अभिप्राय

Submitted by संपादक on 3 November, 2013 - 16:47

आमच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

हितगुज दिवाळी अंक २०१३चं संपादक मंडळ स्थापन झाल्यापासून अंक प्रकाशित होईपर्यंतच्या काळात आम्ही खूप काही शिकलो. बर्‍याच अनुभवांची शिदोरी आम्ही आयुष्यभरासाठी बांधून घेतली आहे.
आमची ही निर्मिती तुमच्या पसंतीस कशी उतरते आहे याबद्दल आम्हांला खूप उत्सुकता आहे. तुमच्या सविस्तर अभिप्रायांचं इथे स्वागत आहे.

अंकातील प्रत्येक लेखावर प्रतिसाद देण्याचीही सोय आहे. ते सर्व प्रतिसाद या दुव्यावर पाहू शकता: http://vishesh.maayboli.com/navinlekhan

हितगुज दिवाळी अंक २०१३

नेहमीप्रमाणे अगदी नीटनेटका.. सहजगत्या नजरेखालून चाळता येणारा... व सुंदर सजावटीने डोळे दिपवणारा ! मस्त एकदम.. संपादक मंडळ अभिनंदन !!

सर्वांग सुंदर...
संपादक मंडळाने घेतलेले कष्ट दिसून येत आहेत. एक सर्वसमावेशक आणि वाचनीय असा अंक दिसतोय. सविस्तर प्रतिक्रीया अंक वाचून देतोच. अभिनंदन संपादक मंडळ.

अरे वा ! अंक आला का?
चवीने वाचणार Happy आणि अभिप्रायही देणार.

संपादक मंडळाचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार Happy

संपादकाचं अभिनंदन !

इराचं नृत्य पाहिलं. छान आहे. एकपट, दुप्पट, चौपट छान केलंय. बाकी अंक चाळला आहे. वाचून होईल तश्या प्रत्क्रिया लिहिन..

अभिनंदन! अंक छान दिसतो आहे. वाचायलाही बरंच आहे. अंक वाचून झाल्यावर लिहिते पुन्हा.

संपादकमंडळाला दीपावलीच्या शुभेच्छा!

संपादक मंडळातील सर्व सदस्यांचे मानावे तितके आभार कमीच होतील, इतके कष्ट त्यानी घेतले आहेत, अंक सर्वांगसुंदर करण्यासाठी ! प्रत्येक पान त्यांच्या कलात्मकतेची साक्ष तर देत आहेच शिवाय वापरलेला फॉण्ट, त्याची साईझ आणि रंगसंगती केवळ अप्रतिम. साहित्य वाचत आहेच, त्याविषयी स्वतंत्रपणे प्रतिसाद इथेच द्यावा लागेल की त्या त्या कथा, लेख इत्यादींच्या तळाशी उपलब्ध असलेल्या जागेत देणे आवश्यक आहे त्याबद्दल संपादक मंडळाकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे.

अथक परिश्रम तसेच जागरण करून अंक प्रकाशित करणार्‍या या मंडळाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!

यंदा संपादक मंडळाला खूपच कमी वेळात अंक तयार करावा लागला.
सुंदर झालाय अंक! संपादक मंडळाचे आणि संबंधितांचे हार्दिक अभिनंदन!

छान दिसतोय अंक.

अथक परिश्रम तसेच जागरण करून अंक प्रकाशित करणार्‍या या मंडळाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !! >> +१

संपादक मंडळ, सर्व लेखक, कलाकार आणि इतर पडद्यामागचे कलाकार - सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन !!
बाकी अंकाबद्दल प्रतिक्रिया एकेक वाचून सावकाश देईन Happy

सगळे व्याप सांभाळून, आपलेपणानं मायबोलीच्या दिवाळीअंकाचं काम करणार्‍या सगळ्यांचं अभिनंदन!

बघताक्षणी अंक 'फेस्टिव' दिस्तोय.

आता दिवाळी सुरू झाल्यासारखी वाटते आहे. Happy

अतिशय देखणा अंक... Happy
मुखपृष्ठापासून ते साहित्यदर्जा पर्यंत सारं उत्कृष्ट..!!
संपादकांचं मनापासून अभिनंदन... माबोकरांना दिवाळीच्या शुभेच्छा Happy

यंदा संपादक मंडळाला खूपच कमी वेळात अंक तयार करावा लागला.
सुंदर झालाय अंक! संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन >>> +१

अभिव्यक्ती पाहून झालंय. बाकीचं हळूहळू वाचते आणि प्रतिक्रिया देते Happy

अ‍ॅडमिन, अंकाची लिंक पहिल्या पानावर देणार का? >>> +१

थोडं थोडं वाचून प्रतिसाद देते आहे त्या त्या लिखाणाखाली Happy

सुटसुटीत वाटतोय अंक.

Pages