कैलासपती !!!!!

Submitted by भालचन्द्र on 21 July, 2010 - 13:36

एक अतिशय वैषिष्ठ्यपूर्ण आकाराचे, मनोवेधक रंगाचे व मोहक सुगंध असणारे कैलासपतीचे फूल

DSCN7056.JPGDSCN7057.JPG

गुलमोहर: 

मी पाहिले आहे हे फूल, मस्त दिसते एकदम, इथे कलर जरा जास्त गुलाबी केला आहे का काही इफेक्ट्स ने? बाकी फोटो मस्त..

मसत फोटो.....आम्ही शाळेत असताना जेवणाच्या सट्टीत ही फुलं गोळा करायला लांपर्यंत जायचो Happy

व्वा! मस्त फोटोज! ह्यालाच नागलिंगम म्हणूनही संबोधतात. हरीहरेश्वरच्या देवळापाशी आहे ह्याचे झाड! मुंबईला विद्यापीठाच्या कालिना कँपसमध्ये आणि चर्चगेटच्या कँपसमध्येही आहेत ही झाडं! त्याची फळं (?) देखील मस्त राखाडी रंगाची गोलाकार असतात. आणि ह्या फुलांचा सुगंधही अनोखा असतो.

मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी अनेक झाडे आहेत हि, आणि मस्त फ़ूलतातही.
याबद्दल पूर्वी सविस्तर लेखन झाले आहे इथे.
अरुंधती, याची फ़ळे तोफ़गोळ्यासारखी दिसतात, म्हणून याला कॅनन बॉल ट्री, असेही
नाव आहे. पण हि फ़ळे दुरुनच साजरी, फ़ळे खाली पडून फ़ूटली, तर प्रचंड दुर्गंधी येते.
कैलासपती नाव असले तरीपण हे झाड भारतातले नाही.
मुंबईला, दादरला प्लाझा थिएटरकडून टिळक ब्रिजकडे जाणारा जो रस्ता आहे तिथे आहे
आणि पूण्याला बालगंधर्व च्या आवारात आहे. (हि सहज दिसणारी झाडे.)