निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पक्षी एका ठिकाणी घरटे करतात तेव्हा, पिल्लांची सुरक्षितता आणि त्यांच्या चारापाण्याची मुबलकता हे महत्वाचे निकष असतात.
सुरक्षितता बघताना त्या घरातील माणसे आणि पाळीव प्राणी यांचा पण विचार केलेला असतो Happy

शशांक / शांकलीच्या घरी गेल्यावर हे चांगलेच जाणवले. त्यांच्या शेजार्‍यांकडे अनेक पक्षी घरटे करतात पण
शशांकच्या घरी नाही, कारण शांकलीच्या मांजरी !!!

एक प्रश्न पडलय कुठे विचारु सुचत नव्हते म्हणून इकडे विचारतेय..
मी तुळशीचे रोप २-३ वेळा आणले पण सध्या उन्हाळ्यामुळे की कशामुळे कळत नाही पण ती सुकतेय आणि जगत नाहीये Sad .. मी कशी निगा राखू तुळशीची ?? प्लिझ मदत करा.

.. मी कशी निगा राखू तुळशीची ?? - तुम्ही तुळस बाल्कनीत ठेवली असेल तर ऊन्हापासुन बचाव करण्यासाठी थोडा आडोसा तयार करा.
आमच्याकडे आहेत तुळशीची लहान/मोठी रोपे. पुढच्या आठवड्यात या आणि घेऊन जा.

घरट्याची स्टेप बाय स्टेप कृती Happy
काही पक्षी तर नुसत्या आपल्या लाळेने घरे बांधतात आणि नेमकी तीच काही रसिकांना, बर्ड नेस्ट सूपसाठी हवी असतात. थायलंड सारख्या देशांत याचा व्यापार सर्रास चालतो. आपल्याकडे पण वेंगुर्ला जवळच्या एका बेटावर अशी घरटी असतात पण त्यांना संरक्षण मिळाले आहे.

किशोर मुंढे
मस्तच!
२ दिवस झाले. चिमणाचिमणीची जोडीचे फ्लॅट सिलेक्शन चाललेय.पण अजून पसंत नाही.ती पाखरे कारलीच्या
वाळक्या काड्या तोडतात तर कबुतर मुळापासून वेल तोडण्यात दंग आहे.

किशोर, अप्रतिम फोटो! एवढं सगळं नुसत्या चोचीच्या सहाय्याने बांधायचं म्हणजे केवढी मेहनत आहे! आपल्याला आयुष्यात एकदा बिल्डरकडून फ्लॅट बांधून घेऊन थकायला होतं! Wink

किशोर, काय लिहावे ते सुचत नाहीये.--- थक्क झालेय......+१०० अगदी नि:शब्द.
घर कसे रेखीव बांधले आहे. बाहेरून आत बांधकाम दिसते आहे. पिलांची खोली बाहेरून बंद. किती हा समंजसपणा.
सगळ्यांनाच सलाम... बांधकाम कारागिरांना आणि ईतक्या चिकाटीने फोटो काढणार्‍या तुम्हाला सुद्धा.

<<सगळ्यांनाच सलाम... बांधकाम कारागिरांना आणि ईतक्या चिकाटीने फोटो काढणार्‍या तुम्हाला सुद्धा<< खरेच हे सगळे फोटो घ्यायला किती केळ लागला?? अर्थात पेशंस तर लागलाच असेल.

आज मी करटुली (भाजी) घेतली.एकेक फळाचा आकार मोठ्या चिकूएवढा! प्रथमच इतकी मोठी करटुली पाहिली.

मधु-मकरंद, सुमंगल ही प्र.चि मी नाही काढली. मानुषींच्या घरट्यातील घरट्यावरुन प्रेरणा घेऊन थोडा शोध घेतला तेव्हा ही प्र.चि मला आंतरजालावर मिळाली.

किशोर फोटो सुंदरच.
हा मेल फिरत होता मागे.

आमच्या कडे अंडी घातली आहेत सध्या झुंबरावर. फोटू नंतर डकवते. हल्ली राधा रांगायला, उभी रहायला लागल्याने वेळच मिळत नाही. सतत तिच्या मागे रहावे लागते. २३ ऑगस्टला तिचा वाढदिवस आहे. त्याच गडबडीत मी सध्या आहे. उद्या परवा सुट्टीच घेतली आहे.

... झुंबरावर अंडी. बाप्रे पक्षीही कॉक्रिटच्या जंगलात यायला लागले. झाडे लावा .. झाडे जगवा .. ठाण्याच्या `पर्यावरण दक्षता मंच' सारखा मंच मायबोलीनेही सुरु करावा ...

माझ्याकडेही बुलबुलाने परत घरटं केलय. त्याच्या २ फेवरीट जागा आहेत. दरवर्षी अल्टर्नेट घरटं बांधतो. गेल्या वर्षीचं घरट मी तसच ठेवलं होतं पण त्याने ते नाही वापरलं. दुसर्‍या ठिकाणी बांधलं. उलट ते जुनं उचकटलेलं दिसलं.

परवा कुंड्यांमधली माती मोकळी करताना एका कुंडीत माती खाली साबुदाण्या सारखी आणि आकाराने तेवढीच बरीच अंडी दिसली. ती माती सकट प्लॅस्टीक पिशवीत ठेवल्येत. पाहू त्यातून काय येतय.

येळेकर ती खास विकसित केलेली करटोली आहेत. गुजराथी लोकांना त्या भाजीची गोडी लागल्याने ते झाले असावे. खास जंगलात उगवलेली करटोली पण मुंबईत मिळतात.

जो_एस, मला पण कुतुहल आहेच. ती बहुतेक गांधील माशीची किंवा तत्सम किटकाची असावीत. ( जरा जपून ! )

किशोर धन्यवाद! किती चिकाटी आणि नीटनेटकेपणा आहे कामात. एवढं मोठ्ठ (त्यांच्यामानाने) घर बांधताना नाही भांडाभांडी, नाही कामचुकारपणा. किती शांतपणे, आणि चिकाटीने (एकावेळी चोचीतून किती सामान आणणार ना? ) दोन खोल्या अगदी मस्त बांधल्यात. आकारही किती छान आहे. मला वाटतं दुमजली घर आहे ते.
हे गुण आपल्यात असते तर...........:स्मित:

असेच फ़ोटो मी कुंभारीण माशीचे काढले आहेत. तेव्हा मलाही तिचं खूप कौतुक वाटल होतं. Happy

किशोर्,सुंदर घरटं आहे..फोटोशेअर केल्याबद्दल्धन्यवाद..

दिनेश्,:हाहा:

व्वा!! मस्त फोटो.
तुम्ही तुळस बाल्कनीत ठेवली असेल तर ऊन्हापासुन बचाव करण्यासाठी थोडा आडोसा तयार करा.<<< अहो आडोसा केला, घरात ठेऊन बघितली आतापर्यंत ३-४ वेळा रोप आणले पण जगले नाहीत Sad
अगोदर होती घरी ती चांगली वाढली होती पण भारतातुन परतल्यापासुन तुळस जगत नाहीये Sad

मयुरी, जगत नाही म्हणजे पाने दिवसा मलूल होतात व संध्याकाळी ताजी होतात का ? तसे असेल तर पाणी कमी पडत असेल.
पाने करपून जात असतील, तर उन जास्त लागत असेल.

पण अजिबात जीव धरत नसेल तर माती निकस असेल किंवा त्यात काही रसायने पडली असतील.

मग मातीच बदलायला हवी. तूम्ही नसताना बहुतेक मातीत काहीतरी मिसळले / पडले असेल. किंवा मोठे किटक झाले असतील.
बाय द वे, मी भारतातून ( भायखळा ) दाणेदार खत आणले होते. त्याने माझी भाजीपाल्याची रोपे छान तरारली आहेत. अगदी आठवडाभरातच फरक पडला.

येळेकर ती खास विकसित केलेली करटोली आहेत.>>>>> हरकत नाही ना तीखायला.कारण ती भाजीवाली
देशी म्हणत होती. तिची शेजारीण जंगली म्हणत होती.

Pages