डाळ वडे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 April, 2013 - 14:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चणा डाळ पाव किलो
२ मिडियम कांदे चिरुन
२ ते ३ मिरच्या चिरुन
मुठभर कोथिंबीर चिरून
१ चमचा धणेपुड (असल्यास)
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
चविनुसार मिठ
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

वडा नावाचा मासा आहे पण डाळ नावाचा नाही तसेच डाळ घालून माशाचे प्रकार केले जात नाहीत त्यामुळे हा माशाचा प्रकार असेल असा गैरसमज करुन घेऊ नका. Lol
माझ्या वहिनीकडे एक समारंभ होता तेंव्हा मी हे डाळवडे केले होते म्हणून फोटोतील प्रमाण जास्तीचे आहे. पण सोयीसाठी मी पावकिलोचे प्रमाण लिहीले आहे.

चणा डाळ ५ ते ६ तास भिजत ठेवा.

५-६ तासांनंतर ती स्वच्छ धुवुन मिक्सरमधुन थोडेसेच पाणी घालून जाडसर लगदा होईल अशी थोडी चरट वाटून घ्या. (बापरे किती शब्द टाकले? : हाहा: गोंधळ उडाला नाही ना?)

वाटलेल्या पिठात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, हिंग, हळद, धणेपुड, मिठ घालून एकत्र करा.

आता लिंबाएवढा ह्या मिश्रणाचा गोळा घेउन त्याचे चपटे वडे करुन तेलावर मिडीयम गॅसवर शॅलोफ्राय करावेत. ६-७ मिनिटे एक बाजू शिजायला लागते.
हे आहेत तयार डाळवडे.

वाढणी/प्रमाण: 
कमीत कमी प्रत्येकी २
अधिक टिपा: 

घरात लहान मुले असतील तर मिरची सरळ डाळीसोबत वाटून घ्या म्हणजे खाताना मिरची तोंडात येणार नाही.

आल-लसुण पेस्ट तसेच गरम किंवा गोडा मसालाही घालू शकता.
हा वडा चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. वरुन गरम गरम चहा तर मस्तच.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतेय चटणी. थोडे दाणे किंवा डाळं घातलं आहेस का?
वरुन फोडणी घातलीस तेव्हा घरातला कढीपत्ता संपला होता का? Wink

व्वाह!!!! एकदम तोंपासु Happy

असे वडे आणि गरमागरम चहा.... के बात!!!!

यात मी थोडे जीरे / बडीशेप भरडुन टाकते.

वडे तोंपासू दिसत आहेत जागू.
एका ओळखिच्यांकडे खाल्ले होते असे वडे. खूप टेस्टी होते.

जागु नेहमीप्रमाणेच तोंपासु रेसिपी आणि फोटो.

हे शॅलो फ्राय केलेत?>>>> +१

तसेच आप्पेपात्रात हे वडे किंवा इतर प्रकारचे वडे शॅलोफ्राय कसे करायचे? खरच खरपुस होतात का?

सशल चटणी छानच.
दिपांजली, प्राजक्ता, ज्ञाती, लोला, लाजो, ऑर्किड, वत्सला, दक्षिणा, अनिष्का धन्यवाद.

लोला, लाजो खर्‍या सुगरणी आहात Happy जास्त प्रमाणात होते आणि लवकर होण्यासाठी शॅलोफ्राय करायच्या तव्यातच जास्त तेल घातले होते. कडा बुडतील एवढे. पण मी घरी करते तेंव्हा मात्र कमी तेलातच शॅलोफ्राय करते.

रुनी मला अस वाटत की आप्पे पात्रात होऊ शकतील शॅलो फ्राय. करुन बघायला हरकत नाही.

अश्विनी अग डिप फ्राय पण करतात. हॉटेल मधले डिप फ्रायच असतात. पण उगाच जास्त तेल वापरायला नको म्हणून मी शॅलो फ्राय करते.

जागुले
बरं झालं गं बाई >>>>>>>>>> वडा नावाचा मासा आहे पण डाळ नावाचा नाही तसेच डाळ घालून माशाचे प्रकार केले जात नाहीत त्यामुळे हा माशाचा प्रकार असेल असा गैरसमज करुन घेऊ नका.>>>>>>>>>>>
हे क्लिअर केलंस ते..........हेहेहेहेहेहेहे!

हे वडे कुठल्याश्या रेल्वे स्टेशनात मिळतात ना?

Pages