"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.
ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html
हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.
वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.
जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.
हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.
करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!
"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei
सन रायजिंग इन द वेस्ट म्हणजे
सन रायजिंग इन द वेस्ट म्हणजे वेस्टरोसमध्ये डॅनीला होणारा मुलगा?>>>>
नाही डॅनीला मुलगी होणार आणि तिचं नाव लियाना ठेवणार आणि डॅनी मरणार जस्ट लाइक लियाना.
सान्साचे ट्रान्सफॉर्मेशन मला पण फारावडले. पण जेमीचे किंचितही कमी वाटले नाही तिच्यापुढे.
ती बदलते त्याला कारण तिला मिळणारी अनफेयर वागणूक्/अत्याचार त्यामुळे तिला आपण किती बावळट होतो ह्या सगळ्याला आधी भुललो होतो असं कहितरी..
पण जेमीचं जास्ती कॉम्प्लिकेटेड आहे. बहिणीच्या प्रेमात आणि घराण्याच्या/टायविन्च्या प्रभावामुळे त्याचा मूळचा स्ट्राँग मॉर्ल असलेला स्वभाव दबून होता की काय. कैदी बनून कॅट च्या कँप मध्ये राहाणे आणि बाकी एक्स्पोजरमुळे ही केम इन्टू हिज ओन बिइंग , कमिंग आउट ऑफ शॅडोज ऑफ सर्सी/टायविन...
अजुन एक थिअरी ऐकली, गेंड्रीला
अजुन एक थिअरी ऐकली, गेंड्रीला का जीवन्त ठेवलय त्याची.
तो सुध्दा म्हणे बास्टर्ड नाहीच, सर्सी आणि किंग रॉबर्टचा एकुलता एक मुलगा , अजुन एक लिगल दावेदार आयर्न थ्रोनचा!
सर्सीच्या बोलण्यात येतं सिझन १ एपिसोड २ मधे कि तिचं एक लहान बाळ तान्हं असतानाच गेलं, ‘ अ डार्क हेअर्ड सन‘ तो गेंड्री!
बाळ मेल्यावर तिला दाखवलही नाही, तसच नेलं असही काहीतरी आलय तिच्या बोलण्यात, ते बाळ (गेंड्री )म्हणे जेमीने तिच्यापासून दूर केलं, किंग रॉबर्ट वरचा राग आणि जेलसी म्हणून !
इंटरेस्टिंग थियरी.
इंटरेस्टिंग थियरी.
इन्टरेस्टिंग!
इन्टरेस्टिंग!
सर्सी आणि किंग रॉबर्टचा
सर्सी आणि किंग रॉबर्टचा एकुलता एक मुलगा >> ओएमजी! म्हणजे बॉलिवुडी शीन असणार आता एक. काही कारणाने सर्सी आणि गँड्री एकमेकाच्या जिवावर उठणार आणि मग जेमी मधेच येऊन रुक जाओ! रुक जाओ तुम दोनो! असे ओरडणार!! " यही तुम्हारा बिछडा हुआ बेटा है सर्सी" मग "क्या ! क्या!! क्या!!!" असा माझा आवडता त्रिवार वळून बघण्याचा आणि उद्गारण्याचा शॉट!! मग त्यावर सर्सी, जेमी , टिरियन, नाइट किंग, माउंटन, अशी सर्व मंडळींच्या आश्चर्याच्या रिअॅक्शन्स आणि ब्याकग्राउंड ला विजा चमकणार!!
>>> यही तुम्हारा बिछडा हुआ
>>> यही तुम्हारा बिछडा हुआ बेटा है सर्सी"
इतकं बोलतोय तो ब्रॉनचा बाण येऊन लागणार त्याला!
>>> यही तुम्हारा बिछडा हुआ
>>> यही तुम्हारा बिछडा हुआ बेटा है सर्सी"
इतकं बोलतोय तो ब्रॉनचा बाण येऊन लागणार त्याला! Lol>>>
पण तो सर्सीचा मुलगा असणे अथवा तिला इथून पुढे मूल होणे म्हणजे त्या विच ची प्रोफसी खोटी ठरण्यासारखं आहे...सो ती थिअरी व्हॅलीड नाही वाटत.
बिछडा हुआ बेटा /नाजायझ सगळच
बिछडा हुआ बेटा /नाजायझ सगळच बॉलिवुडी आहे ऑलरेडी
बाकी ते व्हाइट वॉकर्स सगळे टार्गेरियन्स आणि मॅड किंग= नाइट किंग हेच अत्ता पर्यन्त तरी जुळतय कथानकाशी!
टार्गेरियन्सचे हजारो वर्षांचं राज्य आणि व्हाइट वॉकर्सच हजारो वर्षाच अस्तित्व, त्यांचं ड्रॅगनग्लास किंवा व्हॅलेरियन स्टीलने मरणं, फायर इम्युनिटी, त्यांचा सिजिल थ्री हेडेड ड्रॅग्स्नचा पॅटर्न सतत दिसत आलाय पहिल्या सिझनपासून , मग ते मेलेले सांगाडे/प्राणी त्या आकारात मांडून ठेवणे असो, डॅगनस्टोन गुहेतले पॅटर्न्स असो, ते उंबरबॉय जळेपर्यन्त! शिवाय विंटरफेल मधल्या झाडाचा टॉप व्ह्यु सुध्दा तसाच असतो.
जेमी त्यासाठीच आला असावा, किंग स्लेयर आणि किंग आमने सामने !
सान्साचे ट्रान्सफॉर्मेशन मला
सान्साचे ट्रान्सफॉर्मेशन मला पण फारावडले. पण जेमीचे किंचितही कमी वाटले नाही तिच्यापुढे.
ती बदलते त्याला कारण तिला मिळणारी अनफेयर वागणूक्/अत्याचार त्यामुळे तिला आपण किती बावळट होतो ह्या सगळ्याला आधी भुललो होतो असं कहितरी..>>> +१
पूर्वीची डोक्यात जाणारी सान्सा अजून नजरेसमोरुन जात नाही हे कारण असेल पण मला ही सध्याची सान्सा फारशी प्रामाणिक नाही वाटत..रादर ती डेनेरिस इतकीच अथवा थोडी कमी घमेंडी वाटते. त्या लिटलफिंगरला मारायच्या आधीपर्यंत तर ती कायम त्याचा मोहराच वाटत राहते, त्यामुळे त्याला मारण्यामागे ब्रॅनने त्याची केलेली पोलखोल हेच कारण वाटते.
अजून एक म्हणजे त्या Battle of bastards' च्या वेळी लिटलफिंगरची फौज मागवलीये हे ती शेवटपर्यंत जॉनला सांगत नाही. परीणामी तो अपूर्या वाईल्डलिंग्सना घेवून लढतो व शेवट मरता मरता वाचतो. तेव्हापण अशीच शंका येत राहते की ही बया जॉन व इतर वाईल्ड्लिंग्सचा बळी जायची वाट पहात होती की काय?
ट्रांसफॉरमेशनचा विषय निघाला
ट्रांसफॉरमेशनचा विषय निघाला तर टिरियन लॅनिस्टरचा प्रवास अमेझिंग आहे - फ्लॅमबॉयंट ब्रॅट ते मुत्सद्दी राजकारण्या पर्यंत...
ट्रान्फॉर्मेशन किती झालं
ट्रान्फॉर्मेशन किती झालं माहिती नाही ,टिरियन जरी सुरवातीला कमी कॉन्फिडन्ट, थोडा रंगेल , वाइनप्रेमी वगैरे दाखवला असला तरी पहिल्यापासूनच मॅच्युर्ड , खूप पॉझिटिव कॅरॅक्टर आहे ! बोलून जिंकण्यात, डॉयलॉग्ज मधे नं.१ , ड्वार्फ असला तरी त्याचा आवाज मात्रं भारदस्तं आहे !
मला नेहेमी वाटतं कि हे लेखकाचं ते सर्वात क्लोज टु हार्ट कॅरॅक्टर आहे
गॉट मधे प्रत्येक सिझनला मिळालेले धक्के बघता आता या फायनल सिझनला टिरियनचं काही वेगळ रुप दिसेल का बघायचं !
तो दिनेरियसला सर्व्ह करत असला तरी जेमी किंवा सर्सीसाठी दगा देणार , असं वाटतय !
हाउस ऑफ अनडायिंग मधे दिनेरियसला ३ वेळा बिट्रेयल फेस करावं लागणार आहे असा उल्लेख होता , Once for blood, once for gold, and once for love.
अत्ता पर्यन्त सर जोराह आणि ड्रोगोला मारणार्या विचने तिला दगा दिलाय , आता थर्ड टाइम बहुदा टिरियनची टर्न किंवा अर्थात जॉनही देऊ शकतोच दगा !
टिरियन आणि आर्या स्टार्क या
टिरियन आणि आर्या स्टार्क या दोन व्यक्तिरेखा घटनांचे प्रमूख साक्षीदार आहेत. ते वेस्टरोस आणि एसोसच्या मुख्य ठिकाणी मोठ्या घटना घडताना बऱ्याच वेळा उपस्थित होते. त्यांचा प्रवासदेखील अनोखा आहे
डीजेचे नॉलेज ताजे आहे ३
डीजेचे नॉलेज ताजे आहे
३ वेळा बिट्रेयल लक्षात नव्हतं. तिला जॉन, दारिओ नहारिस हेही देऊ शकतात दगा.
सर्सीचा सर्वायवल प्लान आयर्न आयलंड्स किंवा एस्सोस असावा का ? (" दे" कॅन नॉट स्विम - हे माहित आहेच)
तरी पण हत्ती कशाला हवे होते कळले नाही. जेमी यावेळी त्यागापायी मरेल की काय असेही वाटते आहे! अर्थात त्याआधीच मॅड किंग ची मुलगी त्याला बेंड द नी च्या हट्टापायीच आल्या आल्या सस्त्यात मारू शकते!
गोल्डन कंपनी हे भाड्याने
गोल्डन कंपनी हे भाड्याने लढणारे लोक आहेत. जरी युरॉन त्यांना घेऊन आला असला तरी मोबदला सरसी देणार आहे. गोल्डन कंपनीच्या लिस्ट मध्ये पहिला आयटम २४ हत्ती आहेत मग २० हजार सैनिक आणि शस्त्रास्त्रे वगैरे. सरसी obv पैसे पुरेपूर वसूल करणारी व्यक्ती असल्यामुळे ती हत्ती का नाही आणले म्हणून चौकशी करते.
त्या युरॉनला पण मानला पाहिजे.
त्या युरॉनला पण मानला पाहिजे..

गोल्डन कंपनी आणली पण आपला हेका काही सोडला नाही राणी (सर्सी ) ला पटवलच
आफ्टर वॉर वगैरे बघू अस ती म्हणत होती पण हा काही हार मानायला तयार नाही
कदाचित त्याला जाणवल असेल जगू कि नाही तोपर्यंत
पहिल्याच भागात सांसा म्हणते
पहिल्याच भागात सांसा म्हणते की becoming a Queen is the only thing she ever wanted, ती finally राणी होईल बहुतेक.
मुलींना King's landing नेले नसते तर त्यांची एवढी दुर्दशा एवढ्या पटकन झाली नसती असं वाटलं.
मुलींना King's landing नेले
मुलींना King's landing नेले नसते तर त्यांची एवढी दुर्दशा एवढ्या पटकन झाली नसती असं वाटलं.>> त्या तिकडे गेल्या नसत्या तर घरात शिवण टिपण, भरतकाम करून आत्ता रॅमझीचे अत्याचार झेलत असत्या!
मुलींना King's landing नेले
मुलींना King's landing नेले नसते तर त्यांची एवढी दुर्दशा एवढ्या पटकन झाली नसती असं वाटलं.
<<
असं कसं, मग राम सुध्दा वनवासाला जायलाच नको होता
पोरी किंगज्लँडींगला गेल्या नसत्या तर गोष्टं कशी घडली असती आणि परिस्थितीचे चटके खात इतक्या कणखर कशा बनल्या असत्या !
सांसाला राणी करायचं तर टिरियन
सांसाला राणी करायचं तर टिरियन(च) नवरा राहणार का? तसंही त्याचंही लग्न झालं आहेच.
सांसाला राणी करायचं तर टिरियन
सांसाला राणी करायचं तर टिरियन(च) नवरा राहणार का? तसंही त्याचंही लग्न झालं आहेच. Wink. >>>>. मधल्या काळात मी त्यांचं लग्न झालेले विसरून गेले होते. या एपिसोडमध्ये दोघेही एकत्र पाहिल्यावर आठवलं.
मला डॅनी खूप आवडायची, पण सिझन 7 पासून डोक्यात जाते आहे. पूर्वीची ती आणि आताची गर्विष्ठ हसणारी ही, या दोघी एकच आहेत का एवढी वेगळी वाटते.
सॅन्साचा चेहरा कायमच रुसल्यासारखा दिसतो. आता तर डॅनीच्या अस्तित्वाने ती अजूनच परेशान आहे. पण तरीही तीच ट्रान्सफॉर्मेशन आवडलं. GOT मध्ये आवडते नावडतेची व्याख्या सारखी बदलते आहे, कारण कोणीही कॅरेक्टर पूर्ण चांगलं किंवा वाईट नाही. सगळ्यांना ग्रे शेड्स सुद्धा आहेत. म्हणूनच मला कितीतरी वेळा सर्सी सुद्धा आवडते.
सांसाला राणी करायचं तर टिरियन
सांसाला राणी करायचं तर टिरियन(च) नवरा राहणार का? >> मला नाही वाटत राहील कारण ते लग्न consummate न झाल्यामुळे आपोआप रद्दबातल झालं त्यानंतर तिचं रॅमझी बरोबर लग्न होऊन ते consummate झालं त्यामुळे तिचा सध्याचा स्टेटस रॅमझीची विडो असाच आहे.
पब्लिक,
पब्लिक,
शनिवार आला, कुठे आहात ?
गॉट बॉलिवुड कास्टींग विषय झाला का?
मी आणि मै नेहेमी बोलतो यावर, तिने मला २ रोल्स कन्व्हिन्स करून टाकले ऑलरेडी: सर्सी तब्बु आणि केके मेनन लिट्ल फिंगर
तब्बु इतकी लायक कोणी नाही सर्सी साठेर हे खरच पण माझी लिस्ट थोडी वेगळी आहे, कारण जेमी हा शाहरुखच हवा , म्हणून सर्सी बदलली !
खाल ड्रोगो : रणवीर सिंग (कोई शक ?)
दिनेरियस : आलिया
जेमी: शाहरुख
सर्सी: प्रियांका चोप्रा
ब्रिएनः काजोल
टिरियनः नवाझुद्दिन
शे: कल्की कोचिन किंवा राधिका आपटे
जॉफरी: इशान खट्टर
मार्जरी: जान्हवी कपुर
ओलेना : हेमा मालिनी
रेन्ली : सिध्दार्थ मल्होत्रा
लोरासः फवाद खान
लॉर्ड व्हॅरीसः ऋषी कपुर
लिट्ल फिंगरः अर्थात केके मेनन
नेड स्टार्कः जॅकी
कॅटलिनः अमृता सिंग
सान्सा: सारा अली खान
आर्या: झाहिरा वासिम (दंगल्/सिक्रेट सुपरस्टारची छोटी)
रॉब स्टार्कः टायगर श्रॉफ
तलिसा: श्रध्दा कपुर
जॉन स्नो: विकी कौशल
इग्रिटः परिणीती
थिऑन ग्रेजॉय : रणबिर कपुर
यारा: करीना
रेड वुमन :कंगना (कोई शक ?)
स्टॅनिस :सैफ
ब्रॉनः अक्षय कुमार
फेसलेस नो वन : ह्रितिक रोशन (कोई शक ?)
हाउंडःअजय देवगण
माउंटनः संजय दत्त
रॅमजी: जिम सर्भ
वाईल्ड फायर
वाईल्ड फायर
मॅड किंग ने किंग्ज लँडिंग मध्ये पूर्ण शहराखाली वाइल्ड फायरचे बॅरल भरून ठेवले आहेत.
त्याचा वापर १००% होणार आहे. पूर्ण शहर उध्वस्त करण्याची क्षमता असणाऱ्या बॅरल चा वापर कसा होणार ही उत्सुकता आहे
दीपांजली, सगळे रोल्स फिट्ट
दीपांजली, सगळे रोल्स फिट्ट बसताहेत!
गेम ऑफ जोन्स...
गेम ऑफ जोन्स...
https://indianexpress.com
https://indianexpress.com/photos/trending-gallery/what-if-bollywood-star...
हे इंडियन एक्स्प्रेस मध्ये आले होते 3 वर्षांपूर्वी
बिल्ड अप एपिसोड. गॅनार्या.
बिल्ड अप एपिसोड. गॅनार्या. !!!
सेर ब्रिआना
आता लढाई रे लढाई.
आधी पुस्तकं वाचून मग मालिका
आधी पुस्तकं वाचून मग मालिका बघायचं ठरवलं होतं. पण प्रत्येकी जवळपास १००० पानं बघून धडकी भरली, आणि पुढची पुस्तकं येतील की नाही शंकाच आहे. त्यामुळे मीदेखील मालिका बघायला सुरवात केली. आतापर्यंत सिझन १ भाग ५ पर्यंत बघून झालंय. एवढी हाईप का आहे ते मलातरी अद्याप समजलं नाही. मी गुंतले नाहीय पण कंटाळा आलाय असेदेखील नाही. त्यामुळे पुढे बघत राहीन. आर्या आणि टिरियन हे दोन कॅरेक्टरच आवडले आहेत. आणि दिसायला सुंदर सर्सी आहे <3
आज मला जेमी ब्रिएन सीन्स
आज मला जेमी ब्रिएन सीन्स आवडले !

त्या बोधीवृक्षापाशी जेमी ब्रॅन सीन पण आवडला आणि त्या आधी ‘द थिंग्ज वि डु फॉर लव्ह’ वाक्याचं टायमिंग
ब्रॅन पुन्हा गूढ वाटतोय, नाइटकिंग त्याच्यासाठी त्याला न्यायला येणार याबद्दल जे बोलतो ते !
जेमी टिरियन सीन्सही आवडले..
आर्या गेंड्री रोमान्स मात्रं बळेच टाकला, मला नाही आवडत ती पेअर, मुळात ७ सिझन्स नंतर आता आर्या मोठी झाली असली तरी लहान मुलगी म्हणूनच आठवते
सान्सा डॅनी सीन आवडला . सान्सा तिचे इन्टेन्शन्स ओळखून तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारते ‘व्हॉट अबाउट द नॉर्थ’ आवडलं !
पुढचा एपिसोड युध्द , ९० मिनिटांचा आहे म्हणे एपिसोड , अत्ता पासूनच अगदी धाकधुक होतेय !
डॅनीला सत्य कळलय, ती एक तर जॉनला मारायचा प्लॅन करणार किंवा स्वतः मरणार, टु मच गोइंग ऑन , कशी संपेल गोष्ट ४ भागात ?
गेम ऑफ थ्रोन्स पहिला सीजन
गेम ऑफ थ्रोन्स पहिला सीजन बघितला होता. इंटरेस्टिंग वाटलं म्हणून बुक्सहि घेतले... पण नंतर मार्टिनकाका विनाकारण थ्रेड वाढवत चाललेय बघून बोर झालं. सीजन ५ नन्तर तर विकिपीडिया वरच एपिसोडची समरी वाचून घेतो. (कोण खपलंय ते कळायला.)
आताही समरी वाचली. बॉलीवूड स्टाईल शेवट होणार असं दिसतंय.
सांसा मात्र खूपच सुंदर दिसते.
Pages