आंतरराष्ट्रीय घडामोडी.

Submitted by केदार on 21 November, 2008 - 10:56

भारतीय नौदलाने सोमालियन चाच्यांचे जहाज बुडवले.

मटाचा हा अग्रलेख पण बघा.

सि ऐन ऐन वर हे काही दाखवत नाहीत लोकं.

आणखी दोन जहाज सोडविन्यासाठी भारतीय नौदल सध्या त्यांचा पाठलाग "hot pursuit" करत आहे.
चिन ने अरबी समुद्रात पाकीस्थानच्या साहाय्याने बोटींवर नियत्रंन ठेवन्यासाठी योजना काही वर्षांपुर्वी आखली होती. त्याला भारताने फार जोरात विरोध दर्शविला होता. पण तरीही तो प्रोजेक्ट चालूच आहे. (ते बंदर कुठपर्यंत आलय ह्याचा शोध घ्यायला हवा). त्या धर्तीवर आपल्या नौदलाची कामगीरी पाहून अमेरिकन व्यावसायीक भारताची मदत घेत आहेत ही निश्चीतच अभिमानाची बाब आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुमोदन झक्किभाय. stimulus money कसे कोणी नाकारू शकतो स्वार्था पोटी?

चीन मधील दंगे. उघिर व लोकल हान चिनी लोकान्मधील वैमनस्याचा परिणाम. सरकार परिस्थिती आटोक्यात
आणण्याचा प्रयत्न करीत आहे. खरी परीस्थिती कळायचा मार्ग नाही.

<<खरी परीस्थिती कळायचा मार्ग नाही.>>
चीनच्या बाबतीत ते नेहेमीचेच आहे. पुनः एकदा, जगात कुठेहि अस्थिर परिस्थिती असलि की त्यात मुसलमानच कसे असतात?

त्या उघिर लोकांना मक्केला यात्रेला जाण्यावर नि इतरत्रहि प्रवास करण्यासाठी निर्बंध आहेत. त्यांची भाषा नि अरेबिक लिपी शिकवायची बंदी आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती सर्वात खालच्या दर्जाची आहे.

मला वाटते, भारतातल्या काही नेत्यांना कळले तर ते त्या बिचार्‍या मुसलमानांना भारतात घेऊन यावे अशी मागणी आपल्या सरकारकडे करतील. म्हणजे बिचार्‍यांना यात्रेला जायला पैसे मिळतील, जिहादचे शिक्षण मिळेल.

Happy Light 1

http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/8242233.stm

साधारणत: चिन कडून शस्त्रांचा प्रवाह वहातो, आता हा साठा सैदी वरुन भारत मार्गे चिन कळत नाही. सौदीने C-130 Hercules विमान शस्त्रे वाहून नेत आहे हे भारताकडे जाहिर केलेले नव्हते (कागदी अर्जावर शस्त्रे/ स्फोटके च्या समोर not applicable म्हणुन निवडले).

काय गौडबंगाल आहे ?

मुशर्रफ हे आज सांगतो आहे, पण अमेरिकेला ते केव्हाच माहित असणार. वेळ, सोय, स्वत:चे हित याला जास्त प्राधान्य दिले जाते. अमेरिका त्यांना हे आजच कळाले आहे असे भासवणार असेल (तसेच दिसते आहे) तर आपण अजुनही भोळे आहोत.

काय न्हाय...... आजुन अफगाण अन इराक चे फदफदे नीट शिजुन न्हाय र्हायले अन काहींचे पाक चे भरित करायचे प्लान सुरु झाले Happy

एशिया टाइम्स ऑनलाइन मध्ये सध्या एम के भद्रकुमार अफगाणीस्तानवर चांगली लेखमाला लिहीत आहेत.. वॉर अगेन्स्ट टेरर आणि त्यानुषंगाने घडणार्‍या मध्य-पश्चिम आशियातील घडामोडींवर चांगले लेख येतात ह्या आंतरजालावरील दैनिकात..
http://www.atimes.com/

मागच्या क्वार्टरच्या 'Indian Defence Review' मध्ये भरत वर्मानी भारत-चीन युद्ध का होउ शकते ह्यावर एक तपशीलवार निबंध लिहिला होता. त्यातील बरीच सुचके आता दिसत आहेत. चीनची गेल्या काही आठवड्यात लडाख, उत्तराखंड (तिकडून दक्षिण-पश्चिम तिबेट) आणि अरुणाचल अश्या विस्तीर्ण पूर्व-पश्चिम पट्ट्यात घुसखोरी (पायदळ तसेच हवाई हद्दींचा भंग करत) चिथवणारी आणि ६२च्या युद्धासारखी आगाउ सुचना देणारी आहे.
मागच्या आठवड्यात एडीबी मध्ये आपण चीनच्या अरुणाचल मधील महत्वाकांक्षी प्रोजेक्टला सुरुंग लावला तर त्यांनी आपल्या अरुणाचलप्रदेशच्या सगळ्याच प्रोजेक्टना सुरुंग लावलाय (हा भाग वादग्रस्त सीमेमध्ये येतो असे बहुमताचे मान्य करुन).

त.टी.:अरुण शौरींचे 'are we deceiving ourselves again' हे पुस्तक वाचनीय ह्या संदर्भात.

भारत चीन युद्ध झाले तर (ते कधी ना कधी होईलच) आपण काही एवढे अन्प्रेपेअर्ड नाही आहोत. पण युद्धाची किम्मत इकॉनॉमीला फार मोजावी लागते अन विकासावर फार वाईट परिणाम होतो. म्हणून राज्यकर्ते (कोणतेही) सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून त्याची निवड करतात . यंव खाऊन जगू अन त्यं खाऊन जगू हा केवळ अभिनिवेष्.फाटक्या शाहीराने समरगीत म्हणावे तसे Happy

१९९६ ला लोकसत्तेत कि सकाळ मध्ये ७१ ची युद्ध विशेषांक पुरवणी आली होती. त्यात जसा पाक युद्धाचा आढावा होता, तसाच "भारताचा खरा शत्रू कोण" असा लेखही होता. चिन बद्दल लेखकाने बरेच काही लिहीले होते. अनेक गोष्टींसोबत अरुणाचल प्रदेशाबाबत त्यांनी काही अंदाज वर्तविले होते. लेखकाचे नाव विसरलो, पण लेखाचे नाव लक्षात आहे.

चीन भारताच्या सीमेबाबत चीनच्या काही गोष्टी भारताला (आणि उलट) मान्य कराव्या लागतील असे नाही का केदार तुला वाटत? ज्या पद्धतीने मॅक मोहन रेषादि विचार करता.? च्यायला हे ब्रिटीश महाहरामखोर. जिथून गेले तिथे पाचर मारूनच गेले. रडक्लिफ लाईन, ड्युरांड लाईन, ई. अफगाण पाक बॉर्डर ही दोघानाही डोकेदुखीच आहे. अगदी अभिनिवेश सोडला तरी अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि चीन यांचे सीमेबद्दल स्वतःचे प्रामाणिक समज आहेत. कारण ह्या इंग्रजानी मारलेल्याअथवा न मारलेल्या संदिग्ध लायनी ! Angry
बाल्फोर जाहीरनाम्याने मारलेली पाचर तर अजूनही मध्यपूर्वेत निघत नाही. हाँग्काँगचे हस्तान्तरण ई.

हो, अगदी बरोबर! एकदा दोन्ही देशांनी बसून काय तो निर्णय लावावा. पण १९६२ सारखी फसवणूक होता कामा नये. आपण जागरुक आहोत का प्रश्न आहे. आपला बराचसा भाग त्यांनी घश्याखाली घातला आहेच, हे ही विसरु नये.

अश्यातच एक व्हाईट पेपर वाचला, त्या प्रमाणे भारत पाक सोबत युद्ध झाल्यावर युद्ध हारेल, कारण त्यांचाकडे असणारे अत्याधूनिक शस्त्रे. त्या टाईम्सच्या लेखात देखील पाकने काय विकत घेतले आहे ते दिले आहे. मग चिन सोबत युद्ध परवडनार का? सात्-आठ वर्षांपूर्वी पाकला उत्तर द्यायला निदान सैन्य समोरासमोर उभे होते, पण आज आपण तशी फुसकलीही सोडू शकत नाही आहोत.

वर तुम्ही अन्प्रेपेअर्ड नाही आहोत असे लिहीलयं पण खरच आपण कुणाशीही युद्ध करायला सज्ज आहोत का?

येस रॉबीन.. युद्धाची किंमत फारच मोठी मोजावी लागेल.. गोल्डन आर्चेस थेअरी (कितीही भंपक असो) खरी ठरो! पण येत्या तीन-चार वर्षात जागतिक परिस्थितीत काही विशिष्ट बदल घडले तर चीनला युद्ध करणे फायद्याचे ठरेल.

>> म्हणून राज्यकर्ते (कोणतेही) सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून त्याची निवड करतात . >> हे वाक्य आपल्यासारख्या गरीब/विकसनशील देशाला लागू होते. अमेरिकेसारख्या देशाला युद्धे ही अर्थव्यवस्थेला बूस्ट देणारी म्हणुन उपयोगी ठरतात हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे.

बाकी इंग्रजांनी मारलेली पाचर जगभर प्रसिद्ध आहे. पार आफ्रिकेपासून सुदूर पूर्व आशियापर्यंत.. मध्य आशियाचे जे काही खोबरे त्यांनी केले आहे आणि त्यात इस्रायेलला बसवून जो काही मुत्सद्देगिरी आणि दूरदृष्टीचा (त्यांच्या बाजूने) नमूना दाखवून दिला आहे त्याला सलामच!

अमेरिकेला युद्धे फायद्यात राहतात हेही एक अर्धसत्य असावे असे माझे मत आहे. आर्थिक दृष्ट्या असतीलही. पण विअ‍ॅतनामसारख्या युद्धाने त्यांचे किती सामाजिक नुकसान झाले आहे .पिढी ड्रगच्या विळख्यात सापडली. ह्या नुकसानीची किम्मत कशी करणार? आपण जी काही छोटी युद्धे जिंकलो हरलो त्याने आपले आर्थिक नुकसान झाले पण सामाजिक वीण विस्कटली नाही उलट पक्कीच झाली. एवढी सामाजिक डायवर्सिटी असताना. ही आपली जमेची बाजू नाही का?

अमेरिकेचा सगळा पैसा हा बाहेरून आलेला असतो. युद्धानंतर त्यांनी यूरोपला किती लुटले, जिथे जातील तिथून त्यांनी मिळेल ते लुटले. म्हणून त्यांचा आर्थिक फायदा पूर्वी झाला. ते सगळे पैसे आता काही थोड्या स्वार्थी लोकांच्या हातात आहेत, देश भिकारी.

नि सामाजिक नुकसान तर चालूच आहे. एकूण युद्ध वाईटच.
अगदी महाभारतसुद्धा! धर्मयुद्ध म्हणे. जगाचे वाटोळे केले, दोष कलियुगाला दिला! कलीयुग म्हणून लोक बिघडले नाहीत. युद्धामुळे लोक बिघडले, म्हणून कलीयुग.

फली नरीमन ह्यांची एक उत्तम आणि सोपी मुलाखत (नाहीतर असल्या माणसांच्या सोप्या मुलाखती मिळणे अवघडच).. न्यायव्यवस्था, तिचे स्वतंत्र अस्तित्व आणि त्यावर अंकूश असावा की नाही वगैरे बाबी थोडक्यात आहेत. वर्थ रीड.
http://www.indianexpress.com/news/i-am-very-angry-with-sc-saying-if-govt...

केदार, मागे मी तुला जपानच्या पुस्तकाबद्दल बोललो होतो. त्याचा तपशील.

नाव.- जपानचे महायुद्ध.
लेखकः- पंढरीनाथ सावन्त.
मनोरमा प्रकाशन
प्रथमावृत्ती एप्रिल २००९.
२२५ रु.
पृष्ठे:- २२४
"दुसर्‍या महायुद्धावर हिटलरचे युद्ध असा शिक्का बसला आहे.वस्तुस्थिती तशी नाही् . हिटलरमुळे तीन महत्वाकांक्षा एका धाग्यात गोवल्या गेल्या आणि तीन वेगवेगळी युद्धे एकाच वेळी चालत राहिली. हिटलरने त्याची, इटलीच्या मुसोलिनीची आणि जपानी लष्करवाद्यांची अशी तीन प्रादेशिक महत्वाकांक्शा एका सूत्रात गोवल्या हे खरे...............
....हिटलरच्या युद्धाची माहिती मराठीत त्यामानने बरीच आहे पण जपानच्या युद्धाची त्यामागच्या सांस्कृतिक ,राजकीय, आर्थिक प्रक्रियेची माहिती मराठीत नाहीच असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे.जपान राखेतून उभा राहिला असे आपण म्हणतो. ती राख झाली कशी ते आपल्याला माहीत नाही. ते माहीत करून घेण्याचा आणि देण्याचा हा प्रयत्न. ...

-------प्रस्तावनेतून.

समोआ बेटे आणि परिसरात ८ मॅग्निट्युड इतका भुकंप आणि सुनामी ... मृत्युचा आकडा १०० च्या वर

माझा एक आत्येभाउ (जो मायबोलीकर पण आहे) हा वेस्टर्न समोआ मधे रहातो. कालपासुन प्रयत्न करतो आहे पण फोन लागतच नाही. कदाचित सुनामीमुळे फोन वगैरे व्यवस्था कोलमडल्या असतील.
आत्ताच फोन लागला ...त्यांच्याकडे ठीक आहे पण सागरकिनार्‍यावरील लोकांना स्थलांतरीत केले आहे.

http://news.bbc.co.uk/2/hi/europe/8612825.stm

पोलंडचे अध्यक्ष सोबतच सेना प्रमुख, केंद्रिय बँकेचे गव्हर्नर, काही लोक प्रतिनिधी अशा ८० लोकांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यु. Sad

रशियाच्या म्हणण्यानुसार त्यांनी वैमानिकाला विमान वळवायला सांगितले होते, पण त्याने एकले नाही. मला सर्वच शंकास्पद वाटते. राष्ट्र प्रमुख, सेना प्रमुख, अनेक नेते एकाच विमानात... वैमानिकाला परवानगी नाकारली (असे म्हणतात), त्याने जुमानले नाही... विमानाने ४ वेळा खाली येण्याच्या प्रयत्नात झाडाला स्पर्श झाला...

मला सर्वच शंकास्पद वाटते. राष्ट्र प्रमुख, सेना प्रमुख, अनेक नेते एकाच विमानात
काहि सांगता येत नाही.रशियाचा पोलंडवर अँटी मिसाईल उनिट्स लावण्ल्यापासुन राग होता.

रॉबिन हुड.. तु जो पंढरीनाथ सावंतांच्या पुस्तकाचा उल्लेख केला अहेस त्यावरुन...

जपानच्या दुसर्‍या महायुद्धातल्या भागाबद्दल मराठीत जास्त लिखाण आहे की नाही हे मला माहीत नाही पण मला त्याबादल जी काही माहीती आहे त्याचा सारांश मी इथे मायबोलीवरच्या इतिहासप्रेमींसाठी देत आहे.

आपल्या सगळ्यांना ब्रिटिश्-फ्रेंच्-डच साम्राज्यवादाबद्दल व वसाहतवादाबद्दल नेहमीच इतिहासात वाचायला मिळाले आहे. १६०० ते १९०० सालापर्यंत या ३ देशांचे साम्राज्य त्यांची व्यापारी महत्वाकांक्षा व बळकट आरमारी बळ या दोन गोष्टींमुळे सर्व जगात पसरले होते हे आपल्याला माहीत आहेच. पण साधारणपणे १९०० सालापासुन त्यामधे अमेरिका व जपान यांचाही सहभाग होउ लागला. १९०० सालापर्यंत अमेरिका त्यांच्या अंतर्गत सिव्हिल वॉर मधुन सावरली होती व भांडवलशाहीच्या आधार घेउन औद्योगीक क्रांतीमधे बघता बघता अमेरिकेने बरीच मजल मारुन आपली इकॉनॉमी प्रबळ केली होती. पण १६०० ते १९०० सालादरम्यान इंग्रज्-डच्-फ्रेंच या देशांनी जसा उघड उघड साम्राज्यवाद/वसाहतवाद स्विकारला होता तसा १९०० साली अमेरिकेला करता येणे शक्य नव्हते. एक तर त्या ३ प्रमुख देशांनी जगातले जवळ जवळ सगळे देश काबीज केले होते व त्या अनुशंगाने त्या त्या देशातील कच्च्या मालावर आपला मालकी हक्क बसवला होता. तरीसुद्धा अमेरिकेने फार इस्ट मधल्या व प्रशांत महासागरातल्या बर्‍याच बेटांचा ताबा घेउन आपल्या आरमाराला प्रबळ करायला सुरुवात केली होती. त्याची परिणीती १९०८ मधे हवाइमधे पर्ल हार्बरमधे झाली.तिथे अमेरिकेने आपल्या आरमारी दलातल्या पॅसिफिक फ्लिट्साठी मोट्ठा आरमारी अड्डा बांधला जेणेकरुन संपुर्ण प्रशांत महासागरातल्या आरमारी हालचालीवर त्यांना नजर ठेवता यावी. तसेच त्या नाविक दलाचा फायदा मग त्यांना फ्रेंच इंडोचायना मधे ढवळाढवळ करण्यासाठी होणार होता. थोडक्यात म्हणजे अमेरिकेचा डोळा फ्रेंच इंडोचायना मधल्या.. व फिलिपिन्स,इंडोनेशिया सारख्या ट्रॉपिकल रेन फॉरेस्टने भरलेल्या देशातल्या कच्च्या मालावर. खासकरुन तिथल्या लाकडावर व तेलावर होता. अमेरिकेतल्या प्रचंड मोठ्या औद्योगीक भरभराटीच्या भुकेसाठी तिथला तो कच्चा माल, ते लाकुड व ते तेल अतिशय महत्वाचे होते.

आता हे सर्व होत असताना जपानचा एंपरर व त्याच्या हाताखालचे सैन्यदल अमेरिकेच्या या हालचालींवर पारख ठेउन होता. अर्थातच पॅसिफिक ओशिअन.. म्हणजे त्यांच्याच बॅकयार्डमधे अमेरिका असे हळु हळु आपले मिलिटरी बस्तान बसवत आहे ही गोष्ट त्यांना खचितच बोचत होती. त्यामुळे जपानही त्यांचे आरमारी दल बळकट करण्याच्या मागे लागली होती. हिटलरला जसा त्याच्या वंशाबद्दल गर्व होता तसेच पुर्वेकडे जपानच्या लोकांचाही ते वांशीक दृष्ट्या वरचढ असल्याचा दावा होता व म्हणुनच जपानने चायनावर १८९० व १९३० च्या दरम्यान बरेच हल्ले केले होते(जॅपनिज ऑक्युपेशन ऑफ मांचुरिया,कोरियन पेनिन्सुला वगैरे) व त्यांत चायनाला लुटुन चायनिज लोकांची कत्तल केली होती. त्या काळात जपानला चायना म्हणजे त्यांना आयतेच मिळालेले आंदण आहे असेच वाटत होते व सुपिरिअर मिलीटरी बळावर त्यांनी चायनामधुन बरीच लुट गोळा केली होती. पण जपानचा फ्रेंच इंडोचायना,फिलिपिन्स वगैरे देशांवर सुद्धा अमेरिकेसारखाच कच्च्या मालासाठी डोळा होता. त्यासाठी १९१० ते १९३० दरम्यान जपानने आपले आरमार फार मोठ्या प्रमाणात वाढवले होते. १९३० पर्यंत जपानचे आरमार हे जगातल्या सगळ्यात प्रबळ आरमारांपैकी एक म्हणुन ओळखु जाउ लागले.

थोडक्यात म्हणजे दुसरे महायुद्ध सप्टेंबर १९३९ मधे जेव्हा युरोपमधे सुरु झाले तोपर्यंत अमेरिका व जपानमधे पॅसिफिक व फार इस्ट मधे अशी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी जे मिलिटरी पॉष्चरिंग चालु होते ते शिगेला पोचले होते. फ्रेंच इंडोचायना व फार इस्टमधल्या कच्च्या मालाव अमेरिका व जपान हे दोघेही डोळा ठेवुन होते. त्यामुळे अर्थातच पॅसिफिक ओशियन मधे ज्या देशाचे आरमारी बळ श्रेष्ठ तो देश त्या कच्च्या मालाचा धनी होणार हे दोन्ही देशांना ठाउक होते. जपानी वसाहतवाद व अमेरिकन वसाहतवाद हळुहळु असा म्युच्युअली एक्स्ल्युझिव्ह होत चालला होता.त्यामुळे दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी हिटलरच्या आज्ञेनुसार जर्मनिचा तत्कालिन परराष्ट्रमंत्री रिबेंट्रॉप याने जो जर्मन-इटली-जपान हा अ‍ॅक्सिस व त्यांच्यातल्या मैत्रीचा प्रस्ताव मांडला तेव्हा जपानचा सम्राट हिरोहिटो याने ताबडतोब तो प्रस्ताव स्विकारला. एंपरर हिरोहिटोला वाटले की युरोपमधे बाकीचे देश असे महायुद्धात गुंतले असताना त्यांना पॅसीफिकमधे व फार इस्ट-इंडोचायनामधे बिनविरोध धुमाकुळ घालता येईल व आपली साम्राज्यवादी भुक भागवता येईल.पण त्याला हेही ठाउक होते की या त्याच्या मनसुब्याला फक्त एकच अडथळा होता.. तो म्हणजे हवाई मधला--पर्ल हार्बर इथला.. अमेरिकेचा बलाढ्य नावि़क तळ! तो पर्ल हार्बरचा अमेरिकन तळ त्याच्या डोळ्यात केव्हापासुन सलत होता. १९३० ते १९४० पर्यंत जपानच्या नाविक दलाने तो तळ उध्वस्त करायचे बरेच प्लान्स केले होते, प्रॅक्टिस केली होती पण प्रत्यक्षात काही ते तसे करायला धजावले नव्हते. पण दुसर्‍या महायुद्धाच्या निमित्ताने त्यांची ती सुप्त इच्छा परत उफाळुन आली व एंपरर हिरोहिटोने अ‍ॅडमिरल यामामोटो या अमेरिकेत हार्वर्ड मधे शिकलेल्या अतिशय हुशार अश्या माणसाची जपानी नाविक दलाचा प्रमुख म्हणुन नियुक्ति केली व त्याच्यावर पर्ल हार्बर इथले अमेरिकेचे बलाढ्य नाविक दल उध्वस्त करण्याची जबाबदारी टाकली व त्याची परिणीती ७ डिसेंबर १९४१मधे... अमेरिका पुर्णपणे गाफिल असताना.. जपानने अमेरिकेच्या हवाइमधील पर्ल हार्बर या नाविक दलावर..प्रि वॉर्निंग न देता... केलेल्या हल्ल्यामधे झाली व जपानने अधिकृतरित्या अमेरिकेविरुद्ध युद्धाची तोफ डागली. त्या दिवशी अमेरिका जपानला धडा शिकवायला म्हणुन दोस्त राष्ट्रांच्या वतीने अधिकृतरित्या दुसर्‍या महायुद्धाच्या खाईत पडली!

क्रमंशः.......

नेमस्तक.. वरचे माझे पोस्ट चुकुन दोनदा पोस्ट झाले. त्यातले एक कसे डिलिट करायचे? ते डुप्लिकेट पोस्ट डिलिट केलेत तरी चालेल.

चांगली माहिती देत आहात मुकुंद.
पोस्ट डीलीट करता येत नाही. "संपादन" दुव्यामधुन डीलीट करायच्या पोस्टचा मजकुर डीलीट करुन तिथे ... किंवा तत्सम काही टाकुन सेव्ह करा.

Pages