दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरी गाडगीळाना त्यांच्या गुणांच्या मानाने संधी नाही मिळाली. त्यावेळी चमकवून घ्यायची संधी देणारी माध्यमं , शोज वगैरे नसल्याने संधी देणारांनाही टॅलेन्ट नजरेला येण्याची मारामारच होती....

चंद्रशेखर गाडगीळ यांना श्रद्धांजली.
"दु:ख सुखकी हर इक माला कुदरत ही पिरोती है"कुदरतच्या गाण्याने ते पुढे येतील असं वाटलं होतं.

शिव सेनेचे धडाडीचे शिलेदार , कल्याण डोंबिवलीचा सेनेचा आवाज -- शाबिर भाई शेख यांचे काल निधन झाले....
दुर्गाडीचे आंदोलन , मलंग गड चा विष्य, आणि कल्यान ग्रामिण ला सेनेचा धडाडीचा प्रचारक,
जो उभा भगव्या खाली तो माझा सैनिक असे अभिमानाने बाळासाहेब सांगत त्यांचेच उदाहरण देउन ....
७०-९० च्या सेना फळीतील सच्चा सैनिक...

शाबिर भाईंना भगवा सलाम
आणि आदरांजली...

पुणे विद्यार्थी ग्रुहा चे सर्वेसर्वा : श्री प भ कुलकर्णी सर याचे निधन ....
काय बोलावे लिहावे कळत नाही ...

श्रद्धांजली.

पाथर्डी तालुक्यात जावखेडे या गावी तिघा जणांची हात पाय, कंबर, पोट वेगवेगळे करून क्रूर हत्या. हे तिघेही भारतीय नागरीक होते. गावात कुणाशीही शत्रूत्व नव्हते. त्यांचा मुलगा मुंबईला डेअरी तंत्रज्ञान शिकण्यासाठी होता. दिवाळीला तो घरी आला होता. नरकचतुर्दशीला या तिघांचाही मृत्यू झाला. पोलिसांना आरोपी सापडत नाहीत,

बापरे !

मागच्या आठवड्यात गायक संजीव अभ्यंकरच्या मातोश्री डॉ. शोभा अभ्यंकर गेल्याच समजल होत.. पण न्युज वगैरेमधुन काही वाचण्यात आलेल नाही.. कुणाला माहीत असेल तर प्लीज लिहा इथे..

Pages