भोकsरूss

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

शेवाळी रंगाचं,
शेंबड्या अंगाचं,
मराठी ढंगाचं,
माझं भोकरूss

लोणची जायाचं,
पुरवून खायाचं,
सांभाळा रातीचं,
माझं भोकरूss

कैरीशी मैत्रीचं,
चवीच्या खात्रीचं,
तों.पा.सो, रुपाचं,
माझं भोकरूss

मुरल्या वाणाचं,
भेव गंss पाण्याचं,
रक्षण दाद्र्याचं
माझं भोकरूss

प्रेरणा: http://www.maayboli.com/node/43403 आणि http://www.maayboli.com/node/42775

विषय: 

सगळ्यांना खूप धन्यवाद! (आवडत असल्यास 'ना' ऐवजी 'चे' वाचावं).

झकासराव, भारी काँप्लिमेंट! थँक्यू!

मला 'दादरा' शब्द माहिती असण्याचं मानुषीताई आणि शोभा यांना आश्चर्य का वाटलं असावं? त्यांना मी, बाजारची लोणची बारक्याश्या बाटल्यांमधून आणून खाणारी, फार 'अलिकडची' मुलगी वाटली असेन असं वाटून पाव सेकंद आनंद झाला. Proud

सशल, हो गंs हो. तू पण प्रेरणेचं रूटरू!

कुंकूच्या शीर्षकगीताची लिंक शोधते. त्याशिवाय अंदाज येणार नाही. Proud

मूळ कवितेची लिंक देते. आधीच द्यायला हवी होती. उशीर झाल्याबद्दल माफ करा.

Biggrin मस्त जमलीये!

प्रेरणा घेऊन एक पाडतेच :

चिखल-आवडीचं
ठुसक्या बांध्याचं
चपट्या नाकाचं
माझं गं डुकSरूSSS

पिचक्या डोळ्यांचं
वाटोळ्या शेपटीचं
निमुळत्या तोंडाचं
माझं गं डुकSरूSSS

निरागस नजरेचं
पिल्लावळीचं
लडबडीत पायांचं
माझं गं डुकSरूSSS

चविष्ट चवीचं
हॅम-सलामीचं
पोर्क बेलीचं
माझं गं डुकSरूSSS

ते जास्त(च) टॅन झालेलं. Happy

या कवितांची एकूण ठेवण (हुशार लोकं त्याला वृत्त म्हणतात बहुतेक) दृष्ट काढताना जे काही पुटपुटतात ना तशी आहे. Proud

मृ आणि मामी दोघी भारी Lol

मामीचं डुकरु शेवटचं कडवं वगळून फोटोसकट ललिताप्रीतिच्या डुक्कर लेखावर लावायला द्या Proud

मृ, ते शेंबडं अंगं का गं पण ? भोकरं बुळबुळीत असतात का ? :बाजारी बाटलीतून लोणचं आणणारी मुलगी: Wink

धन्यवाद मॅक्स!
'माझं कुंकूss'. Lol 'काहीच्याकाही टायटलसाँग्ज' बाफ काढा.

मामी "माझं डुकरू" गाताना सिनेमॅटोग्राफी (?) कशी असेल?

रिया, पूर्वीपासून लोणची चिनी मातीच्या बरणीत ठेवतात. वरुन झाकण लावल्यावर त्याभिवती सुती कापड दोर्‍याने वगैरे बांधतात त्यालाच दादरा म्हणतात. लोणच्याला दमट हवा, पाणी वगैरे लागू नये म्हणून असेल.

मामी, अशक्य! Biggrin आता दुकानात हॅम इत्यादी बघुन तुझं हे डुक$$$रु$$ आठवणार बघ!
(माबोवर येऊ साडेतीन+ वर्ष झाली पण तो 'एस' काही लिहीता येत नाहीये. मदत करा$$$! Wink )

मामी Rofl डुकSरूSS.... अशक्य आहे...

रुSS मातला मातला त्याला कशी आवSरुSS
अंगी गुलमोहSरूSS बहरला त्याला कशी सावSSरुSSS ??????

वत्सला, अग मराठी फोंट मध्य्न इंग्रजीत जा आणि S टाईप कर Happy

लाजो, Biggrin पूर्ण करच तू हे आता!

त्या 'एस' बद्द्ल धन्स. मराठीतच काही शॉर्टकट आहे का ते बघत होते!

Pages