निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
बघ बघ हक्काची बाजू घेणारी
बघ बघ हक्काची बाजू घेणारी व्यक्ती मिळाल्यावर भाषा पण बदलली ओए आणि होय?
आता काही खर नाही बाबा आपल. जपुनच बोलावे लागेल. 
जागुले......... तू. ,
जागुले......... तू. , ,सुद्धा?
आता तो "त्या व्यक्तीला "आपलं नाव सांगेल बर्का??????
अब जिप्सीको बक्ष भी दो
जिप्स्या, डाळिंबावर लावण्या
जिप्स्या, डाळिंबावर लावण्या पण आहेत बर्याच.. तुला किती आठवताहेत ?
दिनेशदा, तुम्हीपण?
दिनेशदा, तुम्हीपण?

ब्रूटस यू टू ???? एक
ब्रूटस यू टू ????
एक गं(भीर.. मतशीर!!!) सूचना.. निसर्गा च्या गप्पा हा मथळा तात्पुरता बदलून ,' जिप्स्याला नवनवीन रीतींनी कसकसे चिडवावे' असा करावा..
सुप्रभात.
सुप्रभात.

नमस्कार .... मी घरी भोंगी
नमस्कार .... मी घरी भोंगी मिर्ची लावली आहे .... त्यातल्या २-३ रोपांची नविन येणारी पाने काळी पडल्यासारखी दिसत आहेत ....मी फोटो टाकते .... एका कुंडीत ३ रोपे, अशा २ कुंड्या आहेत.... एका कुंडी मधील रोपांनाच असे झाले आहे :(.... मदत करा ....
हे खाल्चे चांगले आहे
हे खाल्चे चांगले आहे

प्राची, कदाचित कडक उन किंवा
प्राची, कदाचित कडक उन किंवा काही केमिकल पडले असेल. तेवढा शेंडा खुडला कि नवीन पाने चांगली येतील.
माझ्या एका फसलेल्या
माझ्या एका फसलेल्या प्रयोगाबद्दल पण लिहायला हवे.
माझ्या घरच्या मिरचीवर पण किडे झाले होते. हळद / हिंग भारतातून आणलेले त्यामुळे ते मौल्यवान. ते कसे वापरू ? शिवाय स्प्रे बॉटल पण नव्हती.
आमच्याकडे फ्लेव्हर्ड व्हीनीगर स्प्रे मधे मिळते. तेच स्प्रे केले..... प्रयोग फसला, झाडानेच मान टाकली-
आता भारतातून स्प्रे बॉटल आणायला हवी.
२-३ रोपे एकत्र आहेत म्हणून
२-३ रोपे एकत्र आहेत म्हणून तसे होत असेल का... केमिकल पडायची शक्यता खूप कमी आहे.. नाहीच म्हणा कारण घरातच नाही आहे ... आणी ऊन सगळ्या झाडाना सारखे आहेच ना ... . किड असेल का? हळद , हिंग किती घालाय्चे पाण्यामध्ये....
प्राची, या लिंन्क्सवर
प्राची, या लिंन्क्सवर बघः
http://www.thechileman.org/guide_disease.php
http://www.harvesttotable.com/2009/05/pepper_troubleshooting/
व्यवस्थीत माहिती दिली आहे.
रोजच्या वॉकच्या रस्त्यावर
रोजच्या वॉकच्या रस्त्यावर एके ठिकाणि गवतावर पातळ बर्फाच असा पातळ थर अल्लगद वरच्या वर जमा ़ झाला होता.
तडे गेलेली काच बसवल्यासारखं दिसत होतं.
या मखमली निळ्सर रंगाच्या बेरीज वाटेत दिसतात.

आणि या लाल.
पण दोन्हीची पानं अगदी वेगवेगळी.
मानुषी तो बर्फाचा थर खरंच काच
मानुषी तो बर्फाचा थर खरंच काच नाहीतर प्लॅस्टिकसारखा दिसतोय. मस्त आहे फोटो.
मानुषीताई, मस्त फोटो.
मानुषीताई, मस्त फोटो.
अन्जू आणि मामी धन्यवाद,
अन्जू आणि मामी
धन्यवाद, मुलींनो झोपला नाहीत का अजून?
मी इथे भारतात अमेरिकेची वेळ
मी इथे भारतात अमेरिकेची वेळ पाळतेय.
लाल आहेत त्या हॉली - डेक द
लाल आहेत त्या हॉली - डेक द हॉल्स विथ बोज ऑफ हॉली गाण्यातल्या . यात गर्ल प्लांट अन बॉय प्लांट असतात. गर्ल प्लांटसनाच बेरीज येतात ..
बर्फ पडलेला असला की अजूनही मस्त दिसतात याची झुडुपं,
निळ्या आहेत त्या जुनिपर बेरीज - जिन करायला वापरतात ..
मेधा नवीन माहिती. धन्यवाद.
मेधा नवीन माहिती. धन्यवाद.
त्या लाल बेरीज कुठे कुठे डेकोरेश्नसाठी वापरलेल्या पाहिल्या.
सुदुपार निगप्रेमींनो माझी
सुदुपार निगप्रेमींनो
माझी रिक्षा...... हे पहा
http://www.maayboli.com/node/46857
मानुषी, फोटोतल्या बर्फावर
मानुषी, फोटोतल्या बर्फावर नंबर कस्ले आलेत?? मला तो फोटो निटसा कळतच नाहीय ..
सुप्पर्ब मानुषी... वॉक ला
सुप्पर्ब मानुषी...
वॉक ला जातानाही कॅमेरा घेऊन जातेस?? धन्य आहेस
घरी पक्ष्यांचे फोटू काढायला म्हणून सतत कॅमेरा जवळ ठेवण्याचा सर्वांनी वेळोवेळी दिलेला सल्ला , अब काम मे आ रहा है, है ना???
मेधा, छान माहिती..
मेधा, छान माहिती..
धन्यवाद मृण्मयी .... वाचते
धन्यवाद मृण्मयी :).... वाचते आता ....
मानुषी, ती फळे खाण्याचा खुप
मानुषी, ती फळे खाण्याचा खुप मोह होतो ना ? पण अनोळखी फळे न खाल्लेलीच बरी.
प्राची. बाकीचे झाड हेल्दी दिसतेय. पानाखाली किड आहे का ते बघून उपाय करावा लागेल. किड असेल तर हळद किंवा हिंग किंवा साबणाचा अगदी सौम्य द्राव करुन फवारला तरी चालतो. त्या साईटवर पण तेच लिहिलेय.
स्पॅथेडीया.
स्पॅथेडीया.
वाह!!! काय गोड रंग आहे
वाह!!! काय गोड रंग आहे ,केशरी..
आम्ही लहानपणी पळसाची या रंगाची फुलं उकळवून होळी करता ईको फ्रेंडली रंग बनवत होतो
.
.
मानुषी, फोटोतल्या बर्फावर
मानुषी, फोटोतल्या बर्फावर नंबर कस्ले आलेत?? मला तो फोटो निटसा कळतच नाहीय ..
...................,..,
साधना....पाइपलाइनीवरचं. लोखंडी झाकण होतं त्यावर साठलेल्या पाण्याचं बर्फ झालेलं होतं. त्या झाकणावरचे नंबर्स तुला दिसताहेत.
घरी पक्ष्यांचे फोटू काढायला म्हणून सतत कॅमेरा जवळ ठेवण्याचा सर्वांनी वेळोवेळी दिलेला सल्ला , अब काम मे आ रहा है, है ना??? ................अगदी अगदी. वर्षू! आणि अगं सध्या कॅमेरा नाहीये जवळ. आयपॅड वर काम चालू.
दिनेशदा...... बरोब्बर! दोन्ही बेरीज इतक्या टेम्टिंग दिस्त होत्या!
ऊठा, ऊठा, गारठलात का सगळे?
ऊठा, ऊठा, गारठलात का सगळे? सूर्यकिरणात बसा बघू.
Pages