पुन्हा आसाराम

Submitted by धडाकेबाज on 23 August, 2013 - 12:28

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/asaram-bapu-jodhpur-rape-p...

आसाराम हा पुन्हा विवादात फसलाय. त्याच्यावर बलात्काराचा आरोप झालाय. ह्याला पोसणाऱ्या भक्तांनी आता तर सुधारावे. हे भक्त लोकच ह्यांच्या सारख्या लबाड साधूंचे भक्ष्य ठरतायत .काय करायचे ह्या नीच भोदुंचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे तो रंगपंचमी खेळणारा बापु भक्त कुठे गेला?:फिदी: तोंड बंद झाले असेल आता. २-२ धागे काढले होते त्याने बाप्पु होळी खेळले तर काय बिघडले अशी सारवासारव करणारे.

बाप्पु आजारी पडले. रामकृष्णहरी! हार्ट अ‍ॅटॅक आला की काय या भोंदुला?

मुग्धमानसी अतिशय सुरेख पोस्ट
आजकाल लोकांना आपलं दु:ख, वेदना उघडून पाहून त्यावर इलाज करण्यापेक्षा अशा भोंदूंच्या पायी शरण जाऊन त्या वेदनेपासून दूर पळणे जास्ती सोप्पे वाटते. आणि असे बाबा लोक या लोकांच्या व्हल्नरॅबिलिटीचा फायदा घेऊन आपले उखळ पांढरे करून घेतात. 'भगवान सब भला करेगा' च्या नावाखाली मॉब हिप्नोटाईज करायचा... आणि स्वतःचा टेंभा मिरवायचा.
जर गुन्हा केला नसेल तर पळून का गेला हा XWQ#$%
ह्या असल्या सगळ्या बाप्या आणि आयांना रस्त्यावर आणून फटके मारले पाहिजेत. Angry

मुग्धमानसी,
छान पोस्ट.
आपल्यासारखी विचार करणारी माणसे संख्येने कमीच आहेत, आहेत ती या मोठ्या समुहाला विरोध करायला
घाबरतात.
या लोकांचे भक्तगण, इतके अंधविश्वासू असतात कि आपला बाबा / बाई यांच्या बद्दल कुणीही काही बोलले कि हिंसक होतात.

हम्मम. लोक आधी नादाला का लागतात ? >>

लोकं खाली सांगितल्या गोष्टीवर विश्वास का ठेवतात हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला हे पण कळेल की ते बुवांच्या नादाला का लागतात.

<गोष्ट सुरु>
एक देवी होती, तिने एकदा आंघोळ करायचं ठरवलं. तिने अंगावरचा मळ (!!!) काढून त्याचा एक मुलगा(!!) बनवला आणि त्याला जिवंत केले(!!). काही गैरसमजातून तिच्या नवरयाने त्या मुलाचे डोके तोडले. ते इतके लांब उडाले की सर्वशक्तिमान देव असून पण ते त्याला पुन्हा मिळालेच नाही(!). मातीचे दुसरे डोके बनवण्यापेक्षा त्याने जंगलात जाऊन एका हत्तीचे (!!) डोके तोडून आणले आणि त्या मुलाच्या डोक्याच्या जागी बसवले (!!!) मुलगा पुन्हा जिवंत झाला (!). असा हा हत्तीचे डोके असलेला मुलगा आता एका लहान उंदरावरून सगळीकडे फिरतो(!!). त्याची मूर्ती बनवताना हत्तीची सोंड उजव्या बाजूला वळलेली आहे की डाव्या बाजूला यावरून त्या मूर्तीची ताकत कळते.
<गोष्ट संपली>

कोणी कशावर विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकाने आपआपल्या विश्वासाची फळे चाखण्यास तयार असले पाहिजे. बुवा तिथे बाया या प्रकारांची शेकडो उदाहरणे असताना पण आपली फसवणूक करून घेणाऱ्या लोकांबद्दल मला फारशी सहानुभूती नाही.

दुर्दैवाची गोष्ट ही आहे की दुसऱ्यांच्या (अनाठायी) विश्वासामुळे माझ्या जीवनशैलीचा स्तर खालावतो. मला ध्वनी, वायू आणि जल प्रदूषणाचा सामना करावा लागतो. मला वाहतूक कोंडी मुळे घरी पोचायला उशीर होतो.

"आसाराम आजारी आहे त्यामुळे ते चौकशीसाठी हजर राहु शकत नाहीत" असे त्याच्या मुलाने सांगितले.

त्यांना मुलगा आहे मला आजच कळले. मागे त्यांचे ब्रम्हचर्यावर प्रवचन देखील ऐकले होते आस्था चॅनेल वर.
आणि आता कळले की तो "ब्रम्हचर्यावर प्रवचन देणारा" स्वतःच एका(च?) मुलाचा बाप आहे.
अरे देवा!! Happy

मी या माणसाचं एक भाषण लाईव्ह ऐकलं होतं. त्यामधे त्याने त्याच महिन्यात अमेरिकेमधे एका स्त्रीने "सहा बाळांना एकाच वेळेला जन्म दिला" या बातमीचं कात्रण पकडून "छे लोगोके साथ सोयी होगी, इसिकिये कुतिया की तरह जनी है" असं विधान केलं होतं. समोरच्या मूर्ख जनतेने टाळ्या वाजवल्या होत्या >> How mean... या बाबा चे स्वतःच्या आई बद्द्लहि हेच मत असावे..

.

.

.

@तुर्रमखान: +१०००
मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. गाडगेबाबा हेच खरे संत होते.

मुग्धमानसी अतिशय खरे आहे. माझी आई पण एकेकाळी या आसाराम ना फार मानायची, आम्ही सर्व तिची चेष्टा करायचो पण माणूस भोंदू असला तरी असा विकृत असेल असे वाटले नव्हते.

आता आई तर कानाला खडा लावून आहेच. चला आई तरी सुधारली या सगळ्या प्रकरणांमुळे....

आचार्य अत्रे यांचे 'बुवा तेथे बाया' नाटक पहा/वाचा. ही बुवाबाजी परंपरा पिढ्यानपिढ्या सुरु आहे आणि भोंदू भारतीय त्यांचेच गुणगान करता. तेथे मेळ्घाटात कुपोषित बालके आहेत, त्यांना वाली नाहि त्यांना पैसे द्या, आमट्यांना स्वयंसेवक हवेत तेथे जा खुप काहि करण्यासारखं आहे. पुण्यात बेहेरे यांच्या व्रुद्धाश्रमा त व्यवस्थापक हवाय तेथे जा. पण लक्शात कोण घेतो ?

परमपूज्य बापूंची परमेश्वर परिक्षा बघतोय झालं.. बापू त्यातूनही तरून जातील. राउल विन्सी आणि सोनियेने हे कुभान्ड सुरु केले आहे. जगात संतांना नेहमीच त्रास झाला आहे. सत्य परेशान होता है पराजित नही...

जय प.पू. आसारामजीबापू...

एक म्हण आठवली

रावण पडला उताणा, त्याच्या तोंडात XXX

तात्पर्य काय, थोर माणूस उताणा पडला तर सगळेच त्याच्या विरोधात जातात. आता तो परत उठून बसेल तेव्हा बघा, कसा एकेकाचा बदला घेणार आहे तो Happy

तात्पर्य काय, थोर माणूस उताणा पडला तर सगळेच त्याच्या विरोधात जातात. आता तो परत उठून बसेल तेव्हा बघा, कसा एकेकाचा बदला घेणार आहे तो

माँ कसम, चून चूनके बदला लूंगा, हाँ Rofl

परमपूज्य बापूंची परमेश्वर परिक्षा बघतोय झालं. >>

अगदी खरं. "जय संतोषी मा" नावाच्या डॉ़क्युमेनट्रि मधून हे अगदी वादातीतपणे शास्त्रीय रित्या सिद्ध झालेलं आहे की देव त्याच्या सच्च्या भक्तांची कडक परीक्षा घेतो. ज्या वेळी राहू आणि गुरु ची युती होईल तेव्हा बापुंमागची ही शनीची साडेसाती सुटेल.

राहु आणी गुरुची यूती?:अओ::हहगलो:

समझनेवालोंको इशारा काफी, चहा, दूध असतो.:फिदी:

http://www.loksatta.com/desh-videsh-news/asaram-bapu-case-hunger-strike-...

पीडीत मुलीच्या वडिलांचे उपोषण
अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या आसाराम बापूंच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. "माझ्या मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी आसाराम बापूंना अटक होईपर्यंत अन्नाचा कण घेणार नाही" असे म्हणत पीडीत मुलीचे वडील उपोषणाला बसले आहेत

उपोषणाला बसून तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रकार आहे हा...
याला काय न्याय म्हणतात काय . पुरावे असले तर पोलीस करतीलच ना अटक? हे नाटक कशासाठी?

आसाराम ला अटक बालात्कार्याना फाशी द्यावे हि मागणी पुढे आली होती. हा म्हातारा जर दोषी असेल तर ह्याच्यापासूनच सुरवात करावी.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/asaram-bapu-arrest-indur-r...

मागे त्यांचे ब्रम्हचर्यावर प्रवचन देखील ऐकले होते आस्था चॅनेल वर.>>
अहो, त्यांनी एक पुस्तक लिहीलंय. ब्रह्मचर्य हेच जीवन. त्यात त्यांनी पुरूषाने आयुष्यातून फक्त एकदाच शरीरसंबंध करावा असं सांगितलंय. महिन्यातून एकदा जरी संग केला तो पुरूष वर्षभराच्या आतच आपली सगळी शक्ती हरवून बसतो आणि मरतो, असंही म्हटलंय. तीस दिवसांच्या अन्नसेवनातून कितीतरी ग्रॅम रक्त बनते आणि त्या रक्तापासून एक थेंब वीर्याचा बनतो, असाही जावईशोध त्या पुस्तकात लावलाय. लोका सांगे ब्रह्मज्ञान ही म्हण याच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. आता कुठं गेलं याचं ब्रह्मचर्य?

एखादा गुरु ब्रम्हचर्य या 'विषया' वर लंबीचौडी भाषणे देऊ लागला की दाल मे कुछ काला है. मागे अमेरिकेत असेच एक होते योगी अमृत देसाई. याच विषयावर भाषणे देत. नंतर कळाले की ते तीन विवाहित महिला शिष्यांबरोबर...( काय ते चाणाक्ष वचकांना.. ) अर्थात असले हे गुरु गाजर गवताप्रमाणे चिवट असतात. स्कँडल नंतर काही दिवस चुप बसतात आणी मग दुकानाचे पुन्हा उद्घाटन. बेंगलोर चे नित्यानंद पळून गेले तेव्हा मी आनंदाने एक सत्यनारायण बोलून ठेवला होता. पण कसले काय, नव्या जोमाने योगिक फ्लायिंग चे क्लासेस घेत आहेत.

.

Pages