मला आवडलेले/न आवडलेले आयटेम-सॉंग

Submitted by अंकु on 31 May, 2013 - 04:05

हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील पृर्वीपासुन चालत आलेल्या आयटेम - गाण्याविषयी बोलुयात Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न आवडलेलं : माधुरीच घगरा सॉंग ! अति सामान्य नृत्य -कोरिओग्राफी-लठ्ठ माधुरी -पोटावरच्या वळ्या- तेच ते तिचे टिप्पिकल हावभाव आणि बेकार डिझाइन केलेले घागरा आउटफिट्स!

आवडलेलं : जॉन अब्राहम -अक्शय कुमार ' सुबह होने ना दे शाम खोने न दे'
बॉलिवुड मधलं अत्ता पर्यन्त बेस्ट वाटतं शोलेचं ' मेहबूबा मेहबूबा' , अत्ता पर्यन्तची बेस्ट आयटेम गर्ल पण हेलनच !

असो, बॉलिवुड मधे 'आयटेम गर्ल्स ' घेण्यावर जास्तं फोकस असतो , 'आयटेम बॉइज ' ना कमी महत्त्व असणार्या (थोडक्यात फिमेल ऑडियन्स टेस्ट ला कमी महत्त्व देणार्या ) ट्रेंड् चा निषेध Proud

बॉलिवुड मधलं अत्ता पर्यन्त बेस्ट वाटतं शोलेचं ' मेहबूबा मेहबूबा' , अत्ता पर्यन्तची बेस्ट आयटेम गर्ल पण हेलनच >> अगदी अगदी! हेलन वॉज दी बेस्ट! तीची सगळिच गाणि आयकॉनीक आहेत, शिवाय कुठेही वल्गर किवा चीप वाटत नाहीत.

तेरे अखियोन्का वार किसि शेर का शिकार
तेरा प्यार प्यार प्यार प्यार हुक्काबार.

आवडते. गाण्यातले शब्द आणि उपमा पण item आहेत.
अशी गाणी मला आवडतात.

नविन हिम्मतवालाचे
चलावो न नैनोसे बाणरे "बॉडी से प्राण रे" अफलातुन काव्य आहे.

पहिल्या दहा प्रतिसादात "बाबूजी जरा धीरे" नाय म्हणजे तर भरवशाच्या म्हशीला टोणगा अस झाल की!!! (मी ह्या प्रतिसादाचा नंबर ८ जाहीर करते Wink ) (प्राजक्ता, तू जर हे म्हणाली असशील तर निषेध.. नेहा कक्कर व्हर्जन ऐक ह्या गाण्याची.)

'आयटेम बॉइज '>>> दीपांजली, 'धूम'-१!!!!! पुढील शतकातील सर्व महिला आणि गे लोकांना नवीन आयटम लागणार नाही! एक तेलगु गाणे आहे - रिंग रिंगा (आर्य २) मध्ये. ते धींक चिका चे ओरिजिनल आहे. त्यातला तो मुलगा आयटम किडा बघ. अमेझिंग कोर स्ट्रेंग्थ. स्त्री-पुरुष भेद सोडून केवळ शरीर कसे कमवावे, लवचिक ठेवावे इ इ साठी एक चांगला डान्स म्हणून बघ तो कार्टा.

'आयटेम बॉइज '>>> दीपांजली, 'धूम'-१!!!!! <<< धूम २ पण आहे की, त्यात एन्ड क्रेडिट्समधे उदय्-अभिषेकला डच्चूदेऊन फक्त ह्रिथिक अ‍ॅशला नाचवलं होतं. धूम १ जॉन बघता बघता उदय चोप्रा दिसला की एकदम यक्क!!!

मास मीडीयामधे शिल्पा शेट्टीच्या "मै आयी हू युपी बिहार लूटने" या शूलमधल्या गाण्यापासून "आयटम नंबर" असा शब्द वापरायलास सुरूवात झाली. त्याआधी अशा गाण्यांना "कहानी की डीमांड" म्हणायचे Wink शाहरूखने काल आणि क्रेझी ४ साठी आयटम नंबर केले होते. ते दोन्ही सिनेमे वाईट रीत्या आपटले Proud

शोलेमधलं महबूबा महबूबा क्लास आयटम साँग होतं. हेलन फार ग्रेट डान्सर होती अशातला भाग नाही, पण ती जे काय करायची ते अत्यंत ग्रेसफुली करायची. माधुरीचं एक दो तीन पण पूर्ण पिक्चर शूट झाल्यावर मग अ‍ॅड केलं होतं म्हणे ते गाणं.

श्री ४२० मधलं नादिराचं मूड मूड के ना देख पण मस्त आहे. पण ते अगदी आयटम साँग म्हणता येणार नाही.. मराठी मधलं नवरा माझा नवसाचा मधली "चला जेजूरीला जाऊ" हे पण माझं एक आवडतं आयटम साँग आहे.

शाहरूखने काल आणि क्रेझी ४ साठी आयटम नंबर केले होते. >> दर्दे डिस्को ला आयटम मानता येईल का? त्याआधीच्या 'अपाहीज प्यार' सीनला जाम हसले होते... Biggrin

अमेझिंग कोर स्ट्रेंग्थ. स्त्री-पुरुष भेद सोडून केवळ शरीर कसे कमवावे, लवचिक ठेवावे इ इ साठी एक चांगला डान्स म्हणून बघ तो कार्टा. >>> त्याच्याकडे कोणाच लक्ष जातच नाही , सगळा फोकस त्या पोरीवर आहे.

पण आयटेम साँग म्हणजे मेन लिड सोडुन इतर कोणाला डान्स साठी आणणे ना ??
धूम बॉइज नाही होउ शकणार मग आयटेम मटेरिअल !
खरं तर देसी बॉइजही नाही होउ शकत त्या डेफिनेशनने पण त्या ' सुबह होनेना दे' गाण्यात आयटेम गर्ल आणलीये म्हणून त्या गाण्याला करून टाकल क्वालीफाय , शिवाय त्या सिनेमात त्या दोघांचा रोल च ' आयटम' कॅटॅगरीत मोडणारा आहे म्हणून पण Proud

बाकी कजरारे , मुन्नी , युपी बिहार लुटने , दिल मेरा मुफ्त का , झल्ला वल्ला , हम्मा , माइया माइया , चिकबुक चिकबुक रैले पण सही आहेत !
चिकनी चमेलीची कोरिओग्राफी- कॉस्च्युम्स चांगले हवे होते अजुन !!

पण आयटेम साँग म्हणजे मेन लिड सोडुन इतर कोणाला डान्स साठी आणणे ना ??
>>>हो.

धूमचं वगैरे ती गाणी प्रमोशनल साँग्ज आहेत. मूळ चित्रपटात नसलेले तरी टीव्ही, इंटरनेट साठी वगैरे बनवलेले व्हीडीओ. मध्यंतरी असे व्हीडीओ काढायचं फार फॅड होतं, अता जरा कमी झालंय. आता मार्केटिंगसाठी टीव्ही शोज, मॉल्स, अशा ठिकाणी स्टार्सनी प्रत्यक्ष जाणं वगैरे फंडा जोरात चालू आहे. मेट्रो सिटी तर आहेतच पण टीयर टू सीटीजमधे हा फंडा जाम चालतोय.

चिकनी चमेलीची कोरिओग्राफी- कॉस्च्युम्स चांगले हवे होते अजुन !!<< मला त्या गणेश आचार्यची कोरीओग्राफी कधीच आवडत नाही. राँची म्हणण्यापेक्षा गावठी असतात त्याच्या स्टेप्स. भरीसभर म्हणून त्यात नाचायला कतरीना. अशा गाण्यांमधे मलाईका किंवा शिल्पा शेट्टी हवी.

त्यापेक्षा वैभवी मर्चंट आणि फराह खान आयटम साँग्ज चांगल्या कोरीओग्राफ करतात. सरोज खानच्या पण स्टेप्स सिम्पल आणि क्लासिकल बेसच असतात. अगदी "चोलीके पीछे" सारख्या गाण्यामधे पण अजिबात व्हल्गर स्टेप्स नव्हत्या. हल्ली तर नाचाच्या स्टेप्सपेक्षा कॅमेरा गिमिक्स जास्त असतात गाण्यांमधून.

आयटेम साँग म्हणजे मेन लिड सोडुन इतर कोणाला डान्स साठी आणणे ना >> अस्स आहे का! अरे एकदम पैसा वेस्ट आयटम गर्ल म्हणजे आपली मराठी मुलगी सोनाली बेंद्रे. 'हम्मा' मध्ये काय शतपावली घालते (पण जातीच्या सुंदराला काहीही शोभत त्यातली गत.)

घागरा - इतक्यात बघितलेलं सगळ्यात ओव्हर रेटेड अन जाम बकवास आयट्म साँग! माधुरी मठ्ठ दिसलीय अगदी. रेखा टाइप - आपल्याच सौंदर्याच्या अन एक दो तीन च्या वेळच्या अदांच्या प्रेमातून वय ५० च्या जवळ आली तरी बाहेर यायला तयार नाही!

सगळ्यात भयंकर दोन आयटम साँग्ज रेखाच्या खात्यात जमा.
प्यार दो प्यार लो चा उल्लेख झालेला दिसला. परिणीतातल्या गाण्याचा झालाय का?

आवडत्या पहिल्या दहांत हेलन , हेलन आणि हेलन ( मुंगळा, आ जाने जा, पिया तू, मेरा नाम चिन चिन चू).

<<अरे एकदम पैसा वेस्ट आयटम गर्ल म्हणजे आपली मराठी मुलगी सोनाली बेंद्रे. >>

अहो असं काय करता? चम चम करता मध्ये छान नाचली आहे, एकदम ढिंच्याक... Happy

न आवडलेली बरीsssssssssच आहेत.

आवडलेली :
चम चम करता है ये नशीला बदन.
हे के सरा सरा सरा
मन सात समंदर डोल गया ( सगळ्यात आवडतं आणि बेस्ट आहे हे )
आ आण्टे (तेलुगु) (ते आयट्म साँग प्रकरात मोडतं की नाही माहीत नाही पण मला आवडतं )

हेलनचं ऊई इतनी बडी मेहफील और एक दिल पण आयटम मध्येच मोडेल..
माझ्यामते सुद्धा बॉलिवूडची तिच बेस्ट आयटम गर्ल आहे. Happy बाकी सगळ्या फिक्या.

त्या काळात म.कु. आणी मनिषा कोईरालाचं अशी दोन गाणी फार गाजत होती. म.को.चं गाणं आठवत नाहीये. Sad
म.कु. बघायला आवडते तुला दक्षे?? याक!

Pages