सुप्रसिद्ध पशु-पक्षी

Submitted by मामी on 5 April, 2013 - 01:25

लहानपणी आपल्याला सगळ्यात पहिले भेटतात ते काऊ, चिऊ, माऊ आणि भुभु. मग विठुविठु पोपट येतो. 'साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी' करत साळुंकी येते. रामाच्या देवळाला पाच फेर्‍या मारणारी घार भेटते. ससा, कासव भेटतात ...... हळूहळू हे संग्रहालय वाढायला लागतं.

पण या कोणाला अजून खास नावं आलेली नसतात. टिप्या, मोती अशी जेनेरिक नावं असली तरी त्यांना खास व्यक्तिमत्त्व आलेलं नसतं.

पण मग पुढच्या आयुष्यात एकसेएक सुप्रसिद्ध प्राणी-पक्षी भेटू लागतात. त्यांचं खास वैशिष्ट्य असतं, त्यांना व्यक्तिमत्व असतं आणि/किंवा त्यांनी एखादी लक्षात राहणारी भुमिका तरी बजावलेली असते.

खर्‍याखुर्‍या जीवनात किंवा गोष्टींच्या / सिनेमांच्याद्वारे सुप्रसिद्ध झालेल्या पशु-पक्ष्यांबद्दलची माहिती इथे एकत्र करूयात का? वाचताना खूप मजा येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी,

>> यातलं पिंगू तर एकही वाक्य नसलेलं आणि निखळ आनंद देणारं कार्टून आहे.

इथेच तर नेमका वांधा होतोय आमच्या घरी! Happy आमचे बालक नवनवे शब्द आत्मसात करण्याच्या वयात आहे. तर मध्येच पिंगूसारखे बडबडत बसते. वैताग झालाय हो!

मग काही दिवस त्याचं पिंगूप्रेक्षण बंद ठेवतो! Proud

आ.न.,
-गा.पै.

<<नाग न आठवता झुरळ का आठवलं, हा प्रश्न कृपया विचारू नका! << Rofl

असं कसं...असं कसं! हा नागावर अन्याय आहे. आख्खा शिणुमा ज्यांच्यावर निघतो/ चालतो तो तुम्हाला आठवु नये....

हॅप्पी फीट मधली सगळी पेंग्वीन्स Happy

पेपा पीग आणि त्यातले सगळेच क्युट प्राणी...
अ‍ॅंजलिना बॅलरीना - उंदर...
ऑलिविया - डुकरं...

लाजो, हीच्च सगळी नांव लिहायला आले होते!

सध्या पेपा आणि ऑलिविया या दोघींनी आमच्याकडे ठाण मांडला आहे. अँजलिना पण येतेच मधुन मधुन!

दाद, धन्यवाद! कालही वानुचा उल्लेख वाचला होता पण नक्की कोण ते समजले नव्हते. तू दिलेल्या लिंकमुळे समजले. आता सगळे लेख वाचते.

वत्सला Happy

आमच्याकडे पेपा च्या डिव्हीडींची पारायणं असतात..... Lol

अजुनही बरेच अ‍ॅड आहेत प्राणी इ इ -

शॉन द शीप,
टीमी - शीप,
बझ बी,
गॅस्पर्ड अँड लिसा - ससे,
सेसमी स्ट्रीट मधले प्राणी,
गीगल आणि हूट आणि हूटाबेल - घुबडं
बनानाज इन पजामाज मधले प्राणी

हाथी मेरे साथी मधला .......राजेश खन्ना

तेरे मेहेरबानिया मधला........जॅकि श्रॉफ

आंखे मधले....................चंकी पांडे आणि गोविंदा

निगाहे मधला.................सन्नी देओल

फुंक मधला....................राजपाल यादव

बॅटमॅन मधला................जोकर

डॉक्टर डुलिटील मधला ........डॉक्टर
.
.
बरेच आहेत........ आठवल्यावर लिहितो

पेशवे पार्क मधील अनारकली हत्तीण व सुमित्रा हत्तीण आठवतात का कुणाला? मी लहानपणी बहुतेक सुमित्रेच्या पाठीवर बसून पेशवे पार्काची सफर केली होती.
बाकी 'पेशव्यां'च्या पार्कात 'अनारकली' म्हणजे साक्षात् ऐतिहासिक गडबडघोटाळा! Proud

डॉ. प्रकाश आमट्यांकडचं नेगल व नेगली हे, मराठी समजणारं बिबट्यांचं जोडपं, माकडाच्या पिल्लाला पाठीवर बसवून हिंडणारा कुत्रा, अनेक भाषा बोलणारी व निरोप पोचते करणारी मैना, इयत्ता तिसरीपर्यंत शिकलेला पँथर मुन्ना, राणी अस्वल हे व असे अनेक, आमटे कुटूंबीयांचे जीवश्च्च प्राणी मैतर-- खूप धमाल आणि चकित करणार्‍या आहेत त्यांच्या कथा. वाचा -- नेगल -- भाग १ व २ -- लेखक - विलास मनोहर

मिस्टर ब्रिगल्सवर्थ अर्थात ऑस्टिन पॉवर्स मधील बिनकेसांचं मांजर.

mrbigglesworth[1].jpg

अधिक माहितीसाठी हा इंग्रजी दुवा पहा : http://austinpowers.wikia.com/wiki/Mr._Bigglesworth

-गा.पै.

हाथी मेरे साथी मधला .......राजेश खन्ना

तेरे मेहेरबानिया मधला........जॅकि श्रॉफ

आंखे मधले....................चंकी पांडे आणि गोविंदा

निगाहे मधला.................सन्नी देओल

फुंक मधला....................राजपाल यादव

बॅटमॅन मधला................जोकर

डॉक्टर डुलिटील मधला ........डॉक्टर
.
.
बरेच आहेत........ आठवल्यावर लिहितो

हे प्राणी आहेत का ?

गामा,

तुम्ही केलेल्या सुचनेनुसार शीर्षकात 'सुप्रसिध्द'चं 'सुप्रसिद्ध' केलं आहे. धन्यवाद. Happy

ट्विटी, ओसवाल्ड ऑक्टोपस, त्याचं विनी नावाचं कुत्रं आणि हेन्री नावाचा पेंग्विन दोस्त

किंग कॉन्ग मधला गोरिला, अ‍ॅनाकोन्डा मधला विशालकाय साप, जुन्या काळी डीडीवर एक फिल्म लागायची त्यातला स्विम्मी मासा, व्होडाफोनचा पग

बापरे किती हे प्राणीमित्र आणि रंजक माहिती ! मजा येतेय.
माझ्याकडून हा इनपुट- Marjorie Kinnan Rawlings च्या 'The Yearling'
या अमेरिकन कादंबरीत एक वनजीवनाच्या तपशीलांनी समृद्ध पण शोकान्त प्रवास रेखाटलाय बाळवयातून समज येण्यापर्यंतच्या एका जगावेगळ्या मनोबंधनाचा -लहानगा ज्योडी अन त्याने पाळलेले एक पाडस.. आपल्या राम पटवर्धनांनी 'पाडस ' या नावाने तोलामोलाने अनुवादलीय ही भावश्रीमंत कादंबरी.सिनेमाही आहे वाटतं या कादंबरीवर.

आणि माझ्या मराठी कवितांच्या जगात 'नळदमयंती आख्याना'तला नळराजाच्या प्रेमाची मध्यस्थी
दमयंतीकडे करणारा सुवर्ण राजहंस,रघुनाथ पंडितांनी चितारलेला..
राजाने पकडल्यावर मनुष्यवाणीने त्याला 'मला सोड, मी तुझ्या कामाला येईन ' असे विनवणारा..राजाची कानउघाडणीही करणारा.. Happy

''जागजागी आहेत वीर कोटी ,भले झुंजारही शक्ती जयां मोठी
तया माराया धैर्य धरी पोटी,पाखरू हे मारणे बुद्धी खोटी !
वधुन माझी ही कनकरूप काया,कटकमुकुटादिक भूषणे कराया
कशी आशा उपजली तुला राया ? काय नाही तूजला दयामाया ?! "

शिवाजी महारांजाचे सरदार तानाजी घोरपडे यांना कोंडाना किल्याची कडा चढुन जायाला मदत करणारी.... "यशवंती" नावाची घोरपड..... तिचं नाव पोवाड्यात नेहमी येत असतं....

लहान असताना, कुठल्यातरी कारणाने, फर्ग्युसन कॉलेज च्या अ‍ॅम्फी थिएटर मधे 'Born Free' नावाचा इंग्रजी सिनेमा पाहिला होता. बहुदा true story असावी. त्यातली 'एल्सा' सिंहीण कायम लक्षात राहिली. अजुन कुणी पाहिलाय का हा सिनेमा?

रामायणात सेतुबंधनाच्या कामी मदत करणारी खार

कार्टून केरेक्टर - गार्फिल्ड - गलेलट्ठ मनिमाऊ
१०१ डाल्मेशियन्स मधले डाल्मेशियन कुत्रे, त्यातलेच सार्जंट आणि कर्नल - घोडा व कुत्रा
रामसे फिल्ममधली वटवाघुळे व घुबडे

Pages