क्विक मँगो कलाकंद-गोड-सीमा

Submitted by सीमा on 19 September, 2013 - 00:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मिल्क पावडर : १/२ ते ३/४ कप
साखर १/२ कप
आंब्याचा रस काढून घ्यावा किवा मॅगो पल्प : १/२ कप
वेलदोडे,केशर्,ड्रायफ्रुट वगैरे
पनीर १ कप किंवा
(पनीर बनविण्याचे साहित्यः
४ कप दुध
१/२ कप दही)

क्रमवार पाककृती: 

दुध उकळून घ्यावे. त्यात दही घालून आणखी एकदा उकळी आणावी. गाळुन घ्यावे. थोडस पाणी राहिल तरी हरकत नाही. तयार झालेले पनीर नॉन स्टिक पॅनमध्ये घालून परतून घ्यावे.
पनीर विकतचे असेल तर कुस्करून पॅन मध्ये परतून घ्यावे.
त्यात मिल्क पावडर घालून २/३ मिनिटे परतावे. साखर घालावी व साधारण कडेचे बुडबुडे जावू पर्यंत परतावे. आंब्याचा पल्प घालून घ्यावा. केशर,वेलदोडे कुटून घालावेत. साधारण १ मिनिट परतावे.
गॅस बंद करुन तुप लावलेल्या भांड्यात काढून फ्रीज मध्ये ठेवावे. थोड थंड झाल कि ड्रायफ्रुट टाकून वड्या पाडाव्यात. मँगो कलाकंद तयार.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

मॅगो पल्प ऐवजी इतर फळांचा पल्प घालून पण छान लागेल.उदा. पायनॅपल किंवा ऑरेंज.
गॅसवर करायचे नसेल तर मायक्रोवेव्ह मध्ये पण होतो. वेळेच प्रमाण मात्र मी नंतर बघून लिहिन.

माहितीचा स्रोत: 
नई नवेली दुल्हन कि रेसीपीज :P अर्थात नविन लग्न झाल्यावर ज्या रेसीपीज लिहून घेतलेल्या ती वही भारतातून येताना आणलीये. त्यातली रेसीपी आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच बघितली ही रेसिपी. केवळ अप्रतिम.

सगळे साहित्य असल्यामुळे लगेच करता येईल.

प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन.

वा! अस्सल कलाकन्द वाटतोय. मस्त फोटो. आम्ब्याचा मौसम आहे, सहीच केला पाहीजे.

आशिका, तुझ्या फोटोतल्या वड्या पण काय कातिल आहेत. वर बदाम काप पेरलेत का?

सीमा वेळ होईल तेव्हा मायक्रोव्हेव मधल्या कृतीबद्दल सान्ग. किती वेळ ठेवायचा वगैरे.

काल रात्री पुन्ह एकदा केला हा कलाकंद. ह्यावेळी माझ्या हातून पनीर जरा जास्ती वेळ परतलं गेलं कारण पल्प घातल्यावर ते मिक्स्चर फार पातळ झालं पण त्यामुळे जरा रबरी लागणारे. किंचित चाखून पाहिलं आहे अजून पूर्ण वडी खाल्ली नाही.
नेक्स्ट टाइम मी पनीर घरी करून ट्राय करणार.
पुन्हा एकदा धन्यवाद सीमा.

हा कलाकंद करून खूप वेळा खाणार्‍यांचे आशिर्वाद मिळवलेत.. सगळेच्या सगळे वेळोवेळी तुझ्या पायाशी पोचवलेत, सीमा
Happy

अगदी कालसुद्धा.

Happy दाद,थँक्यु गं.
रश्मी मी बघितलच नाही तु लिहिलेलं. बघते मायक्रोवेव्ह मध्ये उद्या करून आणि लिहिते गं.
शुम्पी अगं , पनीर घरी करून जास्त इझी आहे. बघ करून.

Pages