दिलेले असते. त्यांना कनेक्ट करून योग्य शब्द शोधायचा आणि योग्य जागी लिहायचा.
३. मग पुढची लेव्हल येते. मग पुन्हा तेच. Proud

fake, digital, electronic.. सगळं ट्राय करुन झालय.. पण काहीच जमत नाहीये..

३अ आनि ३ब वर डकलये. ३ब साठी अ‍ॅप इन्स्टॉलअकराय।च्म्य बहुतेक

मी झोपते आता. उद्या फ्रेश माईन्डने बघू

.

mami namskar. mi navin ahe ya gem madhe. mi dusryac leva ch clua virtual economy asa prayatn केला पण पुढे जायला जमतच नाहीये. काही मदत करू शकाल ?

३ ब सोडव. जे सर्वात आधी सापडतंय तेच उत्तर आहे. उगाच त्यांच्या क्लूजमधे फिरू नकोस.

Pages