निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कैलासपती >>> म्ह्णजेच कवठाच झाड ना? ------- नाही

Limonia acidissima म्हणजे कवठ

आणि Couroupita guianensis म्हणजे कैलासपती ------- या दोन्ही नावाने गुगलून पाहिले की फरक कळू शकेल ...

कढीपत्त्याची एकचं काडी आहे, त्याला थोडी पाने आहेत, पुण्यात ह्या सीझनमधे वाढेल का नाही ? मी रोज पाणी घालते, अजून काय घालता येईल ?

कढीपत्त्याची एकचं काडी आहे, त्याला थोडी पाने आहेत, पुण्यात ह्या सीझनमधे वाढेल का नाही ? >>> नक्की वाढेल - फार चिवट झाड असतं हे .. सध्या थंडीचा सीझन असल्याने वाढ फार असणार नाही - पण अजून एक महिन्याने छान वाढेल (हवेतली उष्णता वाढेल तसे) -- पाणी फार घालू नका - कुंडी असेल तर एक -दिवसाआड ... थोडेसेच खत घाला (शेणखत चांगले) व मुळापाशी जपून माती उकरा - मुळांना धक्का न लागेल अशी ....

कढिपत्ता खरेच खुप चिवट आहे. माझ्या गावी तर कुठेही तो उगवतो, त्याची मुळे खाली जमिनीत पसरलेली आहेत.

आंबोलीच्या जंगलात तर मोठमोठी झाडे आहेत त्याची. त्या झाडांच्या मुळातुनही तो उगवतो. सहसा झाडाचा वरची कॅनोपी जितकी पसरलेली तितकी त्याची मुळेही खाली पसरलेली असतात त्यामुळे वरती डेरेदार झाड आणि त्याच्या खाली सावलीत उगवलेली इटुकली पिटुकली झाडे हे दृष्य आंबोलीच्या जंगलात खुप् वेळाअ पाहिलेय.

माझ्या आंबोलीच्या घराच्या आजुबाजुला तो इतका पसरलाय की सैपाक करताना फोडणीला भांडे ठेऊन लगेच कुंपणावरुन उडी मारुन बाहेर मिळेल त्या रोपाची दोन चार पाने खुडुन आणायची आणि फोडणी द्यायची हा माझा आवडता उद्योग आहे.

(पण हा उद्योग फार काळ चालणार नाही. लोक आता आजुबाजुच्या प्लॉटवर घरे बांधताहेत Sad Sad )

माझ्याकडील कढिपत्त्यचे मुळ झाड कुठले हेच कळत नाही मला. सगळी आजूबाजूला छोटी रोपे उगवलीत त्यांची.

मी नेहमी खंड्या एकटाच पाहीला आहे. आज ऑफिसला येताना चक्क खंड्याची जोडी उडताना दिसली.

हो नताशा.....कढिपत्याला ताक घालावे. उअपयोग होतो.
वॉव जागू ...खंड्याची जोडी!
हेल्लो लोक्स
८ ़जाने. हा इथला ( वॉशिन्ग्टन डीसी) १९९६ पासूनचा सर्वात कोल्डेस्ट दिवस होता.
असो....काल व्हाइट हाउसच्या समोरच्या जायंट खारी एका प्रचंड मोठ्या वृक्षावर आणि परिसरात धुमाकूळ घालत होत्या.
एक प्रकार दिसायला आपल्याकडच्या सारख्या, फक्त आकार मोठा.
त्याच झाडावर अश्याच मोठ्या साइजच्या पण काळ्या कुट्ट अशीही एक व्हरायटी होती. त्या ़ काळ्या खूप कलकलाट करत
होत्या. आणी सैरावैरा पळत होत्या. इतक्या मोहक सिन्क्रोनाइज्ड हालचाली होत्या त्यांच्या .....
या सगळ्या आजूबाजूला पडलेली वाळकी पानं उचलून तोंडातून वाहून नेऊन याच झाडाच्या एका छोट्य ढोलीत ठेऊन येत होत्या. हे त्यांचं काम अगदी हसत(!?) खेळत, उड्या मारत चालल्लेलं होतं.
मीआयपॅड नेम धरून छान व्हिडिओ घेतला. आत जाणारी/रा चा. पण नंतर लक्षात आलं.....यांना या ढोलीव्यतिरिक्त या झाडातून बाहेर जाण्याचे अनेक मार्ग आहेत.
काळ्या जरा अतीच तरतर्या असल्याने फोटो नाही.

मी लावलेला कढीपत्तसुद्धा टिकत नाही म्हणजे ग्रीन थंबच्या एक्झॅक्टली अपोझिट जे काही असेल ते माझं आहे. साधना तुम्ही लिहिलेलं वाचून अनिल अवचटांनी लिहिलेली कढीपत्त्याच्या झाडाची गोष्ट आठवली.

व्वा! मानुषी, छान फोटो. तोंडात किती पानं पकडलेत ना ? ही बालजन्माची तयारी असेल का? Happy

मी आता बाली, ( इंडोनेशिया ) मधे आहे. भरपुर मजा केली. अंगोलात पोहोचलो कि मायबोलीवर फोटो टाकून त्रास देईनच Happy

मी नायजेरियाला माझ्या घराच्या कुंपणाच्या आता कढीपत्त्याचे रोप लावले होते. मी नायजेरिया सोडूनच आता चार वर्षे झाली. परवा तिथले डायरेक्टर माझ्या अंगोलाच्या घरी आले होते ते म्हणाले आता त्याचे खुप मोठे झाड झालेय आणि अजून तिथले लोक त्याला दिनेशचा कढीपत्ता म्हणून ओळखतात.....!

मी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले तिथे तिथे माझी अशी ओळख राहिली तर आयूष्याचे सार्थक झाले असे वाटेल मला.

Pages