निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंब्याचे कलम! मस्तच!

माझ्या मामांच्या गावी नर्सरी आहे हापूस कलमांची. तिथे रुजलेल्या कोयींपासून उगवलेल्या झाडाला छाटून तिथे हापूस आंब्याची डहाळी सेलोटेपसारख्या पट्टीने चिकटवतात.

हापुसचे कलम असेच करतात गमभन. या झाडांमध्ये कॉस-पोलिनेशन इतके जास्त असते की हापुसची बी लावली तरी त्याला हापुसचे आंबेच लागतील याची खात्री नसते म्हणुन कलम करावे लागते असे सांगितले गेले. पण ही भानगड मला नीटशी कळली नाही. कोणी जाणकार अजुन नीट उलगडुन सांगेल तर बरे होईल

जागू, मस्त कलम कसे करतात त्याचे फोटो टाकलेस त्याबद्दल. सासरी माझ्या हापूसची झाडे आहेत, देवगड तालुकाना आमचा, तिथला हापूस फेमस. मी स्वतः अजूनही कलमे कशी करतात ते बघितले नाही, मध्यंतरी माझ्या नवऱ्याने मला तोंडी कृती सांगितली पण एवढे लक्षात नाही आले आता तू दिलेला फोटो बघून डोक्यात प्रकाश पडला.

व्वा! जागु मला कोकणची आठवण झाली. माझे वडील असेच काही काही कलमे करत असायचे. ते असंच माती थापून बांधून ठेवलेल असायच. Happy

हे माझ्या कडे पण मागील आठवड्यात फुललेले. पण हल्ली ते फुलणे म्हणजे नेहमीचेच झाल्यासारखे वाटते. Happy

पण हल्ली ते फुलणे म्हणजे नेहमीचेच झाल्यासारखे वाटते.>>>>>>>>>मी पण आज कळी पाहिल्यासारखे वाटले. पण घाइत होते म्हणून "नसेल" असं म्हणून सोडलं. आता घरी गेल्यावर बघतेच. Happy

वा, बरीच फुले फुललेली दिसताहेत ....

सध्या पुणे परिसरात झिनिया / झेनियाही बरेच ठिकाणी फुललेली दिसतात .... (सर्व फोटो आंतरजालावरुन साभार ....)

stock-footage-zinnia-flower.jpgzinnia.jpgzinnias-flowersexpert-advice--------gardening-is-about-surprises----city-garden-ideas-mqfh54zk.jpg

वा शशांकजी, मस्तच.

आज वसुबारस, आपली दिवाळी खरी आजपासून सुरु. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्व निगकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! Happy
ही दिवाळी आपणा सर्वांना शांततेची, सुखाची, आनंदाची, आणि निसर्गमय जावो! Happy

http://www.maayboli.com/node/46105

शशांक, फोटो दाखवून मला डिवचलेय बरं का. आता मुद्दाम त्या बागेसाठी जाईन Happy

जागू, उद्योगी बाई आहेस !

साधना,

बाकी विषयांत सोडून दे. जंगलाच्या संबंधात एकदोन बाबी बघू.
त्यांनी वसाहत केली त्या काळात, त्यांच्याकडे साग नव्हता आणि भारतात तो उत्तम होता. त्यासाठी विविधता असलेली जंगले नष्ट करुन तिथे त्यांनी सागाची लागवड केली. लाकडासाठी चांगला असला तरी साग उन्हाळ्यात कुचकामी असतो. सगळी पाने गळून गेल्याने अजिबात सावली देत नाही तो. याच काळात जांभळी / आंबा पाने राखून असतात. उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या प्राण्यांना थोडाफार निवारा मिळतो.
सागाची पाने मोठी असल्याने आणि त्यांना जाळी पडत असल्याने ती झाडाखालीच साचतात. वणवे पसरायला मोठा हातभार लागतो त्यांचा. असे वणवे विझवायला वनकर्मचारी जांभळाच्या फांद्या वापरतात. पण सागाची एकसूरी लागवड करताना, मूळ झाडे राखावी याचे भान अजिबात राखले नाही.

आणि दुसरी बाब शिकारीची. इंग्रजांकडे बंदुका होत्या. त्यानी वाघाची / चित्याची शिकार करणे फार मर्दुमकीचे नव्हते. चित्ता तर मोकळ्या मैदानातच सावजाचा पाठलाग करून शिकार करत असे. त्यामूळे तो जास्त काळ बंदुकीच्या टप्प्यात असे. आणि त्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानणार्या आपल्या संस्थानिकानी शिकार हा स्पोर्ट ( गेम ) म्हणून स्वीकारला. चित्ता तर १९४८ सालीच नामशेष झाला आणि त्याकाळात केवळ दोन महाराजांनी शिकार केलेल्या वाघांची संख्या आज पूर्ण भारतातल्या वाघांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. चित्ता नष्ट झाल्याने कुरुंग वर्गातील तृणभक्षी प्राण्यांची संख्या अतोनात वाढलीत आणि आज ते शेतीवर हल्ला करतात. ( सलमान खान फेम ) काळवीट पण याच वर्गातले आहे.

काही इंग्रजांनी इथल्या जंगलांचा / लोकांचा उत्तम अभ्यास केला हे निर्विवाद पण कंपनी सरकारचा हेतू उद्दात वगैरे अजिबात नव्हता.

आमच्याकडे आता उन्हाळ्याची सुरवात. आणि अर्थातच आंब्याचे दिवस.
इथल्या वाळवंटात हि आंब्याची झाडे कुणी मुद्दाम लावली असतील याची शक्यता कमीच आहे. यांची कुणी
काळजीही घेत नाही. पण फळे मात्र भरपूर लागतात. मुद्दाम वाळवंट दिसेल असा फोटो घेतलाय.

जरा जवळून

आणखी जवळून

वरचा फोटो बघून जर तोंडाला पाणी सुटले नसेल तर माझ्या हातचा साखरांबा बघून नक्कीच सुटेल !

आंब्याच्या जवळच पण वाळवंटातच ही फुले पण होती. टिपीकल जास्मिन कूळाचा सुगंध. ~
पण कुंदाचा असतो तसा वेल नव्हता.

जरा जवळून

आणखी एक !

आमच्याकडे रानचवळीच्या पानात नवी नक्षी दिसल्याचे मी मागे लिहिले होते. तशीच नक्षी मला या माठ - तांदुळजा वर्गातल्या रोपट्याच्या पानावर पण दिसली.

आणखी जवळून.

माझ्या घरी पण लाल माठ मस्त वाढला होता.

पाने बघा कशी तेजस्वी दिसताहेत.~

कालच भाजी केली होती.

इन्विटेशन लेटर भेजो.. दिनेश.. हम आ रहे हैं... Happy

कालच भाचा , बायको, २ पोरांसकट केनिया ला पोचलाय.. ४ दिवस तिकडे राहून युगांडाला जातोय.. सासरी... Happy Happy

वॉव दिनेशदा काय सदाफुली फुललीये!
गेल्या वीकान्ताला आम्ही मुक्काम पोष्ट कशेळी.........
कशेळीच्या कनकादित्य मंदिरापासून ते नवरोबांच्या मामांच्या घरापर्यंत जायला १५/२० मि. लागतात.
तोच हा रस्ता. खालील सर्व फोटो याच रस्त्यावरचे आहेत.
खूप मज्जा येते या चढ उताराच्या रस्त्यावरून जाताना. असंख्य प्रकारचे पक्षी दिसतात.


या सीझनला जिकडे नजर टाकाल तिकडे भातशेती दिसते. आणि याच्यामधूनच बनवलेल्या फरसबंदीवरून जावे लागते. इथेच परवा एक अगदी जायंट साइझ बेडुक दिसला होता. काय पर्सनॅलिटी होती!


मामांचं घर

वर्षू, अब देर किस बात कि.. सॅक भरायची आणि निघायचे.
मानुषी, अगदी आपल्या भाऊ नमसकरांच्या चित्रात दिसते तसे आहे हे.

Pages