डाळ वडे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 April, 2013 - 14:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चणा डाळ पाव किलो
२ मिडियम कांदे चिरुन
२ ते ३ मिरच्या चिरुन
मुठभर कोथिंबीर चिरून
१ चमचा धणेपुड (असल्यास)
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
चविनुसार मिठ
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

वडा नावाचा मासा आहे पण डाळ नावाचा नाही तसेच डाळ घालून माशाचे प्रकार केले जात नाहीत त्यामुळे हा माशाचा प्रकार असेल असा गैरसमज करुन घेऊ नका. Lol
माझ्या वहिनीकडे एक समारंभ होता तेंव्हा मी हे डाळवडे केले होते म्हणून फोटोतील प्रमाण जास्तीचे आहे. पण सोयीसाठी मी पावकिलोचे प्रमाण लिहीले आहे.

चणा डाळ ५ ते ६ तास भिजत ठेवा.

५-६ तासांनंतर ती स्वच्छ धुवुन मिक्सरमधुन थोडेसेच पाणी घालून जाडसर लगदा होईल अशी थोडी चरट वाटून घ्या. (बापरे किती शब्द टाकले? : हाहा: गोंधळ उडाला नाही ना?)

वाटलेल्या पिठात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, हिंग, हळद, धणेपुड, मिठ घालून एकत्र करा.

आता लिंबाएवढा ह्या मिश्रणाचा गोळा घेउन त्याचे चपटे वडे करुन तेलावर मिडीयम गॅसवर शॅलोफ्राय करावेत. ६-७ मिनिटे एक बाजू शिजायला लागते.
हे आहेत तयार डाळवडे.

वाढणी/प्रमाण: 
कमीत कमी प्रत्येकी २
अधिक टिपा: 

घरात लहान मुले असतील तर मिरची सरळ डाळीसोबत वाटून घ्या म्हणजे खाताना मिरची तोंडात येणार नाही.

आल-लसुण पेस्ट तसेच गरम किंवा गोडा मसालाही घालू शकता.
हा वडा चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. वरुन गरम गरम चहा तर मस्तच.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला हे वडे जाम आवडतात..

पण मी करते तेव्हा एक गोष्ट खटकते आणि ती म्हणजे हे वडे खाताना खुप कोरडे वाटतात. कधीकधी घशाला बसतात. थोडे थंड झाल्यावर तर खुपच कोरडे वाटतात. असे कोरडे होऊ नये म्हणुन काय करावे? थोडा खायचा सोडा घातला तर? मी ब-याच वर्षात केले नाहीत, आता करेन तेव्हा थोडे वडे सोडा घालुन करुन बघेन, पण त्याव्यतिरीक्त अजुन काही युक्ती असल्यास सुचवा मैत्रिणींनो. Happy

छान प्रकार.
आमचे एक कारवारी शेजारी होते. त्या आजी या प्रकाराला बिस्कुट अंबाडा म्हणत. ( आणखी डाळी पण असत त्यात. )

शॅलो फ्राय - डीप फ्राय फरक स्पष्ट केला प्रतिसादांमधे ते एक बरं झालं.. आता हेच विचारायला परत एकदा पाकृ चा हा धागा उघडलेला.. Happy

दिनेशदा, बिस्कुट अंबाडा / आंबोडा नावाचा प्रकार जो मी खाल्लाय तो बोंडा स्टाईलचा होता! Uhoh कदाचित प्रांता-प्रांताप्रमाणे नामकरण वेगवेगळे असावे. कारण हा प्रकार मी बंगळुरात खाल्लेला.

जागू, फोटो व कृती दोन्ही मस्त आहेत. मला हे वडे खूप आवडतात. बंगळुर रेल्वे ठेसणावर पुण्याला परत निघताना प्रवासात खाण्यासाठी पार्सल बांधून घेतेच घेते. सोबत 'नंदिनी'चा सॉफ्ट मैसुरपाक आणि काप्पी. Happy

जबरी
मानुषी >>>बरं झालं गं बाई >>>>>>>>>> वडा नावाचा मासा आहे पण डाळ नावाचा नाही तसेच डाळ घालून माशाचे प्रकार केले जात नाहीत त्यामुळे हा माशाचा प्रकार असेल असा गैरसमज करुन घेऊ नका.>>>>>>>>>>>
हे क्लिअर केलंस ते..........हेहेहेहेहेहेहे! +१०००००००००००००००० Happy

सगळ्यांचे धन्यवाद.

श्रद्धा पण मी ह्या वड्यांना जरा जास्त तेल वापरले आहे. पण इतर वेळी मी कमी तेलातच शॅलोफ्राय करते.

दिनेशदा, अरुंधती छान नाव आहेत वड्यांची.

साधना ओल्याचटणी बरोबर नाही लागणार कोरडा. नाहीतर सोबत चहा घ्यायचा. Happy

जागु तुला हाणु का?:फिदी: माझ्या उपासाच्या दिवशीच टाकतेस असे तोंपासु फोटो?

आता उपासाच्या थालिपीठावर भूक भागवावी लागेल्.:अरेरे::फिदी:

मस्त कुरकुरीत दिसतायत.

सशलने केलेली चटणी पण झकास दिसतीय्.:स्मित:

चटणीची पण कृती मिळेल का सशल?

Pages