निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, बुलबुल बाळे अगदि बाळसेदार आहेत. तिट लाव त्यांना. Wink
रच्याकने हि कितवी पिढी ?
जो_एस मस्त कविता.
दिनेशदा, खरंय आमच्या लहानपणी डाळीम्बे नव्हती.
काजू, फणस, आंबा, अननस, पपनस, करवंदे, चाराबोरं (चारोळ्या) नीव, रामफळ, शहाळी ईत्यादि अगदि मुबलक खाल्लय. त्यामुळे आमचं बालपण अगदि एका अर्थाने श्रिमंती थाटात गेलंय हे आत्ता कळंतय. Proud
एकिकडे ह्याचं समाधान तर हे माझ्या मुलाला मिळत नाही ही खंत ही वाटते. Uhoh

मानुषी, हे देऊळ असेच राहिले पाहिजे. नूतनीकरणाच्या नावाखाली बहुतेक देवळांना भडक ऑईलपेंटने रंगवलेले दिसते कोकणात.

हो प्रज्ञा, मी पण अगदी हिच यादी दिली असती. इंदूरात गेलो होतो तर डोंगरी आवळ्याची / कवठाची झाडे पण
भरपूर दिसली. ती पण नव्हती आपल्याकडे.

वर्षू, खोटे वाटेल पण माझ्या ( आणि कदाचित शोभा / प्रज्ञाच्याही ) लहानपणी कोकणात डाळींबाची झाडेच नव्हती. >>>>>>>>>>हो दिनेशदा. हे फळ आम्ही इथे पुण्यात आल्यावरच प्रथम पाहिलं.

अगदी खर आहे दिनेशदा, करवंदे जालितून तोडून खायला काय मज्जा येते , ती विकत घेऊन खाण्यात नाही>>>>>>>>>>>>काय रम्य आठवणी आहेत त्या. जाळिवरच करवंद खाउन बघायच गोड लागल तर सगळी जाळी संपवायची नाहीतर दुसरी जाळी पकडायची. किती काटे लागायचे, शरीरावर ओरखडे यायचे पण करवंदे खायचोच. कित्येक तास हा कार्यक्रम चालायचा. तिथे असताना, कधी वाघ, किंवा हिस्र श्वापद येईल ही भितीही वाटली नाही. खूप मज्जा केली आम्ही बालपणी. Happy (गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. Sad )

मी गेलेय ह्या मंदिरात. खुप छान वाटलेले. आम्ही गेलेलो त्याच्या आदल्या दिवशी कसलातरी उत्सव होता. दुस-या दिवशी सुर्याचे मुखवटे आणि इतर ब-याच गोष्टी स्वच्छ धुवून विहिरीशेजारीच वाळत घातलेल्या. मस्त वाटले ते बघायला.

काजू, फणस, आंबा, अननस, पपनस, करवंदे, चाराबोरं (चारोळ्या) नीव, रामफळ, शहाळी ईत्यादि अगदि मुबलक खाल्लय. त्यामुळे आमचं बालपण अगदि एका अर्थाने श्रिमंती थाटात गेलंय हे आत्ता कळंतय. >>>>>>>>>व्वा! ताईसाहेब अगदी हेच लिहीणार होते मी. सगळ चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.

अजून, ओवळदोडे (बकुळाची फळे), आटकं, करांदे, भुईमुळे हे माझ्याकडून. Happy

जागु, तुझी नातवंड छान आहेत ग. बारसं कधी आता? Happy

शोभा, तू नेहमी माझ्या आधी सर्व लिहून टाकतेस, आणि मला नुसत वाचण्यावर समाधान मानावं लागतं, म्हणून तू येण्यापूर्वी आठवले तेवढे लिहिले. : फिदी:
ओवळदोडे (बकुळाची फळे), आटकं, करांदे, भुईमुळे हे मी विसरलेच होते Happy

काल कडुलिंबावरून काहीतरी वेगळाच कर्कश्य आवाज आला. पटकन लक्षात आलं की हा नेहेमीचा पक्षी नाही.
पळत जाऊन पाहिलं तर एक जोडी लिंबावर बसलेली. नाहीच कळलं कोणता पक्षी ते. चोच थोडी लांब आणि बाकदार. राखाडी रंग. भारद्वाजापेक्षा मोठा. मी गच्चीत गेले तर दोघेही उडून गेले. चांगले लांब मोठे पंख होते. हॉर्नबिल नक्की नसावा. (आमच्या नगरात ?)खूप चुटपुट लागली. >>>>
मानुषी - तो हॉर्नबिलच आहे - हा बघ - इंडियन ग्रे हॉर्नबिल - याला ती टिपिकल चोचीवरची चोच नसते पण हा हॉर्नबिलच .... Happy

indian_grey_hornbill_0.jpg

मानुषी,
घरात लुई असूनही पक्षी येतात म्हणजे एकतर त्यांना लुईची भिती वाटत नाही किंवा त्यांना माहीत आहे कि तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पक्ष्यांचा घरटे बांधण्यापुर्वी बराच सर्व्हे झालेला असतो.

मानुषी, काल आमच्या सोसायटीतही हॉर्नबिलची जोडी आली होती सकाळी ७.३० च्या सुमारास. छान योगा योग म्हणायचा Happy गंमत म्हणजे माझ्या नवर्‍याच लक्ष गेल आणि त्याने हाक मारुन मला दाखवली. जनरली त्याच या सगळ्यांकडे लक्ष जात नाही. नाही म्हणायला एक मात्र खर की कुंड्यामधे मी झाड लावते आणि तो न चुकता सकाळ संध्याकाळ त्याना पाणी घालतो. मला कधी पाणी घालाव लागत नाही.

शशांक दिनेश स्निग्धा जो एस धन्यवाद! :स्मितः
हॉर्नबिलच असावेत ते. खूप कर्कश्य ओरडतात ना?
हो लुई महाराज आता ८ वर्षाचे (म्हणजे ४०+) आहेत ना! भरपूर खाऊन पिऊन दिवसभर झोपा काढतात. घरातली माणसं बाहेर जाताना दिसली की खूप डिमांडिंग ओरडून घरात येण्यासाठी हट्ट करतात.
बाकी घर राखण इ.इ. त्यांचं काम कधीच नव्हतं. फक्त संध्याकाळी टाइम पास म्हणून आवारातून फिरणार्‍या मांजरांवर जीव ठेऊन ओरडतो.
आणि दर शनि. सकाळी गल्लीतल्या दोन मारवाड्यांकडे येणार्‍या जैन मुनींवरही! आज झाला तो सोहळा!
आणि आवार खूप मोठं आहे आणि कडुलिंब उंच. त्यामुळे खूप पक्षी येतात.
>>>>>>>>>>>नाही म्हणायला एक मात्र खर की कुंड्यामधे मी झाड लावते आणि तो न चुकता सकाळ संध्याकाळ त्याना पाणी घालतो. मला कधी पाणी घालाव लागत नाही.>>>>>>>>>>>>> स्निग्धा..........ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या.........................

आत्ता माझ्या घराजवळ खारिताइम्चि मैफिल रंगात आले। कोक्नातातरी आगम्य राग आळवतायत:) आता फारच कर्कश्य ।

आता फारच कर्कश्य ।>>>>>>>>>>अग, नक्किच झाडाखाली मांजर असणार. (अनुभवाचे बोल. म्हणजे झाडाखालची मांजर मी नव्हे. :फिदी:) फारच कर्कश ओरडत असतात. Uhoh

माझ्या इमारतीमागे आठ दहा झाडं आहेत मोठीमोठी. मला त्यात भारतीय झाडं वाढवायची आहेत. आंब्याचं झाड कसं लावायचं? आणि छान वास असलेलं बुचाचं किंवा बकुळीचं? आणि जाईचं रातराणीचं लावता येईल का? कुठे मिळेल>

Do insects sneeze, cough or hiccup ?

That's funny to think about, but the answer is no. All of those reactions take place only in breathing systems that are similar to ours. Insects breathe through tiny holes in the skin, so they have no reason to sneeze, cough, or hiccup.

(असेच अजून गंमतीशीर प्रश्न आणि त्यांची उत्तरे इथे मिळतील - http://www.highlightskids.com/science-questions/archives )

हे अजून एक त्यातलेच ........

Why aren't spiders insects ?

We use different names for spiders and insects because it's useful to have names that tell how living things are related to one another. Both spiders and insects (and crabs and lobsters and many other creatures) are called arthropods. That’s the group of animals that have the skeleton on the outside of the body and the body and legs divided into segments.

Among the arthropods, some animals are more closely related to one another than to others. So we have a name for creatures with three body parts and six legs: insects. And we have another name for those that have two body parts and eight legs: spiders.

sq0906_why-aren't-spiders-insects_main.jpg

सुप्रभात निगकर्स!!

शशांकदा, मस्त माहिती देत आहात. Happy

लोक्स.. आज सकाळला आलेली ही 'मिकानियाबद्दलची' बातमी वाचलीत काय?
http://epaper3.esakal.com/12Nov2013/Normal/PuneCity/Pune1Today/page3.htm

वल्लरी, कुठे असता ?
मुंबई / पुण्यात ही झाडे सहज मिळतील.

आम्हाला २ दिवस रजा होती. कॉलनीच्या आजूबाजूच्या जंगलात भटकून बर्‍याच कैर्‍या गोळ्या केल्या.
अगदी प्रत्येक झाडाच्या कैरीची चव बघून ! चांगलं वय वाढलं तरी असला बालिशपणा माझ्याकडून नेहमीच होतो. गोव्याला असताना, मायबोलीकर गिरीराज पण माझ्या असल्या उद्योगात साथ देत असे.

मी जंगल / जंगल म्हणतोय खरा. पण हा गवताळ प्रदेश आहे. अशा जंगलात हरवायची शक्यता नसते.
आपली नजर दूरवर पोहोचते. पण शिकारी प्राण्यांना मात्र दबक्या पावलांनी वावरावे लागते.
या अशा गवताळ प्रदेशामूळेच मानवाच्या पूर्वजांना दोन पायावर उभे रहायची गरज वाटली.

शशांक, छान आहे लिंक. शांकली कुठे आहे. बर्‍याच दिवसात काही पोस्ट नाही !

शांकली कुठे आहे. बर्‍याच दिवसात काही पोस्ट नाही ! >>>> ती क्रोशामधे गुंतून गेलीये पार .... Happy Wink

आर्या, त्या बातमीशेजारचा जो फोटो आहेत त्यातले हबीब शेख, बरेचसे शशांक सारखे दिसताहेत >>>> नाही हो, ते शेख खूपच स्मार्ट आणि देखणे दिसताहेत माझ्यापेक्षा ..... Happy

मला अंगणात थोडी जागा उपलब्ध झालीये झाडे लावायला, पण ती सगळी आंब्याखालची आहे. औषधी किंवा उपयुक्त (भाज्या इ.) लावावे असे मनात आहे. काय लावता येऊ शकेल?
बेसिल इ.सारखे काही लावता येईल? बिया पुण्यात कुठे मिळतील?

हा धागा मस्त आहे.
मी तुळशीच्या मंजि-या कुंडीत पेरल्या होत्या.
तर एकदमच कुंडीत १५,२० रोपे आली. लहान रोपे तोडून दुसरीकडे लावली तर जगणार नाहीत म्हणून तोडली नाहीत.आता सर्व रोपे खूप मोठी झाली आहेत.कुंडी साधारण १ फुट लंब व अर्धा फूट रुंद आहे. तर आता त्यांना तोडून दुसरीकडे शिफ्ट करावे का? की पुरेसे पाणी,खत मिळाले तर ती एकाच कुंडीत वाढतील ?
तसेच तुळशीच्या झाडाचे आयुर्मान काय असते?

tulas.JPG

हो फोटो २ महिन्यांपुर्वीचा आहे.रोपे आता अजूनच मोठी झाली आहेत.

Pages