मलई बर्फी

Submitted by सायो on 15 March, 2009 - 13:07
malai burfi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.

क्रमवार पाककृती: 

मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्‍या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२,१३ वड्या.
अधिक टिपा: 

इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वीकेंडला करून पाहिली. फार म्हणजे फारच सुरेख झाली होती.
सायो, अनेक धन्यवाद! मृण, तुला पण ग. Happy

या रेसिपीतली बर्फी बिघडवण्याचा अतुलनीय पराक्रम अजून कुणी केलेला दिसत नाही,

(मी केलाय. अजून फ्रीझरमधे ठेवलिये. घट्ट होतच नाहीये. :फिदी:)
--------------
नंदिनी
--------------

हीही, नंदिनी फ्रिजर सोड पण फ्रिजमध्ये ठेवायचीही काही गरज नाही. बाहेर ठेवलीस तरीही जरा कडक होते. जर फ्रिजला टाकली तर त्यातलं तूप/बटर गोठेल आणि खायच्या आधी गरम करावी लागेल.

अगं, घट्ट होत नाहीय तर रबडी समजुन खा नं..... हाकानाका...... Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

घट्ट न होणारी बर्फी, जरा हाताने मळुन घे, त्यात थोडासा भाजलेला बारीक रवा घाल, जस्ट थोडस घट्ट होण्यासाठी आणि मस्तपैकी साटोर्‍या कर. झक्कास होतात... स्वानुभव Happy

घट्ट होत नाहीय तर रबडी समजुन खा नं> तेच चाललय.

लाजो, आता अजून काही प्रकार करायची हिम्मत होत नाहिये.
--------------
नंदिनी
--------------

मला मदत हवी आहे. मी ही मलई बर्फी केली. वर दिलेल्या स्टेप्स प्रमाणे सर्व केले. चव चांगली होती पण ती मलई बर्फी सारखी न होता कलाकंदा सारखी झाली. आणी वर असलेल्या फोटोज सारखी पांढरी शुभ्र न होता कलाकंदासारखी दिसत होती. काय चूकले असेल? मी वर दिले आहे तेवढा वेळच मायक्रोवेव्ह केले होते.

कोणती पावडर घातली होतीस ह्यावरही रंग अवलंबून आहे. मैत्रिणीने माझ्याकरता जी मलई बर्फी बनवून आणली होती ती रंगाने अगदी फिकट पिवळी होती. ऑफव्हाईट म्हणता येईल अशी. मी केली ती अगदी पिवळट रंगाकडे झुकणारी होती. कारण मी वापरलेली पावडर मिल्क-खवा पावडर होती.

माझी पण कलाकंदासारखीच झाली होती, मिल्क पावडर दाणे दाणे होती माझी.

आज प्रसादाला म्हणून ही बर्फी केली आणि बिघडली Sad
१)मायक्रोवेव्ह मधे सगळीकडे मिश्रण उडले.तो आत साफ करायचे मोठे काम आहे.
२)खूप चिकट झाला आहे तो प्रकार.खाताना तोंडाला आत चिकटत आहे.
३)पांढरी शुभ्र न होता कलाकंदासारखी दिसत आहे.

मी कालच बर्फी केली पण माझीही बर्फी खाताना चिक्कीसारखी चिकटतेय तोंडाला Proud
सहसा पदार्थ चुकत नाहीत इथले.. केक वगैरे छान झाले होते...

काय चुकले असावे कोणी मार्गदर्शन करेल काय?? अमुल मिठाईमेटचा एक डब्बा (४०० ग्र असतो बहुतेक), २०० ग्र मिल्क पावडर आणि तिन चमचे तुप वापरले होते.

मलई बर्फी करताना त्यात क्रीम पण घालावे. १ टीन कन्डेन्स्ड मिल्क असेल तर अडिच कप (साधारण २०० ग्रॅम) मिल्क पावडर आणि २५० मिली थिकन्ड क्रीम घालावे. मायक्रो मधे अडिच मिनीटाच्या इंटर्व्हल्स मधे साधारण १२ मिनीटे ठेवावे. प्रत्येक अडिच मिनीटांनी बाहेर काढुन नीट ढवळावे. शेवटी सगळे मिश्रण एकत्र येऊन गोळा तयार होतो...

हे पहा माझे याच पद्धतीने केलेले मावा मोदक...

Copy of IMG_1149.JPG

एमबी जपान- तू सगळं सामान बरोबर वापरलं होतंस ना? मग खरंतर असं व्हायला नको. मी आत्तापर्यंत ३,४ वेळेला केलीय पण कधी बिघडली नाहीय.
अ‍ॅशबेबी, तुला तिथल्या वस्तूंचं प्रमाण तिथे रहाणारं कुणीतरी नीट सांगू शकेल माझ्यापेक्षा.

मी परत एकदा करुन बघते. ते घोटायचे पण राहुन गेले माझे. खुप घाईघाईत केली ना. लेक तशीच घेऊन गेली शाळेत. तिला आवडली...

घेतले होते सगळे नीट.पण आता अजून एकदा करून पाहीन.आता बिघडली तर कानाला खडा.
मायक्रोवव्ह चे वेळाचे गणित नीट जमले पाहिजे.
लाजो अडीच कप म्हणजे २०० ग्रॅम कसे काय?
इकडे तरी १ कप = २०० ग्रॅम असे प्रमाण आहे
मला जरा ग्रॅम /मिली मधे कोणी सगळे प्रमाण सांगेल का?

भारतात जो कन्डेन्स्ड मिल्कचा डबा मिळतो तो ४०० ग्रॅमचा असतो.
४०० ग्रॅम = 14 oz.
तर २२८ ग्रॅम = 8 oz. होइल.

मी केल्या तर माझ्याही घट्ट न होता कलाकंद सारख्या झाल्या. (सुधारण्यासाठी त्यात कन्डेन्सड मिल्क जास्त झाले असे वाटुन आणखी मिल्क पावडर घातली तर घट्ट झाल्या पण चिकट गोळ्या सारख्या.)
आता पुन्हा करीन तेव्हा मायक्रोवेवच्या तापमानात बदल करून बघणार आहे.

mbjapan, मी घरी जाऊन नीट मेजर करुन सांगते नक्की काय प्रमाण ते. अगदी वजनच करुन सांगते Happy १-२ दिवसात चालेल ना? लग्गेच घाई असेल तर सांग. आज रात्रीच टाकेन.

नाही गं अजिबात घाई नाहिये..आधीच्या बर्फीला रावळगाव म्हणत अजून संपवणे चालू आहे.

माझीही रावळगाव टॉफी लागत होती. आणि टाळ्याला चिकटलेली बर्फी चोखताना मस्त फाईव स्टार खाल्ल्याचा आनंदही मिळत होता.. Happy

पण पुढच्या वेळेस मात्र बर्फीच होईल याची काळजी घेईन.. हे असे केला गणपती, झाला मारुती चालणार नाही दर वेळेस.. Proud

हाय टेम्परेचर वर कन्डेन्स्ड मिल्कचे कुठलेही पदार्थ असेच चिकट गोळे होतात. एक सोपी आयडीया म्हणजे आधी कन्डेन्ड मिल्क टाकून मस्त क्रम्स बनवले व लो टेम्पला मोजून २ मिनीटे झाकणाने झाकून ठेवून बाहेर काढून फक्त एकदाच एकाच दिशेने फिरवून आत ठेवायचे. आता नुसता वर एक ओला पेपरटॉवेल ठेवून ठेवा २ मिनीटे आत. मग पुन्हा एकदा एकाच दिशेने ढवळून पेपर टॉवेल ठेवून १मिनीटे. ज्यास्त वेळा ढवळाढवळ न करता ही मस्त होते. कधीच बिघडली नाही अजून तरी.
नो चिकट, नो तूपकट. तूपही कमीच टाकायचे मग पाक होतो कन्डेन्ड मिल्कच्या साखरेने.
हे असे चमत्कार न करता ही होते पण होवु नये म्हणून हे प्रयत्न. Happy
(नोटः मायक्रोवेवची पॉवर देशात वेगळी आहे वाटते. )

एक केमीस्ट्रीचा प्रयोग म्हणून साखर ,दूध व तूप एकदम हाय टेम्पला अचानक ठेवून बघा, मग पुन्हा साखर्,पुन्हा दूध टाकून उकळून बघा. बोट चिकटून बसतील. तेच चुकतेय ही वडी बनवताना. वडी चिकट होणारच. Wink

सायो,
वरच्या रेसिपी मधे मायक्रो च टेम्प. सेटिंग काय ठेवाव हे सांगाल का प्लीज?
मी मिडीयम वर ठेवल होत. अत्ता तासभर झाला अजुन वड्या घट्टच होत नाहीयेत.
अजुन थोडा वेळ वाट पाहीली तर आशेला वाव आहे का?
अजुन १ शेवटची स्टेप करताना त्या १ मिनीटात मिश्रण फसफसुन बाउलबाहेर आल.
माझ काय चुकल सांगा प्लीज.

थोड्या वेळ बाहेर ठेवुन गार होउदेत मिश्रण. मी मँगो पल्प घालुन केल्या होत्या तेव्हा असेच जरा सैल राहिले होते. साधारण कोमट झाले की थापून वड्या पाड नाहीतर पेढे/मोदक कर.

अगदी पातळ असेल तर कदाचित बटर जास्त झालं असावं. माझ्या मायक्रोवेव्हचं टेंप. मी हाय/लो वगैरे चेंज करत नाही. शेवटच्या स्टेपला मिश्रण साधारण तरी घट्ट असावं. म्हणजे वड्या थापता येतील. पण सिंडी म्हणतेय तसं जरा गार होऊ देत मग बघ मिश्रण आळतंय का ते. जरा पातळ असेल तरीही वड्या थाप. हवेने जरा घट्ट होतील.

सायो आणि सिंडी,
लगेच रिप्लाय केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
तुम्ही सांगितल तसच झाल.
ईथे पोस्ट करुन मी मैत्रीणीकडे जाउन आले आणि मग बघितल तर जाताना
होतं त्यापेक्षा मिश्रण बरेच आळले. आता त्याचे पेढे वळले.चवही छान झालीय.
माझा मुलगा तर सारखा मटकावतोय.
पुढच्या वेळी काय सुधारणा करु म्हणजे वरच्या फोटोतल्यासारख्या वड्या होतील?

सायो, आज करुन पाहिली बर्फी या कृतीने. मस्त झाली. जसेच्या तसे प्रमाण घेऊन व्यवस्थित वड्या पडल्या..
ही बघा अशी झाली...malaee_barfi.jpg

fat free condensd milk ani full fat (normal) milk powder waprale tar chalela ka? mala normal milk powder milali aahe.

Pages