आंतरराष्ट्रीय घडामोडी.

Submitted by केदार on 21 November, 2008 - 10:56

भारतीय नौदलाने सोमालियन चाच्यांचे जहाज बुडवले.

मटाचा हा अग्रलेख पण बघा.

सि ऐन ऐन वर हे काही दाखवत नाहीत लोकं.

आणखी दोन जहाज सोडविन्यासाठी भारतीय नौदल सध्या त्यांचा पाठलाग "hot pursuit" करत आहे.
चिन ने अरबी समुद्रात पाकीस्थानच्या साहाय्याने बोटींवर नियत्रंन ठेवन्यासाठी योजना काही वर्षांपुर्वी आखली होती. त्याला भारताने फार जोरात विरोध दर्शविला होता. पण तरीही तो प्रोजेक्ट चालूच आहे. (ते बंदर कुठपर्यंत आलय ह्याचा शोध घ्यायला हवा). त्या धर्तीवर आपल्या नौदलाची कामगीरी पाहून अमेरिकन व्यावसायीक भारताची मदत घेत आहेत ही निश्चीतच अभिमानाची बाब आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर सी एन एन वर बातमि बघितलि कि इतर काहि नौकांप्रमाणे भारतिय नौदलाचि नौकेच पण समुद्रि चाचांनि अपहरण केल (अशि एका ओळिचि बातमि होति पण माझि ऐकण्यात चुक होण्याचि शक्यता पण आहे).

बाय द वे वर दिलेल्या लिंकवर एरर येतेय मटा च्या अंकात कुठल्या दिवशिचि हि बातमि आहे हे सांगतोस का? म्हणजे त्यांच्या साइट वर जाउन वाचता येइल.

रश्मी ति लिंक बरोबर केलीय आता. आजचाच अग्रलेख.
ती बातमी बहुतेक वेगळी होती. ऐका भारतीय जहाजाचे अपहरण झालेय आणि त्यासाठी ते चाचे २५ मि $ चा हप्ता मागत आहेत, कदाचित ती तू ऐकली असशील.

CNN चे माहित नाहि पण ABC आणि NBC वर सांगितलेली भारतीय नौदलाची कामगिरी असे.

BBC वर मोठीच बातमी आहे. केवळ भारतानेच नाही तर सर्व देशांनीच बंदोबस्तासाठी आणि प्रसंगी कठोर कारवाई साठी पुढे यायला हवे. बाकीचे खंडणीच्या पैशांनी काम चालवतील असे नको व्हायला. सौदीचे मोठे जहाज अडकले आहे, चाचे खुप पैशे मागत आहेत, बघु काय होते पुढे.

PBS वरही बरेच कव्हरेज होते. CNN चॅनेल चे माहित नाही, पण वेबसाईटवर न्यूज होती बहुतेक.

धन्यवाद केदार, बातमि आणि अग्रलेख दोन्हि वाचलेत. खरच सगळ्या भारतियांना अभिमान वाटावा अशि घटना.

च्च च. सिऐन ऐन वर कव्हरेज नाही हा मुद्दा न्हवता. तसे चूकुन झालेच पण.
तर आता पुर्ण गल्फ आणि अरबी समुद्रावर भारतीय नौसेना बंदोबस्त ठेवून असते व तिची की मस्त कामगिरी हे मांडायचे होते.

lol
तू ते सीएनएन बघायचं बंद कर बरं! Happy

केदार, इथे हॉलन्डमध्ये देखील मोठी बातमी आहे ही. आज ऑफिसमध्ये इथल्या सगळ्या लोकांनी बातम्यात पाहिल्याचे सांगितले.

अग पण निंदकाचे घर असावे शेजारी म्हणून बघतो. बंद करतोच. पण तो ऍन्डरसन आणि लॅरी पाठीमागे लागतात उगीच.

बीबीसी ची होम पेज पाहिल का? तिथे http://www.bbc.co.uk/?ok
युके नंतर ? येतो आणि पुढे ओके पण येत. म्हणजे घाबरत घाबरत दिल्या सारखे वाटले ते. जाम हसायला आलं. Lol

टण्या माझा अमेरिकन कलिग ने मला विचारले तूमच्या कडे युध्द नौका आहेत का म्हणून. :कपाळावर हात मारलेली बाहूली:

BTW मी आय ऐन ऐस विक्रांत व आय ऐन ऐस दिल्ली वर पाय ठेवलेले आहे तर शल्की पाणबूडी ला खुप जवळून बघीतले आहे.

स्वतंत्र भारताचा विजय असो.

स्वतंत्र भारताचा विजय असो.

>>>

आज तुमची बत्तीशी भारताच्या नावाने कशी काय उचकली बुवा? की उपहासाने?
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

काही रडू नका. भारतात काय कमी गायक आहेत का?
विशेषतः पाकीस्तानचा गायक नको. उगाच फालतू 'कला' वगैरेच्या नावाखाली परदेशियांचे पाय चाटायचे. आहेत भारतातहि खूप गझल गायक. त्यांना परत परत ऐकलेत की तेहि आवडू लागतील.
लता नि भीमसेन, नि जसराजहि भारतातलेच आहेत. ते जरी गझल गाणारे नसतील तरी दुसरे अनेक असतील. नि नाही ऐकले त्या पाकड्याला तर काही मरत नाही!
हज्जार वर्षे झाली, अजून तुमच्या टाळक्यात घुसत नाही का की मुसलमानांवर विश्वास ठेवू नये?
फुक्कट परकीयांचे पाय चाटायचे!

केदार थोडा गैरसमज झालेला आहे. दिल्लीवरुन "**(???)** भारतात पाठवू नका" असा कडक निरोप आला होता, पण नक्की काय ते पाकला कळालेले नाही. काहीतरी पाठवायचे नाही एव्हढे मात्र कळाले म्हणुन मग गझलगायक कारण त्यांच्या वर पुर्ण नियंत्रण आहे. हा तर खार्‍या भारतीय संगीत रसिकां (खारे आणि खोटे असे दोन रसिक आहेत) वर एकाचवेळी दुहेरी आघात आहे. पहिला आघात तर सहन केला, आता हा सहन करण्यासाठी कोठून बळ आणायचे?

झक्की रडतं नाहीये. माझा पर्याय तर अजुनही नं १ च आहे. पुर्ण संबंध तोडा. पिरीऐड.. काही गरज नाही त्यांची आम्हाला.

मी हे विसरलो नाही की लता मंगेशकर व आशा भोसले ह्यांना पाक त्यांचाकडे येऊ देत नाही. (तसे बरेच ट्राय झाले होते आधी). त्यामूळे गुलाम अली ला ऐकले नाही तरी माझे काही बिघडनार नाही. त्यांचा चाहता असलो तरी.

उदय LOL.

दवा दारु वर बंदी आलेली आहे. केदार, अशा बंदीचा काही उपयोग होतो कां? काही दिवसातच नवीन नावाने पुन्हा तेच कार्य सुरु होते.

गंमत-गंमत च्या लढती नंतर, पाकने २-३ लोकांना स्थान बद्ध (नजर कैद) केले आहे, आता त्यांची कसुन चौकशी सुरु आहे. जखमींना नेण्यासाठी ambulance(s) आणल्या होत्या, पण शुर सैनीकांपुढे या अतिरेक्यांनी अक्षरशः नांग्या टाकल्या, त्यामुळे कुणिही जखमी झाले नाही.

भारताच्या परराष्ट्रखात्याच्या पत्रकात (२९ डिसेंबर) इस्त्रायलच्या गाझा हल्ल्यांचा निषेध व्यक्त केला आहे (This continued use of indiscriminate force is unwarranted and condemnable.). पत्रकात कुठेही आधी झालेल्या रॉकेट हल्ल्यां बद्दल अवाक्षरही नाही...

त्याच भुमिकेला साजेल अशी अजुन एक बातमी आज वाचली. भारत पाकमधील अतिरेक्यांवर कारवाई (hot pursuit) करणार नाही. http://www.expressindia.com/latest-news/No-hot-pursuit-on-terrorists-ope...
भारतात अजुन एक हल्ला झाला (होणार... फक्त कधी, कोठे आणि त्याचे स्वरुप काय हा प्रश्न) तर आपण अजुन एकवेळा पाकला स्मरणपत्र देणार 'तुम्ही अजुन या या अतिरेक्यांना आमच्या स्वाधीन केलेले नाही...., लवकर करा अन्यथा परिणामांना सिद्ध रहा'. निव्वळ शब्दाने मागाणी करुन मिळत नाही हे लहान मुलपण जाणते, त्याच्यासोबत काही तरी कृती लागते ज्याने भविष्यात शब्दांना वजन प्राप्त होते...

२६ नोव्हेंबर घडून आता तब्बल ५ आठवडे झाले आहेत. जे झाले ते सर्व भारताने पुन्हा विसरुन शांती चर्चेला पुन्हा अजुन एकदा संधी द्यायला काय हरकत आहे?

भारताची एकमेव (हे बरोबर आहे कां?) विमान वाहक युद्धनौका "विराट" ला लक्ष करण्याचा तोयबाच्या अतिरेक्यांचा बेत आहे असे वाचण्यात आले. त्यामुळे तिचा बंदोबस्त कडेकोट केलेला आहे. आता विराट नौकेने काश्मीर मधे काय उत्पात/ अन्याय घडवला म्हणुन तिच्यावर रोष आहे हे मला कळत नाही.

सचिन, लता, अमिताभ... यांच्या जिवाला धोका असल्याच्या बातम्या अधुन मधुन येतच असतात. मग असलेला बंदोबस्त अजुन कडक केला जातो. मुंबई (तसेच बाकीच्या प्रमुख शहरात) मधील अनेक स्थळांवर सुरक्षा वाढवली आहे.

संसदेवर हल्ला झाल्यावर थोडे वादळ जरुर उठते... मग मधुनच कुठल्या तरी शिर्डीच्या अथवा महालक्ष्मी मंदिराला धमकीचे पत्र येते, मग पुन्हा असलेला बंदोबस्त कडक होतो...

या सर्व धमक्या निव्वळ निव्वळ पोकळ नाही आहेत याची जाणिव व्हावी म्हणुन मुंबई_नोव्हेंबर२००८ घडते. आता या सर्व कारवायांचा स्त्रोत हा काळानुरुप पुर्णपणे विकसीत (मोठा) होतो आहे... किती किती ठिकाणी, कोणा कोणाला कडक सुरक्षा पुरवणार? हे भारताला कसे परवडते?

त्यामुळे तिचा बंदोबस्त कडेकोट केलेला आहे. >> च्यायला, आता दिवसच उलटे आलेत. त्या नौकेने आपला बंदोबस्त करायच्या ऐवजी आपणच तिचा बंदोबस्त करत आहोत.
हो ती एकमेव आहे. पण काही बाकीच्यांवर जसे 'दिल्ली' कॉप्टर आहेत.

केदार आपण तिचा बंदोबस्त केल्यावर त्याच्या बदल्यात ती आपला बंदोबस्त करणार आहे समजलं? Happy

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

उदय,
आपल्या भेकड राज्यकर्त्यान्ना शूर ईस्राईल कसे कळणार? अरे जे आपल्याच देशातल्या स्वाभिमानी संघटनांवर बंदी घालण्यासाठी आपली सगळी शक्ती खर्च करतात त्यांना शत्रूशी लढायला वेळ कुठुन असणार? रामजन्मभूमीच्या नंतर मुंबईत जे दंगे झाले होते त्याबद्दल मायबोलीवरच्या चर्चा वाचा. सगळे भेकड सेक्युलर हिंदू संघटनांवर खापर फोडून मोकळे. दंगा करणार्यांचा बाबर कोण लागतो हा प्रश्न विचारण्याची प्राज्ञा एकातही नाही. गोध्रा ट्रेन बद्दल अवाक्शर नाही - निषेध नंतरच्या प्रतिक्रियेचा!
"शिवराज" म्हणतो "अफझल" ला मारण्यात राष्ट्रभक्तांना रस का?
हे सत्तेवर राहतात कसे??

अरे इस्रायल च्या नखाचि सर येणार नाहि या मन मोहन सिन्ग ला.
आणि बाटग्या कॉग्रेस ला.

११ मिनिट(च)झाले बुवा तुम्हाला मायबोलीवर Proud
लगेच आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल बोलायला आलात , छान वाटले Happy

***************
गोड बोलायला
तिळगूळ कशाला ?

तशि ५,२५,६०० मिनिट झालि . हि माझि दुसरि आय डि आहे.
पयल्या आयड्या मॉड नि ब्लॉक केल्या ग.

तिळ गुळ घे आणि ग्वाड बोल.

मला वाटलच होत की हा संतु असणार्
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

५,२५,६०० मिनिट झालि . हि माझि दुसरि आय डि आहे.
--- 'वर्षभरातील' काळात केवळ दुसरी ? तुम्ही कोणी जरी असलात तरी तुमचे स्वागत तिळ-गुळाने गोड करायलाच हवे (तुम्ही माबो वर गोड बोलाल या अपेक्षेने).

आम्ही शत्रुवर (देखील) प्रेम करणारी माणसे, तुम्ही तर...

चिन्या देअर यु आर. बरोबर ओळखलस.
क्या बात है दोस्त दुरुस्त फर्माया.

उद्या
मि कशाला ग्वाड बोलु मला वाटल ते मि बोलणार.
तोंडदेखले गोड बोलायला मि काय फुढारि नाय येड्या.

Pages