पुन्हा आसाराम

Submitted by धडाकेबाज on 23 August, 2013 - 12:28

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/asaram-bapu-jodhpur-rape-p...

आसाराम हा पुन्हा विवादात फसलाय. त्याच्यावर बलात्काराचा आरोप झालाय. ह्याला पोसणाऱ्या भक्तांनी आता तर सुधारावे. हे भक्त लोकच ह्यांच्या सारख्या लबाड साधूंचे भक्ष्य ठरतायत .काय करायचे ह्या नीच भोदुंचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी सख्खी बहीण या अनिरुध्द बापूच्यान नादाला लागलेली आहे , जिथे तिथे याचेच फोटो याच्या बायकोचे फोटो. काय तर म्हणे याची आख्खीच्या आख्खी फॅमिलीच अवतार आहे. सोंगं नुसती. मला भयंकर चीड येते. माझी बहीण तर फोनवर पण हॅलो ऐवजी आधी त्याचेच नाव घेते आणि माझ्या प्रचंड डोक्यात जाते.
मला या बापु पेक्षा त्याच्या अनुयायी\ शिष्यांचीच चीड येते.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>. बायका मंगळसुत्रात पण याचे फोटो घालतात

बायका मंगळसुत्रात पण याचे फोटो घालतात >>> मंगळसूत्राने मानसिक गुलामगिरी स्विकारली असेल तर आणखी काय होणार ?
(मंसू घालावे कि नाही हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो )

माझी सख्खी बहीण या अनिरुध्द बापूच्यान नादाला लागलेली आहे , जिथे तिथे याचेच फोटो याच्या बायकोचे फोटो.
------- माझे वाईट होणार अशी मनात असलेली भिती, कमालिची असुरक्षितता, मानसिक दुबळेपणा असे वातावरण बाबा/ बापून्चे पिक येण्यास मदत होते.

काही वर्षान्पुर्वी, माझ्या भारत वारीत असेच एक बापू आमच्या देव्हार्‍यात टुनकन उडी मारुन आले होते.... मी असताना नव्हते. या नव्या भरतीबद्दल आईला विचारले.... "शेजारच्या काकूने तो फोटो भेट दिलेला आहे.... " मी सागितले आई हा बापू चोर आहे, तो तुझ्या माझ्यापेक्षा काहीही वेगळा नाही आणि मग तो फोटो देव्हार्‍यातुन कचर्‍याच्या टोपलीत ठेवला.... त्यान्ना असे काही करायचे धाडस नव्हते.... बाबा आपले वाईट करेल अशी मनोमन भिती. Sad

don't build your faith based on fears and miracles असे कुणा वैचारिकाने म्हटले आहे. प्रत्येक घटनेची सत्यता तपासुन पहा..., विचार करा हे असेच का ते तसेच का ? मुख्य म्हणजे सतत प्रश्न विचारत रहा आणि उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा...

साधू संताना लाडावून ठेवणारा अध्यात्मिक दुनियेतून राजनीतीत उतरवणारा भाजपा आसरामच्या प्रश्नावर गप्प का ?

बायका मंगळसुत्रात पण याचे फोटो घालतात >> माझ्या बहिणीच्या बँकेतल्या एका कलीग च्या गळ्यातील चेन मधे त्यांचा फोटो पाहून माझ्या ताईने निरागसपणे विचारले की तुझे मिस्टर का म्हणून.

साधू संताना लाडावून ठेवणारा अध्यात्मिक दुनियेतून राजनीतीत उतरवणारा भाजपा आसरामच्या प्रश्नावर गप्प का ?
>> बहुधा भाजपाने मनमोहनांची दिक्षा घेतली असावी. आणि तसे काँग्रेसीदेखिल (आदरणिय राहुल गांधी यांच्यासहित) कोळसा, ३जी आणी ईतर बर्‍याच विषयांवर गप्प असतांत की. Wink

ही अजुन एक बातमी. बापू पुत्र आता गायब झाले आहेत. आधी बापाने पोलिसांसमोर उभे राहायला आजारपणाचे सोंग घेतले, आता मुलगा गायब झाला आहे.

नारायण साईचा शोध घेण्यासाठी नोटीस

http://www.loksatta.com/desh-videsh-news/asarams-son-narayan-sai-untrace...

आधी त्या मुलीचा बापही आसुमल चा भक्त होता.... समजा आसुमल ने त्याच्या मुलीवर रेप न करता तो जर दुसर्याच्या मुलीवर केला असता तर हा बापही आसुमलला वाचवायला निघला असता.... खरं की नाही बोला!

हो, हे मात्र खरंय. त्याच्यावर हा प्रसंग गुदरला म्हणून तो आमसुलला राक्षस म्हणतोय, नाहीतर देव म्हणूनच पूजत राहिला असता.

मला whatsapp वर आलेला एक संदेशः

रघुपती राघव राजा राम
जेल के अंदर आसाराम
साधू बन के ऐसे काम
कैदी बन के करो आराम
देख लिया अपना अंजाम
हुए बुढापे मे बदनाम
झुठे पाखंडीके नाम
ये देश का है पैगाम
खुद को कहते है भगवान
पकडे गए ना झंडू बाम... Happy

हा विडियो पहा.

https://www.youtube.com/watch?v=BXDdHTl8eWA

एका प्रवचनात लाडात आलेला आसाराम गंमत म्हणून "मी तिहार जेल मध्ये जाईन ह्ह!" असे म्हणत होता.

पण "उपरवाले ने उसकी सुन ली" Biggrin

आसाराम जेल मधुन सुटण्याची लक्षणे..... मग काही लोक बोंबलायला तयार... खोटे आरोप टाकुन आत घातलेले आता खरे बाहेर आले बघा

असुमलवर वर सुरु असलेल्या खट्ल्यातील एका महत्वाच्या साक्षिदाराची हत्या. Sad

http://indianexpress.com/article/india/india-others/police-say-not-rulin...

साक्षिदारान्ना धमक्या मिळत असताना आणि काही महत्वाच्या साक्षिदारान्ची हत्या होत असताना कोर्टात खटला चालणार कसा? मग आहेच सबळ पुराव्या अभावी सराईत आरोपी निर्दोष मुक्त.

Pages