प्रसाद - केशर बदाम पेढे / मोदक

Submitted by लाजो on 7 August, 2013 - 09:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आजपासुन श्रावण सुरू... म्हणजे एकामागे एक सणासुदींचे दिवस....म्हणजेच गोडधोड-प्रसाद यांची रेलचेल....

श्रावणाची सुरूवात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या पेढ्यांपासुन Happy

लागणारे जिन्नसः

२ कप मिल्क पावडर,
१ कप बदामाची पावडर,
२५०मिली क्रिम *
१ टीन कंडेन्स्ड मिल्क (३९५ ग्रॅम च टीन मिळतो इथे),
वेलची पूड / केशर / इतर स्वाद आवडीनुसार,
सजावटीसाठी बदाम्/पिस्ते काप इ इ आवडीनुसार.

क्रमवार पाककृती: 

हे पेढे / मोदक करायला अगदी सोप्पे पण चवीला एकदम झक्कास Happy

१. एका मायक्रोवेव्ह सेफ बोल मधे मिल्क पावडर आणि बदाम पावडर मिक्स करा.
२. यात आता कंडेन्स्ड मिल्क घाला आणि मिश्रण सारखे करा.
३. या मिश्रणात थिकन्ड क्रिम आणि आवडीनुसार वेलची/केशर इ इ घालुन नीट ढवळा. अजिबात गुठळ्या रहाता कामा नयेत.
४. मिश्रण हाय पॉवर वर मावे मधे २ मिनीटे गरम करा. बाहेर काढुन एकदा सारखे करा आणि परत मावे मधे २ मिनीटे ठेवा.
५. अश्या प्रकारे साधारण ८ मिनीटे मिश्रण मावे मधे गरम करा. आता बाहेर काढुन कन्सिस्टंसी चेक करा. आणि परत १-१-१ मिनीटाच्या अंतराने मावेमधे गरम करा.
६. साधारण १०-११ मिनीटात मिश्रण एकत्र यायला लागले की बाहेर काढा.
७. हाताला (आणि साचा वापरणार असाल तर साच्याला) तूप लावा आणि आपल्या आवडीनुसार पेढे वळा. वरती हवे असल्यास पिस्ता/बदाम काप इ इ ने सजवा.

प्लेन मोदकः

आंबा पेढे:

पिस्ता पेढे:

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात मध्यम आकाराचे ३० एक पेढे सहज होतात
अधिक टिपा: 

१. मावेमधे लागणारा वेळ हा घेतलेले प्रमाण/घटक आणि तुमच्या मावेची पॉवर यावर अवलंबुन आहे. माझ्या ११००W च्या मावेमधे वरील घटक आणि प्रमाणासाठी १०-११ मिनीटे लागतात.
२. मिश्रण जास्त वेळ मावे मधे गरम करु नये... कोरडे पडेल.
३. मिश्रण कोरडे वाटलेच तर थोडे तूप लावुन मळून घ्या.
४. यात बदामा ऐवजी काजू/पिस्ता पावडर घालु शकता. मी केलेल्या पिस्ता पेढ्यांमधे ५०-५० बदाम-पिस्ता पावडर आहे.
५. आंबा पेढा/मोदक बनवायचे असल्यास आंब्याचा रस न घालता आंब्याचा मावा/आटवलेला रस घाला.
६. डेकोरेशन करताना मोल्डच्या तळाला काप घालुन त्यावर पेढ्याचे मिश्रण दाबुन भरा आणि मग मोल्ड किंचित टॅप करुन पेढा बाहेर काढा.
*७. थिकन्ड क्रिम, साधे फ्रेश क्रिम किंवा साय फेटुन वापरता येइल पण प्रमाण अंदाजाने कमी/जास्त करावे लागेल.
८. मिल्क पावडर लो फॅट/ फुल्ल फॅट कुठलिही चालेल. मी फुल्ल फॅट वापरली आहे.
९. हे पेढे मावे नसल्यास गॅसवर पण करता येतिल.
१०. ट्रे ला तूपाचा हात लावुन त्यात थापुन याचे काप करून बर्फी पण बनवता येते.

हे पेढे फ्रिजमधे ठेवल्यास बरेच दिवस टिकतात.

पुढच्यावेळेस करताना स्टेप बाय स्टेप फोटो काढेन Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो, कसले मस्त दिसतायत पेढे.. Happy
नक्कीच करुन बघेन. पिस्ता पेढे करायला पिस्ते आणि खायचा रंग वापरला आहे का?

लाजोडी!!!!! किती सुंदर्,सुबक..वाह!!!!!

चव तर चक्क फोटोतून इथे जिभे पर्यंत पोचतीये...जियो लाजो!!

{लागणारे जिन्नसः
२ कप फुल्ल फॅट मिल्क पावडर,
१ कप बदामाची पावडर,
२५०मिली थिकन्ड क्रिम,
१ टीन कंडेन्स्ड मिल्क,
वेलची पूड / केशर / इतर स्वाद आवडीनुसार,
सजावटीसाठी बदाम्/पिस्ते काप इ इ आवडीनुसार.} no sugar?

no sugar? >> कंडेन्स्ड मिल्क गोड असते Happy

जो ही रेसिपी तुच कुठेतरी लिहीली होतीस का? मस्तच आहेत सगळे फोटो.

पण खरं सांग.. नक्की खाण्यासाठीच आहेत ना? नाहीतर ते गेल्या वेळच्या गणपतीतल्या स्पर्धेसारखे असायचे साबणाचे Wink

धन्यवाद मंडळी Happy

आज सकाळपासुन अत्ता वेळ मिळाला बघायला तर एकदम ४९ प्रतिक्रिया बघुन छान वाटलं Happy (जरा धस्स पण झालं.. Proud )

हे पेढे अति गोड, अति तुपकट किंवा अति दुधाळ लागत नाहित. आपल्या आवडीनुसार फ्लेवर्स बदलता येतात. मी गुलकंद घालुन गुलाब पेढे, संत्र्याचे मार्मलेड घालुन संत्रा पेढे, स्ट्रॉबेरी क्रश घालुन स्ट्रॉबेरी पेढे आणि केशर+पिस्ता+प्लेन असे तिरंगी मोदक केले आहेत. चॉकलेट मला मिठाईत आवडत नाही त्यामुळे ते ट्राय केलेले नाही... कुणीतरी करा आणि फोटो टाका Happy

हे पेढे मलाई बर्फीसारखे नाही म्हणता येणार कारण यात बटर नाही आणि चवही थोडी वेगळी.. जास्त पेढ्यासारखी असते.

यात अ‍ॅडिशनल साखर घालायची गरज नाही. कंडेन्स्ड मिल्क मुळे पुरेसा गोडवा येतो Happy

मोदकाचा आणि पेढ्याचा (मुदाळं) साचा भारतातुन आणलाय... पण पहिल्या फोटोतले पेढे छोट्या ताटलीत केले आहेत.

वर्षा_म<<<ही रेसिपी मी आधी कुठे टाकल्याचे मलाच आठवत नाही Uhoh

परत एकदा सगळ्यांना थँक्यु Happy

कधीही या घरी पेढे खायला Happy

लाजो ........सुंदर सुबक आणि चविष्टही(मनातल्या मनात चव घेतली सुद्धा)!
गणपती बाप्पा मोरया!

लाजो दाय नेम इज क्रिएटिव्हिटी.:स्मित: बाप्पा लवकर पावु देत आणी लाजोला मनासारखे सगळे मिळु दे.

सगळेच खावेसे वाटतायत. आणी मांडणी वगैरे सगळे एकदम सुबक्.:स्मित:

लाजो............... मला आत्ताच्या आत्ता ते पहिल्या फोटोतलं पेढ्यांचं ताट हवंय. कधी एकदा फस्त करतेय असं झालंय.
तुम धन्य हो लाजो जी Happy

>>हे पेढे अति गोड, अति तुपकट किंवा अति दुधाळ लागत नाहित<<
असे कसे शक्य आहे? फुल्ल फॅट मिल्क पावडर, थिकन्ड क्रीम असल्यावर (बटर सारखेच काम करते ना क्रीम) दूधाळ व बटरी होवून हेवी होतातच ना.

मी असेच पेढे नेटवरची सेम एक रेसीपी वाचून करायची आधी पण मला खूपच गोड,हेवी वाटायचे कनडेन्स्ड मिल्क व थिकन्ड क्रीम ने, आता साखर व फक्त विप क्रीम वापरून करते.
(दोन्हीच्या लिंक मिळाली तर देते इथे) Happy

Pages