क्विक मँगो कलाकंद-गोड-सीमा

Submitted by सीमा on 19 September, 2013 - 00:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मिल्क पावडर : १/२ ते ३/४ कप
साखर १/२ कप
आंब्याचा रस काढून घ्यावा किवा मॅगो पल्प : १/२ कप
वेलदोडे,केशर्,ड्रायफ्रुट वगैरे
पनीर १ कप किंवा
(पनीर बनविण्याचे साहित्यः
४ कप दुध
१/२ कप दही)

क्रमवार पाककृती: 

दुध उकळून घ्यावे. त्यात दही घालून आणखी एकदा उकळी आणावी. गाळुन घ्यावे. थोडस पाणी राहिल तरी हरकत नाही. तयार झालेले पनीर नॉन स्टिक पॅनमध्ये घालून परतून घ्यावे.
पनीर विकतचे असेल तर कुस्करून पॅन मध्ये परतून घ्यावे.
त्यात मिल्क पावडर घालून २/३ मिनिटे परतावे. साखर घालावी व साधारण कडेचे बुडबुडे जावू पर्यंत परतावे. आंब्याचा पल्प घालून घ्यावा. केशर,वेलदोडे कुटून घालावेत. साधारण १ मिनिट परतावे.
गॅस बंद करुन तुप लावलेल्या भांड्यात काढून फ्रीज मध्ये ठेवावे. थोड थंड झाल कि ड्रायफ्रुट टाकून वड्या पाडाव्यात. मँगो कलाकंद तयार.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

मॅगो पल्प ऐवजी इतर फळांचा पल्प घालून पण छान लागेल.उदा. पायनॅपल किंवा ऑरेंज.
गॅसवर करायचे नसेल तर मायक्रोवेव्ह मध्ये पण होतो. वेळेच प्रमाण मात्र मी नंतर बघून लिहिन.

माहितीचा स्रोत: 
नई नवेली दुल्हन कि रेसीपीज :P अर्थात नविन लग्न झाल्यावर ज्या रेसीपीज लिहून घेतलेल्या ती वही भारतातून येताना आणलीये. त्यातली रेसीपी आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पल्प वापरुन केलाय असं वाटतं. <<<< बुवा, अगदी अगदी. मग ते विचारून निर्णय घेणे योग्य ठरले असते असे सगळ्या सामान्य सदस्यांचे मत आहे.

वैद्यबुवा +१

सीमाने खर्‍या आंब्याचा गर वापरला की कॅन्ड पल्प तो खुलासा ती करेल तेव्हा करेल पण मला ही रेसिपी जाम आवडली आहे. आणी जेव्हा करीन तेव्हा आंबे हाताशी नसणारच तेव्हा मी तरी पल्पच वापरणार कॅन्ड किंवा फ्रोझन.

सॉरी मी चुकून "वाटतं" असं लिहिलं. खरंतर पल्पच वापरलाय असं सिद्ध होतं. सुरवातीला फळांचा रस किंवा पल्प असं लिहिलय आणि जर पुढे फळांचा रस वापरला गेला असता तर माझ्यामते सीमानी "फळांचा रस" असा उल्लेख केला असता.

स्पर्धकाला विचारायला पाहिजे हे बरोबर आहे. सीमा, आता तूच उलगाडा करु शकतेस.

शुम्पी, मी पोस्ट लिहू पर्यंत तुझी पोस्ट आली. आय थिंक वि आर ऑन द सेम पेज हियर. Happy

पल्प ला मराठि शब्द काय बरे?
ताज फळ काहिहि न घालता मिक्सर मधुन फिरवुन घेतल तर तो रस होतो कि पल्प?

गर

>> खरंतर पल्पच वापरलाय असं सिद्ध होतं. सुरवातीला फळांचा रस किंवा पल्प असं लिहिलय आणि जर पुढे फळांचा रस वापरला गेला असता तर माझ्यामते सीमानी "फळांचा रस" असा उल्लेख केला असता.
रिअली? एकदम सिद्धच होतं? ती एक कॉमन टर्म म्हणून (जो काही घरचा किंवा विकतचा वापरत असाल तो - असं म्हणून) पल्प शब्द वापरलेलाच नाही हे सिद्धच होतं?

इथे संयोजकांना कशात रस आहे त्याबद्दल चर्चा सुरू नाही. एन्ट्री बाद ठरवण्याआधी हा खुलासा मागायला हरकत नव्हती.

कलाकंद नवर्‍याच्या फारच आवडीचा आहे. नक्की करून पाहिन. धन्यवाद इतक्या सोप्या रेसिपीसाठी.

आनंदाचा सण म्हणून ही स्पर्धा आणि इतर उपक्रम केले जात आहेत त्यामुळे संयोजकांनी एकदा सीमाला विचारायला हवे होते ह्याबद्दल +१. ताबडतोब बाद वगैरे करायची काहीच गरज नाही.
सिद्ध होतच माझ्यामते. आधीच जर फळांचा रस आणि पल्प म्हणजे कॅन मधला पल्प हे डिस्टिंक्शन सीमानीच ड्रॉ केलय सुरवातीला तर पुढे पल्प हा शब्द वापरला म्हणजे तो टीन मधला पल्पच आहे असं मला वाटतं. इथे पुढे जर सीमानी खुलासा केला की तीनी कॅन्ड पल्प नाही वापरलाय तर प्रश्नच मिटतो.

बुवा , सॉरी मी तुम्ही लिहिलेलं वाचल नव्हत.
या रेसीपीमध्ये मी आंब्याचा घरी बनविलेला रस/पल्प वापरला आहे. तसच ह्या रेसीपीमध्ये तुम्ही ताजा किंवा फ्रोजन कुठलाही रस वापरु शकता. आंब्याचा टिनमधला रस सुद्धा चालेले.
खरतर नंतर रेसीपीमध्ये पल्प म्हणजे रस किंवा रस+फळाचे तुकडे (जनरल टर्म, पातळ रसच हवा नसुन मिडिअम कंसिस्टन्सी असलेला फळांचा गर) या अर्थानेच वापरल आहे. काहीही वापरल तरी चवीत फारसा फरक पडेल अस वाटत नाही.
या विषयाच्या चर्चेवर मी आता माझ्याकडुन पुर्णविराम देते. धन्यवाद.

प्रिती स्त्रोत लिहिला आहे. कालच लिहिलेला. स्पर्धेसाठी रेसीपी आहे म्हणुन एडीट केलेला. Happy

सीमा Happy

मस्त दिसतोय.
संयोजक, ही पाककृती गणेशोत्सवाच्या मुख्य पानावरील पूर्णब्रह्म या सदरात दिसत नाही.

तुम्ही दिलेल्या खुलाश्यानुसार ही प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येत आहे.
झालेल्या प्रकाराबद्दल दिलगीर आहोत.

Pages