पुन्हा आसाराम

Submitted by धडाकेबाज on 23 August, 2013 - 12:28

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/asaram-bapu-jodhpur-rape-p...

आसाराम हा पुन्हा विवादात फसलाय. त्याच्यावर बलात्काराचा आरोप झालाय. ह्याला पोसणाऱ्या भक्तांनी आता तर सुधारावे. हे भक्त लोकच ह्यांच्या सारख्या लबाड साधूंचे भक्ष्य ठरतायत .काय करायचे ह्या नीच भोदुंचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आसाराम विरूद्ध साक्षीदारांच्या हत्यांची जवाबदारी आसुवर की त्याच्या भक्तांवर?

<<पण त्या पिडीत हिंदु मुलीला कुणी का बरे सहानूभुती दाखवत नसावे?>>
------ कारण या मुली गरीब घराण्यातल्या आहेत...

<<आसाराम विरूद्ध साक्षीदारांच्या हत्यांची जवाबदारी आसुवर की त्याच्या भक्तांवर?>>
------ साक्षीदारान्च्या सुरक्षेची जबाबदारी प्रामुख्याने राज्य सरकारची आहे. पण दहाच्या वर हल्ले झाले असतील, काही हत्या झाल्या आहेत कोर्टाने काही आदेश दिले नाहीत का ?

साती,

>> गापै पळाले का पत्रं खोटं आहे कळल्यावर?

नाही हो! मी आहे इथेच!

खालचं कात्रण कोणी पडताळून पाहिलंय का? इथे सापडलं : https://twitter.com/Ish_Bhandari/status/628852195459383296

त्यासोबत हेही सापडलं : https://twitter.com/Ish_Bhandari/status/628850024449904640/photo/1
CLofvXwVAAAQE85[1].jpg

आ.न.,
-गा.पै.

देशातले नावाजलेले वकील श्री. राम जेठमलानी आणि श्री. सलमान खुर्शीद यान्नी आसारामला जामीन मिळवण्याचे प्रयत्न केले होते, हे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.

आतापर्यन्त सहा वेळा, वेगवेगळ्या कोर्टाने (अगदी सर्वोच्च न्यायालय पण), आसूमलचा जामीन अर्ज फेटाळला आहे. नुकताच सुब्रमण्यम स्वामी यान्नी पण एक प्रयत्न करुन बघितला....

http://indianexpress.com/article/india/india-others/asarams-bail-plea-tu...

दुसरं कात्रण बरोबर आहे.
ते एन सी ई आर टी चं पुस्तक नाही.पण मी तरी जितक्या ठिकाणी वाचलं तिथे दिल्लीतल्या प्रायवेट पब्लिशरने पब्लिश केलेलं टेस्ट्बुक असाच उल्लेख आहे.

ही चंमतग पाहिलीच नव्हती.

सलमान खुर्शीद यांनी आदरणीय आसारामबापूंचे वकीलपत्र घेतल्याबद्दल काहींना प्रश्न पडलेले दिसले.
मला मात्र प्रश्न पडलाय की ज्या आदरणीय आसारामबापूंचे भक्तगण त्यांच्यामागचे खटल्यांचे झेंगट हे इटलीमातेचे हिंदूंधर्माविरुद्धचे कारस्थान असल्याचे सांगतात, त्या आदरणीय आसारामबापूंना इटलीमातेच्या एका दरबार्‍याशिवाय दुसरा वकील मिळाला नाही का तेव्हा?

आसारामाच्या सुनेने पितापुत्र यान्च्याविरुद्ध छळवणुकीच्या तक्रार दाखल केली आहे असे सकाळ वृत्तपत्रात आले आहे. तिने स्वत: साठी आणि तिच्या कुटुम्बासाठी जिवाच्या रक्षणाची मागणी (कुणाकडे) केली आहे.

नारायणसाई हा सध्या सुरतमधील कारागृहात आहे तर आसाराम हा जोधपूरमधील कारागृहात अटकेत आहे. नावाजलेली वकिलान्ची फौजेने विविध कोर्टात ७- ८ प्रयत्न करुनही आसारामाला जामिन नाकारला गेला आहे. ते कारागृहात असतानाही बाहेर त्यान्च्या अनेक काळ्या कृत्याच्या गुन्ह्याशी सम्बन्धित केसचे अनेक साक्षिदार मारले गेले आहेत.

३+ महिने ह्या बाफवर कुणाच्याही प्रतिक्रिया नाही... अजुन एक साक्षिदार नाहिसा झाला आहे, केला गेला आहे असे वाचण्यात आले. काय चालले आहे ? खरे काय आहे ?

http://indianexpress.com/article/cities/lucknow/witness-in-asaram-rape-c...

या आधी अनेक साक्षिदारान्च्या सन्शयास्पद हत्या झालेल्या आहेत, त्यान्च्यावर प्राणघातक हल्ले झालेले आहेत. साक्षिदाराला साक्ष देता आली नाही तर न्यायाधिश कशाच्या आधारावर या आरोपीला शिक्षा देणार ? हा साक्षिदार तरी सुरक्षित रहावा यासाठी प्रार्थना.

हा नक्कीच गॉडमॅन नाही आहे...

बलात्कारी आसुमल
आसुमल दोषी ठरली
इथल्या तमाम बलात्कारी आसुमलच्या समर्थकांना सणसणीत चपराक मिळाली.

जास्त खुश होऊ नका,
हे को लॅटरल डॅमेज आहे, न्यायव्यवसंस्थेवर विश्वास परत बसवण्यासाठी

जास्त खुश होऊ नका >> रामदेव/श्री श्री यांच्या तुलनेत तो नावडता बाबा आहे. त्याला 'सोडवणे' भारी पडले असते हे आणखी एक कारण

जास्त खुश होऊ नका,
हे को लॅटरल डॅमेज आहे, न्यायव्यवसंस्थेवर विश्वास परत बसवण्यासाठी
>>>

आयला, काय तगडी मॅनेजमेंट आहे सत्ताधारी पक्षाची. सिम्बाभौ, तुम्हाला हे इतक्या ठामपणे कसे काय माहिती होते लगेच? हा कयास म्हणायचा की ठाम माहिती?

आसुमल दोषी ठरली
इथल्या तमाम बलात्कारी आसुमलच्या समर्थकांना सणसणीत चपराक मिळाली.
Submitted by दत्तू on 25 April, 2018 - 11:05

जास्त खुश होऊ नका,
हे को लॅटरल डॅमेज आहे, न्यायव्यवसंस्थेवर विश्वास परत बसवण्यासाठी
Submitted by सिम्बा on 25 April, 2018 - 11:21

जास्त खुश होऊ नका >> रामदेव/श्री श्री यांच्या तुलनेत तो नावडता बाबा आहे. त्याला 'सोडवणे' भारी पडले असते हे आणखी एक कारण
Submitted by विठ्ठल on 25 April, 2018 - 11:32
>>
हे एवढे सगळे मात्तबर अतिप्रचंड बुद्धिमान मानव सगळे एकजात मायबोलीवर, ट्विटर, फेबुवरच कसे काय सापडतात? हे सगळे हुशार व्यक्ती संयुक्त राष्ट्रसंघ, भारताचे केंद्र सरकार इथे जाऊन मानवजातीच्य हिताचे काही करत का नाही? किंवा गेला बाजार एखाद दुस-या एलियन प्रजातीकडे जाऊन मानवाचे सर्वात बुद्धिमान प्रतिनिधी म्हणुन प्रतिनिधित्व का करत नाही?

हे सगळे निर्णय केंद्र सरकारने घेतलेले नसुन, स्वायत्त न्यायव्यवस्थेने घेतले आहेत, ही माझी माहिती चुकीची आहे की काय?

जास्त खुश होऊ नका,
हे को लॅटरल डॅमेज आहे, न्यायव्यवसंस्थेवर विश्वास परत बसवण्यासाठी
Submitted by सिम्बा on 25 April, 2018 - 11:21
<<

ह्या ढोंगी लोकांचे हे एक बरे आहे,
म्हणजे आसारामला कोर्टाने दोषी ठरवून शिक्षा केली तर म्हणायचे सरकार कोलॅटरल डॅमेज सांभाळायचा प्रयत्न करत आहे आणि कोर्टाने आसारामला दोषमुक्त करुन त्याची सुटका केली असती तर म्हणले असते सरकार बलात्कार्‍यांना वाचवायचा प्रयत्न करत आहे. हे दुतोंडी ढोंगी लोक, ह्याच कारणाने डोक्यात जातात, सतत कोलांट्या उड्या मारायची सवयच लागलेय.

डोकयात जायला आधी भक्ताकडे डोकं हवे ना? ते तर मोदीचरणी अर्पन केले आहे.
आयटीसेलवर उदरनिर्वाह करणार्यांनी पोस्टी लिहून घर चालवावी

स्वायत्त न्यायव्यवस्थेने घेतले आहेत, ही माझी माहिती चुकीची आहे की काय?>>>>>>
बघा,
लगेच न्यायासंस्था अजूनही स्वायत्त आहे, म्हणून मागे दिलेले निर्णय पण निष्पक्ष आहेत हे सांगायला सुरुवात झाली की नाही Happy

लगेच न्यायासंस्था अजूनही स्वायत्त आहे, म्हणून मागे दिलेले निर्णय पण निष्पक्ष आहेत हे सांगायला सुरुवात झाली की नाही
>>> मग मग, तुम्ही म्हंटलं आणि लगेच सिद्ध करायला रांगेने उभारलेच पंटर...

<< हे दुतोंडी ढोंगी लोक, ह्याच कारणाने डोक्यात जातात, सतत कोलांट्या उड्या मारायची सवयच लागलेय. >>
------- ढवळ्याशेजारी पवळ्या बान्धला वाण नाही पण गुण आला गोढ कुणाला द्यायचा ? काल पर्यन्त तुम्ही अगदी हेच करत होता, आज त्यान्नी केले.... Happy

अहो उदय, तुम्ही काँग्रेजी असे वर्तुळाकार का फिरत असतात?
जसे भक्तांनी मागच्या ७० वर्षात काय झाले हे विचारायचे नाही, त्याला कमी लेखायचे नाही,
तसेच तुम्हीही "काल पर्यंत तुम्ही हेच करत होता" असे बोलायचे नाही. आत्ताचे काय ? ते बोला. इथे न्यायसंस्थेवर अविश्वास दाखवुन कोण चुकलय ते बोला.

हि फेबु वरची एक पब्लिक पोस्ट आहे. भक्त मानसिकतेची कल्पना येण्यासाठी शेअर करत आहे.
या पोस्त मध्ये सर्काझम नाहीये, हे खालच्या प्रतिक्रिया वाचल्यावर स्पष्ट होईल.

Manjusha Thatte Joglekar
4 hrs ·
आसाराम बापू यांनी बलात्कार केला नाही केला, विनयभंग केला नाही केला...

पण,

मिशनरीजना जशास तसे उत्तर देत गुजरातमधील लाखो हिंदूंचं धर्मांतर होण्यापासून या बापूंनीच रोखलं.

हे हिंदू हित कार्य विसरण्यासारखं नाही, म्हणूनच बहुतेक पॉस्को बिस्को प्रकार त्यांच्यावर लावण्यात आला असावा. हिंदू या बापूंना शिव्या घालतात पण Vatican City ला हेच आसाराम बापू अतिशय धोकादायक वाटतात. त्यामुळे बापूंचा पुढचा मार्ग भयंकर खडतर असणार आहे.

बापूंचं काहीही होवो, त्यांचं हिंदू धर्मासाठीचं योगदान विसरण्यासारखं नाहीच. धर्मांतराला विरोध हे एक कार्य झालं, बाकी कार्यं वेगळीच.

- मंजुषा
( आसाराम बापू यांचं चारित्र्य पठण इथे करू नका, त्यांनी जे धार्मिक कार्य केलं त्याची दखल घेणारी ही पोस्ट आहे. मीडिया आता दोन चार दिवस त्यांच्याविषयी भुंकत बसेलच पण ती जे सांगणार नाही ते मी या पोस्टमध्ये लिहिलंय. )

माबोवर असे काही लिहिले तर अकलेचे धिंडवडे काढले जाईल इतकी समज असल्याने इकडचे भक्त गप्प आहेत इतकेच.

न्याय संस्थेवर अविश्वास नाही हो, विश्वास आहे म्हणूनच म्हंटले, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट कुठेतरी सुटेलच तो , मायाबेन नाही सुटल्या?
शेवटी न्याय होतोच

Pages