आजपासुन श्रावण सुरू... म्हणजे एकामागे एक सणासुदींचे दिवस....म्हणजेच गोडधोड-प्रसाद यांची रेलचेल....
श्रावणाची सुरूवात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या पेढ्यांपासुन
लागणारे जिन्नसः
२ कप मिल्क पावडर,
१ कप बदामाची पावडर,
२५०मिली क्रिम *
१ टीन कंडेन्स्ड मिल्क (३९५ ग्रॅम च टीन मिळतो इथे),
वेलची पूड / केशर / इतर स्वाद आवडीनुसार,
सजावटीसाठी बदाम्/पिस्ते काप इ इ आवडीनुसार.
हे पेढे / मोदक करायला अगदी सोप्पे पण चवीला एकदम झक्कास
१. एका मायक्रोवेव्ह सेफ बोल मधे मिल्क पावडर आणि बदाम पावडर मिक्स करा.
२. यात आता कंडेन्स्ड मिल्क घाला आणि मिश्रण सारखे करा.
३. या मिश्रणात थिकन्ड क्रिम आणि आवडीनुसार वेलची/केशर इ इ घालुन नीट ढवळा. अजिबात गुठळ्या रहाता कामा नयेत.
४. मिश्रण हाय पॉवर वर मावे मधे २ मिनीटे गरम करा. बाहेर काढुन एकदा सारखे करा आणि परत मावे मधे २ मिनीटे ठेवा.
५. अश्या प्रकारे साधारण ८ मिनीटे मिश्रण मावे मधे गरम करा. आता बाहेर काढुन कन्सिस्टंसी चेक करा. आणि परत १-१-१ मिनीटाच्या अंतराने मावेमधे गरम करा.
६. साधारण १०-११ मिनीटात मिश्रण एकत्र यायला लागले की बाहेर काढा.
७. हाताला (आणि साचा वापरणार असाल तर साच्याला) तूप लावा आणि आपल्या आवडीनुसार पेढे वळा. वरती हवे असल्यास पिस्ता/बदाम काप इ इ ने सजवा.
प्लेन मोदकः
आंबा पेढे:
पिस्ता पेढे:
१. मावेमधे लागणारा वेळ हा घेतलेले प्रमाण/घटक आणि तुमच्या मावेची पॉवर यावर अवलंबुन आहे. माझ्या ११००W च्या मावेमधे वरील घटक आणि प्रमाणासाठी १०-११ मिनीटे लागतात.
२. मिश्रण जास्त वेळ मावे मधे गरम करु नये... कोरडे पडेल.
३. मिश्रण कोरडे वाटलेच तर थोडे तूप लावुन मळून घ्या.
४. यात बदामा ऐवजी काजू/पिस्ता पावडर घालु शकता. मी केलेल्या पिस्ता पेढ्यांमधे ५०-५० बदाम-पिस्ता पावडर आहे.
५. आंबा पेढा/मोदक बनवायचे असल्यास आंब्याचा रस न घालता आंब्याचा मावा/आटवलेला रस घाला.
६. डेकोरेशन करताना मोल्डच्या तळाला काप घालुन त्यावर पेढ्याचे मिश्रण दाबुन भरा आणि मग मोल्ड किंचित टॅप करुन पेढा बाहेर काढा.
*७. थिकन्ड क्रिम, साधे फ्रेश क्रिम किंवा साय फेटुन वापरता येइल पण प्रमाण अंदाजाने कमी/जास्त करावे लागेल.
८. मिल्क पावडर लो फॅट/ फुल्ल फॅट कुठलिही चालेल. मी फुल्ल फॅट वापरली आहे.
९. हे पेढे मावे नसल्यास गॅसवर पण करता येतिल.
१०. ट्रे ला तूपाचा हात लावुन त्यात थापुन याचे काप करून बर्फी पण बनवता येते.
हे पेढे फ्रिजमधे ठेवल्यास बरेच दिवस टिकतात.
पुढच्यावेळेस करताना स्टेप बाय स्टेप फोटो काढेन
जबरदस्त फोटो!!!
जबरदस्त फोटो!!!
मस्तं !!!
मस्तं !!!
खरंच तुम्हाला _/\_ लाजो. किती
खरंच तुम्हाला _/\_ लाजो. किती सुंदर केलेत तुम्ही पेढे आणि लिहिलंयपण छान.
लाजोजी कसले भारी पेढे आहेत ,
लाजोजी कसले भारी पेढे आहेत , आता किमान पेढे खाण्यासाठी तरी ऑस्ट्रेलियाला यावचं लागेल.
लाजो, कसले मस्त दिसतायत
लाजो, कसले मस्त दिसतायत पेढे..
नक्कीच करुन बघेन. पिस्ता पेढे करायला पिस्ते आणि खायचा रंग वापरला आहे का?
यम्मी! कसले दिस्ताय गं..
यम्मी! कसले दिस्ताय गं.. मस्त.
खुपच छान. मोदकाचा आणि
खुपच छान. मोदकाचा आणि पेढ्यांचा साचा भारतातून आणला का कि तिथे मिळाला?
सहीच!
सहीच!
खुपच छान ......... नक्की
खुपच छान ......... नक्की करणार.
लाजो, श्रावणाची सुरुवात मस्त
लाजो, श्रावणाची सुरुवात मस्त झाली. छान आहे रेसिपी.
तो.पा.सु.
तो.पा.सु.
तो.पा.सु.<<+११११
तो.पा.सु.<<+११११
मस्त रेखीव दिसत आहेत पेढे
मस्त रेखीव दिसत आहेत पेढे
देवा, हा लाजोने दिलेला प्रसाद
देवा,
हा लाजोने दिलेला प्रसाद खाउन खुश हो आणि मला तिचा शेजारी बनव प्लीज प्लीज...
वॉव, कसले भारी दिसताहेत.
वॉव, कसले भारी दिसताहेत.
फार भारी. तुझ्या हातचे पदार्थ
फार भारी. तुझ्या हातचे पदार्थ ज्यांना खायला मिळतात ते भाग्यवान
लाजोडी!!!!! किती
लाजोडी!!!!! किती सुंदर्,सुबक..वाह!!!!!
चव तर चक्क फोटोतून इथे जिभे पर्यंत पोचतीये...जियो लाजो!!
{लागणारे जिन्नसः २ कप फुल्ल
{लागणारे जिन्नसः
२ कप फुल्ल फॅट मिल्क पावडर,
१ कप बदामाची पावडर,
२५०मिली थिकन्ड क्रिम,
१ टीन कंडेन्स्ड मिल्क,
वेलची पूड / केशर / इतर स्वाद आवडीनुसार,
सजावटीसाठी बदाम्/पिस्ते काप इ इ आवडीनुसार.} no sugar?
no sugar? >> कंडेन्स्ड मिल्क
no sugar? >> कंडेन्स्ड मिल्क गोड असते
जो ही रेसिपी तुच कुठेतरी लिहीली होतीस का? मस्तच आहेत सगळे फोटो.
पण खरं सांग.. नक्की खाण्यासाठीच आहेत ना? नाहीतर ते गेल्या वेळच्या गणपतीतल्या स्पर्धेसारखे असायचे साबणाचे
धन्यवाद मंडळी आज सकाळपासुन
धन्यवाद मंडळी
आज सकाळपासुन अत्ता वेळ मिळाला बघायला तर एकदम ४९ प्रतिक्रिया बघुन छान वाटलं (जरा धस्स पण झालं.. )
हे पेढे अति गोड, अति तुपकट किंवा अति दुधाळ लागत नाहित. आपल्या आवडीनुसार फ्लेवर्स बदलता येतात. मी गुलकंद घालुन गुलाब पेढे, संत्र्याचे मार्मलेड घालुन संत्रा पेढे, स्ट्रॉबेरी क्रश घालुन स्ट्रॉबेरी पेढे आणि केशर+पिस्ता+प्लेन असे तिरंगी मोदक केले आहेत. चॉकलेट मला मिठाईत आवडत नाही त्यामुळे ते ट्राय केलेले नाही... कुणीतरी करा आणि फोटो टाका
हे पेढे मलाई बर्फीसारखे नाही म्हणता येणार कारण यात बटर नाही आणि चवही थोडी वेगळी.. जास्त पेढ्यासारखी असते.
यात अॅडिशनल साखर घालायची गरज नाही. कंडेन्स्ड मिल्क मुळे पुरेसा गोडवा येतो
मोदकाचा आणि पेढ्याचा (मुदाळं) साचा भारतातुन आणलाय... पण पहिल्या फोटोतले पेढे छोट्या ताटलीत केले आहेत.
वर्षा_म<<<ही रेसिपी मी आधी कुठे टाकल्याचे मलाच आठवत नाही
परत एकदा सगळ्यांना थँक्यु
कधीही या घरी पेढे खायला
ही रेसिपी मी आधी कुठे
ही रेसिपी मी आधी कुठे टाकल्याचे मलाच आठवत नाही >> घे तुझ्या मेमरीची रिफ्रेश की प्रेस करते
http://www.maayboli.com/node/6425?page=2
एव्हाण समोर असते तर गट्टम
एव्हाण समोर असते तर गट्टम केले असते !
हा लाजोने दिलेला प्रसाद खाउन
हा लाजोने दिलेला प्रसाद खाउन खुश हो आणि मला तिचा शेजारी बनव प्लीज प्लीज...>>>> +१००००००
लाजो ........सुंदर सुबक आणि
लाजो ........सुंदर सुबक आणि चविष्टही(मनातल्या मनात चव घेतली सुद्धा)!
गणपती बाप्पा मोरया!
मस्त
मस्त
सुंदर दिसताहेत पेढे-मोदक.
सुंदर दिसताहेत पेढे-मोदक.
थिकन्ड क्रिम म्हणजे इकडे भारतात दुधावरची घट्ट साय घेऊन चालेल का?
लाजो दाय नेम इज
लाजो दाय नेम इज क्रिएटिव्हिटी.:स्मित: बाप्पा लवकर पावु देत आणी लाजोला मनासारखे सगळे मिळु दे.
सगळेच खावेसे वाटतायत. आणी मांडणी वगैरे सगळे एकदम सुबक्.:स्मित:
कातिल फोटो
कातिल फोटो
लाजो............... मला
लाजो............... मला आत्ताच्या आत्ता ते पहिल्या फोटोतलं पेढ्यांचं ताट हवंय. कधी एकदा फस्त करतेय असं झालंय.
तुम धन्य हो लाजो जी
>>हे पेढे अति गोड, अति तुपकट
>>हे पेढे अति गोड, अति तुपकट किंवा अति दुधाळ लागत नाहित<<
असे कसे शक्य आहे? फुल्ल फॅट मिल्क पावडर, थिकन्ड क्रीम असल्यावर (बटर सारखेच काम करते ना क्रीम) दूधाळ व बटरी होवून हेवी होतातच ना.
मी असेच पेढे नेटवरची सेम एक रेसीपी वाचून करायची आधी पण मला खूपच गोड,हेवी वाटायचे कनडेन्स्ड मिल्क व थिकन्ड क्रीम ने, आता साखर व फक्त विप क्रीम वापरून करते.
(दोन्हीच्या लिंक मिळाली तर देते इथे)
Pages