पुन्हा आसाराम

Submitted by धडाकेबाज on 23 August, 2013 - 12:28

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/asaram-bapu-jodhpur-rape-p...

आसाराम हा पुन्हा विवादात फसलाय. त्याच्यावर बलात्काराचा आरोप झालाय. ह्याला पोसणाऱ्या भक्तांनी आता तर सुधारावे. हे भक्त लोकच ह्यांच्या सारख्या लबाड साधूंचे भक्ष्य ठरतायत .काय करायचे ह्या नीच भोदुंचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://swamy39.blogspot.in/
http://www.hindujagruti.org/hindi/news/2799.html?utm_source=site&utm_med...
पोलिसांना आसारामबद्दल नसेल इतकी माहिती त्या मुलीबद्दल या लोकांना आहे. अगदी आसाराम-आश्रमात येण्यापूर्वी तिने आपल्या मैत्रिणींना काय सांगितले हेही यांना माहीत आहे.
लड़की छिन्दवाड़ा गुरुकुल छोड़ने से पहले अपने फ्रेंड्स को बताती है कि ‘‘मैं इस गुरुकुल में दुबारा किसी भी कीमत पर नहीं आऊँगी । मैं छिन्दवाडा गुरुकुल की नींव हिला दूँगी ।’’ इसीसे पता चलता है कि लड़की के दिमाग में शुरू से ही कुछ योजना चल रही थी ।

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Asaram-capable-of-sexual-a...

'मी तर नपुंसक आहे, लैंगिक शोषण करूच शकत नाही', असा दावा करणारे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम यांचं पौरुषत्व पोटेन्सी टेस्टमधून सिद्ध झाल्यानं बापूंची सॉल्लिड गोची झालेय. आपल्याला मानसिक आजार असल्याचं त्यांचं म्हणणंही वैद्यकीय तपासात खोटं ठरलं आहे. त्यामुळे बापू संशयाचं भोव-यात सापडले आहेत.

'आसाराम हे संत नसून राक्षस आहेत.' या शब्दात पीडित मुलीच्या वडिलांनी आपला राग व्यक्त के >>>>

त्या मुलीचा बाप कीती ढोंगी आहे. स्वताच्या मुलीला त्याने च नेले आसाराम कडे.
त्याला ही शिक्षा होयला हवी.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/decision-is-still-pending-in-as...

स्वयंघोषित संत आसाराम बापू यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना आणखी एक रात्र जोधपूरमधील तुरुंगात काढावी लागणार आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आता बुधवारी सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे.

स्वयंघोषित संत आसाराम बापू यांनी जे काही सांगितले, ते 'ब्रह्म वाक्य' समजून त्याचे पालन करीत गेलो आणि तीच आमची चूक झाली, अशी भावना शारीरिक शोषण झालेल्या पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/blindly-following-asaram-was-bi...

@धनंजय वैद्य - तुम्हि त्याची (हरामी शब्द वापरु का त्या थेरड्या साठी Uhoh , की त्या शीवी ला ही लाजवेल हा आसुमल) एवढी बाजु का घेताय ते कळत नाही??

आसाराम बापुवर एवढी आगपखड करुन यांना कोणता 'असा' आनंद मिळतो 'राम' जाणे >>> बापरे ह्याला म्हणतात झोपेचं सोंग घेणे, ह्या असल्या लोकांना कोणीच नाही उठवू शकत. जेंव्हा ह्यांच्या आया बहिणींसोबत असले प्रकार होतील तेंव्हा ही कदाचीत जाग येईल का नाही कोण जाणे?

बापरे ह्याला म्हणतात झोपेचं सोंग घेणे, ह्या असल्या लोकांना कोणीच नाही उठवू शकत. जेंव्हा ह्यांच्या *** ****** असले प्रकार होतील तेंव्हा ही कदाचीत जाग येईल का नाही कोण जाणे?
------ टोकाचा अनावश्यक प्रतिसाद आहे, भाषेचा निषेध Sad . ह्यान्चे विचार पटत नाही पण म्हणुन त्या निष्पाप जिवान्चा त्यात काय दोष आहे? कृपया अनावश्यक शब्द काढाल का?

निरुद्ध बापूने सांगीतलेल्या बलात्कारापासून वाचण्याच्या जालीम उपायांची यादी पाहिली आणि थक्क झालो. आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी आणि सुरक्षेसाठी ती यादी इथे देत आहे..

दिनांक ३ जानेवारी रोजी आपल्या परमपूज्य सद्गुरूंनी श्रीहारीगुरुग्राम येथे सर्व स्त्रियांना भयमुक्त केले. एवढेच नाही तर, एका गोष्टीची खात्री बाळगायला सांगितली कि यापुढे कोणीच माझ्या मुलींकडे वाकडया नजरेने पाहू शकणार नाही - परमपुज्य बापूंनी खालील पंचसुत्री सांगितली,
०१. कोणावरही बलात्कार झालेला असेल व त्या व्यक्तीने १०८ वेळा अनिरुद्ध चलिसा ११ दिवस म्हंटली तर बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल .
०२. जी व्यक्ती रोज पाच वेळा श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम मंत्र म्हणेल त्या व्यक्तीवर कोणी कुठ्ल्याचप्रकारे जबरदस्ती करू शकणार नाही.
०३. ज्या व्यक्तीला स्वतःवर बलात्कार होईल अशी सतत भीती वाटते त्या व्यक्तीने श्री मातृवात्सल्य उपनिषदातल्या, श्रीशिवगंगागौरीच्या महात्म्याचे दोन अध्याय वाचाल्यासं त्या व्यक्तीचे भय व भयाचे कारण कायमचे नाहीसे होईल.
०४. ज्या व्यक्तीस लिहिता वाचता येत नसेल अशा व्यक्तीने पूर्ण विश्वासाने व प्रेमाने फक्त अनिरुद्ध अनिरुद्ध म्हंटले तर सर्व वाचन स्वतः सद्गुरु करतील व त्याचा संपूर्ण फायदा त्या व्यक्तीस मिळेल.
०५. अहिल्या संघाच्या बल गटास व श्रीचंडिका आर्मीच्या गटास स्वतः परमपुज्य बापू असे टेक्निक शिकवणार कि ज्याने बलात्कार करणारा लागलीच कायमचा नपुंसक होईल.
परमपुज्य सद्गुरूंनी सर्वांना सांगितले कि आत्माविश्वासाने भयमुक्त जीवन जगा व त्या परमात्म्यावर मनापासून प्रेम करत संपूर्ण सुखमय जीवनाचा आनंद लुटा.
आपण खरोखरच फार सुदैवी आहोत की आपल्याला बापुंसारखा बाप, नंदाईसारखी आई आणि सुचीतदादासारखा मामा सातत्याने आपले सर्व वाईट गोष्टींपासून रक्षण करावयास ढालीसारखे आपल्या सर्वबाजुनी उभे आहेत.

मला स्वत:ला कोणी तथाकथीत गुरू असे सांगून स्वतःचेच हसे करून घेइल असे अजीबात वाटले नव्हते, म्हणूनच अर्थात ह्या प्रकारावर विश्वास बसला नव्हता, पण नंतर गणपाच्याच वॉलवर प्रत्यक्ष त्याच बुवाच्या प्रवचनाची वीडीओ लिंक पाहिली..
http://www.youtube.com/watch?v=kO04G6gLUEc&feature=youtu.be

माझी सख्खी बहीण या अनिरुध्द बापूच्यान नादाला लागलेली आहे , जिथे तिथे याचेच फोटो याच्या बायकोचे फोटो. काय तर म्हणे याची आख्खीच्या आख्खी फॅमिलीच अवतार आहे. सोंगं नुसती. मला भयंकर चीड येते. माझी बहीण तर फोनवर पण हॅलो ऐवजी आधी त्याचेच नाव घेते आणि माझ्या प्रचंड डोक्यात जाते.
मला या बापु पेक्षा त्याच्या अनुयायी\ शिष्यांचीच चीड येते.

@उदय, ते शब्द मी प्रतिसाद देणार्यासाठी नाही, तर झोपेचं सोंग घेतलेल्या शिष्य/अनुयायांसाठी वापरलेत्...त्यात काय चुकले? आ.बा जर खुलेआम त्या अमेरिकन स्त्री विषयी "कुत्री" असा शब्द वापरू शकतो तर मी तर एक साधारण स्त्रीच आहे..

आसुमलने आधी आजारी आहे, नंतर नपुंसक आहे, नंतर आजोबा आहे अश्या बाता मारल्या.
आता जर मी 'गे' आहे असे म्हटले तर ते त्याची चाचणी करता येइल काय?

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Shiva-Asaram-CD/articlesho...

महिलांना एकांतात भेटणारे स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या सर्व 'एकांतलीला' चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. बापूंचा सेवक शिवा याने त्याच्याकडे या सीडी असल्याचा दावा केला आहे.

फॅब्रिकेटेड फोटोसारखी फॅब्रिकेटेड सीडी करता येत नाही का?
आजकाल अ‍ॅनिमेशनने मेलेली नटीसुद्धा सिनेमात काम करतेय असे दाखवता येते.
पुज्य (०) बापूजी तर(अजूनही) जीवंत आहेत.

माझी सख्खी बहीण या अनिरुध्द बापूच्यान नादाला लागलेली आहे , जिथे तिथे याचेच फोटो याच्या बायकोचे फोटो. >>>>>>>>>> ३-४ वर्षांपूर्वीचा ऐकीव किस्सा आहे.खखोदेजा. बापूच्या पत्नीला एका भक्ताने १ लाख रु.ची पैठणी देऊ केली होती.पण रंग न आवडल्याने तिने घेतली नाही!

फॅब्रिकेटेड फोटोसारखी फॅब्रिकेटेड सीडी करता येत नाही का?
आजकाल अ‍ॅनिमेशनने मेलेली नटीसुद्धा सिनेमात काम करतेय असे दाखवता येते.
पुज्य (०) बापूजी तर(अजूनही) जीवंत आहेत.
------- हे बापू विरुद्ध कुभान्ड रचले असण्याची शक्यता आहे.

मी जर बापूंचा पाठीराखा असतो तर एक नकली सीडी, जी नकली आहे हे सहज ओळखता येईल अशी, मीडिया कडे पोचवली असती. मग सगळीकडे आरडाओरडा चालू केला असता की बापुंविरुद्ध कुभांड रचण्यात येत आहे आणि जशी सीडी नकली आहे तसेच बाकीचे सगळे पुरावे नकली आहेत.

मालक धा जोडे मारा आनी येक मोजा, पन संत म्हणान श्या देऊ नका.
------ Happy

टग्या सिडी ची आयडिया भारी आहे... आसारामाला (आयडिया) विकली तर करोडपती बनवतील... आता पर्यन्त जमवलेली माया अडचणिच्या वेळीच कामाला लावायची असते.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/--/articleshow/22382172.cms

बलात्काराच्या आरोपामुळे अटकेत असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम यांच्याविरोधात जोधपूर पोलिसांकडे शुक्रवारी आणखी तक्रारी आल्या आहेत . तर आसाराम यांच्याविरोधात पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांचे एक पथक अहमदाबादच्या आश्रमात गेले आहे .

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/asara...

स्वतःमध्ये मंत्रशक्ती असल्याचा वारंवार दावा करणाऱ्या तथाकथित संत आसाराम बापू यांनी आता जामीन वगैरेच्या भानगडीत न पडता मंत्रशक्तीच्या बळावरच बाहेर येऊन दाखवावे, असे पत्र अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आसाराम बापू यांना जोधपूर कारागृहाच्या पत्त्यावर पाठविले आहे.

ते अनिरुद्ध बापु पण असेच...म्हणे मी श्री क्रुष्ण.....आणि माझी बायको सत्यभामा कि सुभद्रा कोण तरी.....याचा डॉक्टरकी चा धंदा चालला नाही म्हणुन हा बाप्या बापु बनला......एका न्युज पेपर मधे त्यांची महती गाणारा कॉलम असायचा...आता आहे कि नाही ते माहित नाही...पण लोक अभिप्राय द्यायचे...
१. माझी सोन्याची चैन हरवली होती...बापुना साकडे घातले तर लगेच मिळाली...
२. माझ्या बायकोला कॅन्सर झाला अशी शंका होती बापुना म्हटले मनात असं होउ देउ नका..त्यांनी ऐकले आणि आज माझी बायको सुखरुप आहे......कै च्या के.......
माज्या कॉलेज च्या समोर अक्खं मैदान या बापुच्या प्रार्थनेसाठी दिलं जायचं.....लोक यायचे खुप......
एकदा बस मधे एक बाई त्याच प्रवचना वरुन आली होती ती भेटली....गरमी खुप होती....तिने ओळख नसताना गप्पा मारायला चालु केल्या....म्हणते कशी बापुंची कुल्फी खाल्ली की कसं गार वाटतं.............
माझी बोलती बंद

Pages