आंतरराष्ट्रीय घडामोडी.

Submitted by केदार on 21 November, 2008 - 10:56

भारतीय नौदलाने सोमालियन चाच्यांचे जहाज बुडवले.

मटाचा हा अग्रलेख पण बघा.

सि ऐन ऐन वर हे काही दाखवत नाहीत लोकं.

आणखी दोन जहाज सोडविन्यासाठी भारतीय नौदल सध्या त्यांचा पाठलाग "hot pursuit" करत आहे.
चिन ने अरबी समुद्रात पाकीस्थानच्या साहाय्याने बोटींवर नियत्रंन ठेवन्यासाठी योजना काही वर्षांपुर्वी आखली होती. त्याला भारताने फार जोरात विरोध दर्शविला होता. पण तरीही तो प्रोजेक्ट चालूच आहे. (ते बंदर कुठपर्यंत आलय ह्याचा शोध घ्यायला हवा). त्या धर्तीवर आपल्या नौदलाची कामगीरी पाहून अमेरिकन व्यावसायीक भारताची मदत घेत आहेत ही निश्चीतच अभिमानाची बाब आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तस बघायला गेल तर दुसरे महायुद्ध व जपान याबद्दल जेव्हा बोलल जात तेव्हा साधारणपणे जपानचा पर्ल हार्बरवरचा हल्ला व अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा-नागासाकी वर अणुबाँब टाकुन केलेला हल्ला या दोनच ठळक गोष्टींइतकीच जपानची दुसर्‍या महायुद्धात व्याप्ती होती असे वरकरणी सर्वसामान्य माणसांना आज वाटते. पण वस्तुस्थिती तशी नाही. पर्ल हार्बर ही जपानची त्या युद्धातली नांदी होती तर ऑगस्ट ९,१९४५ मधला नागासाकी अणुबाँब हल्ला हा त्या युद्धाचा शेवट होता. या दोन घटनांदरम्यानचा जवळ जवळ पावणे चार वर्षाचा काळ हा पॅसिफिक महासागरात जपानने केलेल्या असंख्य छोट्यामोठ्या लढायांनी ओतप्रोत भरलेला आहे.. इथे मी त्या सगळ्याच लढायांची जंत्री देत बसत नाही पण काही महत्वाच्या लढायांचा आढावा मात्र देऊ शकेन.

संपुर्ण दुसर्‍या महायुद्धात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या ज्या महत्वाच्या मिलिटरी मनुव्हर्स आहेत त्यात माझ्या मते जपानने पर्ल हार्बरवर केलेला अनपेक्षित हल्ला हा टॉप ३ मधे गणला जात असेल. ज्या अनपेक्षितपणे मे ,१९४० मधे जर्मन पँझर जनरल गुडेरिनने आर्देन्सच्या जंगलातुन-- आपल्या १९व्या आर्मीचे सात डिव्हिजन्स सैन्य व त्यांचे पॅन्झर रणगाडे घुसवले व फ्रांसच्या मॅजीनो तटबंदिला बगल देउन फ्रेंच ब्रिटिश सैन्याला पाचर मारुन पॅरिस सोडायला भाग पाडले व मग जनरल अर्विन रोमेलची सातवी पॅन्झर तुकडी व जनरल रुडस्टेंड्ट च्या हाताखालची सहावी व आठवी पॅन्झर तुकडी.. अश्या त्या त्रिकुटाच्या ब्लिट्झक्रिग टेक्निक वापरुन केलेल्या कैचीत १० लाख दोस्त सैन्याची डंकर्क इथे जशी कोंडी केली.... त्याच अनपेक्षितपणे पॅसिफिकमधे... जपानच्या अ‍ॅडमिरल यामामोटो व अ‍ॅडमिरल नगुमोच्या आरमाराने.. अमेरिकन आरमाराला कसलाही सुगावा न लागु देता पर्ल हार्बरवर ७ डिसेंबरच्या झुंजुमुंजुला.. जबरदस्त व अकस्मात हल्ला केला.

या हल्ल्याबद्दल बरेच काही लिहीले गेले आहे त्यामुळे इथे त्याबद्दल सगळे लिहीत बसण्यापेक्षा मी फक्त एकच गोष्ट तुम्हाला करायला सांगतो... जर का तुम्हाला कुठे " तोरा!... तोरा!... तोरा!.. हा इंग्लिश चित्रपट बघता आला तर जरुर बघा.. पर्ल हार्बरवरचा तो अल्टिमेट व माझ्या दृष्टिने अगदी अनबायस्ड चित्रपट आहे. तो हल्ला जरी जपानच्या दृष्टीने बराच यशस्वी वाटला तरी त्या हल्ल्यानंतरचे जपान नाविक दल प्रमुख यामामोटो याचे उद्गार खुपच उद्बोधक होते...He said.... All we have managed by this attack is to wake up a sleeping giant!...

क्रमंशः.....

मुकुन्द, नेहेमीप्रमाणेच सुन्दर पोस्ट! Happy माझ्या वाचनातुन सुटणार होती Sad
असो
>>>> ७ डिसेंबर १९४१मधे... अमेरिका पुर्णपणे गाफिल असताना..
यातिल, लोकशाही राष्ट्रान्चे कायमचे गाफिलपण अधोरेखित होऊ शकेल काय? इतिहासात काय दाखले?

लिंबुटिंबु.. लोकशाही राष्ट्रे कायम गाफील असतात हे विधान चुकीचे आहे. पण अतिक्रमण करणारे देश गाफीलपणाची एकही संधी सोडत नाही व ९९ टक्के वेळी जागृत असुनही १ टक्का गाफीलपणा शांतीप्रेमी देशांना भोवतो. म्हणजे अस बघ.. अतिरेक्यांचा हल्ला वाचवायला आपण १०० टक्के जागरुक असावे लागते पण जागरुकतेचे प्रमाण १ टक्का जरी कमी झाले तर अतिरेकी त्याचीच वाट बघत असतात व मग आभास असा निर्माण होतो की आपण नेहमीच गाफील राहतो. १०० टक्के जागरुक राहणे महत्वाचे असले तरी ते प्रत्यक्षरित्या अमलात आणणे खुप अवघड गोष्ट आहे. असो.

पर्ल हार्बरवरचा अमेरिकेचा गाफिलपणा अक्षम्य होता व त्याची फळे त्यांनी त्या हल्यात झालेल्या हानीरुपात भोगलीच. पर्ल हार्बरच्या पराभवाचे खापर ल्युटेनंट जनरल शॉर्ट व अ‍ॅडमिरल हजबंड किम्मेल या पर्ल हार्बरच्या रक्षणाची जबाबदारी असणार्‍या दोन अधिकार्‍यांच्या माथी मारण्यात आले व त्यांना तिथुन पदच्युत करुन निलंबित करण्यात आले. त्या हल्ल्याच्या वेळी फिलिपिन्समधे असणार्‍या जनरल मॅकार्थरकडे मग पॅसिफिकमधली सुत्रे "सुप्रिम कमांडर ऑफ अलाइड फोर्सेस इन पॅसिफिक" या बिरुदाखाली देण्यात आली .

पण अ‍ॅडमिरल यामामोटो व नगुमो यांनी अमेरिकेला वन- टु पंच देण्याचे ठरवले होते व पर्ल हार्बरनंतर जास्त उसंत न घेता त्यांनी अमेरिकेच्या फिलिपिन्स तळावर हल्ला करायचे ठरवले. तिथेही अमेरिकेची स्थिती पर्ल हार्बरसारखीच झाली व बॅटल ऑफ बटान व बॅटल ऑफ कॉरिगॉडर मधे अमेरिकन सैन्याला शरणागती पत्करावी लागली. जनरल मॅकार्थरने त्यावेळेला फिलीपिन्समधुन पळ काढून ऑस्ट्रेलियात जाउन आश्रय घेतला.

आता फिलिपिन्सही हातात पडल्यामुळे जपानच्या आरमाराला दक्षीण पॅसिफिकमधे मलाया,बर्मा,सिंगापुर व इंडोनेशियावर बिनविरोध हल्ला करता आला व जपानने ताबडतोब मलाया,इंडोनेशिया,सिंगापुर व बर्मावर ताबा मिळवला व भारताच्या पुर्व हद्दीपर्यंत कब्जा मिळवण्यासाठी त्यांनी रंगुनला आपल्या सैन्याची मोठी जमवाजमव करायला सुरुवात केली. ते बघुन ब्रिटिशांचे धाबेच दणाणले व भारताच्या रक्षणासाठी तजविज करायला त्यांना युरोपमधल्या युद्धातुन वेळ काढून उपाय योजना करायला जपानने भाग पाडले.

डिसेबर ७, १९४१ ते जुन १९४२ या ६ महिन्यात जपानच्या पॅसिफिक कॅपेनला त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त असे सहज विजय मिळाले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अजुनच बळावला व ते आता पुर्वेकडे सॉलोमन आयलंड व फिजि बेटांवर हल्ला करायचे मनसुबे करु लागले की जेणेकरुन थेट ऑस्ट्रेलिया पर्यंत त्यांचे वर्चस्व राहु शकेल. तसच ते दक्षिण मध्य पॅसिफिकमधल्या मिड वे या छोट्याश्या पण महत्वाच्या अमेरिकन आरमारी अड्ड्यावर हल्ला करायचाही प्लान करु लागले जेणेकरुन मग अमेरिकेन आरमाराला मग पार त्यांच्या वेस्ट कोस्ट पर्यंत माघार घ्यायला भाग पडेल व जपानला संपुर्ण पॅसिफिक ओशियनवर निर्विवाद वर्चस्व गाजवता येइल.

हे सगळे बेत कागदावर तर चांगले वाटत होते पण त्या बेतांना सुरुंग लावायला अमेरिकेच्या ज्या काही खंबिर नाविक दल अ‍ॅडमिरलांनी हातभार लावला त्यात अ‍ॅडमिरल चेस्टर निमिट्झ व व्हाइस अ‍ॅडमिरल विलिअम हाल्सी या दोघांचा सिंहाचा वाटा होता . बॅटल ऑफ मिडवेच्या युद्धापासुन पॅसिफिकमधल्या जॅपनिज कॅन्पेनचे पारडे अमेरिकेच्या बाजुने झुकायला सुरुवात झाली असे म्हटले तर वावगे ठरु नये.तर त्या अत्यंत महवाच्या बॅटल ऑफ मिडवे बद्दल २ शब्द पुढच्या पोस्टमधे...

क्रमंशः....

छान माहीती मुकुंद Happy

अवांतर :
जपान ने पॅसिफिकमध्ये हल्ले करत असताना रशिया बरोबर शांतिकरार केला होता. त्याचा काही प्रभाव पडला होता काय जपानच्या युध्धमोहीमेवर? या तहाचा जबरदस्त फटका हिटलरला बसला होता.

मुकुंदा, पर्ल हार्बरच्या हल्ल्याबाबत अजून एक गोष्ट म्हणजे: पर्ल हार्बरवर अमेरिकेचा प्रचंड तेलसाठा होता.. अमेरिकेच्या प्रचंड सुदैवाने त्या तेलसाठ्याला काहिही झाले नाही. कदाचित जॅपनीज इंटेलिजन्सचे हे अपयश होते की त्यांना तिथे तेल आहे ह्याचा सुगावा लागला नाही किंवा जनरल्सना त्यात फारसे महत्वाचे काही वाटले नसेल.. पण जर हा तेल साठा उध्वस्त झाला असता तर अमेरिकेच्या नाकी नउ आले असते.. इंडोचायनामधल्या सर्व खाणी रॉयल डचच्या, भारताच्या आसपास बर्मा ऑइल वगैरे.. एकुणात एशियात रॉकफेलर साम्राज्याच्या तेलविहिरी नव्हत्या.. आखाती तेलसाठा भरात यायचा होता.. तेव्हाचा सगळ्यात मोठा तेलउत्पादक रशिया सुरुवातील जर्मनांबरोबर व नंतर दोस्तांबरोबर जरी आला तर अ‍ॅटलांटिक ओलांडून तेल अमेरिकेत येणे अशक्य होते.. अश्या प्रकारे अमेरिकेच्या डाव्या आघाडीवर इंधनाअभावी अमेरिकेचा दारुण पराभव होण्याची शक्यता होती..

शंतनु.. तुझे अगदी बरोबर आहे. जपानने ती फार मोठी चुक केली.. पण त्याला दोन कारणे होती.

१: पहिले कारण म्हणजे यामामोटोला टॅक्टि़कल टार्गेट्स.. म्हणजे अमेरिकन क्रुझर्स व एअर क्राफ्ट कॅरिअर्स..नष्ट करण्यात जास्त इंटरेस्ट होता.. लॉजिस्टिक टार्गेट्स(ऑइल रिझर्व्ह )वर त्याने अजिबात लक्ष दिले नाही ही त्याची मोठी चुक होती. पर्ल हार्बरला त्या वेळी ४५ लाख बॅरल ऑइल होते.

२: आणी दुसरे व मह्त्वाचे कारण म्हणजे यामामोटोला असे वाटत होते की पर्ल हार्बरवरच्या हल्ल्याचा उपयोग अमेरिकेशी पॅसिफिकमधे वाटाघाटी व काँप्रोमाइज करण्यासाठी करावा. त्याला अमेरिकेशी दिर्घकाळ युद्ध टाळायचे होते.

पण मी आधीच्या पोस्ट मधे सांगीतल्याप्रमाणे इथे पर्ल हार्बर हल्ल्याविषयी मी जास्त लिहीणार नव्हतो कारण त्या हल्ल्याविष्यी खुप काही लिहीले गेले आहे पण कोणाची इच्छा असेल तर त्या युद्धाच्या इतिहासाबद्दलही .. जो अतिशय रंजक आहे... सखोल लिहायला मला आवडेल.

रंगासेठ.. रशियाबरोबरच्या मैत्रीकरारचा फायदा जपानला जरुर झाला. रशियाने त्याच वेळेला जर्मनीशीही मैत्रीचा करार केला होता. हे दोन्ही करार अतिशय शॉर्ट साइटेड होते ते शेवटी रशियाच्या अंगलटच आले.. कारण त्या करारामुळे जर्मनीला आपल्या पुर्वेकडच्या आघाडीला कसलीच भिती राहीली नाही व जर्मनी पश्चिम आघाडीवर.. इंग्लंडवरच्या हल्ल्यावर आपले लक्ष पुर्णपणे केंद्रित करु शकली व ६ महिने सतत इंग्लंड्वर बाँबफे़क करु शकली. पण हिटलरने जेव्हा बघीतले की चर्चील व ग्रेट ब्रिटन त्यांच्या बाँबींगला घाबरुन शरण येत नाही तेव्हा.. रशियाबरोबर ६ महिन्यापुर्वीच (सोयीसाठी) केलेल्या मैत्रीकराराला त्याने धाब्यावर बसवुन.. ऑपरेशन बार्बारोसाला.. म्हणजे रशियावरच्या आक्रमणाला सुरुवात केली...

पाकिस्तानमधे दहशतवादी हल्ला. लाहोर मधे चार ठिकाणी बॉम्बस्फोट. दोन मशिदीमधे दहशतवादी लपून बसले आहेत. एका दहशतवाद्याला पोलिसानी पकडले आहे. मशिदीमधून फायरिंग चालूच आहे. आज शुक्रवार असल्याने नमाजासाठी आलेल्या लोकाना ओलीस धरून ठेवले आहे. या दोन्ही मशिदी अहमदिया लोकाच्या आहेत. आतापर्यंत दहा लोक ठार झाल्याची बातमी आहे. मृतात्म्याना शांति लाभो आणि अशी वेळ कुणावरही येऊ दे नको, ही प्रार्थना.

तहरीक ए तालिबान या ग्रूपने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. एकंदरीत "दहशतवाद" म्हणजे काय याचे चटके आपल्या शेजार्‍याला पण जोरात बसायला लागले म्हणायचे!!!

एकंदरीत "दहशतवाद" म्हणजे काय याचे चटके आपल्या शेजार्‍याला पण जोरात बसायला लागले म्हणायचे!!!
--- माजी लष्करशहा जनरल मोहम्मद झिया उल-हक यांनी ७७-८८ या काळात जे पेरले त्याची फळे. आज जगात (ब्रिटन, अमेरिका, स्पेन, चिली...) कुठेही खुट्ट झाले कि त्याची पाळेमुळे पाक पर्यंत
पोहोचतात. जे पद्धतशीर पणे पेरले होते ते आता अधिकारात वरच्या फळी मधे गेले आहेत. आता आभाळच फाटले तिथे थिगळ कुठे लावणार...

परवेझ मुशर्रफ हा हुशार, मुत्सद्दी होता. त्याने बर्‍याच गोष्टी झाकुन ठेवण्यात कमालीचा यशस्वी झाला.

>परवेझ मुशर्रफ हा हुशार, मुत्सद्दी होता. त्याने बर्‍याच गोष्टी झाकुन ठेवण्यात कमालीचा यशस्वी झाला.
नुसत्या झाकून नाही ठेवल्या त्या बदल्यात रग्गड पैसा ऊकळला अमेरीकेकडून. मुशर्रफ मुत्सद्दी वगैरे नव्हता, एक कुशल गारूडी होता. एका हातात साप ठेवायचा अन दुसर्‍या हातात काठी... तो गेल्यावर अर्थातच आता हे साप शिल्लक गारूड्यांवर ऊलटत आहेत. अमेरीकेच्या पैशांच्या पुंग्या बंद होवून अलिकडे "ड्रोन" चे धोंडे अंगावर पडू लागल्याने हे साप दिसेल त्याला चावताहेत झालं. अर्थातच ज्याच्या घरात बिळे आहेत त्यांन्ना दंश होणारच!

http://www.nytimes.com/2010/07/27/opinion/27tue1.html?_r=1&hpw

विकी लिक्स ने सर्वांना माहित असलेली माहिती वर पुन्हा एकदा प्रकाश टाकलेला आहे. भारत गेल्या ३ दशकां पासुन आय एस आय अतिरेक्यांना लष्करी प्रशिक्षण देतो या बद्दल ओरडत आहे. पहिले दोन दशके केवळ भारताला चटके बसत होते, त्यामुळे सर्व पाश्चात्य राष्ट्रे गप्प होती. ९-११ नंतर समिकरण थोडे बदलले...

आज जगात कुठेही खुट्ट झाले की बर्‍याच प्रमाणात पाळेमुळे पाकपर्यंत पोहोचतात. काही महिन्यांपुर्वी London School of Economics च्या अनुसार पाक आय एस आय आणि तालिबान / अफगाण मधील मधुर संबंधांवर प्रकाश टाकला होता. कळस म्हणजे हे अधिकारी लोकं तालिबानांच्या बैठकांमधे भाग घेतात, त्यांना मार्गदर्शन करतात असेही आले होते.

मागच्याच आठवड्यात भारताचे गृह सचिव गोपळ कृष्ण पिलइ यांनी २६-११ च्या मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यास पाकच्या आय एस आय चा पुर्ण हात होता असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या शब्दात They [ISI] were literally controlling and co-ordinating it from the beginning until the end असे आहे. या परखड वक्तव्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी वेळ चुकीची निवडली म्हणुन सक्त नाराजी व्यक्त केली होती. काय खोटे बोलले होते गुह सचिव? आज विकी लिक्स मधे काय वेगळे आले आहे?

आयसीसी चे अध्यक्ष शरद पवार यांना आता ही निवड झाल्यापासुन तर तर भारतातल्या शेतकर्‍यांच्या (त्याच त्या) प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ अतिशय कमी पडत आहे, कारण काय तर या शेतकर्‍यांच्या कडुन त्यांना मताशिवाय कामाचा मोबदला म्हणुन फारस काही मिळत नाही.

अमेरिकन दुतावासात काम करणारे श्री रेमंड डेव्हिस यांना दोन नागरिकांच्या खुनाबद्दल पाक सरकारने लाहोरात अटक केली आहे. डेव्हिस हे अमेरिकन राजनैतीक अधिकारी असल्याने त्यांना पाकने त्वरित मुक्त करावे असा अमेरिकेचा हट्ट आहे.

डेव्हिस यांच्या कडे सापडलेल्या वस्तुंवरुन प्रकरण संशयास्पद वाटते आहे. त्यांना पळवण्यासाठी (पाक हेर?) सापळा होता कां? मारले गेलेले लष्कराशी संबंधीत असतील तर पाक-सरकारवरचा (सुटका करण्या बाबत तसेच सुटका न करण्या बाबत) दबाव अजुनच वाढणार.

diplomatic immunity च्या कमाल किमान मर्यादा आहेत काय? खुना सारख्या गंभीर प्रकराणांत दिली जाते कां?

महाकाय भूकंप त्यानंतर तेव्हढीच भयंकर त्सुनामी, सर्वच भयानक आहे... Sad

बातम्यां मधे दोन न्युक्लीअर प्लँटस ना नुकसान पोहोचण्याची भिती व्यक्त केलेली आहे.

जपान मधील मायबोलीकर सुखरुप आहात नां?

गेल्या शुक्रवारी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत लिबियासाठी no fly zone चा ठराव संमत झाला होता. ब्रिटन फ्रांस यांनी पुढाकार घेतला होता, मोठ्या प्रमाणात निरपराध लोक मारले जात होते म्हणुन अरब लिग यांनी तशी मागणीच होती.

गेली अनेक आठवडे गडाफीने त्याच्याच लोकांचे, विरोधकांचे शिरकाण सुरु केले होते. गमावलेली शहरे एका पाठोपाठ काबीज करत विरोधकांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे बेन-गाझी पर्यंत गडाफीचे सैन्य पोहोचले. स्वत:च्याच लोकांवर हवाई, रणगाडे यांचे हल्ले म्हणजे अत्याचाराचा कळसच होता. प्रथम पासुनच चिन, रशिया हे गडाफीच्या विरुद्ध कारवाईला अत्यंत निरुत्साही होते.

सुरक्षा समितीत no fly zone ठराव संमत केला म्हणजे गडाफी मुकाट्याने तो ठराव पाळेल हा खुळचट विचार होता. कालपासुन गड्डाफीच्या लष्करी तसे हवाई तळांवर अमेरिका, फ्रांन्स, ब्रिटन यांनी अत्यंत मर्यादित स्वरुपाचा हल्ला चढवला आहे - सामर्थ्य खच्ची करणे या एकमेव (?) हेतू.

सध्या भारत सुरक्षा समितीचा सभासद आहे. त्याने ठरावावरिल मतदानात भाग घेतला नाही, पण आता अमेरिकन आणि मित्र राष्ट्रांच्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी पुढे झाला आहे. जिवीत हानी होत आहे म्हणुन अरब लिगने पण रडायला सुरवात केली आहे.

अरब लिग, भारत, चिन, रशिया यांनी गळे काढायला सुरवात केली आहे. अरे पण अरब लिगचा पाठिंबा होता म्हणुन तर सुरक्षा समितीला ठराव संमत करायचे बळ आले होते. चिन, रशिया, भारत मतदानापासुन का दुर राहिले? २४ तासांत किती बदल ? आणि गडाफीच्या अतिरेकी कारवायां बद्दल यांनी कधी निषेधाचा अवाक्षरही काढला नाही :अरेरे:.

असे दिसते की उद्यापासून अमेरिका बंद, म्हणजे बेसबॉल, सिनेमे, वगैरे नाही, तर काही सरकारी कचेर्‍या. कारण अंदाजपत्रकावर एकमत झाले नाही. एव्हढे काही गंभीर प्रकरण नाहीये, असे होते कधी कधी. पण त्या निमित्ताने पूर्वी जेंव्हा असे झाले होते तेंव्हाची एक गंमत आठवली -

सरकार बंद म्हणजे बांगलादेशच्या अमेरिकन वकिलातीला पैसे आले नाहीत, नि इकडे बांगलादेशमधे तर त्यांचे विजेचे बिल, पाण्याचे बिल सगळे थकले. मग ज्या बांगलादेशला किसिंजर ने जगातला अत्यंत भिकारी देश म्हणून हिणवले होते, त्या बांगलादेशकडून अमेरिकन वकीलाने कर्ज काढले!!!!

या वेळेपर्यंत अमेरिकेला कर्ज म्हणजे काहीच वाटत नाही. नऊ ट्रिलियन, दहा ट्रिलियन म्हणजे काहीच नाही. मुळात ट्रिलियन म्हणजे किती याची बर्‍याच जणांना कल्पनाच करवत नाही. त्यामुळे ९, १० असे ऐकले की काहीच वाटत नाही.

तसे कुणि देशाने, म्हणजे जपान, भारत यांनी आमचे कर्ज ताबडतोब फेडा अशी धमकी दिली तर हिरोशिमा, नागासाकी यांचे १९४५ चे फोटो पाठवतील, नि आता त्याहूनहि भयानक अस्त्रे आमच्याकडे आहेत आणि म्हणालात तर एका तासाच्या आत तुमच्या देशाकडे 'पोचती करू' असे सांगता येईल.

सर्व जण अमेरिका ऑइलसाठी युद्ध करते म्हणुन गळा काढतात पण अशा हुकुमशहाच्या हातात ऑइलसाठे लागले तर जगभर किती महागाइ, उपासमार होइल याचा कोणी विचारच करत नाही.
अन्नाचा प्रश्ण कधीच सुटला आहे जग्भर जी उपासमार आहे कारण अन्नाचा साठा(शीत जागेत साठा ज्याला इंधन लागते) आणि वाहतुक ज्याला इंधन लागते याचा खर्च ७५% ते ८०% आहे .

अमेरिकेने शेवटी १० वर्षांनंतर का होईना पण लादेनला मारलंच. जगातला एक क्रूरकर्मा नष्ट झाला. पाकिस्तानने त्याला १० वर्षे संरक्षण देऊन सुध्दा अमेरिकेने जिद्द न सोडता सतत त्याच्या पाळतीवर राहून त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला मारले. सद्दाम, प्रभाकरन, वीरप्पन प्रमाणेच लादेन ह्या क्रूरकर्म्याचा शेवट झाला. आता दाऊद, टायगर मेमन, शकील, भटकळ इ. चा असाच शेवट व्हावा.

काय उपयोग? या सर्व 'महात्म्यांनी' मरण्यापूर्वी पुरेसा डॅमेज केलेलाच होता. आणि असले प्रभाकरन, लादेन खरे तर मरत नसत्तातच त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालणारे नवेनवे निर्माण होतच असतात. मुळात कशाचे तरी न्यायपूर्ण वाटप होत नाही. अगोदर सनदशीर मार्गाने केलेल्या मागणीकडे सत्ताधाअरी लक्श देत नाहीत. मग कोणीतरी भस्मासूर भडक भावनाना हात घालून उभाराहतो. त्याला काही लोक आणि राष्ट्रीय किंवा आन्तरराष्ट्रीय राजकारणातला एक गट डावपेच म्हणून बळ देतो. मग ते बळ देणार्‍यापेक्षा मोठे होऊन मोठेच आव्हान देतो. मग त्याला मारण्यासाठी अपरिमित हानी होउन दहा, पंधरा वीस वर्षानी मारला जातो हाच सगळ्या अतिरेक्यांचा इतिहास आहे.... तरी देशाचे आणि जगाचे धुरीण जागे होत नाहीत...

तो पाक मिलीटरी अकादमी पासुन तो केवळ १ कि.मी (पाक राजधानी पासुन १०० कि मी) अंतरावर रहात होता... पाकच्या आतमधे ४ हेलीकॉप्टर येतात आणि १०० % यशस्वी कारवाई करुन परत जातात, अत्यंत धाडसी कृत्य होते. खुप प्रश्नांची उत्तरे अजुन बाहेर यायची आहेत.

अमेरिकेने संपुर्ण घटनांत कुठल्याही बाहेरच्या देशाला थांगपत्ता लागू दिला नाही. ऑगस्ट २०१० पासुन त्यांनी या मह्त्वाच्या बातमीची गुप्तता ठेवली हे वाखाणण्या सारखे आहे.

अगोदर सनदशीर मार्गाने केलेल्या मागणीकडे सत्ताधाअरी लक्श देत नाहीत.
---- ह्याचा (सनदशीर मार्गाने मागण्या मान्य न होण्याचा) आणि हातात घातक शस्त्रे घेऊन हजारो निरपराधांना मारण्याचा संबंध येतच नाही. त्याच्या कोणत्या सनदशीर मागण्या होत्या?

व्यक्ती म्हणून ओसामा 'ऑब्सोलेट' झाला आहे आणि तालिबान-अलकायदाचा खरा पाडाव होत नसल्याने त्याला मारणे कॉनसॉलेशन प्राईझसारखे आहे.
ओसामाविचार मरणे फार अवघड आहे.

Pages