लहानपणी आपल्याला सगळ्यात पहिले भेटतात ते काऊ, चिऊ, माऊ आणि भुभु. मग विठुविठु पोपट येतो. 'साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी' करत साळुंकी येते. रामाच्या देवळाला पाच फेर्या मारणारी घार भेटते. ससा, कासव भेटतात ...... हळूहळू हे संग्रहालय वाढायला लागतं.
पण या कोणाला अजून खास नावं आलेली नसतात. टिप्या, मोती अशी जेनेरिक नावं असली तरी त्यांना खास व्यक्तिमत्त्व आलेलं नसतं.
पण मग पुढच्या आयुष्यात एकसेएक सुप्रसिद्ध प्राणी-पक्षी भेटू लागतात. त्यांचं खास वैशिष्ट्य असतं, त्यांना व्यक्तिमत्व असतं आणि/किंवा त्यांनी एखादी लक्षात राहणारी भुमिका तरी बजावलेली असते.
खर्याखुर्या जीवनात किंवा गोष्टींच्या / सिनेमांच्याद्वारे सुप्रसिद्ध झालेल्या पशु-पक्ष्यांबद्दलची माहिती इथे एकत्र करूयात का? वाचताना खूप मजा येईल.
मामी, शिवाजीमहाराजांनी कुत्रा
मामी, शिवाजीमहाराजांनी कुत्रा कधिच पाळला नव्हता. तो त्यांच्या कुत्रा नसून शिवाजी महाराजांची समाधी बांधणार्या होळकरांचा होता. समाधीच्या खर्च करतो पण माझा कुत्राही ठेवा अशी अट होती. पुढे पुस्तकातही वाघ्या आला.
>>> असं आहे का? ओके. धन्स केदार.
'दूध का कर्ज' मधला नाग.
'दूध का कर्ज' मधला नाग.
मेन ईन ब्लॅक - १ मधल व्हिलनच
मेन ईन ब्लॅक - १ मधल व्हिलनच झुरळी एलियन होत ना?
झुरळांची इतक्या सिनेमांतली
झुरळांची इतक्या सिनेमांतली भरीव कामगिरी बघून डोळे भरून आलेत.
life of pie मधले प्राणी ,
life of pie मधले प्राणी , स्पेशली वाघ
लाईफ ऑफ पाय मधला 'रिचर्ड
लाईफ ऑफ पाय मधला 'रिचर्ड पार्कर'
उफ्फ....स्मित_ <<झुरळांची
उफ्फ....स्मित_
<<झुरळांची इतक्या सिनेमांतली भरीव कामगिरी बघून डोळे भरून आलेत.<<
मामी, हिरो-हिरवीणची भेट/ मिलण घडवुन आण्ण्यात झुरळांनी फार म्हत्वाची भुमिका बजावलीये.
नाना पाटेकरचा 'यशवंत' मधला,' एक मच्छर साला.... " डायलॉग चालु शकेल का?
अरे आर्या
अरे आर्या
मक्खी - मधली माशी. हिरो
मक्खी - मधली माशी. हिरो पुनर्जन्म घेतो माशीचा आणि विलनला मारतो.
स्पायडर मॅनमधला 'कोळी' ज्याच्यामुळे पीटर पार्कर स्पायडर मॅन होतो.
झुरळांची इतक्या सिनेमांतली
झुरळांची इतक्या सिनेमांतली भरीव कामगिरी बघून डोळे भरून आलेत. <<< मामी, तुझ्या भरलेल्या डोळ्यांत अजून तीन चार बूँद अॅड कर कारण अशी ही बनवाबनवी मध्ये पण अश्विनीभावेच्या फाईलीत झुरळ असते.
'रिचर्ड पार्कर' >> सुचलच
'रिचर्ड पार्कर' >> सुचलच नाही. सही है.
मक्खी - मधली माशी >> म्या
मक्खी - मधली माशी >> म्या लिव्हल हाय अगुदरच:)
स्मित_ >> क्षमस्व. म्या वाचलच
स्मित_ >> क्षमस्व. म्या वाचलच नाही.
'परिचय' मधले कासव (शिक्षकाला
'परिचय' मधले कासव (शिक्षकाला पळवून लावण्यासाठी अंधारात कासवाच्या पाठीवर मेणबत्ती लावून मास्तराला घाबरवतात ते)
टिव्हीवरच्या कार्टुन्समधली
टिव्हीवरच्या कार्टुन्समधली चालतील काय? मग ओगी मधले झपलु, टपलु आणी मपलु पण चालायला हवेत्.:खोखो:
आणी डोरेमान.
जिम कॉर्बेटचा लाडका शिकारी
जिम कॉर्बेटचा लाडका शिकारी हुत्रा रॉबिन.
क्षमस्व कशाला Angry birds !
क्षमस्व कशाला
Angry birds !
जागु यांच्या पाकृतील सगळे
जागु यांच्या पाकृतील सगळे मासे. विशेषतः 'ढोमा'!!
अप्पु
अप्पु
आर्या-२ सिनेमातला हिरोला जागे
आर्या-२ सिनेमातला हिरोला जागे करणारा मासा,
अधीक माहितीसाठी - http://www.maayboli.com/node/2242?page=10
मादागास्करचं चौकडं : अॅलेक्स
मादागास्करचं चौकडं : अॅलेक्स (सिंह), मेलमन (जिराफ), मार्टी (झेब्रा) आणि ग्लोरिया (पाणघोडी). शिवाय त्यातले हुश्शार पेंग्विन्स, मूर्ख राजा ज्युलिएन (लेमूर).
नार्निआ मधील अस्लान , बिवर
नार्निआ मधील अस्लान , बिवर कपल .
दी घोस्ट अॅन्ड दी डार्क्ननेस मधील आफ्रिकेतील दोन लायन.
चिंमण रावांकडे एक स्वयंपाकीण
चिंमण रावांकडे एक स्वयंपाकीण बाई येतात. त्यांचा एक पोपट असतो असे आठवतेय. नाव नाही आठवत
>>हेच माकड चंकी पांडेच्या
>>हेच माकड चंकी पांडेच्या अजून एकदोन सिनेम्यांत आहे
चंकी पांडे असताना माकड कशाला आणखी? उगाच पैश्याची उधळपट्टी! (चंकीच्या फॅन्सना सॉरी!)
चंकी पांडे असताना माकड कशाला
चंकी पांडे असताना माकड कशाला आणखी? उगाच पैश्याची उधळपट्टी! >>>>
चंकीच्या फॅन्सना सॉरी! >>> चंकीचे फॅन्स अशी जमात अस्तित्वात असते?????
>>चंकीचे फॅन्स अशी जमात
>>चंकीचे फॅन्स अशी जमात अस्तित्वात असते?????
काही वर्षांपूर्वी आमच्या शेजार्यांची मुलगी त्याच्यावर जाम फिदा होती. मग बहुतेक तिला अक्कलदाढ आली असावी
लाइफ ऑफ पाय मधले सगळेच
लाइफ ऑफ पाय मधले सगळेच प्राणी.. वाघ तर खासा !
डिस्नेच्या अजब कार्टून
डिस्नेच्या अजब कार्टून कॅरॅक्टर्स पैकी बग्ज बनी सर्वात आवडायचा मला लहान असताना! आणि डोनाल्ड डक, मिकी माऊस - मिनी माऊस. उन्हाळ्याच्या सुट्टीत दर रविवारी पुण्यात लक्ष्मीनारायण थिएटरला मॉर्निंग शो मध्ये डिस्ने कार्टूनपट दाखवायचे. तेव्हा प्रत्येक रविवाराची आम्ही मुले आसुसून वाट पाहायचो आणि बग्ज बनी ला समोर स्क्रीनवर त्याचे फेमस खिदळणे आणि गाजर खाणे आदी कृती करताना पाहिले की मला अतोनात हसू यायचे...
मी प्र चं ड मोठमोठ्याने हसणार्यांमधील असल्यामुळे आजूबाजूला बसलेली भावंडे माझ्या खुर्चीतल्या खुर्चीत मारलेल्या उसळ्या आणि हसण्याला रोखण्यासाठी माझ्या तोंडावर हात धरून मला खुर्चीत दाबून ठेवायचे!
नंतर अनेक आवडलेल्या प्राण्यांमध्ये जंबो म्हणून हत्तीचे कार्टून कॅरॅक्टर होते ते आवडायचे. सिंबा तर अजून आवडतोच!
पुराणकथांमधली सरमा कुत्रीची कथा तिच्या इमानदारपणाबद्दल विशेष लक्षात राहिली. इंद्राचा ऐरावत हत्ती. दशावतारांतील मत्स्य, कूर्म, वराह अवतार. कालिया, शेष नाग. वैनतेय गरुड. नंदी. कार्तिकेयाचा मोर. गणपतीबाप्पाचा उंदीर. पंचतंत्रातल्या गोष्टी. रशियन लोककथांमधील अस्वले, लांडगे इत्यादी प्राण्यांच्या गोष्टी.
डोरोथीच्या गोष्टीतला भेदरट सिंह. मोगलीच्या गोष्टीतली त्याचा प्रतिपाळ करणारी अस्वले. वेताळाच्या गोष्टीतला वेताळाचा घोडा.....
अकु, मस्त यादी. फँटमच्या
अकु, मस्त यादी. फँटमच्या घोड्याचं नाव डेविल होतं.
रशियन लोककथांच्यातला 'छोटा कुबडा कुरूप घोडा' ही आठवला.
फ्रॉग प्रिन्सवाला बेडूक.
The Story of the Three Bears
The Story of the Three Bears मधली अस्वलांची फॅमिली
Pages