निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती छोटी फुले आहेत ही. निसर्गात किती विविध प्रकारची फुले, फळे, प्राणी, पक्षी असतात ना? कमाल आहे त्या निसर्गाची. Happy

माझे हे पोस्ट, संगीताबद्दल असले तरी शेवटी निसर्गापर्यंत पोहोचणार आहे Happy

ऑफिसला येताना गाडीत माझा ड्रायव्हर स्थानिक एफ एम चॅनल लावत असतो. मिना मुल्हेर असे शब्द
असलेले गाणे, बरेचदा लागते. मला ते आवडते देखील.

गेले ३ दिवस आम्ही एका झांबियन सल्लागाराला पिक अप करतोय. गप्पा मारता मारता तो म्हणाला, तूझ्या सेलफोनवर काही भारतीय संगीत असेल तर ऐकव. मी त्याला पं. शिवकुमार शर्मांचा कलावती ऐकवला, त्यानंतर पंडीतजींचा मिश्र शिवरंजनी होता. तो ऐकल्यावर मला तो म्हणाला आधीची रचना थोडी रोमँटीक होती आणि आताची जरा उदासवाणी आहे, नाही का ?
मला आनंद झाला, कारण आपल्या संगीतातले नेमके भाव त्याने ओळखले होते ( तो कॉयरमधे गातो. )
मी त्याला या दोन रागातल्या काही रचना गाऊन दाखवल्या आणि त्या रचनांचे अर्थही सांगितले. जाने कहाँ गये वो दिन.. गायल्यावर तो म्हणाला, तुझ्या लक्षात आले का, त्या मिना मुल्हेर चे सूर पण हेच आहेत. आणि त्या शब्दांचा अर्थही ( मिना मुल्हेर - माझी प्रियतमा ) पण साधारण असाच आहे. अगदी चाहे कही भी तुम रहो, तुमको ना भूल पायेंगे... पर्यंत.

मग मी त्याला माझ्या आवडत्या मल्हार रागांबद्दल सांगितले. बलमा आये रंगिले ( दुर्गा मल्हार ) घिर घिर आयी ( मियाँ मल्हार ) सारख्या काही रचना ऐकवल्या. आणि सांगू लागलो, बघ या कशा पावसाचे आगमन सुचवणार्‍या रचना आहेत. सध्या इथे ढग आलेत, मी पावसाची वाट बघतोय.. वगैरे.

तर तो म्हणाला, तु म्हणतो आहेस तसे मला काही जाणवले नाही.
मी जरा खट्टू झालो, तर त्यानेच मला नीट समजावून सांगितले. तो म्हणाला भारतात मौसमी पाऊस पडतो.
तूमची शेती, तुमचा पाणीपुरवठा सगळ्या त्याच्या लहरीवर अवलंबून आहे.

त्यामूळे पावसाने जो आनंद तूम्हा भारतींयाना होतो, त्याची कल्पना आम्हाला येणार नाही. आमच्याकडची शेती नद्यांवर अवलंबून असते. पावसावर फारच थोडी. काही ठिकाणी तर पाऊस पडतच नाही, फॉसिल वॉटर
वरच शेती होते. तू सांगतो आहेस त्या रचना, यांची सांगड तुझ्या मनात पावसाशी आणि त्या संबंधित
आठवणींशी आहे..

किती खरं आहे ना ? मल्हाराचा कुठलाही प्रकार ऐका. आपल्या मनात पाऊस दाटतोच. इतकेच कशाला नुसता
मेघ राग ऐकला तर ( मेघा बरसने लगा है आज कि रात.. चित्रपट : शक, गायिका : आशा ) तर मनात मळभ
दाटून येते.

संगीतच कशाला, कवितेतला पाऊसही आपल्याला त्याच अवस्थेत नेतो.

आणि ज्यांनी बेळगावचा पाऊस अनुभवला आहे, त्यांनाच इंदिरा संतांचा, अवेळी धिंगाणा घालणारा पाऊस
खर्‍या अर्थाने जाणवेल.

ओह्ह हा दिन का राजा.. मी नाव ऐकलेलं. ही फुलेही पाहिलीत पण हाच दिन का राजा ते माहित नव्हतं .. Happy धन्यवाद शशांक.

सश्या तुझी मांजरी खुप मस्त आहे.

दोन आठवड्यापुर्वी रात्री आमच्या घरातल्य बोक्याला डॉक्टराकडे घेऊन जाताना वाटेत काळोखात बसलेली एक पांढरी माण्जर दिसली. पांढरी मांजर हा घरातल्या मार्जारप्रेमीचा विकपॉईंट असल्याने तिला लगे हाथ हस्तगत केले. जेव्हा घरात आणुन तिचे दर्शन घेतले तेव्हा लक्षात आले की बिचारे पिल्लु आहे आणि बहुतेक ब-यच दिवसांचे उपाशी आहे. फक्त हाडांचा सांगाडा शिल्लक, चालवतही नाही.. परत पावली त्याच डॉक्टरकडे दुसरा पेशंट घेऊन गेलो. त्याने तपासुन पोट बिघडलेय, लहान आहे, हिला दुध पचणार नाही म्हणुन एक पावडर दिली तिच्यासाठी. खिसा ब-यापैकी हलका करुन परतल्यावर ऐशुला मग मांजराला बाटलीने त्याचे खास पावडरवाले दुध प्यायला घालायचे काम मिळाले. आधीच एक बोका घरात असताना नविन माण्जर आल्यावर घरात काय रणकंदन माजले ते विचारु नकाच.... त्यात आम्चा बोका भित्रट आणि नविन मांजर चालायची ताकद नसतानाही गुरगुर मात्र जोरात करत होते.

दोन दिवसात ते मांजर ब-यापैकी व्यवस्थित झाले आणि हिंडाफिरायला लागले. ते नीट झाल्यावर त्याला आंधोळ घालण्यात आली. त्यानंतर तर ते अजुनच सुंदर दिसायला लागले. त्याच्यावरचे आमचे वाढते प्रेम पाहुन आमच्या घरातल्य अबोक्याने गृहत्याग करुन वर गच्चीवर जाऊन बसायचे ठरवले. जोपर्यंत नविन माण्जराला बास्केटात बंद करत नाही तोवर तो अन्नप्राशनही करेनासा झाला. नविन मांजर एवढे धिट झाले की थोड्या दिवसात नविन माण्जर घरमालक होणार आणि जुन्या बोक्याला कायमचा गृहत्याग करावा लागणार यात शंकाच उरली नाही. म्हणुन मग नविन मांजर अजुन थोडी धडधाकट झाली की तिला मासळीमार्केटात सोडुन यायचे ठरवले.

पण असे दोन्-चार दिवस गेले. मी नविन मांजराला नेहमीप्रमाणे बाहेर गच्चीत सोडुन ऑफिसात गेले. घरी गेल्यावर बघते तर ते गच्चीत नव्हते. गच्ची जरी पहिल्या मजल्यावर असली तरी एवढे लहान मांजर खाली जाणार नाही उडी मारुन. आम्च बोका तिच्या वाटेला जाण्याची शक्यता शुन्य. मला आशा वाटत होती की दुस-या दिवशी सकाळी परत येईल माण्जर म्हणुन. पण अजुन ते परतले नाही. उगीच हुरहूर लागुन राहिली. कुठे गेले कोणास ठाऊक. कॉलनीची राऊंडही मारुन बघितली कुठे असेल तर....

ऐशुला दरम्यान दोनदा स्वप्न पडले की मांजर मस्त धष्टपुष्ट होऊन परतलेय म्हणुन.. बघुया आता स्वप्न खरे होते का ते.

साधना, गूढ आहे कथा. शेवट नक्की सांग.
ती धडधाकट झाल्याने मनपसंत घरोबा केला असेल. पण खाल्ल्या अन्नाला जागून परत भेटही देईल.

नाही हो.. घरोबा करण्याइतपत मोठी नव्हती. एकाद महिन्याचे बाळ होते. दुधही पिता येत नव्हते. बाटलीने पित होती. मग जरा बरी झाल्यावर चपातीचे अगदी लहान तुकडे करुन तोंडात घातले तर खाऊ शकत होती. आधीच्याच आठवड्यात ऐशुला त्याच साईझचे एक काळे बाळ दिसलेले पण ती खाली जाऊन बाळाचा शोध घेईपर्यंत बाळ गडपले होते. एकतर त्या पिल्लांची आई गाडीखाली वगैरे आली असेल किंवा मग कोणीतरी पिल्ले आणुन कॉलनीत टाकली असतील.

आणि घरोबा करायचाच झाला तर आजुबाजुला स्थळे आहे भरपुर. दिसली असती ना 'घरोब्या'बरोबर फिरताना....

हल्ली घरात उसासणे चालू आहे. काळे बाळ पुर्ण काळे आणि पिवळे डोळे ह्या कॉम्बोचे होते. अशा मांजराच्या शोधात आहोत. त्यामुळे उसासणे जरा जास्त जोरातच आहे, घराच्या खालपर्यंत आले आणि हाती मात्र लागले नाही.

मी मात्र घरात असले पुर्ण काळे आणि पिवळे डोळे असलेले मांजर ठेवण्याच्या विरोधात आहे. रात्री अचानक दृष्टीस पडले तर मला हार्टअ‍ॅटॅकच यायचा.

काही म्हण, तुमच्या बोक्याची कंपनी आवडली नाही एवढे नक्की.
आणि काळी काय पांढरी काय, घाबरायचे कशाला ? ती काय "एक थी डायन" वाली कोंकणा थोडीच आहे ?
( कालच बघितला मी. )

मल्हाराचा कुठलाही प्रकार ऐका. आपल्या मनात पाऊस दाटतोच. >>>> याला भारतीय मन कारणीभूत आहे. माझे सर डॉ. मिलिंद वाटवे - यांनी व त्यांचा एका साउथ इंडियन दोस्त या दोघांनी मिळून एक प्रयोग केला होता - आपले काही भारतीय राग त्यांच्या काही परदेशी मित्रांना (ज्यांना भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल काहीही माहित नव्हते व आधी कधी ऐकलेही नव्हते) ऐकवले व मनात कोणते भाव उमटतात ते विचारले होते - त्या परदेशी मित्रांच्या परपस्पर विरोधी मतांमुळे या वाटवे आणि कंपनीच्या लक्षात आले की आपण लहानपणापासून हे संगीत ऐकतो आहोत याचा हा परिणाम आहे - हे भारतीय संगीत नव्यानेच ऐकणार्‍याच्या मनात असे काही (समान) येऊ शकत नाही.
........ तरीही "कोमल रे" असला की तो राग आर्त नाहीतर गंभीर होतोच होतो .... (बहुतेकांचा अनुभव)

मार्जार पुराण भारीए.... आमच्याकडील समस्त मार्जार प्रेमी अगदी आवडीने वाचतील व त्यात भरही घालू शकतील ....... (फोटोंसह.... Happy )

@पुरंदरे शशांक: सर्व प्रथम एवढ्या उशीर प्रतिसाद देत आहे त्याबद्दल माफ करा. कामाचा व्याप खूप असल्याने जमल नाही.
उपाय सुचवल्यबद्दल धन्यवाद!

संगीतच कशाला, कवितेतला पाऊसही आपल्याला त्याच अवस्थेत नेतो. +१
आजीच्या तावडीतून वाचलेली काळ्या मांजरांची जोडी होती.बाकीच्या मांजरी दुसर्‍यांदा गाभण्या राहिल्या की
मासळीमार्केटात रवानगी व्हायची.पण या काळ्या मांजरांची जोडीने घरात तेही स्वयंपाकघरात घाण करून (नेहमी) वात आणला होता.नंतर ती जोडी कुठे गायब झाली माहित नाही.
शेजार्‍यांचा पांढराशुभ्र बोका पण पडीक आमच्याकडे , त्याचे नावच चमको ठेवले होते.त्याला काकडी खूप आवडायची. काकडी कापताना वास आला की ह्याचा म्यावम्यावाट चालू! दीड वर्षाचा असताना गाडीखाली सापडून मेला.
असो. स_सा व साधना यांच्या पोस्टमुळे हे सर्व आठवले.

चमको हे नाव आमच्या कॉलेजच्या जमान्यात खुप लोकप्रिय होते. मला आठवतय, फारुख शेख, दीप्ती नवलच्या एका चित्रपटात ( चश्मे बद्दूर ) तिने विकायला आणलेल्या वॉशिंग पावडरचे नाव होते ते.

हो दिनेश.तेव्हाच ठेवलं हे नाव! टीव्हीवर चश्मे बद्दूर सिनेमा सुरु होता आणि ह्या महाशयांची एंट्री झाली.त्याच्या

स्वछ पांढराशुभ्र रंगामुळे हे नाव दिलंय!

दिनेशदा..........संगीत विषयक पोस्ट मस्त.
मल्हाराचा कुठलाही प्रकार ऐका. आपल्या मनात पाऊस दाटतोच. >>>>>>
तसंच विशिष्ठ राग विशिष्ठ वेळेची आठवण करून देतो. मारवा ऐकला आणि संध्याकाळची हुरहुर लागली नाही असं होणारच नाही.
साधनाचं मार्जारपुराणही मस्तच.
आज आमच्या कडुलिंबावर बुलबुल, कोकीळा आणि भारद्वाज यांचं काहीतरी सीरियस डिस्कशन झालं.
भारद्वाज काहीतरी गंभीरपणे सांगत होते. घूत्कार करत.
बुलबुलांना काहीच सीरियसनेस नव्हता. ते मधेच पोरकटासारखा क्लक्लकाट करत होते.
आणि कोकीळा खूपच कर्कश्य पणे आणि तावातावाने आपलं मत मांडत कांगावा करत होती.
१०/१५ मि. तरी हे चाललं होतं मी गच्चीत जाऊन पाहून आले पण काही कळलं नाही.
नंतर एकदम शांतता. एकमत झालं की सगळे चिडून निघून गेले कळलं नाही.

मानुषी, हे खुप ऑड आहे. पक्षी दुसर्‍या जातीतल्या पक्ष्यांशी क्वचितच बोलताना मी बघितलेत. या चर्चेचा विषय नक्कीच "काय हि माणसं" असाच असणार.

पक्षी आपल्या आधीपासून पृथ्वीवर आहेत. माणसांबद्दल त्यांनी नक्कीच विचार केला असणार.

मस्त गप्पा चालल्यात ... सद्ध्या इकडे यायला जमतच नाहीये मला. पण कालच्या एका घटनेने इतकं अस्वस्थ केलं की निगकरांबरोबर शेअर केल्यानेच हलकं वाटेल असं वाटलं ... काल आयडिअल कॉलनीतला सुंदर कदंब कापला ! कारण काहीच नाही. "फांद्या रस्त्यावर येतात" ही सबब. Sad Sad

शी.. किती हळहळ वाटते असे झाले की..

माझ्या कॉलनीतला करंजही कापला. रस्त्याच्या कडेला दगडी कुंपणाला खेटुन उभा होता. तो इतका वाकलेला खाली की जर कापला नसता रस्त्यावर झोपलाच असता. पण तो असा झोपायची कारणे मानवनिर्मित आहेत.. त्याच्या अगदी मुळात डाबर ओतले होते, इकडे तिकडे करायलाही अजिबात जागा ठेवली नव्हती. एका बाजुला दगडी कुंपण त्यामुळॅ तिकडेही सरकता येणे अशक्य, मग बिचारा एकाच बाजुला झुकत गेला आणि असा झुकता झुकता पडायची वेळ आली म्हणुन मग कापला Sad

रस्त्यात फांद्या येतात म्हणुन त्या फांद्या कापायला जे वीर पालिकेने पाळलेत त्यांना फांद्या किती आणि कशा कापायच्या हेही माहित नसतं. एकतर उगीच झाडाला बोडके करुन टाकतात आणि वर फांदी कापताना ती अशी कापतात की अर्धी कापली गेल्यावर खालच्या भागाची साल सोबत घेऊन ती फांदी खाली येते.

काल आयडिअल कॉलनीतला सुंदर कदंब कापला ! कारण काहीच नाही. >>>>> अरेरे ....

का बाजुला दगडी कुंपण त्यामुळॅ तिकडेही सरकता येणे अशक्य, मग बिचारा एकाच बाजुला झुकत गेला आणि असा झुकता झुकता पडायची वेळ आली म्हणुन मग कापला >>> फार वाईट ....

काही ठिकाणी मोठ मोठे वृक्ष क्रेनने उचलून दुसरीकडे नीट खड्डे घेऊन लावतात (योग्य तर्‍हेने पुनर्वसन करतात) आणि कुठे हे विचित्र लोक ......
पुण्यातील एफ. सी. कॉलेजरोड वरील दुर्मिळ सुरंगी वृक्ष हा असाच ससून का कुठून तरी आणून पुनर्वसन केलेला आहे. (तिथल्या आसपासच्या लोकांनी सांगितले हे... )
आमच्या कंपनीतही असे अनेक पुनर्वसित वृक्ष आहेत - अगदी उंच उंच नारळाची झाडे आणून त्यांना नीट आधार देऊन छान वाढवलीएत....
काही वाईट बातम्या तर काही चांगल्या प्रेरणादायी बातम्या ....

शशांक खरेच.. मी पालिकेतही असे काही लोक पाहिलेत जे बागांची अगदी नीट काळजी घेतात, ज्यांन झाडांची माहिती असते, कशी वाढवावी हे माहित असते.... पण मग जेव्हा रस्त्यच्या कडेला उघडेबोडके वृक्ष दिसतात तेव्हा वाईट वाटते की अशा कामाम्साठी योग्य लोक का नाही नेमले जात..

काल आयडिअल कॉलनीतला सुंदर कदंब कापला ! कारण काहीच नाही. "फांद्या रस्त्यावर येतात" ही सबब. >>>>>>>> Sad मला माहितच नव्हत तिथे कदंब आहे ते. पाहिला तरी असता जाऊन. Sad

ती घुबडावरची लिंक मस्त आहे, पण "तू नळी" इथे उपलब्ध नसल्याने घरी जाऊन बघावे लागेल ....

साधारण १९८८-९२ च्या काळात पुण्यातील सदाशिव पेठेतील चिमणबागे समोरील चाळीत घुबड कुटुंब पाहिल्याचे आठवते आहे - बहुतेक हेच असावे - गव्हाणी घुबड / बार्न आऊल .....

घुबडं अगदीच निरूपद्रवी असतात ते माहीत आहे पण वॉट अबाऊट वटवाघूळ? एकदा मी बागेत बसलेले तेंव्हा एक वटवाघळाचं पिल्लू माझ्या अगदी जवळून उडुन गेलं Sad
मला खुप भिती वाटलेली तेंव्हा Sad

घुबडं अगदीच निरूपद्रवी असतात ते माहीत आहे पण वॉट अबाऊट वटवाघूळ? >>> वटवाघुळ फळे खाऊन फळबागेचा नाश करते - आणि सर्वात महत्वाचे म्हणजे - "रेबीज" विषाणू पसरवू शकते (अर्थात त्या वटवाघळात रेबीजचे विषाणू असायला हवेत व असे वटवाघुळ जर आपल्याला चावले अथवा त्याची नखे लागली तर रेबीज व्हायची शक्यता असते) - सो, बी कॉशस ..... (नुसते जवळून उडत गेले तर घाबरण्यासारखे काही नाही... Happy )

ओह्ह वटवाधळात रेबीज असतात? मला महित नव्हते. आमच्या एरियात भरपुर आहेत व.वा. एकदा एक छोटे पिल्लु घरातही आलेले चुकुन.

अरे देवा Sad
एक तर मला ते वटवाघुळ बघुन सारखं सारखं हॉरर सिन्स आठवत होते Sad
आता नाही जाणार मी त्या बगेत Sad

पण मला हे रेबिज बद्दल माहित नव्हतं... म्हणजे समजा मला नखं लागलीच असती तर मी खरच त्याबद्दल काही विचार केला नसता Happy
बरं झालं कळालं मला Happy

आणि वटवाघुळ चावतं पण???????????????????????
आणि लोकं म्हणे काही नाही करत ते... घाबरू नकोस! Uhoh Angry

रिया, जीवाला धोका आहे असे एखाद्या सजिवाला वाटले तर तो सजिव काहीतरी अ‍ॅक्शन घेणारच. तु सुद्धा काहीतरी करशीलच ना??

आता तु कारण नसताना वटवाघळांना घाबरुन त्याना दुर हाकवायला लागलीस तर त्यांना थोडेच कळणार आहे की तु घाबरुन हे करतेय्स.. ते तुला घाबरणार आणि तुला दुर हाकवण्यसाठी तुला चावणार... Happy

ओह्ह वटवाधळात रेबीज असतात? >>>> सगळ्याच वटवाघळात नसतो - पण शक्यता आहे - असेलही .... अशा वटवाघळांचा कोणी सर्व्हे करुन ठेवला नाहीये - आपण सावधगिरी बाळगायची - उगाचच वटवाघाळू, त्याचे पिल्लू यांना हाताळू वगैरे नये ...

म्हणजे समजा मला नखं लागलीच असती तर >>>>> काऽही घाबरायचे नाही - लग्गेच डॉ. डे जायचे व सांगायचे की एक शशांक पुरंदरेनामक विचित्र माणसाने मला खूप घाबरवले आहे तेव्हा प्लीऽज मला रेबीज व्हॅक्सीन द्या - त्या डॉ. ने जर वाद घातलाच तर मला फोन करायला सांग किंवा सिरम इन्स्टिट्यूटला फोन करायला सांगणे - आम्ही समजावू त्या डॉ.ला. डोन्ट वरी....
आणि सारखी घाबरु नकोस - डर गया सो मर गया - गब्बरसिंग - शोले..... Happy Wink

रेबीज हा विषाणू सर्व उष्णरक्तीय प्राण्यांद्वारे प्रसारीत होऊ शकतो - सो बी केअरफुल - इस्पेशिअली विथ डॉग्ज अँड कॅट्स - आपल्याकडील कुठल्याही पेटला रेबीज व्हॅक्सीन दिले की काळजी नाही - आणि समजा आपल्याला चावलाच एखादा पेट - तर आपण व्हॅक्सीन घ्यायची.... लोकहो, फाऽर काळजी करु नका हो - टेन्शन नही लेनेका ...... Wink Happy

रेबीज आणि वटवाघळे - ताजा कलम - वटवाघळे ही फळे खातात - माणसांना उगाचच त्रास देत नाहीत.... त्यामुळे उगीचच नसत्या कल्पना करु नये - व्हॅम्पायर बॅट्स दाखवलेले शिणेमे पाहू नये ..... Wink

Pages