निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन -चार दिवसांपूर्वी ऑफिसमधल्या वडाच्या झाडावर एक हळद्या / गोल्डन ओरिओल तसेच एक कोतवालही/ ड्रोंगो पाह्यला .... जेवढा हळद्या झळाळता आहे तेवढाच कोतवालही झळाळत होतो - इतका तजेलदार काळा रंग असतो त्याचा ......

मागील आठवड्यात रात्री कारने तळजाई देवळात जाणे झाले. (हा रस्ता जवळ जवळ जंगलातला वा माळरानातलाच आहे, चांगला डांबरी रोड आणि स्ट्रीट लाईट्सही लावलेत त्यावर ). परत येताना रस्त्यात एक साप निवांतपणे रस्ता ओलांडताना दिसला. गाडीचा स्पीड एकदम कमी करुन त्याला रस्ता ओलांडू द्यावे म्हटले तर मागील दुसरी फोर व्हीलर मोठ-मोठ्याने हॉर्न वाजवत आमच्या पार शेजारी आली. मी काच खाली करुन हात बाहेर काढून त्यांना थांबवले - ते आश्चर्यचकित झाले व विचारु लागले का थांबला आहात - समोरचा साप दाखवून त्यांना विनंती केली की फारच हळुहळु रस्ता ओलांडतोय तो तेव्हा तुम्हीही जरा थांबा - तेही बिचारे थांबून राहिले...
तोवर समोरुन अजून एक फोर व्हीलर व १-२ टू व्हीलर (बाईक्स) आल्या. आम्ही दोन फोर व्हीलर्सनी रस्ता जवळजवळ अडवलाच होता - त्यामुळे त्यांनाही थांबावे लागले व ते ही विचारु लागले - काय झाले ? का थांबलात ??.....
साप म्हटल्यावर सगळे आधी घाबरत होते - पण मी जेव्हा सांगितले की धामण आहे, बिनविषारी आहे तेव्हा माझ्यावर विश्वास ठेऊन त्या सापाने रस्ता क्रॉस करेपर्यंत सगळे थांबले होते ----

माझी मुलगी मला म्हणतीये इकडे - तू कधी एवढे सापांचे निरीक्षण करुन एका फटक्यात सांगतोय त्यांना धामण आहे म्हणून....
मी तिला म्हटले हे सगळे माळरान किंवा जंगल आहे - हेच त्या सापांचे खरे घर वा वावरण्याचे ठिकाण - आपणच इथे उपरे आहोत -ही सगळी वहाने, रस्ते हे सगळे आपण त्या वन्य जीवनात केलेली ढवळाढवळ आहे -त्यामुळे तो साप जर मेला असता कोणाच्या गाडीखाली तरी त्याला जबाबदार आपणच असतो.... त्यामुळे एका सापाचा जीव वाचवण्यासाठी एवढे सगळे जरी ४-५ मि. थांबले तरी काही बिघडत नाहीये... आणि त्याचा डोक्याचा भाग बघता तो ९०% धामण जातीतलाच वाटत होता ...
तिला काही ते फार पटले नाही पण आपण गाडीत बसलो आहोत आणि त्यामुळेच या सापापासून बचावलो यामुळे ती पुन्हा पुन्हा गाडीचे आभार मानत होती .... Happy Wink

- या "पुरंदरे"प्राण्याच्या........शशांक तू पण ना!
इथे परत जबरदस्त स्नो ़ झाला काल. या आय पॅड्वर टायपाचे ़ जरा वांदे . सवय नाही. ट्च स्क्रीन तर निमित्त्ताला टेकलेला.


मी गिर ला गेले होते. तिथे हॉटेल च्या आवारात हे झाड पाहिलं. प्रचन्ड फुलल होतं आणि खूप सुन्दर दिसत होत.

शशांक असाच अनुभव मी आणि गिरीराजने गोव्यात घेतला होता. आम्ही दोघे बाईकवर आणि उतारावर. आडवा साप आला. मी ओरडलो, " गिर्‍या साप." त्याला दिसला होत पण उतारावर बाईक थांबवणे पण शक्य नव्हते.
दोघे एकमेकांपासून थोडक्यात वाचलो.
सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर पण असाच जाडजूड साप आडवा गेला होता. आम्हा दोघांनाच.
नवल म्हणजे इतकी वर्षे आफ्रिकेच्या जंगल भागात राहतोय. पण इथे अजूनही साप बघितला नाही. विरळ वस्ती आणि भरपूर जंगल असल्याने, माणूस आणि साप एकमेकांना आडवे जात नसावेत. तसेही आफ्रिकेत साप चावून माणूस दगावण्याच्या घटता तुरळकच आहेत. विषारी सापही कमीच आहेत. क्लीओपात्राने डसवून घेतलेला साप मात्र विषारी होता. तो अजूनही आढळतो. ( इजिप्त हा देशही आफ्रिकेतच आहे. )

हेमा, कांचनाचे काही दुर्मिळ प्रकारही भारतात आहेत. पुण्यातही आहेत.
कच्ची कली कचनारकी
क्या समझेगी बाते प्यारकी.. या मन्ना डे यांच्या गाण्यातली कचनार म्हणजेच कांचन !

मानूषी, विंडोज ८ पण टचस्क्रीन विचारात घेऊनच तयार केलेय. लॅपटॉपवर फार वैताग देतेय.

आम्ही कोकणात असताना, पायी चालतानाही साप आडवा यायचा. आधी त्याला रस्ता द्यावा लागायचा. राखणदार तर निघाला की सों..................... असा जोरात आवाज यायचा. जणू वाराच घोंघावतोय. खूप मज्जा असायची तिथे.
गेले ते दिन गेले. Sad

मानुषी, मस्तच गं....

शशांक मागे आमच्या इथे पाम बिच रोडवर असेच झाले. हा रस्ता तिन लेनचा आणि सरळसोट असल्याने गाड्या वेगाने धावतात यावर. एक चारचाकीवाला रस्त्यावर साप बघुन त्याला जाऊ देण्यासाठी थांबला. त्याच्या मागे अजुन थांबला. पण त्याच्या नंतरच्याला कळले नाही काय प्रकार आणि तो मागच्यावर आपटला, मागच्या पहिल्यावर.. अजुन एक गाडी येऊन त्यांच्यावर आपटली असे करुन एकंदर सात गाड्या एकमेकांवर आपटल्या.

त्या गदारोळात साप शांतपणे रस्ता क्रॉस करतच होता. पण बाजुने जाणा-या एका गाडीने त्याला पाहिलेच नाही आणि त्याचे तुकडे करत गाडी निघुन गेली. Sad

अर्र.. साधना!! Sad

मानुषी.. मज्जा चाल्लीये ना सध्या??? गारठण्यात पण मजा असते..

काल सांताक्रूझ च्या एरोप्लेन च्या गार्डन मधे एक झाड दिसलं.. बुंध्यालाच सुगंधी फुलं लागलेली आणी मोठ्ठी फळं ही.. वर फांद्या ,पानं अगदी हात वर करून नुस्तीच उभी !!!

कोणी म्हटलं कौरव पांडव झाड.. कोणतं झाड आहे हे??

फोटो काढीन नेक्स्ट टायमाला..

बुंध्यालाच सुगंधी फुलं लागलेली आणी मोठ्ठी फळं ही.. वर फांद्या ,पानं अगदी हात वर करून नुस्तीच उभी !!!>>>> कैलासपती असणार ते वर्षुदी .........(Couroupita guianensis)
http://www.maayboli.com/node/18034 इथे फोटो पहा ....

इथेही त्याचे फोटो आहेत ...
http://www.maayboli.com/node/24242?page=22&estination=node%2F24242%3Fpag...

कांचनची झाडे कोकणातपण आहेत. आमच्या गावाला आहेत. कधी गेले तर फोटो काढीन. हेमा यांनी फोटो टाकलेल्या कांचनच्या फुलाचा खूप सुंदर रंग आहे.


सकाळी ६ वाजता सहज बाहेर लक्ष गेलं तर अंधारा त हा दिसला. पळत जाऊन आयपॅड आणेपर्यंत लांब गेला होता.
बहुतेक कोल्हा होता. बर्फात खूप वेळ काहीतरी शोधत अंधारात एकटाच फिरत होता.

मानुशी मस्तच.

शशांकजी खरच तो फोटो आणि मेसेज मी काढायला नव्हता पाहीजे. चुकलेच. काय झाले नविन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी भांबावून पटकन ते कट केले. तो फोटो आहे पण मेसेज नाही आता.

जागु कोइ बात नही. आता नविन वर्षाचे काहीतरी मस्त लिही;.

रच्याकने तुला किती दिवस सांगायचे होते पण राहुन जातेय.. आता लिहितेच

तु वर लिहितेस ना "स्थापना - ५ डिसेंबर २०१०" - हे वाचलं की मला नेहमी गणपती बाप्पा बसवल्यासारखं वाटतं... Happy

साधना Happy

जागु कोइ बात नही. आता नविन वर्षाचे काहीतरी मस्त लिही;. >>>> +१००....

तु वर लिहितेस ना "स्थापना - ५ डिसेंबर २०१०" - हे वाचलं की मला नेहमी "गणपती बाप्पा" बसवल्यासारखं वाटतं... >>>> साधना, मला वाटतं तुझी मुलगी तुझ्या खोड्या काढत नसेल, तूच तिच्या खोड्या काढत असशील ....... तुझ्या डोक्यात कायम काहीतरी भन्नाट येत असतं हां ....

......त्या लिटिल चॅम्प्सच्या गाजलेल्या सत्रात (२००८-२००९) अवधूत गुप्ते कसा स्पॉन्टेनियस टाकाटाकी करायचा तशी तुझी कायम चालू असते .... आणि सगळ्यत महत्वाचे म्हणजे तुझ्या कॉमेंट्स वाचताना कोणाच्याही चेहर्‍यावर मिश्किल हास्यच उत्पन्न होत असेल .....खूप भारी असतात या कॉमेंट्स ... नर्म विनोदी ... कीप इट अप .... Happy ...... वुई रिअली एन्जॉय इट ..

शशांक.... माझ्या चिरतारुण्याचं रहस्य तुम्हाला उलगडलं तर... Wink

......त्या लिटिल चॅम्प्सच्या गाजलेल्या सत्रात (२००८-२००९) अवधूत गुप्ते कसा स्पॉन्टेनियस टाकाटाकी करायचा तशी तुझी कायम चालू असते .... आणि सगळ्यत महत्वाचे म्हणजे तुझ्या कॉमेंट्स वाचताना कोणाच्याही चेहर्‍यावर मिश्किल हास्यच उत्पन्न होत असेल .....खूप भारी असतात या कॉमेंट्स ... नर्म विनोदी ... कीप इट अप .... स्मित ...... वुई रिअली एन्जॉय इट ..
>>>
हो खरय Proud
मी तर आजुनही हिडिंबा प्रकाराने हसुन लोटपोट होते Rofl

रिया, तु जर ते केले नसतेस तर त्या प्रसंगानंतर त्या दिवशी दिवसभर तुझी चिडचिड झाली असती... आणि ते केल्याने तु फक्त त्या दिवशीच नाही तर आजही हसतेय्स... तुही माझ्यासारखाच विचार करत राहा कायम Happy

मी आत्ता ह्या साईटवर माझे मेंटल एज तपासले http://www.mbti123.com/mental/en/

चक्क स्विट सिक्स्टीन Wink Wink बाकीच्यानीही तपासा फटाफट....

चक्क स्विट सिक्स्टीन डोळा मारा डोळा मारा बाकीच्यानीही तपासा फटाफट...<<<
मी तपासलं....माझं सेम आहे<<<
ए.भा.प्र. - माझे वय आत्ताच्या वयापेक्षा कमी दाखवले म्हणजे मी तेवढा कमी परिपक्व असे च ना ?? Uhoh
Light 1

वर्षु नील कैलासपती आहे हे झाड
मुम्बई मध्ये खूप आहेत ही झाडं
मोठ्या मोठ्या गोल गोल फळांमुळे इंग्रजीत ह्याला कैनन बॉल ट्री अस म्हणतात.
ह्याची फळं म्हणजे तोफ गोळेच जणुं !!

सश्या, माणूस सोडून बाकी सगलीकड़ वय आणि परिपक्वता यांचा सरल संबंध असतो . माणसामध्ये काहीच सांगता येत नाही . साठी बुद्धी नाठी हे फ़क्त माणसातच

Pages