सुप्रसिद्ध पशु-पक्षी

Submitted by मामी on 5 April, 2013 - 01:25

लहानपणी आपल्याला सगळ्यात पहिले भेटतात ते काऊ, चिऊ, माऊ आणि भुभु. मग विठुविठु पोपट येतो. 'साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी' करत साळुंकी येते. रामाच्या देवळाला पाच फेर्‍या मारणारी घार भेटते. ससा, कासव भेटतात ...... हळूहळू हे संग्रहालय वाढायला लागतं.

पण या कोणाला अजून खास नावं आलेली नसतात. टिप्या, मोती अशी जेनेरिक नावं असली तरी त्यांना खास व्यक्तिमत्त्व आलेलं नसतं.

पण मग पुढच्या आयुष्यात एकसेएक सुप्रसिद्ध प्राणी-पक्षी भेटू लागतात. त्यांचं खास वैशिष्ट्य असतं, त्यांना व्यक्तिमत्व असतं आणि/किंवा त्यांनी एखादी लक्षात राहणारी भुमिका तरी बजावलेली असते.

खर्‍याखुर्‍या जीवनात किंवा गोष्टींच्या / सिनेमांच्याद्वारे सुप्रसिद्ध झालेल्या पशु-पक्ष्यांबद्दलची माहिती इथे एकत्र करूयात का? वाचताना खूप मजा येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, शिवाजीमहाराजांनी कुत्रा कधिच पाळला नव्हता. तो त्यांच्या कुत्रा नसून शिवाजी महाराजांची समाधी बांधणार्‍या होळकरांचा होता. समाधीच्या खर्च करतो पण माझा कुत्राही ठेवा अशी अट होती. पुढे पुस्तकातही वाघ्या आला.

>>> असं आहे का? ओके. धन्स केदार.

उफ्फ....स्मित_ Happy

<<झुरळांची इतक्या सिनेमांतली भरीव कामगिरी बघून डोळे भरून आलेत.<<
मामी, हिरो-हिरवीणची भेट/ मिलण घडवुन आण्ण्यात झुरळांनी फार म्हत्वाची भुमिका बजावलीये. Biggrin

नाना पाटेकरचा 'यशवंत' मधला,' एक मच्छर साला.... " डायलॉग चालु शकेल का?

मक्खी - मधली माशी. हिरो पुनर्जन्म घेतो माशीचा आणि विलनला मारतो.
स्पायडर मॅनमधला 'कोळी' ज्याच्यामुळे पीटर पार्कर स्पायडर मॅन होतो.

झुरळांची इतक्या सिनेमांतली भरीव कामगिरी बघून डोळे भरून आलेत. <<< मामी, तुझ्या भरलेल्या डोळ्यांत अजून तीन चार बूँद अ‍ॅड कर कारण अशी ही बनवाबनवी मध्ये पण अश्विनीभावेच्या फाईलीत झुरळ असते. Lol

'परिचय' मधले कासव (शिक्षकाला पळवून लावण्यासाठी अंधारात कासवाच्या पाठीवर मेणबत्ती लावून मास्तराला घाबरवतात ते)

मादागास्करचं चौकडं : अ‍ॅलेक्स (सिंह), मेलमन (जिराफ), मार्टी (झेब्रा) आणि ग्लोरिया (पाणघोडी). शिवाय त्यातले हुश्शार पेंग्विन्स, मूर्ख राजा ज्युलिएन (लेमूर).

>>हेच माकड चंकी पांडेच्या अजून एकदोन सिनेम्यांत आहे

चंकी पांडे असताना माकड कशाला आणखी? उगाच पैश्याची उधळपट्टी! (चंकीच्या फॅन्सना सॉरी!)

चंकी पांडे असताना माकड कशाला आणखी? उगाच पैश्याची उधळपट्टी! >>>> Lol

चंकीच्या फॅन्सना सॉरी! >>> चंकीचे फॅन्स अशी जमात अस्तित्वात असते????? Proud

>>चंकीचे फॅन्स अशी जमात अस्तित्वात असते?????

काही वर्षांपूर्वी आमच्या शेजार्‍यांची मुलगी त्याच्यावर जाम फिदा होती. मग बहुतेक तिला अक्कलदाढ आली असावी Happy

डिस्नेच्या अजब कार्टून कॅरॅक्टर्स पैकी बग्ज बनी सर्वात आवडायचा मला लहान असताना! आणि डोनाल्ड डक, मिकी माऊस - मिनी माऊस. उन्हाळ्याच्या सुट्टीत दर रविवारी पुण्यात लक्ष्मीनारायण थिएटरला मॉर्निंग शो मध्ये डिस्ने कार्टूनपट दाखवायचे. तेव्हा प्रत्येक रविवाराची आम्ही मुले आसुसून वाट पाहायचो आणि बग्ज बनी ला समोर स्क्रीनवर त्याचे फेमस खिदळणे आणि गाजर खाणे आदी कृती करताना पाहिले की मला अतोनात हसू यायचे...
मी प्र चं ड मोठमोठ्याने हसणार्‍यांमधील असल्यामुळे आजूबाजूला बसलेली भावंडे माझ्या खुर्चीतल्या खुर्चीत मारलेल्या उसळ्या आणि हसण्याला रोखण्यासाठी माझ्या तोंडावर हात धरून मला खुर्चीत दाबून ठेवायचे! Happy

नंतर अनेक आवडलेल्या प्राण्यांमध्ये जंबो म्हणून हत्तीचे कार्टून कॅरॅक्टर होते ते आवडायचे. सिंबा तर अजून आवडतोच!

पुराणकथांमधली सरमा कुत्रीची कथा तिच्या इमानदारपणाबद्दल विशेष लक्षात राहिली. इंद्राचा ऐरावत हत्ती. दशावतारांतील मत्स्य, कूर्म, वराह अवतार. कालिया, शेष नाग. वैनतेय गरुड. नंदी. कार्तिकेयाचा मोर. गणपतीबाप्पाचा उंदीर. पंचतंत्रातल्या गोष्टी. रशियन लोककथांमधील अस्वले, लांडगे इत्यादी प्राण्यांच्या गोष्टी.

डोरोथीच्या गोष्टीतला भेदरट सिंह. मोगलीच्या गोष्टीतली त्याचा प्रतिपाळ करणारी अस्वले. वेताळाच्या गोष्टीतला वेताळाचा घोडा.....

अकु, मस्त यादी. फँटमच्या घोड्याचं नाव डेविल होतं.

रशियन लोककथांच्यातला 'छोटा कुबडा कुरूप घोडा' ही आठवला.
फ्रॉग प्रिन्सवाला बेडूक.

The Story of the Three Bears मधली अस्वलांची फॅमिली

Pages