पुन्हा आसाराम

Submitted by धडाकेबाज on 23 August, 2013 - 12:28

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/asaram-bapu-jodhpur-rape-p...

आसाराम हा पुन्हा विवादात फसलाय. त्याच्यावर बलात्काराचा आरोप झालाय. ह्याला पोसणाऱ्या भक्तांनी आता तर सुधारावे. हे भक्त लोकच ह्यांच्या सारख्या लबाड साधूंचे भक्ष्य ठरतायत .काय करायचे ह्या नीच भोदुंचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६ महिन्यात २ साक्षिदारांची हत्या. (६ महिन्यात करा विचार )
फारच जोरात प्रयत्न चालु आहे आस्याला बाहेर काढायचे.
अच्छे दिन आने वाले है Rofl

उदय,

कशावरून साक्षीदाराची हत्या आसारामबापूंच्या पक्षानेच केलेली आहे? खरी साक्ष देईल म्हणून विरुद्ध पक्षानेही केलेली असू शकते. शार्ली एब्दो हल्ल्याच्या चौकशीप्रमुख पोलिसाने एरिक फ्रेदूने म्हणे आत्महत्या केली. तीदेखील स्वत:च्या कचेरीत. कोण विश्वास ठेवेल यावर!

मलाही सत्य बाहेर यायला हवंय. जर आसारामबापू दोषी ठरले तर मलाही निश्चित बाजू घेता येईल.

आ.न.,
-गा.पै.

जेठमलानी बोला सत्यवादी Happy जेठमलानी ने देखील असा युक्तिवाद सुप्रिम कोर्टात केला नसेल.

लोकहो,

आसारामबापूंना बलात्कारी म्हंटल्याबद्दल टाईम्स ऑफ इंडिया कडून क्षमायाचना करण्यात आली आहे.

apology_to_Pujya_Asarambapu_from_TOI_letter.jpgapology_to_Pujya_Asarambapu_from_TOI_published.jpg

यापुढे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत आसारामबापूंना बलात्कारी म्हणू नये अशी समस्त माबोकारांना विनंती.

आ.न.,
-गा.पै.

भुषण्या, काही लोकांच्या कृत्यांचे परिणाम अभ्यासायचा आग्रह धरला तर त्यात माफी मागण्यासारखं काय आहे?
आ.न.,
-गा.पै.

टाईम्स ऑफ ईंडियाचे क्षमायाचना पत्र साध्या कागदावर!
त्यांची लेटरहेडे कुठे गेली?
कोणत्या हुद्द्याच्या माणसाने अ‍ॅपॉलॉजी दिलीय नेमकी?
कुठल्या तारखेला?

त्या पत्रावर खाली सही दिसतेय ती कुणाची?
रिसिव्हड म्हणून तारीख आणि शिक्का टाईम्स ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीचा दिसतोय.
पण गंमत पाहिलीत का?
गोलातले शब्द वाचलेत का?

<<कुठल्या तारखेला?>>
------ The day before yesterday... स्विकारणारा तारिख लिहीणारच होता, म्हणुन माफी मागणार्‍याने तारिख लिहीणे टाळले आहे...

पत्र ४ तारखेला मिळाले तर day before २ तारिख असायला हवी... येथे ३ तारिख आहे...

पत्र फ्रॉड आहे असे म्हणायला जागा ठेवली आहे...

वृत्तपत्र असे शब्दप्रयोग करत असतीलही... मग हजारो कोटीचा मालक असलेली सर्व प्रकारच्या मोह, माया पासुन मुक्त असलेली सन्त व्यक्ती त्याचा भाडोत्री वकिल पाठवणार... साम, दाम आणि दन्ड पैकी काय हवे अशी माहिती मिळवणार. पैसा आणि वेळ दोन्ही गोष्टीन्ची कमी नाही आहे.

साम - ...
दाम - ...
दन्ड - ...

पैशाने काम झाल्यास आनन्द आहे, प्रकरण सम्पते... दन्ड / धाक हे शेवटचे हत्यार आहे. अनेक साक्षीदारान्च्या झालेल्या हत्या खुप मोठी असुरक्षितता निर्माण करतात...

काही वर्षान्नी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता होते. हत्तीवरुन पेढे, साखर वाटप.

साक्षीदार :
भूल गया सब कुछ,
उफ्फ, याद नही अब कुछ
ओ हो , उं हुं, हुम हु हु
इक यही बात ना भूली

आ.बा. :
ज्युली आ आ आ आ आ आ

अय्यो, त्या अपोलोजी लेटरात पेज नं च्या पुढे रिकामी जागा ठेवलेली दिसली का?
तिथं कुणी आणि काय लिहायचं म्हणे?
Wink

किमान हे पत्रंतरी कुणीतरी घाईघबनावट, बनावट, साध्या कागदावर टीओआय च्या सिक्युरिटीगार्डकडचा स्टँप मारून व्हॉटसॅप किंवा तत्सम साईटवरून ढकललेले आहे हे तरी मान्य करा.

<<सिक्युरिटीगार्डकडचा स्टँप मारून व्हॉटसॅप किंवा तत्सम साईटवरून ढकललेले आहे हे तरी मान्य करा.>>
------- त्याची काय अवशक्ता आहे?

हवा तो स्टॅम्प २५-३० रुपयात बनवुन मिळतो. तयार केलेली (बनावट) पत्रे नेटवर फिरवायला जिवन समर्पित केलेली कार्यकर्ते स्वेच्छेने, किव्वा पवित्र धर्माच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. जोडीला काही दिमाखदार , तिक्ष्ण बुद्धीची पगारी माणसे पण सेवेत आहेत.

हिंदुस्तान टाईम्सनेही अशी माफी मागितली आहे. जोपर्यंत आसाराम बापुंवरचा गुन्हा सिद्ध होत नाहे तोपर्यंत त्यांना "आरोपी" असे संबोधणेच इष्ट. ते आजिबात आवडत नसले तरीही.

मला आसाराम बापू अजिबात आवडत नाहीत. इथल्या आसाराम बापू आश्रमात दोनतीनदा मोफत जेवण केले असले तरीही. पण निदान या बबतीत गामांचे म्हणणे योग्य वाटते. ठीक आहे, आरोपी म्हणूयात.

<<जोपर्यंत आसाराम बापुंवरचा गुन्हा सिद्ध होत नाहे तोपर्यंत त्यांना "आरोपी" असे संबोधणेच इष्ट.>>

---- जोपर्यन्त कोर्टात आरोप सिद्ध होत नाही तोपर्यन्त आरोपीला कायदा निर्दोष मानतो हे तत्व मान्य आहे.

प.पु.चारित्र्यसंपन्न,धर्मरक्षक आसाराम बापु यांना सादर प्रणाम.ह्या बिचार्या संताला बर्याच जणांची सहानुभूती लाभत आहे.धर्म रक्षणासाठी ते आवश्यकच आहे.
पण त्या पिडीत हिंदु मुलीला कुणी का बरे सहानूभुती दाखवत नसावे?

पण त्या पिडीत हिंदु मुलीला कुणी का बरे सहानूभुती दाखवत नसावे?>>>.

कारण बिचार्या संताला जे सहानुभूती दाखवत आहेत त्यांच्या पोटी त्या पिडीत मुलीचा जन्म झाला नाही.

समजा एखादा धर्मरक्षक संत अत्याचारी असला तर तो जे अत्याचार करेल त्याची झळ हि मुख्यता त्याच्याच धर्मातिल पिडितांना बसते.

धर्मगुरूने केलेला अत्याचार हा भक्तानी प्रसाद म्हणुन स्विकारावा का?

धर्मगुरूने केलेला अत्याचार हा भक्तानी प्रसाद म्हणुन स्विकारावा का?>>>

माझ्यामते मुळीच नाही.
आत्याचार करणारा धर्मगुरू असु शकत नाही.
भक्ताच्या अज्ञानाचा फायदा घेऊन केलेला गुन्हा आहे तो.
भक्तांनी चप्पलांचा हार घालुन प्र्तिप्रसाद जरुर द्यावा.

.पु.चारित्र्यसंपन्न,धर्मरक्षक आसाराम बापु यांना सादर प्रणाम.बापुंच्या केसचा निकाल कधि लागतोय?एखादा साक्षिदार तरी आहे का शिल्लक?

Pages