दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

Submitted by चंपक on 8 March, 2013 - 00:46

नमस्कार,

दररोजच्या वर्तमानपत्रांमध्ये आपण महाराष्ट्रातील भीषण दुष्काळा बद्दल वाचत असतोच! त्याबद्दल काही करावेसे देखील वाटते. अश्या दुष्काळी परिस्थितीत सरकार काय करते? असा प्रश्न देखील मनात येतोच. सरकारी काम त्यांच्या पद्धतीने चालु असतेच! आपण जर सकारात्मक भुमिकेतुन सरकारी कामाकडे लक्ष दिले, तर आपण आपला खारीचा वाटा उचलु शकतो.

अश्याच मानसिकतेतुन अहमदनगर जिल्ह्यातील काही तरुणांनी एकत्र येउन एक गट बनवला आहे. अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळी जिल्हा म्हणुन ओळखला जातो. भौगोलिक दृष्ट्या हा जिल्हा खुप मोठा आहे. सरकारी कामकाजाची पद्धत आणि दुष्काळाची भीषणता यामध्ये दुवा साधायचा असेल तर सामान्य जनतेचा आवाज सरकार पर्यंत पोचवण्यासाठी अन तक्रारी/मागण्यांचा पाठपुरावा करण्या साठी एका "हेल्पलाईन" ची गरज भासली. ती पुर्ण करण्यासाठी खालील कार्यक्रम राबवतो आहोत.

यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करित आहोत. आपल्या मित्रपरिवाराला ई-मेल पाठवणे सोपे जावे म्हणुन ते इंग्रजी माध्यमातुन केले आहे. सदर आर्थिक मदत आयकराच्या ८०-जी द्वारे करमुक्त असेल. परदेशी व्यक्तींनी/ परदेशस्थ मायबोलीकरांनी ही मदत आपल्या भारतीय मित्र/परिवाराच्या मदतीने पाठवावी.

इतर जिल्ह्यांमध्ये अशी हेल्पलाईल सुरु करण्यासाठी अहमदनगर गट सर्वतोपरी सहकार्य करेल!

धन्यवाद!

YOUTH FOR CHANGE, Ahmednagar

Appeal For Drought Relief Efforts

Dear Friends,
I am writing to draw your attention towards a very serious issue of the current time. As we all are aware that, the current year is a year of Natural Disaster for Maharashtra. Some reports claim that the situation will be worse than that of 1972 famine.
In Ahmednagar district of Maharashtra, drought relief efforts are being made by Government Administration. The administration works on three aspects.
1) Providing drinking water.
2) Providing unskilled employment.
3) Providing fodder and water to cattle’s through cattle camps.

Current scenario in Ahmednagar Dist is,
No of Cattle Camps (Chhavanis) : 218 and 1.34 lac animals
No of Water Tankers: 272 for 231 villages in 14 Tahasil’s
Estimated tanker requirment is around 850
and estimated cattel population to be served in Camps is lacs

The Holy Grail is that the administration does not provide anything Sue Moto. The relief is provided only to the areas/citizens who raise voice in front of Govt machinery or only to those whose voice reached upto govt machinery. For example, If the village doesn’t have source of drinking water, govt doest not START tanker to that village on its own, until there is demand / regular follow up of the demand. The villagers has to raise demand for drinking water to Gramsevak and Talathi. They submit the proposal to Panchayt Samitti.
Secondly,Dist Administration regularly undertaking review meetings at Dist and Taluka levels either independently or with Political office bearers. These meetings are largely politically influenced. Economically and socially weak citizens cannot raise voice in front of powerful leaders and hence remain out of the relief mechanism.
Also, in implementation of relief activities lots of malpractices happens e.g. tanker skips some trips, less or no payment to labour’s working on EGS works.
Hence, there is gap between demand and supply. The actual scope of work is to bridge the gap between comman man and Govt officials.
Their voice MUST reach to the govt machinery for better relief work and this is the point where YOUTH FOR CHANGE is focusing its efforts.

In such circumstances where the Government machinery is already under pressure due to huge work load. As a young activist, we have a responsibility to shoulder. Hence, few enthusiastic and experienced youngsters from Ahmednagar District, the ill-famous district known for its regular drought-like situation, have come together and are working together to provide some relief to the citizens, farmers, women, animals, live-stock. The government machinery is already under pressure due to huge work load.
HELPLINE initiative:
• We are launching a interactive website along with a Telephone HELPLINE NUMBER.
• Anybody from the district, who want to register his matter can call to this number. we will hear them and register it in our specially prepared software. Immediately one token number will be given.
• People can login to the website and register their demand/ complaint directly.
• We will forward all such matters through separate letter / email to concern govt authority with request for necessary action. For example, all calls demanding drinking water supply will be forwarded to Dist Collector, CEO of Zilla Parishad, Tahsildar and BDO of concern talukas, MLA and Sabhapti (PS) of the taluka.
• The caller will get sms from our system with the token number stating that his issue is forwarded to concerned authority.
• After a week we will follow it up with concern caller about the relief work, if he replied negatively we will forward his issue to higher authorities i.e. Divisional Commissioner, Secretary of Rural Development Department, Revenue Dept and Water Supply Dept and Guardian Minister (Palak Mantri).
• Again after a week if the issue is not resolved it will automatically get forwarded to Chief Minister, Deputy CM, Chief Secretary, Both Leaders Of Opposition.
• Finally we will forward the unattended issues to Lokayukta and Governor of Maharashtra State.
• At every step of follow up media will be involved. A copy of letter / email will be sent to local media to draw attention of people and govt officials towards the issue.
• Caller will be updated at every stage through SMS.
• Caller can view the progress / follow up of his issue online via website.

BUDGETING
Expenses is on three fronts.
Sr no Item Amount Total
A SOFTWARE DEVELOPMENT 1,50,000 1,50,000
B HELPLINE OPERATIONS
1 Office staff 2 nos @ 8000 per month for months 2*8000*4 64,000
2 Phone bill 2000*4 8,000
3 Stationery 2000*4 8,000
4 Mis 1000*4 4,000
C AWARENESS CREATION
1 Press conference 3*2000 6,000
2 Flex banners at 600 villages (5*3 ft) 15*8*600 72,000
3 Displaying the banners 60000 60,000
4 Leaflets 1 lac 100000 1,00,000
5 Meetings 50 @ 2000 each 100000 1,00,000
TOTAL 5,72,000

BRIEF PROFILE OF CHIEF PROMOTERS :
• NITIN UDMALE : (Ex Dy CEO,Zilla Parishad)

• Age : 33 yrs
• Qualification : BSc (Agri)
• Worked as Block Development Officer, Panchayat Samiti, Parner, Dist Ahmednagar for 2.5 yrs.
• Worked as Dy CEO (VP), Zilla Parishad, Latur for 1.5 yrs.
• Worked as a BM in British Petroleum for 3.5 yrs.
• Worked as Vice President (PR) at Goel Ganga Group for 6 months.

• Dr BHARAT KARDAK : (Educationalist, Researcher, Entrepreneur)

• Age : 34 yrs
• Qualification : Ph. D. (Organic Chemistry)
• Post Doctoral Fellow at Australia (June 2009- April 2011)
• Ph. D. at Spain (2002- 2006)
• Worked for Cipla Ltd and Reliance Industries Ltd for three years.

• AJIT ROKADE : (IT Professional)

• Age : 42 yrs
• Qualification: BSc (Agri)
• Working in IT sector since last 17 yrs
• Leading in e- governance project of Government of Maharashtra.
• Appreciated at state level for his innovative software’s for various Govt offices.
• Handling all IT related responsibilities of eminent social worker Hon Anna Hazare.

• RAVIKUMAR JAGTAP : (Professional)

• Age : 33 yrs
• Qualification : B. Sc., D. Pharm.
• Having Corporate experience from last 8 yrs.
• Working as a Area Manager in leading insurance company since last 3 yrs
• Associated with “Snehalaya” project at Ahmednagar. (Satyamev Jayate fame)

We appeal to all socially aware people and organizations (Trusts, NGOs, Private and public Companies and Business houses) to generously donate to this initiative. (These donations will be exempted under income tax 80-G scheme) Kindly send Cheque/DD by the name “ Youth for Change, Ahmednagar” to the following address.

Kindly spread this information by sending SMS/email to your friends.
With Best Regards,
Youth For Change TEAM
Jai Hind !

Contact Person:
Dr. Bharat Kardak
+91 9503636999 / 8237747122
Email : bharat78@gmail.com
Address :
C/o Nitin Udmale,
Plot no 10, Samarth nagar,
Pipeline nagar, Sawedi, Ahmednagar 414003

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा दुष्काळ एवढा भीषण आहे याची कल्पना इथे पुण्यासारख्या शहरात बसून (त्यातही ए. सी रुममधे) येत नाहीये.

ही सर्व योजना इथे सविस्तर दिलीत हे खूपच चांगले केले आहे. माझ्या मित्रपरिवारात मी हे नक्कीच सर्क्युलेट करणार आता.

या अतिशय उत्तम कामाकरता सर्व टीमला अनेक शुभेच्छा.

चंपक या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा.
मायबोलीवर हे सगळ लिहुन तुला कितपत मदत मिळेल ह्याबद्दल मी साशंक आहे.(काही सन्माननीय अपवाद वगळता). ईथ बहुतेक सगळे पुण्या मुंबईतली किंवा परदेशस्थ लोक आहेत. त्यांना दुष्काळ म्हण्जे कस काय कळणार. इथ तर नळ सोडला की पाणी आलच पाहिजे. बटण दाबल की हवी ती विद्युत उपकरण चालु झालीच पाहिजे.
सद्य परीस्थितीत पाणी कपात / लोड शेडींग होणे पण मान्य नाहीये लोकांना तर दुष्काळग्रस्तांना मदत या तुझ्या उपक्रमाला इथले लोक काय महत्व देणार मित्रा.
तुझ्या ह्या धाग्यावर येउन लोकांनी येउन राजकिय धिंगाणा घातला नाही म्हण्जे मिळवली.

चंपकजी अभिनंदन आणि शुभेच्छा !

स्वयंसिद्धा ( Jaldoot) हा शुद्ध पाण्याचा उपक्रम माझ्या एका मित्राने राबवण्यास सुरुवात केलेली आहे. या उपक्रमाची दखल मेडीयानेही घेतली आहे. या उपक्रमा अंतर्गत खेडोपाड्यात घरोघरी जाऊन शुद्ध पाणी पुरवलं जातं. एका जलदूत नावाच्या रिक्षावर फिल्टरेशन प्लाण्ट असतो. त्या इंजिनाच्या सहाय्याने पाणी शुद्ध केलं जातं. त्याचा खर्च मित्रमंडळीच करतात. कुठलाही उपक्रम मोफत असू नये यासाठी लिटरमागे ५० पैसे असा नाममात्र चार्ज केला जातो. सध्या शिरूर व आजूबाजूचा परिसर हे टार्गेट आहे. हळूहळू व्याप्ती वाढवण्यात येईल. त्यासाठी गरज भासल्यास मदत स्विकारायचा निर्णय झाल्यास इथे अपडेट करीनच. (सध्यातरी असा विचार नाही) .

video
http://www.youtube.com/watch?v=i1S8pIug1Xg

चंपक, उपक्रमाला शुभेच्छा.

मला यानिमित्ताने बरेच वर्षं डोक्यात घोळत असलेले काही अडाणी प्रश्न विचारायचे आहेत. यात कुठेही उपरोध नाही आणि मी पूर्ण शहरी, ग्रामीण वास्तवाशी अपरिचित अशी व्यक्ती आहे हे सपशेल मान्य आहे -

१. नगर किंवा मध्य-दक्षिण महाराष्ट्र हा कायमचाच अर्धदुष्काळी भाग आहे. दर तीन वर्षांनी किमान एकदा पाऊस दगा देतोच. मग काही दीर्घकाळ परिणामकारक योजना विचारात घेतल्या जातात का? उदा: रेनवॉटर हार्वेस्टिंग, जोहड सारखे छोटे बंधारे, इ. त्या कितपत परिणामकारक ठरू शकतात?

२. शेती बेभरवशी ठरते, त्यातल्या अडचणी तुला सगळ्यात जास्त माहित. पण यावर उपाय म्हणून काही कमी खर्चाच्या, राजकारण्यांच्या तावडीतून सुटतील अशा योजना होऊच शकत नाहीत का? का पिकांचा बदलता पॅटर्न्/चॉईसही या बेभरवशी उत्पादनाला कारणीभूत आहे?

३. मुळात आपल्या भविष्यातल्या प्रोजेक्टेड गरजांप्रमाणे अन्नपिकं घेतली जातायत का? का नकदी रक्कम देणार्‍या पिकांचं वर्चस्व वाढतंय असं एक जे 'इम्प्रेशन' आहे ते खरं आहे? आणि असलं तर मग हा समतोल कसा साधता येईल? (मला माहित आहे की हा प्रश्न हिमनगाचं एक टोक आहे - शेतमालाचे भाव - मधले दलाल - कमॉडिटी ट्रेडिंग - शेतकर्‍यांचं अज्ञान किंवा संपर्काचा अभाव (इन्फर्मेशन अ‍ॅन्ड कम्युनिकेशन गॅप बिटवीन मार्केट फोर्सेस अ‍ॅन्ड द फार्मर्स) - राजकारण, इ. अनेक प्रश्न याच्याशी निगडित आहेत. तरीपण)

४. अनिर्बंध वाळू उपश्यामुळेही नद्यांच्या पात्रातील प्रवाहांचे स्वरूप, नद्यांची पाणी धरून ठेवायची क्षमता, पुरांचे पॅटर्न्स, इ. फार झपाट्याने बदलते आहे. यावर स्थानिक पातळीवर प्रबोधन करून विरोधी फळी कधीच उभारता येणार नाहीये का?

आमच्यासारखी शहरी माणसं हळहळण्यापलिकडे, जमतील तेवढे चार पैसे देण्यापलिकडे, आणि घरात पाणी, वीज, अन्न वाया जाऊ न देण्याचे प्रयत्न करण्यापलिकडे काहीच करू शकत नाहीत. आमचे रोजचे लढे वेगळे आहेत. तेही लढावे लागतातच. पण एकुणातच या दुष्काळाच्या बातम्या वाचून आतल्याआत जीव तुटतो. माझ्या कामामधे, भ्रमंतीत भेटलेले शेतकरी आठवत रहातात. ते आत्ता नीट जगू शकत असतील ना अशी काळजी वाटत रहाते. पोकळ, दम नसलेली शहरी काळजी - कारण इथे बसून मी काहीच करू शकत नाही. असो.

नगर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे.नगर जिल्ह्याचे २ भाग होतात उत्तर आणि दक्षिण. उत्तरेत अकोला संगमनेर रहाता कोपरगाव राहुरी नेवासा शेवगाव हे तालुके येतात तर दक्षिण भागात नगर , पाथर्डी जामखेड कर्जत श्रीगोंदा पारनेर हे तालुके येतात. उत्तर भागात पाटपाण्याची सोय खुप पुर्वीपासुनच आहे त्यामुळ जरी तिथ पाऊस कमी झाला तरी सह्याद्रीतल्या पावसामुळ मुळा , भंडरदरा हे धरण भरतात आणि उत्तरेतल्या तालुक्यांना पाण्याचा येव्हडा त्रास जाणवत नाही. गुगल मॅपवर जर पहाल तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा हिरवागार भाग तोच येतो.
दक्षिणेत पाणलोट क्षेत्रासाठी नद्या नाहीत आणि ज्या आहेत त्यांच्यावर असलेल्या छोट्या मोठ्या बंधार्‍यासाठी वरच्या भागातुन पाणीच सोडल जात नाही (उदा. भीमा खोर ). ते पाणी कुठ मुरत हा मुद्दा इथ घेत नाहीये.
माझ गाव नगर तालुक्यात येत. यावर्षी २-३ पाऊस झालेत फक्त. सीना नदी माझ्या गावात उगम पावते. २-३ पावसान तिला कितीस पाणी आल असणार. गावचा आठवडे बाजार पावसाळा सोडुन इतर वेळेस नदीत भरतो. यावर्षी पावसाळ्यात पण बाजार नदीतच भरला. नदीला पाणीच आल नाही. आमच्या गावात २००-३०० पेक्षा जास्त शेततळे आहेत. तेव्हडेच छोटे छोटे बंधारे आहेत. पाऊसच नाही त्यामुळ शेततळ्यातले प्लास्टीकचे कागद पण काढुन ठेवावे लागले आहेत. दिवाळीनंतर आम्ही शेतीत काहीच केल नाहीये. जेव्हड पाणी विहीरीला आहे ते पिण्यासाठी राखुन ठेवलय.
माझ गाव नगर औरंगाबाद हायवे वर येतय त्यामुळ आम्हाला येव्हडा त्रास होणार नाही. पण आतल्या गावांचे हाल कुत्रेपण खाणार नाहीत अशे आहेत.
मराठवाड्यात तर यापेक्षा भीषण परीस्थीती आहे. तिकड पाणी सोडाव लागतय त्यामुळ उत्तर भागात पण यावर्षी पाणी टंचाई जाणवतेय.
वरदा नगदी काय आणि अन्नपिक काय यावर्षी कोणतच पिक हाती आलेल नाहीये. आम्ही सर्वस्वी शेतीवर अवलंबुन नाहीये त्यामुळ आम्हाला तस पाहिल तर फार फरक पडलेला नाही पण जे फक्त शेती आणि जोडधंद्यांवर (दुध+कुक्कुट्पालन ई.) अवलंबुन आहेत त्यांच्याकड पाहुन खुप जीव तुटतोय.
अ‍ॅटलिस्ट तुला हे जाणवतय आणि पाणी/वीज बचतीसाठी तु काहीतरी करतेय्स हेच फार फार झाल.

वरदाजी
प्रतिसाद आवडला. प्रत्येकाला मदत करणे शक्य नाही हे ही खरेच. पण या भावनादेखील खूप महत्वाच्या असतात. अशा भावनेतूनच पुढे यथाशक्ती मदत देखील होऊ शकते.

केवळ धाग्याचे नाव वाचताच 'मदत कसली मागताय; सरकारने जाहिर केलेली मदत योग्य ठिकाणी पोहचवा धड'
असा सूर मनात उमटला.
पण आपले मंडळ हेच काम हाती घेतेय हे पाहिल्यावर कौतुक वाटतेय.

आमच्याइथेही नळाला ११दिवसातून एकदा पाणी येतेय पण अगदीच बिकट परिस्थिती नाही.
सुशांत म्हणतायत त्याप्रमाणे आमचाही शेती हा काही एकमेव उद्योग नसल्याने हे वर्ष काढता येईलच.
तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा!

एकूणातच सरकारी योजना त्या त्या गरजू गटाकडे पोहचावे म्हणून प्रयत्न होणे आवश्यक आहे.
याबाबतचा एक अनुभव- सरकारने शेतकर्यांसाठी तात्काळ गोल्ड लोन सर्बिस देऊ केलीय. केवळ ७टक्के इतक्या व्याजाने तुमच्यकडिल सोन्याच्या किंमतीच्या ८०% लोन मिळते. त्यातही शेवटी भरताना ३-४ टक्के माफ होऊन मग साधारण ३.५ टक्केना पडते. बाकि गोल्ड लोन १५-२०टक्के इतके आहे.
कोणत्याही मोठ्या बँकेत या स्कीमखालि सोने घेणारे लोक पहा. बिल्डर, काँट्रॅक्टर आणि नोकरदारच दिसतील.

साती अ‍ॅग्री गोल्ड लोनला सरकारी अनुदान किंवा मदत नाहीये बहुतेक. हे बँकाचा धंदा वाढवण्यातला येक प्रकार आहे. नॉर्मल शेतकर्‍याकड कुठ आलय ढिगभराच सोन. असलेले किडुक मिडुक पण ते पोरीबाळींच्या लग्नासाठीच ठेवतात.आणि जरी शेतकर्‍याला सोन्यावर कर्ज काढायचच असल तरी तो खाजगी सावकाराकड जाणच पसंत करतो.

सुशांत, खुलाश्याबद्दल धन्यवाद.
कोपरगाव भाग तिथल्या अतिसुपीक काळ्या मातीबद्दल आणि बर्‍यापैकी पाणी उपलब्धतेबाबत प्रसिद्ध आहे. प्रश्न उर्वरित भागाचा आणि मराठवाडा वगैरे प्रदेशाचा आहे हेही वाचून ऐकून माहित आहे. तू लिहिलेली सद्यस्थिती वाचून खरंच वाईट वाटलं.
पण
दक्षिणेत पाणलोट क्षेत्रासाठी नद्या नाहीत आणि ज्या आहेत त्यांच्यावर असलेल्या छोट्या मोठ्या बंधार्‍यासाठी वरच्या भागातुन पाणीच सोडल जात नाही (उदा. भीमा खोर ). ते पाणी कुठ मुरत हा मुद्दा इथ घेत नाहीये.>> हाच मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे असं नाही का वाटत? योग्य नियोजन किंवा अंमलबजावणीचा अभाव, भ्रष्टाचार, राजकारण अशा विविध घटकांचा दुष्काळाची तीव्रता वाढवण्यात निश्चितच सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं. संकट फक्त अस्मानी नाही तर सुलतानी सुद्धा आहे! आणि जोपर्यंत त्यावर काही उपाय होत नाही तोपर्यंत ही परिस्थिती सुधारेल असं मला वाटत नाही. कुठे कमी कुठे जास्त पाण्याची उपलब्धता ही नैसर्गिक परिस्थिती आहे, ती आपल्या हातात नाही. पण मुळात बारमाही मोठ्या नद्यांच्या वरच्या पात्रात अतिशय काटेकोरपणे पाणी वापरणं, पाणी प्रदूषणावर कडक नियंत्रण ठेवणं, आणि खालच्या पात्रातही अमाप लोकसंख्या रहाते आणि ते पाणी तिलाही तेवढंच गरजेचं आहे. त्यात कुठलंही राजकारण, अर्थकारण, भ्रष्टाचार, उधळपट्टीची मानसिकता आणू नये हे सर्वसामान्य शहरी लोक, नोकरशहा, राजकारणी यांना कधी कळणार?
आपल्यापैकी कुणीच वैयक्तिक पातळीवर यशस्वी लढा देऊ शकणार नाही हे कळतंय, पण कधीतरी कुठेतरी शिक्षित शेतकरी आणि सुजाण शहरी समाजाने हा आवाज तीव्रपणे उठवायला हवा आहे. आज सुरू केलं तर कदाचित २-३ पिढ्यांनंतर यश येईल. पण सुरुवात तर करूयात!

थोपु वर एक फोटो पाहिला......इथे शेअर करावासा वाटला
.
foto from : Elisabeth Aline Hansen

529702_414289755333446_420424940_n.jpg

वरदा +१
आमच्यासारखी शहरी माणसं हळहळण्यापलिकडे, जमतील तेवढे चार पैसे देण्यापलिकडे, आणि घरात पाणी, वीज, अन्न वाया जाऊ न देण्याचे प्रयत्न करण्यापलिकडे काहीच करू शकत नाहीत >> अगदी अगदी.. हेच करतेय.. नि बाकी कोणी वाया घालवत असेल तर ते थांबवणे सुद्धा .. शक्य असेल ते

उत्तम उपक्रम. यश मिळावे ह्या शुभेछा. किती महिने हे करण्याचा विचार आहे? वरील तक्त्यात ४ महिने असे दिसत आहे. बरोबर का? मित्र-मैत्रिणींना कळवु.
एक-प्रतिसादक, तुमच्या मित्राचा इतका चांगला उपक्रम आहे तो अजुन सविस्तर लिहा की.
सुशांत पहिला प्रतिसाद इतका निराशाजनक का?
वरदा, साती, प्रतिसाद आवडले.

धन्यवाद !

वरदा आणि त्यांच्याप्रमाणे प्रश्न पडलेले सर्व.... या सर्व प्रश्नांचे सध्यातरी उत्तर देणे कठीण आहे. "दुरदृष्टीच्या अभावाने चालवलेले राज्य " या एकाच वाक्याने वरील सर्व प्रश्नांची उत्तरे शोधता येतील. दुष्काळ संपल्या नंतर या बाबींवर देखील काम केले जाउ शकते. अशक्य असे काहीच नाही. अवघड आहे हे नक्की !

परंतु सध्या महाराष्ट्रापुढे "बचेंगे तो और भी लडेंगे" अशी परिस्थिती आहे!

जसे परिक्षेच्या काळात, एवढे वेळ पास कर देवा, पुढील वेळी नीट अभ्यास करील...असे प्रत्येक वेळी म्हटले जाते.... तसेच काहीसे Sad

आज आम्ही मित्रांनी राळेगण येथे अणांची भेट घेतली आणि पुढील कार्यवाहीबद्द्ल चर्चा केली. "दुष्काळाच्या वाढत्या तीव्रतेने जनता व्याकुळ झाली आहे, आणि त्यांना दिलासा देण्यासाठी तरुणांनी संघटन वाढवले पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करुन जनतेला आणि प्रशासनाला मदत करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे" असे अण्णा म्हणाले. अण्णांशी झालेल्या चर्चेनुसार दि २७ मार्च २०१३ रोजी सकाळी १० वाजता सदर हेल्पलाईनचे उद्घाटन करण्याचे ठरवले आहे.

Charcha_Anna_2.jpg

(अण्णांशी चर्चा करताना श्री. नितीन उदमले, श्री. रवी जगताप, श्री. अजित रोकडे)

वरदा " हाच मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे असं नाही का वाटत? "
तुम्ही म्हणता ते १००% खर आहे. मी या मुद्द्याला हात घातला नाही कारण त्यावरुन इथ वाद उपस्थित होऊ नये म्हनुन मी त्यावर बोललो नाही.
सुनिधी : तुम्हाला माझा प्रतिसाद खुप नकारत्मक वाटला पण परीस्थिती पण तशीच आहे. पुण्या मुंबईत येकदिवसाआड पाणी आणी दिवसातले कमीतकमी २ तास भारनियमन केले तर किती आरडाओरड होईल?
भारत खुप खुप शुभेच्छा......

चंपक, इंटरॅक्टिव्ह सुविधा हेल्पलाईन चालू करायच्या कल्पनेबद्दल व योजनेबद्दल अभिनंदन!
याच जोडीला जलसाक्षरता अभियान प्रकल्पासारखा उपक्रम राबविता येणे शक्य आहे का?
तात्पुरती पाण्याची सोय हा उद्देश तर दिसत आहेच, परंतु भविष्यातील पाण्याचे नियोजन, पुनर्भरण कसे शक्य करता येईल याचाही या उपक्रमातून विचार व्हावा असे तळमळीने वाटते.

माझे विधान कदाचित आक्षेपार्हही वाटेल, परंतु एकदा पाण्याचा पुरवठा सुरळीत झाला किंवा निश्चित झाला की त्या पाण्याचा अपव्ययही सुरू होतो. तो अपव्यय कसा रोखता येईल?

कमी पाण्यात होणारी शेती - उद्योगधंद्यांची कल्पना व मार्गदर्शन नगर जिल्ह्यातील रहिवाशांना करता येईल का?
इंडस्ट्रियल एरियात लागणार्‍या पाण्याची बचत होऊ शकेल का? असेही अनेक प्रश्न हा बाफ वाचताना मनात आले.

चंपक, खूप चांगला उपक्रम. मी माझ्या मित्रमंडळींना माहिती फॉरवर्ड करेन.
साती, सुशांत, वरदा चांगल्या पोस्ट्स
अकुच्या पूर्ण पोस्टला +१.

सदर हेल्पलाईनचे उद्घाटन मा. अणांच्या हस्ते २७ मार्च ला राळेगण येथे झाले. फेसबुक पेज (युथ फॉर चेंज, अहमदनगर) वर माहिती उपलब्ध आहे. ( Visit www.y4cnagar.com and Call 99 22 99 28 99 for Drought Related issues.
Hon'ble Anna's Message http://www.youtube.com/watch?v=c6KFS8JUeZ0 )

अरुंधती: अणांनी देखील पुढील काळात अश्या प्रकारचे जल साक्षरतेचे कार्यक्रम घेण्याची सुचना केलेली आहे. त्याच बरोबर, सध्या वेबसाईट अन छोट्या सभांमधुन पाण्याच्या वापराबद्दल प्रबोधन करण्यास सांगितले आहे.

"युथ फॉर चेंज: चे विद्यार्थ्यांना आवाहन

जेष्ठ समाजसेवक पद्मभुषण श्री अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणार्‍या "युथ फॉर चेंज" या संस्थेने दुष्काळग्रस्त अहमदनगर जिल्ह्यातील इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना दोन महिने अभ्यासासाठी विनामुल्य भोजन व निवास व्यवस्था पुरवण्याचे ठरवले आहे. दुष्काळी परिस्थितीमुशालेय वर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीषण परिस्थिती निर्माण झाली असुन ग्रामीण जीवन उध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. अनेक शालेय विद्यार्थ्यांचा वेळ रोजगार, पाणी आणि जनावरांसाठी छावणीवर जाणे यासाठी जात आहे. यामुळे इयत्ता १० वी व १२ वी या महत्वाच्या वर्षांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन "युथ फॉर चेंज" संस्थेतर्फे १०० विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीमध्ये पुणॅ येथील विविध संस्थांच्या होस्टेलवर मोफत भोजन,निवास व अभ्यासाची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
दि. २० एप्रिल ते १० जुने पर्यंत या विद्यार्थ्यांची जबाबदारी संस्था घेईल. यादरम्यान विद्यार्थ्याना शैक्षणिक मार्गदर्शन केले जाईल. तसेच, विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी देखील कार्यक्रमांची आखणी केली असुन, शिक्षण, कला, साहित्य, विज्ञान इ. क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर पुणे व परिसरातील विविध प्रसिद्ध व ऐतिहासिक स्थळांची सहल आयोजीत केली जाणार आहे

वर उल्लेख केलेल्या शिबिरासाठी आम्हाला पुणे परिसरातील स्वयंसेवी शिक्षकांची गरज आहे. १० वी, ११ वी, १२ वी विज्ञान, गणित, इंग्रजी विषयातील तज्ञांनी फुलगांव येथे येउन किमान ७ दिवस मार्गदर्शन वर्ग घ्यावेत अशी अपेक्षा आहे. फुलगांव सैनिकी शाळा हे, लोणीकंद गावाच्या पुढे, वडु फाट्यापासुन २ कि.मी. वर आहे. धन्यवाद.

Pages