दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृष्णा कल्ले..... ओह. Sad
ज्या वेळेस हिंदीमधे लता मंगेशकर हे नाव व्हायचे होते, त्याही आधी व नंतरही, मराठीमधे जी अप्रतिम गीते लहानपणी ऐकायला मिळाली, व ती ज्यांच्याकडून ऐकायला मिळाली, त्यातिल कृष्णा कल्ले हे एक नाव. खूप वाईट वाटलय.

शाहीर साबळे >> शाळेत, आंतरशालेय नाटकांतून कामांसाठी मी अनेक बक्षिसे घेतली त्यांच्या हातून!!
भावपूर्ण श्रद्धांजली

शाहिरांना श्रद्धांजली. रासेदलाच्या कलापथकात फडफडणारी त्यांची हलगी आणि पहाडी आवाज कायम स्मरणात राहिल...

हनुमंत उपरे काका यांचं काल सकाळी देहावसान झालं. उपरेकाकांना भावपूर्ण श्रद्धांजली.

महाराष्ट्राचा अभिमान आणि लोककलेचा चालता बोलता एनसाय्क्लोपीडीया असलेले असलेले शाहीर साबळे यांनादेखील भावपूर्ण श्रद्धांजली.

शाहीर साबळे....

"...आठशे खिडक्या नवशे दारं
कुण्या वाटंनं बा गेली ती नार....."

~ आत्ताच पुन्हा ही पारंपारिक रचना ऐकली आणि एरव्ही शाहीरांचा हा ठसका ऐकताना डुलत होतो... आज फक्त ऐकतच राहिलो.....भावपूर्ण श्रद्धांजली.

फ्रान्समधे कोसळलेल्या विमानातील सर्व प्रवाशांना भावपुर्ण श्रद्धांजली.

Plane Crashes in Southern France, Nearly 150 On Board

आपल्या अभ्यासपूर्ण कॉमेन्ट्रीने क्रिकेट रसिकांना रेडिओ आणि टीव्हीशी बांधून ठेवणारे तसेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचे कप्तानपद भूषविलेले ज्येष्ठ खेळाडू रिची बेनॉ यांचे आज सकाळी निधन झाले. ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांच्या सन्मानार्थ शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.

चॅनेल ९ आणि रिची बेनॉ हे समीकरण फिट बसलं होतं डोळ्यात. त्यांचा खेळ नाही पाहू शकलो पण अत्यंत आत्मीयतेने खेळावरच्या प्रेमातून आलेले समालोचन ऐकून खूप बारकावे कळले.
आत्ताच मी फेबुवर छोटी श्रद्धांजली वाहिली त्यांना.
श्रद्धांजली.

रिची बेनॉ यांना श्रध्दांजली.

माझे आवडते समालोचक होते रिची बेनॉ. क्रिकेटमधील तांत्रिक बाबींची एवढ्या सुंदर पध्दतीने माहिती करून देत की ते एक प्रकारचे कोचिंगच असे.

डॉ यशवंत सुमंत यांचे निधन. पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक व पुरोगामी चळवळींचे वैचारिक आधारस्तंभ. अत्यंत संयत मांडणी करणारे डॉ सुमंत राज्यशास्त्रातील राजकीय प्रवाहा पेक्षा सामाजिक प्रवाह अधिक ठळकपणे मांडत.सामाजिक चळवळीतील तरुणांना वैचारिक भरकटण्यापासून वाचवणारे डॉ सुमंत यांना श्रद्धांजली.
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/dhavte-jag/yashwant-sumant/a...

एअर चीफ मार्शल (रिटायर्ड) हृषिकेश मुळगावकर यांचे (दोन दिवसांपूर्वी) निधन झाले. मृत्यूसमयी ते ९५ वर्षाचे होते.
बातमीची लिंकः http://www.loksatta.com/pune-news/funeral-rites-on-former-air-chief-mars...

माझ्याकरता, ज्यांच्या रोजच्या उठण्याबसण्याजगण्याचाही आदर्श ठेवावा, असे हे करारी, धाडसी, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व होते. तीसेक वर्षांपूर्वीच्या त्यांच्याबाबतच्या काही हृद्य आठवणी मनात दाटून आल्या.

नेपाळ आणि भारतात झालेल्या दुर्देवी भुकंपात, बळी पडलेल्या सर्व मृतांना श्रद्धांजली . Sad

Pages