Submitted by संपादक on 3 November, 2013 - 16:47
आमच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
हितगुज दिवाळी अंक २०१३चं संपादक मंडळ स्थापन झाल्यापासून अंक प्रकाशित होईपर्यंतच्या काळात आम्ही खूप काही शिकलो. बर्याच अनुभवांची शिदोरी आम्ही आयुष्यभरासाठी बांधून घेतली आहे.
आमची ही निर्मिती तुमच्या पसंतीस कशी उतरते आहे याबद्दल आम्हांला खूप उत्सुकता आहे. तुमच्या सविस्तर अभिप्रायांचं इथे स्वागत आहे.
अंकातील प्रत्येक लेखावर प्रतिसाद देण्याचीही सोय आहे. ते सर्व प्रतिसाद या दुव्यावर पाहू शकता: http://vishesh.maayboli.com/navinlekhan
Groups audience:
शेअर करा
Nandini ..... +
Nandini ..... + 1000000000000
agadi mala je mhanayacha hota tech lihilayas ki. Itaka sagala phone varun typayacha katala aala hota. Dhanyavaad.
अरे हो, काय आवडलं ते सांगायचं
अरे हो, काय आवडलं ते सांगायचं राहीलंच!
जे वाचून झाले (१५-२०%) त्यातीलः अमीत ची रोबोंची गोष्ट, आगाऊचा लेख, सावलीची गोष्ट
हिलींग हार्मनी पण.
अंक यायला उशीर होण, मुखपृष्ठ
अंक यायला उशीर होण, मुखपृष्ठ न आवडण, कंटेंटबद्दल चर्चा आणि इतरही चर्चा यातला अंक यायला यावर्षी प्रथा मोडून पाडव्याचा मुहुर्त साधण. हे आवडलं नसलं तरी समजू शकण्या इतपत होतंच. मी २०११ ची मुख्य संपादिका म्हणून आणि त्याआधीही सहसंपादक म्हणून काम केलं आहे. म्हणून इथे काही लिहू इच्छिते.
२०११ चा अंक झाला, प्रतिक्रिया येण सुद्धा बंद झालं तेव्हा अनुभव, सूचना आणि अपेक्षा असा एक बाफ सुरु केला होता. तिथे लिहिलेल काही इथे चिकटवते आहे. ज्यावरुन वाचकांना अंक कसा बांधला जातो आणि त्यात कशा अडचणी येतात हे समजेल.
आपल्याकडे तांत्रिक बाबी सांभाळणारी फार कमी मंडळी आहेत. त्यात दर्वर्षी टिम नवी हे सगळ सगळ्यांना झेपेलच असं नसत. म्हणून काही सुचवण्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापकांना केल्या होत्या. त्या अशा
१) अंकाच काम अजून जरा लवकर सुरु करायला हवं
२) तांत्रिक बाजू सांभाळणारी एक स्थायी समिती आपल्याकडे असावी.
३) टेस्टिंगसाठी मंडळाच्या बाहेरची एक समिती असावी.
४) अंकासाठी जनसंपर्क विभाग वेगळा असावा (किमान ३-४ लोक तरी यात असावेत)
५) मुद्रित शोधनासाठी तांत्रिक उपलब्धता असेल तर वेळ आणि श्रम कमी लागतील
६) अंकाच प्रकाशन ऐन दिवाळीत न करता जरा आधीच करावं.
दिवाळी अंकासाठी कंटेट मिळवण त्यावर संस्कार करण हे काम संपादक मंडळ करतात बाकी सजावट, टेंपलेट डिझाईन, मुखपृष्टाची निवड, डिझाईन आणि त्याची तांत्रीक बाजू हे सगळ, मायबोली प्रशासक, व्यवस्थापक यांच्या मदतीनेच करावे लागते.
दुर्दैवानी संचालक मंडळाकडून दिवाळी अंक हा मायबोलीचा केवळ एक उपक्रम एवढच महत्व दिलं जातं आणि त्यामुळे कदाचित तेवढ लक्ष दिलं जात नाही. हे विधान करताना समिर आणि अजय यांना दोष द्यायचा नाहिये पण दरवर्षी फक्त संपादक मंडळाला धारेवर धरल जातं जे की अतिशय चूक आहे . म्हणून हा खुलासा इथे करावा वाटला. आपल्या या उपक्रमाकडे अजून गांभिर्यानी पाहिलत तर आपला हा अंक कुठल्याही व्यवसायिक अंकाच्या वरचढ ठरू शकतो.
श्यामली +१००००
श्यामली +१००००
Jar Shyamali mhanatey tasa
Jar Shyamali mhanatey tasa asel tar Diwali ank kadhanyacha attahas ka ? Sanchalakanna vel nahi, sahitya yet nahi, tantrik baaju sambhalanare thodech jan aahet pan tantrik baaju atishay mahattvachi aahe, sampadak mandalala tare varachi kasarat karavi lagate ... itakya adachanitun mag ank kadhayalach hava ka?
Shyamalini lihilelya suchana agadi yogya ani practical aahet. Tari tyancha vichar ka zala nahi?
< बाकी सजावट, टेंपलेट डिझाईन,
< बाकी सजावट, टेंपलेट डिझाईन, मुखपृष्टाची निवड, डिझाईन आणि त्याची तांत्रीक बाजू हे सगळ, मायबोली प्रशासक, व्यवस्थापक यांच्या मदतीनेच करावे लागते. > हे आधीही अन्यत्र आणखी कोणीतरी लिहिलेले वाचले होते. यात हतबलता जाणवतेय. गेल्यावर्षी महिला दिन आणि दिवाळी अंकाच्या वेळी तांत्रिक पातळी उंचावलेली जाणवली होती. (प्रत्येक लेखनावर स्वतंत्र प्रतिसादाची सोय ही मागणी पूर्ण झाली).
मामी : वरच्या प्रतिसादासाठी +१ (देवनागरीला काय झालं?)
Phone varun lihitey.
Phone varun lihitey.
साहित्य फार येत नाही, नेहमीचे
साहित्य फार येत नाही, नेहमीचे यशस्वी साहित्य देत नाहीत याला काही वर्षांपूर्वी अॅडमिन ने एक उपाय योजला होता. तेव्हा मला तो जालिम वाटला होता पण आता विचार करण्यासारखा वाटतो आहे. त्या वेळी दिवाळीआधी एक पूर्ण महिना गुलमोहोर बंद ठेवून (म्हणाजे अप्रकशित ठेवून) त्या काळात आलेले सर्व साहित्य दिवाळी अंकासाठी वळवण्यात आले होते. त्यातून संपादकांनी निवड करून उरलेले साहित्य नंतर प्रकाशित करता येत होते.
मैत्रेयी... हा उपाय मला भारीच
मैत्रेयी... हा उपाय मला भारीच पटला! असं करायला खरंच काही हरकत नाही.
स्वतःवरचा विनोद देखील चालत
स्वतःवरचा विनोद देखील चालत नसलेल्यांनी लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण करु थयथयाट या पद्धतीने केलेले उपदेश पाहून मज्जाच आली. इथं सर्वच उपदेशकांच्या बाबतीत ते लागू पडतं.
सुरेख, वैविध्यपूर्ण आणि
सुरेख, वैविध्यपूर्ण आणि इतक्या वर्षांच्या दर्जेदार परंपरेला साजेसा अंक झाला आहे हासुद्धा. लगे रहो मायबोली
संपादक मंडळ, लेखक-कवी-इतर कलाकार-पडद्यामागून सक्रिय हातभार लावलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. आपापले दैनंदिन व्याप सांभाळून हा खटाटोप करणे खरंच कौतुकास्पद आहे.
यंदा संपादक मंडळाला खूपच कमी
यंदा संपादक मंडळाला खूपच कमी वेळात अंक तयार करावा लागला.
सुंदर झालाय अंक! संपादक मंडळाचे आणि संबंधितांचे हार्दिक अभिनंदन! <<< +१००
अंकाच मुखपृष्ठ प्रचंड आवडलं.
अंकाच मुखपृष्ठ प्रचंड आवडलं. सर्व सहभागी मंडळींच मनापासुन कौतुक.
मुखपृष्ठ आवडलं नाही म्हणणारे एकप्रकारे दिवाळी अंकासाठी एवढी मेहनत घेणार्यांच्या कष्टालाच कमी लेखत आहेत .
तांत्रिक बाजू सांभाळणारी एक
तांत्रिक बाजू सांभाळणारी एक स्थायी समिती आपल्याकडे असावी. >>> स्थायी समिती नसली तरी प्रत्येक दिवाळी अंकासाठी अथवा उपक्रमासाठी तांत्रिक बाजू बघणारे १-२ तरी भिडू असावेत. दिवाळी अंक वगळता मी इतर सर्व उपक्रमांमध्ये वेळोवेळी काम केलं आहे आणि प्रत्येकवेळी तांत्रिक बाजूंवर लोकं अडलेले बघितलं आहे. अगदी बेसिक HTML टॅग्स टाकायला सुद्धा अवघड जाऊ शकतं जर त्याची काही माहिती नसेल तर.
मैत्रेयीने सुचवलेला उपाय आवडला. पण नुसतं साहित्य चांगलं येऊन उपयोग नसतो. आलेल्यातून उत्तम साहित्य निवडलं गेलं पाहिजे. मामीची कथा याचं उत्तम उदाहरण आहे. या आधी पण एका अंकात लेखकाचे नाव बघून साहित्य घेतले अशी शंका यावी असे साहित्य आले आहे. साहित्य निवडीसाठी मंडळातल्या सदस्यांनी केलेल्या मतदानाखेरीज संपादक आणि उपसंपादक अशी दोन पदे ठेवून त्यांना व्हिटो देता येइल का?
सिंडे, आताचं माहीत नाही, पण
सिंडे, आताचं माहीत नाही, पण आधी मुख्य संपादक एखादा त्याच्या मते उत्तम लेख रिजेक्ट होत असेल किंवा अगदीच टाकाऊ लेख सिलेक्ट होत असेल तर व्हीटो करू शकत असे. प्रश्न नेहमी बॉर्डरलाइन मतं आलेल्या लेखांचाच असतो, आणि त्यात कुठल्याही बाजूला पारडं झुकणं शक्य असतं.
असा लेख माहितीपर असेल तर त्यात दुरुस्त्या सुधारणा सुचवता येऊ शकतात. पण ललित लेखनाच्या बाबतीत टेक्निकल बाबी वगळता तेही शक्य नसतं.
>> लेखकाचे नाव बघून साहित्य घेतले अशी शंका यावी असे साहित्य आले आहे.
मला वाटतं त्यासाठीच आता लेखकाचं नाव गुप्त ठेवलं जातं मतदान होत असताना. ताजे संपादक हे कन्फर्म करू शकतील.
ओके.
ओके.
मला वाटतं त्यासाठीच आता
मला वाटतं त्यासाठीच आता लेखकाचं नाव गुप्त ठेवलं जातं मतदान होत असताना. ताजे संपादक हे कन्फर्म करू शकतील.
अहो, पण संपादक मंडळाचं नाव जगजाहीर असतंय. लेखकु कंपुतला असला म्हंजे अरे माझा अमूक एक लेख घेतला का असं सहज विचारता येतं कि.
नाही म्हणजे शक्यता नाकारता येत नाही कि नाही ?
शाम यांची गझल अंकात वाचली.
शाम यांची गझल अंकात वाचली.
"उर फुटावा इतके धावत असतो कोणी" या ओळीतील पहिला शब्द मुशोच्या पहिल्याच फेरीत 'ऊर' असा दीर्घ केला गेला आहे. आणि पुढील दोन फेर्यातही तो दीर्घच आहे. तरीही तो 'उर' असा कसा दिसतोय? अंकात या रचनेचं नक्की कुठलं व्हर्जन घेतलं गेलंय?
आनंदयात्रीच्या पोस्टच्या
आनंदयात्रीच्या पोस्टच्या अनुषंगाने आणखी एक सूचना : वृत्तबद्ध काव्यलेखनात शुद्धलेखनाचे नियम नेहमीच गद्यासारखे लावता येत नाहीत. वृत्तपूर्तीसाठी कधीकधी शब्द निराळ्या पद्धतीने लिहिले जातात. (पुलस्तिंच्या गझलेत काही विरामचिन्हांच्या जागा बदलायला हव्या आहेत). तर वृत्तबद्ध लेखनाची किमान तोंडओळख असणार्या व्यक्तींकडे त्यांचं मुद्रितशोधन सोपवावं.
आनंदयात्री (आणि उल्हास भिडे),
आनंदयात्री (आणि उल्हास भिडे), चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. योग्य तो बदल केला आहे.
आधी लिहील्याप्रमाणे, अंकातल्या राहून गेलेल्या चुका दुरुस्त करणे चालू आहे.
धन्यवाद.
Cindy dhanyavaad.
Cindy dhanyavaad.
Maitreichya adhichya muddyanchya anushangane asa suchavavasa vatata ki Diwali ankasathi ek roll-over committee theva. Samaja 8 sabhasad asateel tar tyatale 4 rahteel ani 4 navin yeteel. Pudhachya varshi june 4 jaun navin char yeteel. Ashani navyana sandhi milel ani junyancha anubhav milel. Ani Diwali ankachi tayari nidan 3 mahine adhi suru vhavi.
Lekh nivadikarata honara
Lekh nivadikarata honara matdaan adhik unbiased vhava mhanun alelya sahityala 1 te 10 chya scale var gun dyave. Tyatil sagalyat jast ani sagalyat kami gun kadh u n takave. Uralele gun add karavet (nivadanare kami jast honar asateel tar sarasari kadhavi).
लेखांवरती कमी प्रतिक्रिया
लेखांवरती कमी प्रतिक्रिया येणे हा माबो दिवाळी अंकाचा एक मोठा प्रॉब्लेम आहे असे मला वाटते. हेच लेख गुलमोहरात असते तर कितीतरी जास्त चर्चा-वाद झाले असते. लेख लिहिण्यात, वाचण्यात-प्रतिक्रिया येण्यात- देअर इज डेफिनेट्ली सम काईंड ऑफ इनर्शिआ!
लेखांवरती कमी प्रतिक्रिया
लेखांवरती कमी प्रतिक्रिया येणे हा माबो दिवाळी अंकाचा एक मोठा प्रॉब्लेम आहे असे मला वाटते.>>
हे म्हणजे गुलमोहरात कथा, कविता देणा-याने माझ्या लिखाणावर प्रतिक्रिया का येत नाहीत अशी काळजी करण्यासारखं झालं.
त्याला / तिला काय सांगतात तेच इथं पण लागू होत नाही का ?
एकदा दिवाळी अंकात लेख दिला ना, मग त्यावर प्रतिक्रिया आल्या काय , न आल्या काय , काळजी का करायची ?
<<.... प्रतिक्रिया आल्या काय
<<.... प्रतिक्रिया आल्या काय , न आल्या काय , काळजी का करायची ? >> मलाही असंच कांहीसं वाटायचं. पण 'कार्टूनीं'ग वरच्या एका छान पुस्तकातल्या एका वाक्यानं हा माझा गैरसमजच आहे हें माझ्या लक्षात आलं - ' कोणत्याही कलाकृतिला इतरानी ती पाहिल्याशिवाय पूर्णत्वच येत नाही ' !!
एका प्रतिष्ठित दिवाळी अंकात
एका प्रतिष्ठित दिवाळी अंकात आपले साहित्य येणे यापेक्षा आणखी काय हवे? प्रतिक्रिया मिळत नाहीत म्हणून साहित्य नाही हा मुद्दा मला तरी पटला नाही.
भाऊ तुमचं म्हणणं बरोबर असून
भाऊ तुमचं म्हणणं बरोबर असून चालणार नाही, तर ते तसं तज्ञांना वाटायला पाहीजे.
नाहीतर नव्याने आलेल्यांना एक नियम आणि "आपल्या" उपक्रमांना एक असं होईल. पुन्हा मग लोकांना उपक्रम "आपले" वाटत नाहीत यावर चर्चा होत राहतील.
सिंडरेला, प्रतिक्रिया नाहीत
सिंडरेला, प्रतिक्रिया नाहीत म्ह्णून साहित्य नाही असे मी म्हणत नाहीये, गुलमोहरात ज्या हिरिरिने प्रतिक्रिया येतात तो जोर, तो उत्साह दिवाळी अंकात मला तरी दिसत नाही एवढेच.
आगाऊ, त्यासाठी दिवाळी अंकातलं
आगाऊ, त्यासाठी दिवाळी अंकातलं साहित्य (तशा नावाच्या ग्रूपने) नवीन साहित्यात दिसण्याची सोय करता येईल का असा एक प्रस्ताव आला आहे.
संपादक मंडळाचे आणि
संपादक मंडळाचे आणि संबंधितांचे हार्दिक अभिनंदन, मुखपृष्ठ छान आकर्षक आहे
आमच्या सारख्या अ.ब.चौ मधे चकरा मारणार्यांना विचारा, अंक नक्की कधी येणार हे वितरकांना सुद्धा नक्की माहिती नसते ...
Pages