अभिप्राय

Submitted by संपादक on 3 November, 2013 - 16:47

आमच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

हितगुज दिवाळी अंक २०१३चं संपादक मंडळ स्थापन झाल्यापासून अंक प्रकाशित होईपर्यंतच्या काळात आम्ही खूप काही शिकलो. बर्‍याच अनुभवांची शिदोरी आम्ही आयुष्यभरासाठी बांधून घेतली आहे.
आमची ही निर्मिती तुमच्या पसंतीस कशी उतरते आहे याबद्दल आम्हांला खूप उत्सुकता आहे. तुमच्या सविस्तर अभिप्रायांचं इथे स्वागत आहे.

अंकातील प्रत्येक लेखावर प्रतिसाद देण्याचीही सोय आहे. ते सर्व प्रतिसाद या दुव्यावर पाहू शकता: http://vishesh.maayboli.com/navinlekhan

हितगुज दिवाळी अंक २०१३

अंक प्रकाशित झाल्याचे मायबोलीच्या पहिल्या पानावर कुठेच दिसत नाहीये.. अभिप्रायची लिंक वर आल्यावरच कळाले.. मायबोली विशेष मध्ये पण २०१२ पर्यंतचे अंक दिसत आहेत. कुठेतरी मुख्यपानावर, नवीन लेखनाच्या पानावर दिवाळी अंकाची लिंक द्या की हो अ‍ॅडमिन....

मुखपृष्ठ एकदम प्रसन्न आहे.. आणि लेआउट पण मस्त दिसतोय... सध्या नुसताच चा़ळलाय अंक.. हळू हळू वाचून होईल तसा अभिप्राय देतोच आहे..

संपूर्ण अंक वाचनीय आणि सजावटही देखणी !
संपादक मंडळाचे अभिनंदन आणि आभार .
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा .

स्वतःच्या वैयक्तिक व व्यावसायिक जबाबदार्‍या संभाळून स्वेच्छेने असल्या उपक्रमाचं काम अंगिकारणं व किमान वेळात तें नेटकेपणानं पार पाडणं हेंच मुळांत कौतुकास्पद. छान, सुबक अंकाबद्दल संपादक मंडळाचं अभिनंदन, त्याना मनापासून धन्यवाद व शुभेच्छा.

आश्चिग (आशीष महाबळ),
लिनस पॉलींगची बायको, हेलेन पॉलींग, हिला पित्ताशयाच्या cancer झाला होता. prostate cancer बायकांना बहुदा होत नसतो, रे बाबा!! त्यांना prostate glands च्या ऐवजी Skene's gland असतात.
>>>

ते बहुतेक आशिषने मुद्दामच केले असावे Wink कितीही मोठ्या (कर्तुत्व/वय इ.) माणसाने जरी सांगितले तरी शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवू नये हे विधान ठसवण्यासाठी Proud

अंक वाचतोय.

संपादक मंडळाने व्याप सांभाळत कष्ट घेवून प्रकाशित केलेल्या अंकाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

टण्या Lol

संपादक मंडळी धन्यवाद, आभार आणि अभिनंदन. अभिनंदन इतका देखणा अंक दिल्या बद्दल !धन्यवाद आणि आभार माझा लेख (स्टेम सेल थेरपी- बाजारातल्या तुरी) दिल्याबद्दल. शास्त्रीय विषयावर मराठीतून लिहिणं अवघड. तसा थोडाफार अनुभव होता पण. ह्या लेखाच्या बाबतीत संपादक मंडळाने लेख परत पाठवून मौलिक सूचना केल्या, त्यामुळे तो समतोल झालाय हे नक्की. या दिवाळी अंकातली व्यंग चित्रे तर खासच आहेत. वेगळे पणा म्हणाल तर "अभिव्यक्ती" हा विभाग! भन्नाट कल्पना आहे यार हो ! मी हा प्रयोग (काव्य वाचन) केलाय, तो यु-ट्युब वर टाकलाय, पण दिवाळी अंकात ? त्या साठी खास अभिनंदन. नाम सदृष्यामुळे माझ्या लेखा बाबत ज्यांच्या कडे विचारणा झाली ते अशोक (पाटील) यांचा लेखही (वन फ्लू ओव्हर कक्कोज नेस्ट) मला खास आवडला. त्या लेखानं मला भूतकाळात नेलं , कारण त्या कथेवर आधारीत "आकाश-पक्षी" हे नाटक आम्ही केलं होतं आणि त्या निमित्तानं हा चित्रपट चार वेळा पाहण्यात आला होता. डॉ. शेखर कुलकर्णी ची ओळख होती आधी. हा माणूस दरवेळी स्वत:ची वेगळी ओळख समोर आणतो. (हिलींग हार्मनी) हॅट्स ऑफ टू यू मॅन !

अंक आणि सजावट आवडली. साधी, सुंदर मांडणी. >>> अनुमोदन..
वाचायला छान वाटतोय..

धन्यवाद संपादक मंडळ Happy

संपादक मंडळाचे दिवाळी अंकाबद्दल आभार. दिवाळी संवाद आणि अभिव्यक्ती हे दोन विभाग वाचून पूर्ण झाले आहेत आणि आवडले. बाकीचेही वाचून होईल तसतश्या प्रतिक्रिया नोंदवीनच.

मात्र ह्यावेळची अंकाची मांडणी आणि एकूणच सजावट, रंगसंगतीसकट आवडली नाही. संपादकीयातही स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा उल्लेख करुन त्या अनुषंगाने भविष्यकालाबद्दल टिप्पणी जरा far-fetched वाटली. जरा ओढून ताणून आणल्याप्रमाणे.

स्वाती_आंबोळे आणि बाकी मायबोलीकर,
अंकातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. शक्य होईल त्याप्रमाणे राहिलेल्या त्रुटी आम्ही दूर करतो आहोतच. अजूनही कुठे अश्या दुरुस्त्या आवश्यक वाटल्यास नक्की लिहा. सविस्तर लिहिलेत तर या दुरुस्त्या करणं आम्हाला सोपं जाईल.

सगळे व्याप सांभाळून, आपलेपणानं मायबोलीच्या दिवाळीअंकाचं काम करणार्‍या सगळ्यांचं अभिनंदन! >>>> +१००...

सगळे व्याप सांभाळून, आपलेपणानं मायबोलीच्या दिवाळीअंकाचं काम करणार्‍या सगळ्यांचं अभिनंदन!
>>+1

अभिनंदन संपादक मंडळ. काल फोनवर चाळून झाला अंक. Happy व्यवस्थित नेट अ‍ॅक्सेस मिळत नसतानही अंक चाळता आला हे खूपच आवडलं. नाहीतर दर वर्षी गावाहून परत आल्याशिवाय अंक बघायला मिळत नाही.

आता आज-उद्यामध्ये निवांतपणे वाचेन.

हा माझ्या आठवणीप्रमाणे पहिलाच अंक ज्याने नरक चतुर्दशीला प्रकाशनाचा प्रघात मोडला, इतकेच नव्हे तर विचारणा होऊ लागल्यावरही उत्तर आले ते प्रशासकांकडून, संपादक मंडळाने काही तांत्रिक अडचण असल्यास तसे सांगायला हरकत नव्हती, ती समजून घेण्याचे सौजन्य वाचकांनी दाखवली असते की! बरं, दोन दिवस उशीरा अंक प्रकाशित करताना निदान दिलगिरी तरी व्यक्त केली असती तरी इतके खटकले नसते.

मुखपृष्ठाची निवड करतानाही छायाचित्र निवडावे लागावे? अगदी हाती काढलेले मनाजोगते चित्र नसले तरी फोटोशाॅप किंवा तत्सम प्रणाली वापरून उत्तम डिजिटल चित्र काढू शकणार्या मायबोलीकरांचीही कमतरता नाही. मांडणी, सजावट, रंगसंगती आवडले तर नाहीच, शिवाय त्यात काही नाविन्यही नाही.

'स्वतःच्या वैयक्तिक व व्यावसायिक जबाबदार्‍या संभाळून स्वेच्छेने असल्या उपक्रमाचं काम अंगिकारणं व किमान वेळात तें नेटकेपणानं पार पाडणं' याबद्दल वर काही जणांनी लिहिले आहे जे अगदी खरेही आहे, फक्त ते केवळ या खेपेचे मंडळ नाही तर दर वर्षीच्या संपादक मंडळाला हे लागू होते आणि तरी अंक वेळेेवर प्रकाशित होतो.

मला तोंडापुरती स्तुती जमत नाही आणि मंडळ ाने घेतलेल्या कष्टांची कल्पना नाही असे तर अजिबातच नाही. कोणा एकाला उद्देशून हे नाहीही.

पण काहीही स्पष्टीकरण न देता प्रघात मोडून वाखाणण्यासारखे काही पदरी पडले तर बंड करण्याला अर्थ असतो.

वरील सर्व वैयक्तिक मत आहे.

प्रिया,
तुम्ही लिहीलेल्या बाकी मुद्यांवर मी काही लिहू शकत नाही. एखाद दोन दिवस उशीर होण्यामागे काही तांत्रिक कारणे असतील जी मला माहित नाहीत.
मात्र तुमच्या "मुखपृष्ठाची निवड करतानाही छायाचित्र निवडावे लागावे?" या आक्षेपाबद्दल लिहावेसे वाटले. याचे प्रमुख कारण मी प्रकाशचित्रकार आहे. मुखपृष्ठावर वापरलेले चित्र माझे आहे हे दुय्यम कारण. पण तिथे इतर कोणाचेही प्रकाशचित्र निवडले गेले असते तरिही मी ही प्रतिक्रीया दिली असती.

'मुखपृष्ठ आवडले नाही' असे म्हणालात तर नक्कीच चालेल. त्याबद्दल प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असू शकते , किंवा चित्रात काही त्रुटी/ चुकाही असू शकतात. मात्र मुखपृष्ठ हे केवळ प्रकाशचित्र आहे म्हणुन आक्षेप आहे त्यासाठी हा प्रतिक्रीया प्रपंच.

एखाद्या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशचित्र निवडावे लागणे हे इतके वाईट आहे असे तुम्हाला का वाटले ते कळले नाही. चित्रकला, रेखाचित्रे, शिल्पकला या जशा कला आहेत तसेच प्रकाशचित्रण ही एक दृश्यकला आहे.

कला म्हणजे कलाकाराची अभिव्यक्ती. अभिव्यक्ती करण्याचे माध्यम कुठलेही असू शकते. चित्रकार रंग हे माध्यम घेतो, मूर्तीकाराला ओली माती हे एक आव्हान वाटत असेल तसेच प्रकाशचित्रकाराला प्रकाश, त्यातून निर्माण होणारे अनेक आकार , दृश्य हे आव्हानात्मक वाटते. प्रकाशचित्रण म्हणजे प्रकाशाने चित्र काढणे असे मी मानते. त्याला इतर कलांपेक्षा कमी लेखण्याचे काही कारण नाही. उलट मी तर म्हणते की इतर कुठलेही कलामाध्यम जसे पेन्सिल, रंग , ओली माती सामान्य माणसे सहजपणे हाताळत नाहीत / हाताळू शकत नाहीत जितका कॅमेरा सहजपणे हाताळला जातो.

आता तुमच्या " फोटोशाॅप किंवा तत्सम प्रणाली वापरून उत्तम डिजिटल चित्र " या मुद्याबद्दल. मुखपृष्ठावर वापरलेले चित्र हे एकच प्रकाशचित्र नाही. तर अनेक प्रकाशचित्रांचे कोलाज आहे. त्या अर्थी त्याला डिजीटल चित्र म्हणालात तरी वावगे ठरत नाही.

सावली, सर्वप्रथम एक खुलासा- ते छायाचित्र वाईट आहे असे मी म्हटले नाही, तसेच ते कोणाचे आहे, कोलाज आहे का वगैरै गोष्टी पाहूनही ते लिहिलेले नाही. पण आजवर मुद्दाम एखाद्या मायबोलीकराकडून चित्र काढून घेतले गेले तोही प्रघात मोडला एवढेच मला म्हणायचे होते, व्यक्तीशः तुम्हाला दुखावण्याचे काही कारणही नाही हेतू तर नव्हताच.

बाकी छायाचित्रण ही कला आहे याबद्दल मी पूर्णपणे सहमत आहे. पण कॅमेरा सहजपणे हाताळला जाणे आणि उत्तम प्रकाशचित्र काढता येणे, सहजपणे हाताळताना कॅमेराची जाण असणे या अगदीच भिन्न गोष्टी आहेत असा निदान माझा अनुभव आहे.

तुम्हीच विषय काढला आहे म्हणून आता सांगू इच्छिते की इतरांची याहून अनेकपटीने सरस छाचाचित्रे मायबोलीवरच असंख्य वेळ ा पाहिली आहेत.

प्रिया,

तुम्ही व्यक्तीशः मला दुखावले असे मी म्हणाले नाहीये. मी माझ्या पहिल्याच प्रतिसादात लिहीलेय की कोणाचेही प्रकाशचित्र असते तरी मी हीच प्रतिक्रीया दिली असती.

<<मुखपृष्ठाची निवड करतानाही छायाचित्र निवडावे लागावे? >> या वाक्यावरुन तुम्हाला प्रकाशचित्र कोणते आहे यापेक्षाही मुखपृष्ठ हे 'प्रकाशचित्र' आहे याबद्दल आक्षेप आहे हे सरळ आहे. तेवढ्या आणि तेवढ्याच गोष्टीबद्दल माझी प्रतिक्रीया आहे.
कॅमेर्‍याची जाण असणे वगैरे गोष्टी इथे येण्याचा काही प्रश्नच नाहीये.

<<<पण आजवर मुद्दाम एखाद्या मायबोलीकराकडून चित्र काढून घेतले गेले तोही प्रघात मोडला एवढेच मला म्हणायचे होते>> असला काही प्रघात वगैरे माझ्या पहाण्यात तरी नाही आला. २०१०चे मुखपृष्ठ इथे पहा.
http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2010/index.html

हे ही प्रकाशचित्रच आहे. ते कोणी काढले ते मात्र मला माहित नाही.

<<इतरांची याहून अनेकपटीने सरस छाचाचित्रे मायबोलीवरच असंख्य वेळ ा पाहिली आहेत.>> अर्थातच!! मी कधीच म्हणाले नाही की माझे प्रकाशचित्र चांगले आहे. उलट मी वर माझ्या पोस्टमधे म्हणालेय की 'मुखपृष्ठ आवडले नाही' असे कोणीही म्हणु शकते.

फोटो चांगला आहे. पण दिवाळी अंकाचे कव्हर म्हणून काहीतरीच वाटतोय. साधंसुधं पण बोलकं कव्हरपेज आवडलं असतं.

उशीर झाला तर बिघडलं कुठं. अ‍ॅडव्हान्स घेऊन टाका परत.
त्यांना वेळ मिळाला नाही. मी तर म्हणेन थोडा आणखी उशीर झाला असता तर चाललं असतं. दिवाळी अंक दिवाळीनंतर प्रकाशित झाला तर बिघडलं कुठं ? गेले ते दिवस जेव्हां परंपरेच्या नाड्या ओवून संस्कृतीचे पायजमे शिवले जात. आता बर्म्युडा शिवाय कुणी फिरतं का ? आणि भारतीय वेळेनुसार पहाटे उठायला भारतात राहतं कोण ? एकूण एक विद्वान आणि विचारवंत तर भारताबाहेर !

अंक वाचत आहे. संपादक मंडळाचे प्रथमतः आभार.
सावली, तु काढलेली छायाचित्रे उत्तम असतात. किंबहूना , प्रिया म्हणते त्या "सरस छायाचित्रे काढणारे मायबोलीकर" या कॅटेगरी मध्ये तु येतेस. मुखपृष्ठामध्ये बहुदा तुला तुझे पोटँशिअल पुर्णपणे वापरता आले नसावे अस वाटल.

Ank ajun vachat aahe. Je avadalay tithe abhipray dila aahe. Pan 'Bhavishyateel eke divashi' ya kavitecha ani 'vedh bhavishyacha' yancha sheershaka vyateerikta kaay sambandh? Te kalala nahi.

२०१२ च्या अंकावर अभिप्राने चित्र काढलं होतं जे अप्रतिम आणि हटके होतं. त्या तुलनेत ह्या वर्षीचं मुखपृष्ठ अगदी यथातथाच आहे.

Pages