दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचं निधन. मृत्यूपश्चात त्यांनी अवयवदान केलं.

बातमी खरी आहे याची खात्री नव्हती म्हणून टाकली नव्हती इथे. दुर्दैवाने खरी ठरली Sad
श्रद्धांजली

ओह सकाळी पेपरमधे त्या हॉस्पिटलमधे अशी बातमी वाचली होती Sad , श्रध्दांजली !!

आई गं!! कविता करकरे.. खूपच दु:खद बातमी.. आता तरी त्यांना शांती मिळू दे!!
प्रकाश कौर नी पण जनमभर खूपच दु:ख् भोगलंय !!

दोन्ही वीर पत्नींना मनापासून श्रद्धांजली!! Sad

श्रीमती कविता करकरे यान्च्या मुली आणि मुलाने त्यान्चे अवयव दान केले - किडन्या, यक्रुत आणि डोळे.
वेगळी माणसे आहेत ही.....

मनापासून श्रद्धांजली!!

ही बातमी :
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/In-death-Karkares-wife-gi...

सकाळ आणि म. टा. मधे ही बातमी दिसली नाही.

आत्ताच लोकसत्ता मधिल वाईत बातमी वाचली "गुहागरमधील कासवमित्र विश्वास खरे यांची हत्या"

कासवमित्र विश्वास खरे याना श्रद्धांजली!!

मागिल वर्षी गुहागरला गेलो होतो तेव्हा खरे काकाच्या Resort मधे रहिलो होतो पन महिन नाहि ते हेच खरे का?

'निसर्गराजा ऐक सांगतो', 'कोण होतीस तू काय झालीस तू' या लोकप्रिय गीतांसह 'कुदरत' चित्रपटाच्या शीर्षक गीतामुळे रसिकांच्या मनात घर करून राहिलेले प्रसिद्ध पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ (वय ६७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रात्री दीडच्या सुमारास मुंबई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.
पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन Sad

चंद्रशेखर गाडगीळ यांची काहि मराठी गाणी:
http://www.aathavanitli-gani.com/Swar/Chandrashekhar_Gadgil

हि बातमी समजली तेंव्हा नवरात्रीच्या मंडपात त्यांनीच गायलेल "अशांती" चित्रपटातील "शक्ती दे मा..." गाणं चालु होतं Sad
https://www.youtube.com/watch?v=-sh6BQkWCqc

श्रद्धांजली Sad

अरेरे वाईट बातमी.. एक अतिशय ओरिजीनल आणि रांगड्या आवाजाचे गायक म्हणून ते कायम लक्षात राहतील. त्यांची "निसर्गराजा ऐक सांगते" आणि "कोण होतीस तू काय झालीस तू" ही गाणी अजरामर आहेत. मनःपूर्वक श्रद्धांजली. Sad

ओह... अरेरे...
अष्टविनायका तुझा महिमा कसा हे सुद्धा त्यांचच होतं ना?
चांगला गायक असणं आणि तशी कामगीरी करण्याची संधी मिळणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.

Pages