अभिप्राय

Submitted by संपादक on 3 November, 2013 - 16:47

आमच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

हितगुज दिवाळी अंक २०१३चं संपादक मंडळ स्थापन झाल्यापासून अंक प्रकाशित होईपर्यंतच्या काळात आम्ही खूप काही शिकलो. बर्‍याच अनुभवांची शिदोरी आम्ही आयुष्यभरासाठी बांधून घेतली आहे.
आमची ही निर्मिती तुमच्या पसंतीस कशी उतरते आहे याबद्दल आम्हांला खूप उत्सुकता आहे. तुमच्या सविस्तर अभिप्रायांचं इथे स्वागत आहे.

अंकातील प्रत्येक लेखावर प्रतिसाद देण्याचीही सोय आहे. ते सर्व प्रतिसाद या दुव्यावर पाहू शकता: http://vishesh.maayboli.com/navinlekhan

हितगुज दिवाळी अंक २०१३

श्यामली, "दिवाळी अंकासाठी कंटेट मिळवण त्यावर संस्कार करण हे काम संपादक मंडळ करतात" हे तितकेसे खरे नाही - म्हणजे यात संपादक मंडळ कोण आहे, त्यांची कार्यपद्धती, अनुभव वगैरे गोष्टी भूमिका बजावतात असा अनुभव आहे. आणि तांत्रिक बाजूबद्दल म्हणशील तर दर वर्षीप्रमाणे मी कळवले होते की मी मदत करायला तयार आहे आणि मी किंवा प्रमोद काहीही अपेक्षा न ठेवता दिवाळी अंकासाठी काम करायला कायमच तयार असतो हे संपादक मंडळात काम केलेल्या बहुतेक सर्वांना आणि वेबमास्तर-प्रशासक यांना माहिती आहे.

संपादकीयात जर लिहिले असले की "मोठ्या संख्येने आलेल्या वैविध्यपूर्ण साहित्यातून सर्वाना रुचेल, पटेल असे साहित्य निवडणे हे संपादक मंडळासाठी मोठे आव्हान होते." तर साहित्य कमी आले असेल हे आपण कश्याच्या बळावर म्हणतो आहोत?

कोणताही अंक काढणं हे वाटतं तेवढं सोपं काम नाहीये हे मी स्वानुभवाने सांगू शकतो....त्यासाठी जसे संपादक, तांत्रिक सल्लागार/मदतनीस वगैरे हवेत तसेच लेखक,कवी आणि हो...वाचकही हवेतच....एखाद्या निर्मितीच्या गुणावगुणांची दखल घेणारा रसिक वाचक...तोच जर नसेल तर अंक तरी कुणासाठी काढायचा?
पण एक गोष्ट नेहमीच लक्षात घ्यायला हवी...नेहमी दर्जा/दर्जेदार वगैरे गोष्टींबद्दल आपण अहम-अहमिकेने बोलत असतो...पण माझं वैयक्तिक मत मात्र असं आहे की...दर्जा वगैरे सापेक्ष आहे/असतो....जितका आपला अनुभव,वकुब असेल त्याप्रमाणात आपल्याला एखादी गोष्ट आवडते/नावडते...

कोणत्याही एखाद्या अंकाबद्दल...इथे ह्यावर्षीच्या दिवाळी अंकाबाबत म्हणूया...दोन्ही प्रकारची मतं असू शकतात आणि आहेतही...मी अजून अंक वाचलेला नाहीये...पण लवकरच तो वाचणार आहे आणि शक्य होईल तिथे प्रतिक्रियाही जरूर देणार आहे. पण तरीही ज्यांनी हा अंक काढण्याचं कठीण काम केलंय त्या सर्वांचे आत्ताच हार्दिक अभिनंदन करतो.

जाता जाता एक फुकटचा सल्ला...सुधारणेला नेहमीच वाव असतो आणि म्हणूनच इथे त्रुटी दाखवणार्‍या ज्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत/येतील त्यांची निश्चितच दखल घ्यायला हवी...हा इ-अंक असल्यामुळे जरूर तिथे आणि शक्य असेल तिथे सुधारणाही नक्कीच करता येतील आणि त्या तशा कराव्यात जेणे करून हा अंक जास्तीत जास्त नेटका होईल
धन्यवाद.

एका प्रतिसादावर येवढे प्रतिसाद का? प्रियाला जे वाटलं ते लिहीलं, बाकिच्यांना अंक आवडला ह्यावर तिच्या आक्षेप नाही तर तिला अंक आवडला नाही किंवा काही बाबी खटकल्या तर इतरांचा आक्षेप का? आणि त्यावर येवढा उहापोह का चालू आहे.

मला अंक आवडला छान आहे, संपादक मंडळाचे आभार...

संपादक मंडळाचे बरेच कष्ट असतात, अंक चांगला व्हावा या साठी प्रामाणिक प्रयत्न असतात. कुणाला ह्यातुन काही वयक्तीक फायदा नाही तरी आपणा सर्वांसाठी केलेला हा खटाटोप आहे. आणि हे प्रिया ही जाणुन आहे. एखादं नाटक नाही आवडल तर ते सगळ्यांना आवडायलाच पाहीजे असं नसतं ना, रंगकर्मीची मेहनत असतेच तरीही.

मग अंक काढायला पहीजेच का? उगाच का त्रास हे नसते फाटे फोडू नका. कुणी तरी दिनरात मेहनत घेतली आहे, आणि ते कुठलाही स्वार्थ न साधता स्वखुशीने घेता आहेत. आवडला तर आवडला म्हणा नाही तर नाही म्हणा, वाद घाला पण आपुलकीने.:) पण जे गुण्या गोविंदाने चालू आहे त्यावर आंच आणु नका.

पण अंक उशीरा आला हे काही बरोबर नाही, उशीर झालाच कसा? चला सगळ्यान्नी दहा वेळा स्क्रोल बार वर खाली करुन उठाबश्या काढा... उशीर होतो म्हणजे काय?.माबो दिवाळी अंक संपादन म्हनजे मज्जा वाटली की काय?

मिलिंदा मोड ऑन " मिलिंदा होता का संपादक मंडळात?(बरं)/(!) तरी (च)/(हे) असं (!)/(?)" - कंसातले पर्यांय आपापल्या सोईने निवडावेत.

देखणा झालाय अंक.

होम-पृष्ठ खूपच सुंदर. आतली सजावट पण तितकीच देखणी. नेहमीसारखे डाव्या हाताला नॅव्हिगेशन पॅनल न देता वर दिल्याने मस्त वाटले. पण त्या मेनूवरचे ते तोरण तुकडे जोडून बनवलय (आणि ते सहज ओळखू येतय) त्याऐवजी एक खर्‍याखुर्‍या तोरणाचा फोटो असता किंवा आणखी कुठली नक्षी असती तर अधीक छान दिसले असअते हे मा.वै.म.

पण मुखपृष्ठावरचा मायबोलीचा लोगो आकार मोठा करताना शार्पनेस हरवून बसलाय ते मात्र खटकले.

सगळा अंक वाचला नाहीये अजून पण जुन्या जाणत्यांबरोबर नव्यांची उपस्थिती अगदी चटकन् नजरेत भरतेय. त्याबद्दल संपादक मंडळाचे मनापासून अभिनंदन.

यंदाचे दोन्ही खास विषय खूपच इंटरेस्टींग आहेत. त्यातले लेख वाचायला खूप मजा येणार आहे.

देखण्या अंकाबद्दल संपादक मंडळाचे मनापासून कौतुक!

जुने-जाणते, लोकप्रिय, मायबोलीवर नेहमी लिहिणारे लेखक दिवाळी अंकांमधे लिहित नाहीत, दिसत नाहीत याची खंत कशाला? उलट छापील दिवाळी अंकांमधे जे होतं ते ऑनलाईन दिवाळी अंकांमधे होत नाही हे बरंच आहे, अगदी स्वागतार्ह आहे. नविन, ताज्या लेखकांचं अस्तित्व दिसून येतय ही गोष्ट छानच असते. उलट ऑनलाईन दिवाळी अंकांची ती स्पेशालिटी आहे असं म्हटलं पाहीजे.

काही सूचना-

छापील दिवाळी अंक जसे वर्षभर आधी प्लॅनिंग करतात तसं का करता येऊ नये?

सहित्याचा दर्जा चांगला राखण्याकरता या नवोदित लेखकांना पुरेसा वेळ, संपादकमंडळाकडून त्यांना मार्गदर्शन, त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा दुरुस्त्या करुन नव्याने लिहून घेणं, अंकाच्या दर्जाला साजेसं लिखाण हे ज्यांच्या लिखाणत पोटेन्शियल आहे त्यांच्याकडून सहज करवून घेता येईल.

संपादक मंडळामधे मुख्य संपादक निदान तीन वर्षे बदलू नये. त्याची बाकी टीम, कार्यकारी संपादक वगैरे बदलावे दर वर्षी.

नव्या-जुन्याचा समतोल राखण्याकरता जुन्या जाणत्या वगैरेंकडून ठराविक विषय देऊन साहित्य मागवता येईल. त्याकरता त्यांना पुरेसा वेळ द्यायला हवा. संपादक मंडळाचा वैयक्तिक पाठपुरावा हवा.

Lekh nivadikarata honara matdaan adhik unbiased vhava mhanun alelya sahityala 1 te 10 chya scale var gun dyave >>>> हे असच होतं गुणांकनामध्ये. प्रत्येक संपादक रेट करतो आणि मग अ‍ॅव्हरेज बघितलं जात. शिवाय संपादक मंडळातल्यांना एकमेकांचनी दिलेले गुण दिसत नाहीत. सगळ्यांचे गुण देऊन झाले की अ‍ॅव्हरेज दिसत. फक्त मुख्य संपादकाला सगळ्यांनी दिलेले गुण दिसतात.

आगाऊ, त्यासाठी दिवाळी अंकातलं साहित्य (तशा नावाच्या ग्रूपने) नवीन साहित्यात दिसण्याची सोय करता येईल का असा एक प्रस्ताव आला आहे. >>> हो ह्याची चर्चा आमच्या मंडळातही झाली होती.. आणि बहुतेक बाकीच्या वर्षीही झाली असणार. आपला दिवाळी अंक वेगळ्या डोमेन वर असतो (vishesh.maayboli.com). त्यामुळे ते साहित्य मेन फीडमध्ये दिसत नाही. पूर्वी अभिप्राय बाफही त्याच डोमेन वर असायचा.. पण नंतर तो मुख्य डोमेन वर असतो. चर्चा होत नाहीत कारण आलेल्या प्रतिक्रिया सगळ्यांना कळायचा मार्ग नाही.
'लिंग निरपेक्ष मैत्री' अंकाच्यावेळी अगदी हाच प्रॉब्लेम आला होता.. कारण तिथे चर्चाच अपेक्षित होती. पण अ‍ॅडमिनांनी तिथे 'नवीन लेखन' सारखी फिड उपलब्ध करून दिली ज्यायोगे प्रतिसाद आल की तो लेक्ग त्या यादीत वर येत असे.

मुख्य संपादक ३ वर्ष तोच ठेवणे हे खरच शक्य होईल का माहित नाही. मुळात छापिल अंकातल्या पद्धती जश्याच्या तश्या इथे लागू करता येतील का हाच मला प्रश्न पडतोय.. माझ्यामते त्यासाठी आपण अंक हौस म्हणून काढतोय की आपल्याला खरच परंपरागत दिवाळी अंकांप्रमाणे अंक काढायचा आहे ? हे ठरवावं लागेल. (म्हणजे हौसेचा गणपती बसवतो आहोत, मुलांना पद्धती कळाव्या वगैरे म्हणून.. की घराण्याचे देव आहेत.. त्यांचं सोवळं-ओवळं, पूजा वगैरे झाली पाहिजे म्हणून गणपती करत आहोत.. तसं काहितरी.. Happy )

मुखपृष्ठ आवडलं नाही हे सांगणं म्हणजे संपादकांच्या कष्टांना कमी लेखणं हा मुद्दाही समजला नाही.. कष्टांबद्दल आदर असेलच पण त्याचं आऊटपूट सगळ्यांना आवडावच हा हट्ट कशाला.. ?

मागे श्यामलीने अंकाबद्दाल बाफ काढून चर्चा घडवून आणली होती, गेल्यावर्षीच्या प्रतिक्रिया बाफवरही बरीच चर्चा झाली होती आणि आताही होते आहे. मला असं वाटतं की मायबोली प्रशासनातल्या मंडळींनीही ह्या चर्चेत भाग घेऊन त्यांनी भूमिका/मतं मांडावी. कारण बर्‍याच गोष्टी अश्या असतील की ज्या निव्वळ वाचक म्हणून आम्हांला कळत नसतील.. आणि प्रशासकाच्या भूमिकेत तुम्हांला त्या वेगळ्या पद्धतीने हाताळाव्या लागत असतील. (उदा. जशी माप्रा उपक्रमांबद्दल मागे जशी माहिती दिली होती.. )

मागे श्यामलीने अंकाबद्दाल बाफ काढून चर्चा घडवून आणली होती, गेल्यावर्षीच्या प्रतिक्रिया बाफवरही बरीच चर्चा झाली होती आणि आताही होते आहे. मला असं वाटतं की मायबोली प्रशासनातल्या मंडळींनीही ह्या चर्चेत भाग घेऊन त्यांनी भूमिका/मतं मांडावी. कारण बर्‍याच गोष्टी अश्या असतील की ज्या निव्वळ वाचक म्हणून आम्हांला कळत नसतील.. आणि प्रशासकाच्या भूमिकेत तुम्हांला त्या वेगळ्या पद्धतीने हाताळाव्या लागत असतील. (उदा. जशी माप्रा उपक्रमांबद्दल मागे जशी माहिती दिली होती.. ) >>>>> +१

IE 8 मध्ये सगळ्याच अनुक्रमणिका अश्या दिसत आहेत. ठीक करता आले तर बरे होईल-

hda_2013_index.jpg

प्राचीचा मेसी अफेअर आणि डॉ शेखर यांचा हीलींग हारमनी वाचुन झाला.
दोन्हीही लेख खूप आवडले.

अजुन वाचतेय. अभिप्राय देईनच.

मला डॉ शेखर यांना संपर्क करायचा आहे तर त्यांचा इमेल अथवा विपुचा पत्ता मिळु शकेल का?

अ‍ॅडमिन ,
या सोयीबद्दल तुम्हाला माझ्याकडून एक मोठ्ठसं चॉकलेट.
भारतात आलात की घेऊन जा.
Happy

वेबमास्तर आणि अ‍ॅडमिन, अहो ही सोय गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकातही तुम्ही करुन दिली होतीत की!

साती, अ‍ॅडमिनना दोन चॉकलेट द्यायला हवीत बरं का मग तुम्हाला Happy

काही दिवस मुंबईबाहेर होतो आणि आज परत आल्यावर आतुरतेने अंक चाळला , प्रामाणिकपणे सांगायचे तर निराशाच हाती लागली. अगदी मुखपृष्ठापासुन. मुखपृष्ठावरचे छायाचित्र यापेक्षा अधिक कल्पक असु शकले असते, अगदी गुगल इमेजवर akash kandil असा सर्च दिला तरी याहुन चांगली प्रकाशचीत्रे सापडतील.
संपादकीय अगदी ओढुन ताणुन लिहल्यासारखे.
सजावट - कथातरू च्या index साठी झाडांचा फोटो, ललितलता साठी वेलिंचा आणि काव्यपुष्प साठी फुलांचा , इतकी बाळबोध सजावट किशोरच्या दिवाळि अंकात पाहील्याचे सुद्धा आठ्वत नाही
अभिव्यक्ती चा दर्जा अभिव्यक्ती या शब्दाचा नक्की अर्थ काय या संभ्रमात टाकतो
वेध भविष्याचा- या अंकाची खास थीम , यातली रनेसाँस ३०१३ चांगली आहे , बाकी लेख बेतलेले. भाऊंची व्यंगचित्रही बेतलेलीच, याहुन सुरेख काम त्यांनी या आधी अनेकदा केलेय म्हणुन आणखीच निराशा.
बाकी अंक वाचायचा उत्साह मावळलाय मात्र आपल्या मायबोलीचा अंक असल्याने वाचुन काढणार हे नक्की आणि हाती काही लागले तर आवर्जुन इथेच लिहिन.

मला अंक खास आवडला नाही. कारण काहितरी कमी कमी असे जाणवते.
आधीचे अंकात वाचायला खूप असे असायचे असे वाटले. कथा सुद्धा काही खास नाही वाटल्या. कवितेचे वाकडं असल्याने काव्यपुष्प नादी लागले नाही.

निरामय बरे वाटले.

>>अभिव्यक्ती चा दर्जा अभिव्यक्ती या शब्दाचा नक्की अर्थ काय या संभ्रमात टाकतो<<
+१
अभिव्यक्तीत उगाच काहीतरी टाकायचे म्हणून टाकलेय(म्हणजे अ‍ॅड केलेय असे वाटले). दर्जा वगैरे ठिक पण त्या शब्दाला साजेसे असे काहीच आढळले नाही. त्या सदरात काहितरी वेगळे असे बघायला/वाचायला मिळेल असे वाटलेले... असो.

ललितलता... अवजड शब्द आहे. तिनदा म्हणून पहा एका मागोमाग. Happy (बोबडेपणा पडताळून पाहू शकता. बोबडे असाल तर हमखास तिसरा शब्द 'ललला' होइल.)

(हे वरचे वाचल्यावर प्रयत्न केलाच असेल म्हणायचा व हसत हसाल की तुम्ही सुद्धा बोबडे आहात.)
आज अक्खी रात्र घालवली पण निराशा वाटली.

झंपी, लब्बाडे !
पुढच्या वर्षी आपण तुला संयोजक बनवू आणि या वर्षीच्या संयोजकांचं घर उन्हात बांधू हं अ‍ॅडमिनला सांगून.

वीरु.

अहो एकदम लब्बाडे काय?
त्या शब्दाची सहज गंमत म्हणून करून पाहिले ते लिहिलं. ह्याच्यात कोणाची चेष्टा नाही करत आहे. शब्द जड आहे मात्र.

आताशी नुसतच मुखपृष्ठ पाहिलय.
बघताक्षणीच वॉव वाटलं. Happy
म्हणुन त्याची नोंद.
वेळ मिळेल तसं वाचुन कळवेनच. Happy

अंक वाचतोय, आवडलं. एकूणच नेटका अंक आहे. Happy
अभिनंदन संपादक मंडळाचं आणि सर्व सहभागी माबोकरांच!

बराचसा वाचून झाला. वैयक्तीक माझे साहित्य पाठवलेले नाही, शिवाय अंक प्रकाशनात देखिल कुठलाही सहभाग नाही. तरिही मायबोलीचा वाचक सभासद म्हणून अभिप्राय देत आहे. कृ. गैरसमज नसावा.

एकंदरीतच ऊपलब्ध वेळेत, व नेहेमीचे ईतर सर्व व्याप संभाळून, अंक प्रकाशनाचे काम तडीस नेणे हे किती कठीण आहे याची कल्पना आहे. म्हणूनच अंक प्रकाशनाबद्दल अभिनंदन! असेही मी ऊशीरानेच वाचलाय त्यामूळे अंक मुहूर्तावर प्रकटला वा नाही याचे मह्त्व माझ्या लेखी गौण आहे.
प्रत्येकाच्या वैयक्तीक आवडी निवडीनुसार एकंदर अंक शोभा, सजावट, मांडणी, ई. च्या बाबतीत प्रतिक्रीया येणार हे गृहित धरून लिहू इच्छीतो की मायबोलीचा दिवाळी अंक म्हणून या बाबतीत काही विशेष हटके असे आढळले नाही.

संवाद, निरामय हे विभाग आवडले. हिलींग हार्मनी व विमान अपहरणाचे रहस्य हे लेख अधिक आवडले. बाकी वाचलेले कथा, कविता, ललित बरेचसे नेहेमीचेच वाटले. 'अभिव्यक्ती' हा प्रकार संकल्पनेसकट अजीबातच झेपला नाही. काही संवाद फारच लांबलचक वाटले... was bit too much to absorb and maintain the interest.

एक वाचक म्हणून एकूणात कटेंट मध्ये एकसंधतेचा व सुसूत्रतेचा अभाव दिसून येतो आणि एक दोन अवपाद वगळता प्रकाशीत साहित्यामध्ये विशेष नाविन्य दिसले नाही. कदाचित त्यामूळे एकूणात अंकाचा ठळक प्रभाव पडत नाही.

बाकी सुधारणांबद्दल वर अनेकांनी सूचना केल्या आहेतच.

आभारी.

मला जाण, गोदाई, किन्नराची ट्रान्सफर, विठोबा, मेसी अफेअर, सिंडीची मुलाखत, आगाऊचा लेख, झोपेचं खोबरं, स्टेम सेम इत्यादी आवडले. (सौजन्यः सायो)

मायबोली संपादक
नमस्कार
हितगूज दिवाळी अंक २०१३ चा अंक वाचला. आवडला. त्यातील दिवाळी संवाद मधील बैजू पाटील आणि डॉ. विद्या अत्रेय यांच्या मुलाखती विशेष भावल्या.
मी दिव्य मराठीसाठी संपादकीय विभागात कामाला आहे. आमच्या वृत्तपत्रासाठी वरील दोन्ही मुलाखतींचा संपादीत अंश घ्यायची माझी इच्छा आहे. पाटील आणि अत्रेय यांचं काम आणि कर्तृत्व आमच्या वाचकांपुढेही यावं अशी आमची इच्छा आहे.
दोन्ही लेखांसाठी मायबोली आणि संबंधीत मुलाखतकर्त्यांचा नामोल्लेख करण्यात येईल.
यासंबंधात आपल्याकडून लवकरात लवकर जाणून घेण्यास मी उत्सूक आहे.

आपला नम्र
प्रतिक पुरी

Pages