अभिप्राय

Submitted by संपादक on 3 November, 2013 - 16:47

आमच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

हितगुज दिवाळी अंक २०१३चं संपादक मंडळ स्थापन झाल्यापासून अंक प्रकाशित होईपर्यंतच्या काळात आम्ही खूप काही शिकलो. बर्‍याच अनुभवांची शिदोरी आम्ही आयुष्यभरासाठी बांधून घेतली आहे.
आमची ही निर्मिती तुमच्या पसंतीस कशी उतरते आहे याबद्दल आम्हांला खूप उत्सुकता आहे. तुमच्या सविस्तर अभिप्रायांचं इथे स्वागत आहे.

अंकातील प्रत्येक लेखावर प्रतिसाद देण्याचीही सोय आहे. ते सर्व प्रतिसाद या दुव्यावर पाहू शकता: http://vishesh.maayboli.com/navinlekhan

हितगुज दिवाळी अंक २०१३

सशल, २०१२ चं मुपृ अभिप्रा या माबोकरणीचं होतं.
बाकी अंक वाचते आहे अजून. पूनम ची कथा व प्राचीचं मेसी अफेअर आवडलं. तिथेही लिहीनच. कुकूज नेस्ट अधाशासारखं सर्वप्रथम वाचायला घेतलं पण निराशा झाली.

>>>प्रिया | 6 November, 2013 - 13:30 नवीन

हा माझ्या आठवणीप्रमाणे पहिलाच अंक ज्याने नरक चतुर्दशीला प्रकाशनाचा प्रघात मोडला, इतकेच नव्हे तर विचारणा होऊ लागल्यावरही उत्तर आले ते प्रशासकांकडून, संपादक मंडळाने काही तांत्रिक अडचण असल्यास तसे सांगायला हरकत नव्हती, ती समजून घेण्याचे सौजन्य वाचकांनी दाखवली असते की! बरं, दोन दिवस उशीरा अंक प्रकाशित करताना निदान दिलगिरी तरी व्यक्त केली असती तरी इतके खटकले नसते.

मुखपृष्ठाची निवड करतानाही छायाचित्र निवडावे लागावे? अगदी हाती काढलेले मनाजोगते चित्र नसले तरी फोटोशाॅप किंवा तत्सम प्रणाली वापरून उत्तम डिजिटल चित्र काढू शकणार्या मायबोलीकरांचीही कमतरता नाही. मांडणी, सजावट, रंगसंगती आवडले तर नाहीच, शिवाय त्यात काही नाविन्यही नाही.

'स्वतःच्या वैयक्तिक व व्यावसायिक जबाबदार्‍या संभाळून स्वेच्छेने असल्या उपक्रमाचं काम अंगिकारणं व किमान वेळात तें नेटकेपणानं पार पाडणं' याबद्दल वर काही जणांनी लिहिले आहे जे अगदी खरेही आहे, फक्त ते केवळ या खेपेचे मंडळ नाही तर दर वर्षीच्या संपादक मंडळाला हे लागू होते आणि तरी अंक वेळेेवर प्रकाशित होतो.

मला तोंडापुरती स्तुती जमत नाही आणि मंडळ ाने घेतलेल्या कष्टांची कल्पना नाही असे तर अजिबातच नाही. कोणा एकाला उद्देशून हे नाहीही.

पण काहीही स्पष्टीकरण न देता प्रघात मोडून वाखाणण्यासारखे काही पदरी पडले तर बंड करण्याला अर्थ असतो.

वरील सर्व वैयक्तिक मत आहे.
<<<

टुकार प्रतिसाद!

उशीर्बिशीर झाल्याने काहीही बिघडत नाही. ही काही एखादी प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाही. दिसायला अंक मस्त दिसत आहे, आपल्याच सगळ्या पब्लिकने मस्त लेखनही केलेले आहे, सणासुदीचे दिवस आहेत. मायबोलीचा दिवाळी अंक म्हणजे 'तुमचे काय काय दुरुस्त करता आले असते' हे सांगायचा धागा होऊ नये अशी प्रामाणिक इच्छा! मोठमोठे शब्द लिहिण्याला अन् मोठमोठ्या अपेक्षा व्यक्त करण्याला मर्यादा नसतात, पण काहीतरी जेन्यूईनली निर्माण करण्याला मात्र दुर्दैवाने असतात.

हॅट्स ऑफ टू दिवाळी अंक संपादक मंडळ!

-'बेफिकीर'!

मंडळाचं कौतुक!
गेल्या वर्षीचं अभिप्रा यांचं चित्र इतकं अप्रतिम होतं की दुसर्‍या चित्राची त्याच्याशी तुलना झाली असती(च) त्यामुळे यावेळी चित्राइ॑अवजी प्रचि येण्याला काहीच हरकत नाही.
मला आवडलं मुखपृष्ठावरचं प्रचि.

संपादक मंडळाने काही तांत्रिक अडचण असल्यास तसे सांगायला हरकत नव्हती, ती समजून घेण्याचे सौजन्य वाचकांनी दाखवली असते की! >> हो ना? मग त्याच सौजन्याने वेट न् सी असं का नाही? त्यांनी अडचणी सोडवायच्या का लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देत बसायचं ? दिवाळीच्या दिवसातच मिळाला की अंक! असो!

मागच्या वर्षीच्या अंकाचं मुखपृष्ठ अप्रतिम होतं याद वादच नाही, मात्र त्यातून "दिवाळी" व्यक्त होत नव्हती. अर्थातच हेमावैम.

शुगोल, गेली अनेक वर्षं मंडळं दिवाळी अंकाची जाहिरात, टीझर्स, 'अमुक दिवशी अंक प्रकाशित करू - लाभ घ्यावा' अशा प्रकारचं 'आमंत्रण' अशा विविध पद्धतींनी अंक प्रकाशित होईपर्यंत आणि झाल्यावरही वाचकांशी संवाद साधत होती. प्रियाही यापूर्वी दोन वेळा संपादक मंडळांत होती, आणि अनेक वेळा मुशो, सजावट इ. समित्यांत. त्यामुळे तिला नवल वाटणं स्वाभाविक आहे. अनेकांना वाटलं.

शूम्पी, +१

टीझर न दिसणं, नवल वाटणं रास्त आहे .. सवयी मुळे अर्थातच ..

पण मला उशीर झाल्याने, मंडळाने दिलगिरी न दाखवल्याने रसभंग झाला नाही ..

स्वाती, तू म्हणतेस ते मान्य. पण संमं दरवर्षी वेगळं असतं. आधी जे जे झाले त्या , त्या त्या मंडळाच्या पद्धती होत्या, ते काही नियम नव्हेत की प्रत्येक संमंनी ते फॉलो केलेच पाहिजेत. ह्या संमंनी वेगळं काही केलं म्हणून त्यांना टीकेचं धनी करणं मला पटत नाही.

शुगोल, बर्‍या-वाईट प्रतिक्रीया दर वर्षी येतात ..

सगळ्यांनांच सगळं आवडेल असं नाही .. पण म्हणून कोणी टीका केली तरी त्याने वाईट वाटून घेणंही योग्य नव्हे .. डिप्लोमसी हवी .. Happy

मुद्दा प्रघात मोडण्यापेक्षा संवाद साधला गेला नाही हा असावा असं मला वाटतं आहे.
टीकेपेक्षा त्यामागे अंक वाचण्याची आतुरताच असावी. Happy

नवल वाटणं स्वाभाविक आहे. अनेकांना वाटलं >>> +१

दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंक येतोच. तसा संकेत आहे. यावर्षी आला नाही. मंडळाने अंकाच्याच एखाद्या धाग्यावर एक ओळ लिहायला काहीच हरकत नव्हती.

तीच डिप्लोमसी तर मी वापरतीय ना? दुसरी बाजू समजून घेणारे लोकही इथे आहेत हे संमंला कळावे हाच तर हेतू आहे. तसंच ही डिप्लोमसी प्रतिसाद देणार्‍यांनी पण वापरायला काय हरकत आहे?

शुगोल, हा नियम नसला तरी गेली १३ वर्षे पाळला गेलेला संकेत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंक प्रकाशित होणे ही एक परंपराच झाली आहे. त्यामुळे जेव्हा २ दिवस उशीर होणार आहे हे लक्षात आलं तेव्हा संपादक मंडळाने फक्त हे जर एका ओळीत पोचवलं असतं तरी चाललं असतं. टेक्नीकल अडचणी येतात ह्याबद्दल सगळ्यांनीच समजून घेतले असते. यंदा संमंना अवधी कमी मिळाला हेही जाणून आहोत.

शुगोल, >>मागच्या वर्षीच्या अंकाचं मुखपृष्ठ अप्रतिम होतं याद वादच नाही, मात्र त्यातून "दिवाळी" व्यक्त होत नव्हती. अर्थातच हेमावैम.>> कबूल आहे पण २००५, २००६, २००९, २०१० ह्या अंकांची मुखपृष्ठही दिवाळीच्या वातावरणाशी संबंधित नव्हती.

मुद्दा प्रघात मोडण्यापेक्षा संवाद साधला गेला नाही हा असावा असं मला वाटतं आहे.
टीकेपेक्षा त्यामागे अंक वाचण्याची आतुरताच असावी. स्मित>>> अगदी सहमत..

शेवटपर्यंत संपादकमंडळाकडून अंक कधी येणार हे काहीच कळले नाही.. जेव्हा इथे तिथे विचारणा होत होती, तेव्हा एका ओळीचा खुलाश्याची संपादक मंडळाकडून अपेक्षा असणं यात काय चुकीचे? जेव्हा मायबोलीचा दिवाळी अंक कायमच नरकचतुर्दशीला येत आला आहे व भारताबाहेर असल्याने मायबोलीचा दिवाळी अंक हाच एक दिवाळी वाटण्याचा मार्ग असेल तर दिवाळिच्या पहिल्या दिवशी दिअं न येणे हे जरा वेगळे वाटू शकते, व त्यावर तो पाडव्याला येणारे हे सदस्यांकडूनच कळणे हे तर फारच वेगळे आहे..

आणि माझी खात्री आहे संपादक मंडळाला ऑनेस्ट अभिप्राय हवेच असतील. Happy

अंक उशीरा येण्याबद्दल तक्रार नाही, पण त्यासंदर्भात एखादी ओळ लिहिणे निश्चितच योग्य ठरले असते.

अंक वाचायला सुरुवात केली पण फारसा प्रभावित करत नाही आहे. वाचलेल्या कथा, लेख कंटाळवाण्या वाटल्या. असो. नंतर पुन्हा सावकाशीने वाचून बघीन.

> आणि माझी खात्री आहे संपादक मंडळाला ऑनेस्ट अभिप्राय हवेच असतील. स्मित
बस्के, बस, का?

दर वेळी वेगळं मंडळ असल्यानी अंकाची प्रत सुधारण्याची काहीच शक्यता उरत नाही. दरवेळचे नियम वेगळे, निकष वेगळे. काय घ्यायचं, काय टपकवायचं हे ही बदलणार. पुरेसे लेख आधी येणार नाहीत आणि काही आलेले मंडळाच्या निकषांमुळे धिक्कारले जाऊ शकतात.

नियम प्रकाशीत करायला हवेत, दरवर्षी बदलायला नको.

निरामय मध्ये ओव्हरव्हिव असलेला लेख का नाही? त्या शिवाय त्या थीमला अर्थच रहात नाही. पण तो तसा नाही हा मंडळाचा(च) दोष नव्हे. वाचकांना काय आवडतं, वाचक कशावर प्रतिक्रीया देतात वगैरे हे सगळं त्याचाच भाग आहे.

निकष आणि नियम मंडळ प्रसिद्ध करेल का?
पुढचे मंडळ त्यात हवे ते(च) बदल करेल का?
पुढच्या मंडळात कोणीही असो, तेंव्हाच्या थीम्स आत्ताच प्रसिद्ध करता येतील का?

अंक उशीरा येण्याबद्दल तक्रार नाही, पण त्यासंदर्भात एखादी ओळ लिहिणे निश्चितच योग्य ठरले असते.
>> +१

नरक चतुर्दशीला अंक दिसला नाही तेव्हाच मीही विचारणार होतो पण वर कुणीतरी म्हटलंय तसं यात कमर्शिअल्स नसल्यामुळे वेळ पाळली गेलीच पाहिजे ही अथवा तत्सम कुठलीही जबाबदारी कुणावरही राहायचं कारण नसावं, असं वाटून गेलं आणि मग तो मुद्दा सोडून दिला मी.

संपादकीयमध्ये दोन नरेंद्रांचा संबंध लावलेला आवडला.

बाकी लेख-कविता-कथांच्या दर्जाबद्दल बरीच नापसंती दिसते आहे. पण संपादक मंडळाला उपलब्ध साहित्यातूनच निवड करावी लागते हे स्पष्ट आहे. ज्यांच्या लिखाणाला हमखास वाचकवर्ग आहे असे वर्षभर मायबोलीवर लिहिणारे अनेक लोकप्रिय सदस्य दिवाळी अंकासाठी विनंती करूनही साहित्य पाठवत नाहीत, हा अनुभव आहे. मुळात साहित्याच जर अधिक प्रमाणात आलं तर संपादक मंडळालाही अधिक संधी मिळतील.
चुभुदेघे.

पण संपादक मंडळाला उपलब्ध साहित्यातूनच निवड करावी लागते हे स्पष्ट आहे. ज्यांच्या लिखाणाला हमखास वाचकवर्ग आहे असे वर्षभर मायबोलीवर लिहिणारे अनेक लोकप्रिय सदस्य दिवाळी अंकासाठी विनंती करूनही साहित्य पाठवत नाहीत, हा अनुभव आहे. मुळात साहित्याच जर अधिक प्रमाणात आलं तर संपादक मंडळालाही अधिक संधी मिळतील.
चुभुदेघे. >>>>अनुमोदन.
हल्ली दरवर्षीच संपादक मंडळांना दोन-तिन वेळा मुदत वाढवावी लागतेय साहित्य येण्याची. अंकासाठी हव्या त्या प्रमाणात साहित्य येत नाही सहजासहजी हा अनुभव आहे.

अंक अजून वाचतेय. त्या त्या कथा लेखांवर प्रतिक्रिया देईनच, पण नेहेमी लिहिणार्‍यांपैकी बरीच नावं अंकात दिसली नाहीयेत.

दर वेळी वेगळं मंडळ असल्यानी अंकाची प्रत सुधारण्याची काहीच शक्यता उरत नाही.

》》》》》》》》jyanna diwali akachya samapadan mandalat ghetala aahe tyanni adhiche ank chalun ani adhichya suchana vachun pahilya tar bryach chukanchi punaravrutti talata yeil.

sahitya matra bharapur yayala pahije he khara aahe. Mhanaje nivadila changala vaav milala ki yogya tech sahitya diwali ankat samavishta karata yeil. Diwali anlat samavishta zala nahi tar maaybolivar prakashit karanyacha paryay aahech. Tyamule bharapurikhan ankakara pathavale gele pahije.

दिवाळी अंकांचे मालक, संपादक चांगल्या लेखकांना जूनमधेच बुक करून ठेवतात. सिद्धहस्त लेखकांची गोष्टच वेगळी. त्यांना मागणी तसा पुरवठा शक्य असते. पण नेटवरचे दिवाळी अंक म्हणजे सगळीच घिसाडघाई. एक महिना आधी नोटीस द्यायची, त्याच वेळी प्रकाशनाची तारीख ठरवायची. खरं तर दिवाळीच्या आधीची वेळ खूपच धांदलीची असते. लोक आपापल्या कामात बिझी असतात. मग ठरलेल्या मुदतीत काय द्यायचं याचं टेण्शन येत असावं. त्यातून थीमबीम जाहीर केली असेल तर संपलंच. लेख पाडायचे असते, परिसंवाद असते तर गोष्ट वेगळी. पण साहीत्य असं कारखान्यासारखं पाडून घेता येतं का ? संपादक मंडळ, प्रशासन यांच्या अडचणी आणि वाचकांच्या अपेक्षा हेच महत्वाचं आहे का ? त्यातून नेहमी लिहीणा-या लेखकांबद्दल कुत्सित शेरे, कुजकी टीका, हेटाळणी होत असेल तर ते तरी कशाला लिहीतील आवर्जून ? त्यांचं साहीत्य भले दर्जाहीन असेल पण वेळ तर घालवतच असेल ना ? कि असं साहीत्य दिल्याने त्यांना टोयोटा करोला मिळणार आहे प्रत्येकी कि वाचणा-यांचा मूल्यवान वेळ गेल्याने बीस करोड का नुकसान हुआ छाप संभाव्य (पण हमखास) प्रतिक्रिया वाचायच्या ?

पण नेटवरचे दिवाळी अंक म्हणजे सगळीच घिसाडघाई.>>tivra akshep

सिद्धहस्त लेखकांची गोष्टच वेगळी. त्यांना मागणी तसा पुरवठा शक्य असते.>>he generalization kahi patle nahi (baherchya jagatlya manyavar lekhakanbaddal aahe vakya asa dharun suddha patle nahi)

tumcha tumhich kona xyz chya sahityala darjahin tharavtay tar tharva tyabaddal akshep ghenari mi kon pan tyapudhchya कि असं साहीत्य दिल्याने त्यांना टोयोटा करोला मिळणार आहे प्रत्येकी कि वाचणा-यांचा मूल्यवान वेळ गेल्याने बीस करोड का नुकसान हुआ छाप संभाव्य (पण हमखास) प्रतिक्रिया वाचायच्या ?>> hya vakyachi garaj navhti asa majha mat

तुमचं मत तुमच्याकडे. नेहमी लिहिणा-यांच्या साहीत्याची टवाळी होत नाही असं तुम्हालाही म्हणता येणार नाही. हे प्रतिसाद दिवाळी अंक किंवा गुलमोहरातच असतील असं नाही, पण कुठं ना कुठं ते हमखास दिले जातात. काही वाहून जातात, काही सांकेतिक असतात तर काही उघड. अशी टवाळी नेहमीची झाल्यावरही साहीत्य पाठवण्याइतकं कुणी संतपदाला पोहोचलेलं नसावं. आणि संतपदाला पोहोचूनही पाठवलंच तर आणखीच टिंगलटवाळीला उत येईल.

एकदा लिहून प्रकाशित करायचं म्हटलं की टिंगल होणार टवाळी होणार, आरत्या होणार, स्तुती होणार हे सर्व ओघानेच आलं, क्वचित प्रतिसादांमधे होइल अथवा दुसर्‍ञा कुठल्या बीबीवर होइल.. "नेहमी" लिहिणार्‍यांना हे कदाचित माहिती असेलच!!! त्यामुळे "टींगल होते म्हणून आम्ही लिहत नाही" याला फारसा काही अर्थ नाही. म्हणायचेच असेल तर "कदाचित जर टींगल झाली तर ते आवडणार नाही, खपणार नाही, म्हणून लिहत नाही" से म्हणता येईल. जाहीर केलेल्या थीमव्यतिरीक्तदेखील साहित्य पाठवता येऊ शकतेच की.

यंदाच्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ मलाही विशेष भावले नाही, त्यातून ते सावलीचे आहे हे समजल्यावर तर खूप आश्चर्य वाटले- कारण तिच्याकडून अपेक्षा जास्त आहेत. मुखपृष्ठ थोडंसं "क्लिशे" वाटलं. पण हरकत नाही! आहे तो फोटोदेखील सुंदर आहेच!!

ललितमधला प्राचीचा मेसी अफेअर लेख आवडला. जागूचा पाटावरवंटा आणि अशोक पाटील यांचे लेख देखील चांङले आहेत. व्यंगचित्रे सर्वच धमाल आहेत.

अंकामधे वेध भविष्याचा हा भाग खूप बहकला आहे. एक लेख टिपिकल गृहशोभिका टाईप, एक साय फाय मधला विनोद, नंतर मधेच कविता (त्या कवितेच्या शीर्षकामधे भविष्य शब्द सोडल्यास मला काहीही संबंध दिसला नाही) एक साधी कथा, आणी एक वास्तववादी असलेला ललितलेख. कशाचा कशाला काहीच संबंध नाही.

त्या तुलनेमधे निरामयमधले लेख खूप चांगले आहेत. परिहार सेवा, हीलींग हार्मनी, किन्नराची ट्रान्स्फर, स्टेम सेल थेरपी हे सर्व लेख आवडले आहेत. बाकीचे अजून वाचायचे आहेत.

'प्रेझेंटेशन'ला महत्व असलं तरीही कोणत्याही अंकाचं खरं मूल्यमापन शेवटीं त्यातल्या 'कंटेट'वरूनच होतं, निदान तसं व्हायला हवं. ' A captain is as good as his team ' सारखंच अंकाच्या दर्जाबाबतही सं.मं.च्या कर्तृत्वाला त्यांच्याकडे आलेल्या साहित्याच्या मर्यादा असणं क्रमप्राप्त आहे, हें लक्षात घेणं महत्वाचं. त्यातही, संमं ह्याच क्षेत्रातले व्यावसायिक नसून व पूर्णवेळ ह्या कामाला देणं शक्य नसूनही मर्यादित वेळात हें काम तडीस नेतात याचीही जाणीव ठेवणं अत्यावश्यक. त्यामुळें, अंक प्रकाशित व्हायला झालेला थोडा उशीर, त्याबद्दल सूचना न देणं/ दिलगीरी व्यक्त न करणं ईत्यादींचा 'अभिप्राया'त उल्लेख होणं अनुचित नसलं तरीही त्याचा मोठा 'इश्यू' बनवणं मात्र योग्य नाही असं मला वाटतं.

Pages