मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादर टीटी (खोदादाद सर्कल ) मधे जो मोठा खांब लावला त्याचे दिवे फिलिप्सने पुरवले होते. त्या डिलरचा मुलगा माझा मित्र. त्याचा उजेड कित्ती छान पडतो ते बघायला आम्ही कॉलेज सुटल्यावर बराच वेळ तिथे थांबलो होतो.

त्याचकाळात मी आर्टिकलशिप चर्नीरोडला करत होतो. माटुंगा ते दादर असे रेल्वेने जाण्यापेक्षा आम्ही काही मित्र मिळून हिंदु कॉलनीतून चालत जाऊन टिळक ब्रिज असे करत वेस्टर्न दादर स्टेशनला जात असू,

राजा शिवाजी विद्यालयातली छोटी छोटी मूले आपली बस पकडण्याच्या नादात आमच्या पायात अडकत. ती मुले आपली बस कशी ओळखतात याचे नवलच वाटे.

पुढे ताराबाई मोड्क अध्यापक विद्यालय होते. तिथे पण आम्हाला गडबड ऐकू यायची. त्यावेळची आमची प्रतिक्रिया, यांच्या बाई यांना म्हणत असतील, मुलींनो तूम्हीच एवढी गडबड करता आहात तर उद्या तूमचा वर्ग कसा शांत राखाल ?

त्या वयातही आम्हाला तिथे विकायला असणारी करमळे, बोरे, शिंगाडे यांचे आकर्षण होते. पण तो रस्ता त्या काळात खुप शांत आणि निवांत होता.

<< कुठे फेडेल हे पाप तो? मोक्ष नाही हो मिळायचा त्याला.>> नाहीं,तसं नाही होणार; कारण,माझ्या मुलीला हा किस्सा मीं सांगितला तेंव्हा तिची प्रतिक्रिया होती ," बाबा, उशीर झाला तर आमचं लेक्चर चुकेल याचं त्या चालकाना वाईट वाटायचं; पण ज्येष्ठ नागरिकाना उशीर झाला तर दुसर्‍या कुणावरचं तरी लेक्चर ऐकायचं संकट टळेल, हा उदात्त हेतू असणार त्यांचा !" Wink

भाऊ , आपल्या मुलीच उत्तर आवडलं हं.
ती ही हुशार , हजरजबाबी आणि आपल्यासारखी विनोद बुद्धी जागरुक असलेली वाटतेय.

भाऊ mumling.gif

मुंबईतील काही ठिकाण त्यांच्या टोपण नावानेच इतकी प्रसिद्ध आहेत की त्यांची मुळ नावे लोकांच्या लक्षातही नाहीत. त्यातीलच एक म्हणजे 'मंचेरजी जोशी' मैदान.

'खोदादाद सर्कल' हे बेस्टच्या कृपेने लक्षात राहिलेल नाव.

हे आधी लिहिलंय का कुणी मला माहित नाही, पण वाचण्यांत नाही आलं म्हणून सांगते, सी.एस.टी. स्टेशनात तळ मजल्यावर मध्य रेल्वेने एक म्युझिअम तयार केला आहे. सोमवार ते शुक्रवार दुपारी ३ ते संध्याकाळी ७ पर्यंत व बैंक हॉलिडे नसतांना सर्वांसाठी खुला असतो. (अर्थात सशुल्क)रेल्वेने चालू केलेला एक स्तुत्य उपक्रम असे म्हणावेसे वाटते. रेल्वेचा स्टाफ फार चांगली माहिती देत आपल्याला हे संग्रहालय दाखवतो. इथे सी.एस.टी. स्टेशनचे मॉडेल,जुन्या ट्रेन्सची मॉडेल्स वगैरे आहेत. स्टेशन कसे बांधण्यात आले, कोणी जमिनी दिल्या, किती वर्षे लागली,त्याचे स्थापत्य, वापरलेल्या दगड, विटा इ. ची तपशीलवार माहिती आपल्याला सगळी बिल्डींग फिरुन दाखवत सांगितली जाते.
मी माझ्या मुलाला घेऊन गेले होते. मराठी, हिन्दी, इंग्लिश अशा तीन भाषांत माहिती दिली जाते. ही बिल्डींग तिच्या बांधकामातील मोघलाई, ब्रिटीश शिल्पकाम, ग्लास पेंटिंग अशा बारकाव्यांसकट बघणे हा अनुभव खूप चांगला आहे. पूर्वी वरती जाऊ देत नसत मात्र आता या म्युझिअमच्या निमित्ताने सर्व काही जवळून बघता येते, तो सुप्रसिद्ध घुमटही.

फेसबुक वर मिळालेला फोटो...
फुलमार्केट कडून दादर स्थानका कडे जाणारा Foot Over Bridge.. १९३९ ते १९४५ च्या काळातील फोटो...

Dadar Stn.jpg

इंद्रधनुष्य, प्रचिबद्दल धन्यवाद! Happy माझ्या माहीतीप्रमाणे हा पादचारी पूल अगदी १९९० पर्यंत वापरात होता.
आ.न.,
-गा.पै.

गा. पै... हा पुल अजुनही वापरात आहे... वसईचे फेरीवाले बसतात त्या पुलावर भाजी आणि फुल विकायला.

त्याच्या समोरच ९०च्या दशकात एक पायर्‍यांचा नविन पुल बांधण्यात आला.

माटुंगा ते दादर असे रेल्वेने जाण्यापेक्षा आम्ही काही मित्र मिळून हिंदु कॉलनीतून चालत जाऊन टिळक ब्रिज असे करत वेस्टर्न दादर स्टेशनला जात असू,

राजा शिवाजी विद्यालयातली छोटी छोटी मूले आपली बस पकडण्याच्या नादात आमच्या पायात अडकत. ती मुले आपली बस कशी ओळखतात याचे नवलच वाटे.
>>>>>>>

मग त्यात मी पण एक असेल,
एक दोन तीन चार, राजा शिवाजीची पोरे हुशार Wink
तो हिंदू कॉलनी परिसर खरेच शांत निवांत, आज शाळेबरोबरच त्यालाही बरेच मिस करतो. तरी वीजेटीआयमुळे कॉलेजही तिथेच आणि तश्याच (फाईव्ह गार्डन) परिसरात झाले. दादर माटुंग्यासारख्या मध्यवर्ती भागात आजही तो परिसर शांतता टिकवून आहे हे विशेष. तसेच तेथील रस्त्याच्या दुतर्फा असलेली आणि एकंदरच परिसरातील झाडांची घनताही उल्लेखनीय.

सामी,
सायन सर्कल वरून डाविकडे जो रस्ता चुनाभट्टी स्टेशन कडे जातो त्या रस्तावर शिरल्या बरोबर......
>>>>>>>>>>

या पुरातन शिवमंदिराकडे चुनाभट्टी स्टेशनवरूनही मग जाता येत असेल ना? कुठून बाहेर पडायचे आणि किती वेळ चालायचे हे सांग ना. कामात येईल हि माहिती कधीतरी, बायको शिवभक्त आहे.

अभिषेक चुनाभट्टी स्टेशनपासून सायनच्या दिशेला सरळ चालत ८-१० मिनिटात डावीकडे हे पुरातन शिव मन्दीर लगते तळेही आहे तिथे.

आशिका, ते तळे मधे साफही केले होते, पण आता परत खराब झाल्याचे दिसते. डंकन कॉजवे म्हणजे तोच भाग ना ?

अभिषेक.. नक्कीच असणार. त्याच काळात हिंदु कॉलनीतल्या इमारतींवर मजले चढवायचे काम सुरु झाले.
त्याच भागात दिलिप वेंगसरकरचे पण घर होते ना ? मला बारावीला तूमची शाळा सेंटर होते आणि नेमकी त्याच काळात ती जंगली बदामाची झाडे फुलली होती... भयाण वास त्याचा !

पोस्टाजवळ भरभरून फुलणारे एक कदंबाचे झाडही होते.

चुनाभट्ती ते शिव मन्दिर खुप शान्त रोड आहे. आपण मुम्बैत आहोत असे वाटु नये इतके शान्त आहे तिथे. सायन आणि चु भ दोन्ही स्टेश्नापासुन ते मन्दिर आलमोस्ट सारख्याच अन्तरावर आहे.

या पुरातन शिवमंदिराकडे चुनाभट्टी स्टेशनवरूनही मग जाता येत असेल ना? कुठून बाहेर पडायचे आणि किती वेळ चालायचे हे सांग ना. कामात येईल हि माहिती कधीतरी, बायको शिवभक्त आहे. > चुनाभट्टी स्टेशनवरून रमत गमत जाता ये ईल. शांत रस्ता आहे. बायकोला वाशी च्या शिव मंदिरात घेऊन गेलास का? टोल्नाका क्रॉस केल्यावर डावीकडे लागते. खूप छान आहे मंदीर.

पहिला फोटो फेसबूकवरून साभार,
यात एक इमारत दिसतेय, शाळा मैदानाच्या चारही बाजूने पसरली आहे.

school 1.jpgदुसरा फोटो - छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचा जी आमच्यावेळीच स्थापन केली होती. नक्की साल गूगाळायला लागेल, साधारण ९०-९२ धरून चाला. मात्र हा फोटो मी चारेक वर्षांपूर्वी बायकोला (तेव्हाच्या मैत्रीणीला) "माझी शाळा" दाखवायला घेऊन गेलेलो तेव्हा काढलेला आहे. (सोबत आमच्या वर्गात जाऊन लाकडी बेंचवर बसून आमीर खान स्टाईल पण एक फोटो काढून घेतला, पण तो इथे नको Wink )

school 2 raja shivaji statue.jpg

दिनेशदा, दिलीप वेंगसरकर आमच्याच शाळेचा. Happy
शाळेने सुद्धा दोन वर्षांपूर्वीच शतक मारले आहे. Happy

बायकोला वाशी च्या शिव मंदिरात घेऊन गेलास का?
>>>>
खरे तर मंदिरात मी तिला नाही ती मला नेते. ईतर मंदिरांत मला बाहेर उभे राहायची परवानगी असते पण शिवमंदीर म्हटले की हट्टाने आत नेऊन हात जोडायला लावते. वाशी, माझगाव, वा जिथे आमची पोहोच आहे वा मी आळस नाही करणार तिथपर्यंतचे शक्य तितके शिवमंदिर दर्शन घेऊन झालेत. असो, इथे नक्की तिला घेऊन जाईन. कारण तिला शिवमंदीरात ते ही एखाद्या नव्या, घेऊन जाणे इक्विवॅलेंट टू पाच-दहा हजारांची शॉपिंग आहे. आणि चुनाभट्टी स्टेशन आम्हाला ऑन द वे आहे त्यामुळे जमून जाईल. Happy

अभिषेक तो आमच्या पोद्दार कॉलेजचा पण बरं का ! झालंच तर फारुख इंजिनीयर, रविशंकर शास्त्री पण. शिवाय शिल्पा शेट्टी पण !

त्यावेळी पोद्दारच्या समोरच्या मैदानावर अतिक्रमणे झालेली नव्हती. रुईया आणि पोद्दार मधे गॅप होती. आता वेलिंगकर आहे तिथे प्राचार्यांचा बंगला होता. कॅफे गुलशन खरेच इराणी होतं.
मद्रासी मुले मराठी पदार्थ खायला जयेश मिल्क बार मधे जात तर मराठी मुले मद्रासी पदार्थ खायला मणिज मधे जात.

मणिज तर तेव्हा आमचाही अड्डा. शाळेत असतानाचा. अर्थात स्कूल पॉकेटमनीचा विचार करता महिन्यातून फार तर दोन वेळाच शक्य व्हायचे, ज्याला पार्टी म्हटले जायचे. पण तरीही ईतर हॉटेलांच्या तुलनेत ते स्वस्त होते. खास करून सांबार कितीही वेळा आणि हसतमुखाने मिळायचे. विशेष म्हणजे चव होती त्याला. अन्यथा पाणचट चवीचे बनवून कितीही घ्या फ्री मध्ये असा आव नसायचा. सध्याचे काही माहीत नाही, मध्यंतरी बायकोला तिथे घेऊन गेलेलो तेव्हा दुर्दैवाने बंद होते.

@ मुंबईचे जुने फोटो,

माझ्याकडे एक मेल होता, शोधल्यावर सापडेल लगेच, त्यात मुंबईचे काही जुने मस्त फोटो होते. कोणाला हवे असल्यास मेल आय डी द्या किंवा शक्य झाल्यास इथे टाकता येईल का बघतो. जवळपास वीस-पंचवीस असावेत. या धाग्यात ते या आधी आलेत की नाही याचीही कल्पना नाही, ते ही बघावे लागेल.

अभिषेक, तूला वाचायला मजा वाटेल.
माझा शाळेचा पॉकेटमनी दिवसाला एक रुपया. सुमन नगर ते रुईया कॉलेज बस भाडे चाळीस पैसे.. जाताना किंग्ज सर्कल पर्यंत चालत जाऊन बस पकडायची.. किंग्ज सर्कल ते सुमन नगर बस भाडे पंचवीस पैसे.. वाचले वट्ट पस्तीस पैसे.. तेवढ्यात एक प्लेट इडली / वडा सांबार यायचा राव ! ( १९७७ चे दर )

माझे वडील १९५० च्या दरम्यान मुंबईत आले आणि हिंदू कॉलनीत त्यांच्या आत्येभावाकडे राहिले.. त्यावेळी देखील मणिज त्यांचे फेव्हरिट होते...

आता ज्यांचा फोटो तिथे लावलाय.. ते माझ्या काळात गल्ल्यावर असायचे.

१९५० ?? बापरे, एवढे जुने आहे ते मणीज, भारी आहे.
बाकी जुन्या किंमती आठवण्याची गंमत असतेच, तुमच्या काळातले ऐकूनच नाही तर स्वताच्याही बालपणातील आठवले की गंमत वाटते.

नव्वदीच्या सुरुवातीच्या दशकात बराच काळ शाळेच्या बाहेर गाडीवर मिळणारा वडापाव हा दोन रुपयालाच स्थिर होता. माझ्या पॉकेटमनीनुसार बसभाडे वगळता तीन ते चार रुपये खायला मिळायचे. तसेच पन्नास पैसे आपल्यासारखेच थोडा रस्ता मित्रांबरोबर चालून बसच्या तिकिटातून वाचवायचो. हि बचत म्हणजे आपली शाळकरी मुलांची कष्टाची कमाईच असते जणू Wink तर या तीन चार रुपयांपेक्षा तेव्हा मणीजचे वडासांबार नक्कीच महाग होते एवढे नक्की. त्यामुळे दोन रुपयाचा वडापाव, आठ आण्याचा गोळा किंवा एक रुपयाचा चम्मच असले प्रकार खाल्यानंतर जी रोजची थोडीफार बचत व्हायची त्यानुसार मग मणीजचा रस्ता धरला जायचा. अर्थात आमचे शाळेचे कँटीनही खूप मस्त होते. खास करून तिथला हॉटडॉग खूप टेस्टी आणि फेमस. तेव्हा पाच रुपयांना असावा तो. त्यामुळे त्याचाही नंबर असायचा. तसेच कँटीनची बटाटावडाप्लेट आणि कॉफी हे प्रकरणही सहा-सात रुपयांना जायचे. पण कॉफी पिताना काहीतरी स्टायलिश गोष्ट करतोय याचाच आनंद फार.
बाकी कधीतरी घरून बोनस पॉकेटमनी म्हणून पाच-दहा रुपयांची नोट सरकवली जायची, मात्र स्वताहून मागायची पद्धत नव्हती. त्यामुळे केलेल्या बचतीची किंमतही अबाधित राहायची. Happy

हे सर्व फोटो काही वर्षांपुर्वी लोकसत्तामध्ये आले होते. चुकत नसेन तर दर रविवारी एक फोटो यायचा.

Pages