मला आवडलेले/न आवडलेले आयटेम-सॉंग

Submitted by अंकु on 31 May, 2013 - 04:05

हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील पृर्वीपासुन चालत आलेल्या आयटेम - गाण्याविषयी बोलुयात Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलमान ची नाव ठेवायची सुध्दा लायकी नाही हो.. त्याचे माकडचाळे बघवत नाही..:)
जेवढे लोक अशोका बघायला गेलेले त्याचे निम्मे सुध्दा माकडछाप "वीर" बघायला गेले नाहीत... Lol

नंदींनी तुमचा शाहरूख द्वेष दिसून येतो... Wink

मी असोका पाहिलेला नाही पण. पण जेव्हा जेव्हा त्यातली गाणी पाहिली आहेत तेव्हा तेव्हा फक्त इतकंच वाटलंय की बहुतेक हे दोघं जंगलात फक्त पकडा पकडी खेळतायत की काय.

नंदिनी, मला तुझं प्रगल्भ लेखन आणि प्रतिक्रिया वाचायला आवडतात पण जेव्हा शाहरुखचा विषय येतो तेव्हा तुझ्या प्रतिक्रिया फार बाळबोध आणि द्वेषात्मक वाटतात. हेमावैम.
विषयाला सोडुन लिहिल्याबद्दल क्षमस्व.

नंदिनी, मला तुझं प्रगल्भ लेखन आणि प्रतिक्रिया वाचायला आवडतात पण जेव्हा शाहरुखचा विषय येतो तेव्हा तुझ्या प्रतिक्रिया फार बाळबोध आणि द्वेषात्मक वाटतात. हेमावैम.
>>>> Lol मला शाहरूख खान आवडतो. तो चांगला अभिनेता आहे, मार्केटिंगची उत्तम जाण असलेला आहे, पण म्हणून त्याने काही वाटेल ते केलं तरी त्याला चांगलं मी म्हणून शकत नाही. (सेम अप्लायज टू ऑल अदर हीरोज अ‍ॅ़ज वेल) त्याचा द्वेष वगैरे करण्याइतकी मी काही ग्रेट नाही.उगाच शाहरूखच्या सिनेमामधल्या एका आयटम साँगला नावे ठेवली म्हणून लगेच "इतर हीरोंनी बघा काय केलंय ते" असं म्हणणे (आणि त्यावरून व्ही अँड सी चालू करणे,) हे जास्त बाळबोध आणी विनोदी आहे.

असो, आता टीव्हीवर चुरा लिया है तुमने हा दिव्य पिक्चर लागला होता. (श्रद्धा, फारेंड प्लीज नोट. फार महान चित्रपट आहे.) दहा करोडची संपत्ती एका नाण्यामधे कन्व्हर्ट करणे (तेदेखील एका मॉलमधल्या छोट्या दुकानांत) वगैरे महान भाग तर आहेतच पण चित्रपटामधे राखी सावंत, झायेद खान आणि एशा देओलचं मोहब्बत है मिरची आयटम साँग. चांगल्या गाण्याची वाईट कोरीओग्राफी आणि वाईट डान्सिंगने वाट लावली आहे. एशा देओलपेक्षा राखी सावंत चांगली नाचते. एशा देओल क्लासिकल डान्सर असूनदेखील स्क्रीनवर कायम विचित्र आणि ऑकवर्डपद्धतीने नाचायची.

झायेद खान बद्दल नो कमेंट्स (हो! उगाच त्याचे फॅन्स पण चिडायचे-बिडायचे)

अरे हा धागा का मागे पडला ???
सनी लिओन च आयटेम साँग -- बेबी डॉल मै सोने दी.. मी ह्या गाण्याचे लिरीक्स वेगळेच एकत होते.हॉलिवुड चे सीन्स का कॉपी करतात ???

किक चित्रपटातले सगळॅच गाणी ....आयटम साँग आहे...

ना धड संगीत ना धड शब्द.... आणि कळस म्हणजे आयटम साँग मधे बदककुमारी नर्गिस ला घेतले आहे.. ती कोणत्या ठेक्यावर कोणता नाच करते यावर काही वर्षात कोणी पीएचडी केल्यास आश्चर्य वाटु नये...

हँगओव्हर...... यातला नाच तर झोंबी नाच पेक्षा वाईट आहे....हँग ओव्हर ..... म्हणताना जी काही अ‍ॅक्शन आहे ती बघितल्यावर दारु पिवुन देखील बाजुचा बाब्या देखील त्यापेक्षा चांगली अ‍ॅक्शन करुन "हँगओव्हर" चा शब्दश: अर्थ सांगु शकेल...

जुम्मे की रात.. सुरुवातीलाच हीरो शॉर्टसर्किट करुन लाईट लावतो... Uhoh शॉर्टसर्किट झाल्यावर लाईट जाते हे माहीत होते पण लाईट येते हे पहिल्यांदाच बघितले...महावितरणे या आयडीयाचा ज्याने शोध लावला असेल त्याचा शनिवार वाड्यावर जाहीर सत्कारच करायला हवा.... त्यात देखील सलमान एक स्टेप करतो त्याच्या मागचे वेगळेच विचित्र स्टेप करताना दिसतात.. कुणाचा कुणाशी काही ताळामेळाच नाही ......

साला खडूस चित्रपट..आर माधवन चा..
त्यातील झल्ली फटाका गाण नै का पाहिलं इथ कोणी ?
कसली सॉल्लीड्ड नाचलीए ती..बिंदास एकदम..

टीनातै..
मी पाहिल आता हे गाण.. खरंच मस्त नाचलीये...मोजक्या स्टेप्स पण एकदम छान केल्या आहेत.

मला आवडणारे काही गाणे ("बघायला" आणि ऐकायला सुद्धा):

"तीन पत्ती": तेरी नियत खराब है! (एकदम मस्त डान्स)
"गुरु": मय्या मय्या .. मस्त!
"समय": लैला लैला (लाहीला लाहीला असा उच्चार) ... मस्त मस्त तुफानो मी मस्त मस्त एक कश्ती है ..
"खाकी": " ऐसा जादू डाला रे!" (लारा दत्ता तुफानी नाचली आहे!)
"जो बोले सो निहाल": "रात कुछ और थी, सवेरा कुछ और!"

अजुन आठवतील तसे सांगतो ....

पप्पी दे पारुला

अहाहा! काय तो मंजुळ आवाज! मंत्र मुग्ध करणारं सुंदर संगीत!

आणि काव्या बद्दल तर काय बोलावे!
इतक्या सुटसुटीत सोप्या शब्दात इतके अफलातून गीत लिहिण्याच्या प्रतिभेचे कौतुक करण्यास शब्दच सापडत नाहीत.

सुरवातीला
'हे देना रे! आता तरी देना रे!'
असे शब्द कानावर पडल्या पडल्याच श्रोत्यांचं प्रचंड कुतुहल जागृत होतं आणि सहाजिकच कान टवकारले जातात.
आणि सुरु होतं दणकेदार मंजुळ संगीत आणि त्या संगीतातच सहज पणे विरघुळन जाणारे शब्द 'पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे.........' आणि या मंजुळ शब्दनादाने श्रोते डुलायलाच लागतात, असं वाटतं हे असंच सुरु रहावं, कधी संपुच नये.
आणि हेच नेमके हेरुन संगीतकार हेच दोन शब्द लांबत ठेवुन श्रोत्यांचे मन सहज जिंकतो.

याची धुंदी उतरत नाही तोच, पुढला अप्रतिम शब्द "पारुला" आणि त्याचाच एक इको... 'पारुला!'
वा! वा! श्रोते मनातल्या मनात दाद देतात.
पुढे 'या प्रेम वेडीला!' हे ऐकल्यावर मात्र श्रोत्यांच्या हृदयाचा ठोका क्षणभर चुकतो, की पुढं काय असावं? उगाच काही भारदस्त शब्द घुसडले तर नसतील?
पण नाही! हीच गीतकाराची खरी कमाल आहे.
पुढे परत तेच मंत्रमुग्ध करणारे शब्द रिपीट होतात 'या प्रेम वेडीला!'
वा किती सहज! उगाच फालतु मोठे मोठे शब्द नाही, 'या प्रेम वेडीला' बस्स!

पहिल्या ऐकण्यात श्रोत्यांना शब्द पाठ होतात आणि कोरस सोबत तेही गुणगुणु लागतात ... ' पप्पी दे पप्पी दे.....".
या गीताला आणि संगीताला लोक विसरणेच अशक्य.

काय तो मंजुळ आवाज!>>>> बळंच,,,अजिबात मंजुळ आवाज नाहीये तो.हिरवीण नाजुक आहे पण.
अहो पल्बिक मधे पप्या मागायला असाच दणकट्,,मजबुत आवाज हवा. Proud

बॉलीवूडची आयटम गर्ल कतरीना कैफ
आणि
बॉलीवूडचा आयटम बॉय शाहरूख खान
यांना कुठल्याही गाण्यात टाका गाणे हिट करून देतात. गेला बाजार प्रेक्षणीय तरी होतेच होते.

कतरीनाचे शीला की जवानी, कोंबडी पळाली, अफगाण जलेबी.. काय नाचते बया काय दिसते बया.. तिच्या लटक्या झटक्यांना तोड नाही.. एका आयटम साँगसाठी ती हिरोईनपेक्षा जास्त मानधन मागेल तर ते ही तिला मिळेल..

मुलांमध्ये आयटम बॉयची संकल्पना पहिल्यांदा आणणारा वा ती समर्थपणे पेलून नेणारा पहिला हिरो शाहरूखच असावा. बिल्लू बार्बर किंवा काल सारख्या चित्रपटातील गाणी असोत, त्याच्याच चित्रपटातील दर्दे डिस्को असो वा छैया छैयासारखे आयटम गर्ल मलायका बरोबर नाचलेले गाणे असो की अनुष्काबरोबर चान्स पे डान्स असो.. मला त्याचे सूरज हुआ मध्यम सुद्धा एक आयटम साँगच वाटते.. अफलातून जाण आहे त्याला नृत्याची, त्यातील स्टाईलची. मुख्य म्हणजे पडद्यावर काय छान दिसेल हे कळते. मग तुम्ही शाहीद हृतिक चंकी पांडे वा प्रभूदेवासारखे ग्रेट डान्सर असलेच पाहिजे असे गरजेचे नाही.

कतरीनाचे शीला की जवानी, कोंबडी पळाली, अफगाण जलेबी.. काय नाचते बया काय दिसते बया.. तिच्या लटक्या झटक्यांना तोड नाही.. एका आयटम साँगसाठी ती हिरोईनपेक्षा जास्त मानधन मागेल तर ते ही तिला मिळेल..
>> आमच्या मराठमोळ्या क्रांतीताईंच्या चिकनी चमेली गाण्यासमोर हे काहीच नाही....

मुलांमध्ये आयटम बॉयची संकल्पना पहिल्यांदा आणणारा वा ती समर्थपणे पेलून नेणारा पहिला हिरो शाहरूखच असावा. >>> अभिषेक बच्चन फॉर वन लव्ह. तो पहिला आयटम बॉय होता.

अफगान जलेबीमध्ये कतरीना नाचलीये ही बातमी माझ्यासाठी तरी नवीन आहे.

मला त्याचे सूरज हुआ मध्यम सुद्धा एक आयटम साँगच वाटते.. <<< बावा ऋन्मेषा, ते पिक्चरमधले रोम्यांटिक गाणे आहे. त्याला आयटम साँग म्हणत नसतात. त्या गाण्यात तो कुठे नाचल्याचेही दिसले नाही. बिल्लूमध्ये त्याने दोन तीन आयटम केले आहेत पण शाहरूखचा खर्या अर्थाने आयटम साँग म्हणजे ब्रेक फ्री (क्रेझी ४) ओम शांती ओममम्धला दर्डे डिस्को पण आयटम सॉंगच आहे. (वन ऑफ द बेस्ट आयटम साँग्ज आहे ते)

कसले फ्यान म्हणायचे रे तुम्ही?धड माहिती पण नाही तुमच्याजवळ.

जर सूरज हुआ मध्यम पिक्चरमधील रोमांटीक गाणे होते तर वन लव गाणेही रक्त चित्रपटातील रोमांटीक गाणे होते. अभिषेक बच्चनचा त्यात रोल होता.

कदाचित या आधीही जुन्या एखाद्या चित्रपटात कोणी आयटम बॉय बनलेही असावे म्हणून मी वर म्हणालो की आयटम बॉय इमेज समर्थपणे पेलणारा तो पहिलाच.

दर्दे डिस्को जर आयटम साँग असेल तर छैय्या छैय्या आणि सूरज हुआ मध्यम का नाही?

नाचले म्हणजेच आयटम साँग झाले या चौकटीतील कल्पनाच तर तो मोडून टाकायचा. आणि म्हणूनच तर उघडबंब न होता आणि डोल्ले शोल्ले न दाखवताही तो मोस्ट सेक्सीएस्ट एक्टर म्हणून ओळखला जातो.

तुम्ही लोकं म्हणता ती आयटम साँग बिल्लूच नाही तर वर उल्लेखल्याप्रमाणे इस काल काल मे कर दे कोई धमाल मध्येही होती.

त्याचे शेरवानीमधील शावा शावा गाणे असो वा लै जा लै जा असो किंवा मग मै हू ना मधील तुमसे मिल के दिल का ये हाल क्या हुआ कव्वाली असो वा मोहोब्बतेमधील आंखे खुली हो या हो बंद... त्याचा वापर एक आयटम बॉय म्हणून कैक ठिकाणी केला गेला आहे. करण जोहर आणि फराह खान प्रभूतींचा म्हणून तर तो तुरूपचा एक्का होता.

मला तर ते रावण मधील छम्मकछल्लो गाण्यालाही आयटम साँग का म्हणू नये हे समजत नाही..
तरी त्याच्या फिर भी दिल है हिंदुस्तानी मधील प्रमोशनसाठी केलेले टायटल साँग हम लोगोंको समझ सको तो समझो दिलबर जानी या गाण्याला काय म्हणावे हे तुमच्यावरच सोडतो.

आणि हो, अफगाण जलेबी मधील कतरीनाचे लटके झटके बघायला यूट्यूब गूगाळून प्रोमोज बघा Happy
न सापडल्यास मी शोधायला मदत करेनच. माझ्या मोबाईलमध्ये विडिओ आहे त्याचा, मूड आला की बघितला जातो Happy

अभिनव,
क्रांतीताईंना कोंबडी पळाली गाणे मिळाले हे त्यांचे नशीब.
चिकणी चमेली गाण्यावर कतरीना नाचली हे त्या गाण्याचे नशीब.

ओए बेबी जरा टच मी टच मी टच मी.. ज्या गाण्याला टच करेल त्याचे सोने करते ती Happy

मुलांमध्ये आयटम बॉयची संकल्पना पहिल्यांदा आणणारा वा ती समर्थपणे पेलून नेणारा पहिला हिरो शाहरूखच असावा. >>> अभिषेक बच्चन फॉर वन लव्ह. तो पहिला आयटम बॉय होता.

<< त्या आधी आयटेम साँग /बॉय हे ऑफिशिअल वर्ड्स साउथ च्या 'चिकबुक चिकबुक रैले' आलं तेंव्हा समजले (प्रभुदेवा अर्थत.)
सिनेमातल्या कास्टचा , स्टोरीचा आणि या गाण्याचा काहीच संबंध नाही याचं तेंव्हा नवल वाटलं होतं :), नंतर साउथ मधे आणि तिथून हिंदीत अनेक गाणी आली अशी.
हम्मा हम्मा, रुक्मिणी इ.

Pages