मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< वसई तालुक्यात सुद्धा दादर नावाचे एक ठिकाण आहे. >> रायगड जिल्ह्यातही धरमतर खाडीवर एक मोठं बेट आहे, 'दादर' नांवाचंच !

भाउ,
दादरा- नगरहवेली मधले दादरासुद्धा या अर्थानेच आले असावे. सध्या जरी खडकाळ आणि जलहीन दमणगंगेमुळे ही जागा भूमिव्याप्त दिसत असली तरी एके काळी खाडीमुखाशी उथळ समुद्रकिनार्‍याचा तो एक भाग असावा.

दिनेश.. काय हो.. कसले नोस्टाल्जिक केलेत तुम्ही.. झारापकर दुकान्(टिळक ब्रिजच्या खाली..जरा पुढे.. त्याच बिल्डिंगमधे पिंगेज क्लासेस पण सुरुवातीला होते), सामंत लोणीवाले,मंजु बटाटावडा वाला व बेडेकर मसाले व उटण्याचे दुकान.. ही नाव घेउन..

मी दादरचाच.. माझ्या घराच्या आजुबाजुची ही सगळी दुकाने व ठिकाणे.. माझे शाळेतले व लहानपणचे दिवस आठ्वले हे सगळे ऐकुन.

निर्मला.. हो .. साळगावकरांचे लोण्याचे दुकान मला पण आठवत नाही. पण सामंतांच्याच बाजुला शंभु लोणीवाला मात्र होता. दसर्‍याला त्या २ दुकानात चक्का घ्यायला ही गर्दी असायची. कोइमतुरचे लोणी आठवत नाही पण त्यांच्याकडे खानदेशी व बेळगावचे असे दोन प्रकारचे लोणी मिळायचे हे आठवते.

साळगावकरांचे गोदरेज कपाटांचे दुकान मात्र आठवते.. गोखले रोड वर.. आर के बिल्डिंग च्या खाली.

छबिलदास शाळेच्या समोर.. मंजुच्या(श्रिक्रुष्ण) बटाटावड्याच्या बाजुलाच आयडियल नावाचे पुस्तकांचे दुकान होते.. ३ गाळ्यांचे..

तसच २ पणशिकरांची दुकाने.. एक विसावासमोर.. व एक अगदी दादर(वेस्ट) स्टेशनसमोर.. दोन्हीकडे उपासाचे पदार्थ ,पेढे व खव्याची मिठाई मस्त मिळायची व पियुषही! तेव्हा दहावी(पुर्विचे एस एस सी) पास झाल्यावर पेढे वाटायची पद्धत होती.. पणशिकरांकडुनच आमच्या घरातले सगळे पेढे आणले गेले होते.

आणी रानडे रोडवर..कोहिनुर थिएटरसमोर्(थिएटर जाउन आता मॉल आला आहे तिथे) एका अगदी निमुळत्या दुकानात श्रिक्रुष्ण लस्सीवाल्याची अमृततुल्य लस्सी मिळायची.

न चि केळकर रोड, एस के बोले रोड व भवानी शंकर रोड या ३ रस्त्यांच्या संगमावर.. अँटोनियो डिसिल्व्हा शाळेसमोर.. मारुतीचे देउळ होते व त्याच्याच समोर विसावाच्या जरा बाजुला... कबुतरखाना व एक मशीद होती.

मुकुंद,

तुम्ही किती वर्ष दादरला आला नाही ते माहित नाही. पण तुम्ही वर उल्लेखलेली सर्व ठिकाणे अजुनही आहेत. फक्त सामंत आणि शंभू लोणीवाला ह्या दोन दुकानांबद्दल माहिती करावी लागेल.

दादरमध्ये पणशीकरांची दोन नाही तर तीन दुकाने आहेत दोघांचा उल्लेख तुम्ही आधीच केला आहे. तिसरे दुकान रानडे रोडवर आहे.

नरेश.. दादर कायमचे सोडुन ३० वर्षे झाली पण ५ वर्षापुर्वी धावती भेट झाली होती..:(

सामंत व शंभु लोणीवाले.. तुळशीपाइप रस्त्यावर.. दादर स्टेशनच्या जरा पुढे.. पण टिळक ब्रिजच्या जरा आधी.. तिथे होते.

त्याच रस्त्यावर.. थोडे पुढे गेले की छबिलदास मुलींची शाळा व अजुन पुढे गेले की सरस्वती विद्यामंदिर व थोडे पुढे..माटुंगा स्टेशनच्या जरा आधी .. रुपारेल कॉलेज.

बाय दे वे.. माझ्या बालमोहन शाळेत जाण्याच्या रस्त्यावर.. शिवाजी पार्कच्या जवळ... सेनापती बापटांचा पुतळा होता.. आहे का अजुन तो?

आणी हे तिसरे पणशिकरांचे दुकान रानडे रोडवर कुठे आहे?आणी रानडे रोडवरच्या भंडारी हॉलमधे गुणवंत मांजरेकरांचे दिवाळीमधे.. रांगोळी प्रदर्शन अजुनही भरते का?

मुकुंद, मला सामंतांचे दुकान माहित आहे पण आता ते अजुन सुरू आहे की नाही याची खातरजमा करावी लागेल.

सेनापती बापटांचा पुतळा अजुनही आहे. पणशीकरांचे तिसरे दुकान पोपटवाला बिल्डींगच्या समोरील बाजुस आहे. रांगोळी प्रदर्शनाबद्दल मला माहिती नाही.

सेनापती बापटांचा पुतळा होता.. आहे का अजुन तो?>>> आहे की हो... तो कुठे जात नाही बघा! शान आहे ती दादरची.

सामंत आहेत, शंभू आता नाही.

पणशीकर तीन-चार आहेत. एक खुद्द रानडे रोडवर पोपटलाल बिल्डिंगच्या समोर. एक साळगावकर दुकानाच्या लायनीत, पोर्तुगीज चर्चच्या दिशेने. सचिन हॉटेलच्या थोडं पुढे. आणि तिसरे पणशीकर सिटी लाईटला आहेत. तिन्ही दुकानांची नावं सारखी आहेत, पण ती हॉटेल साखळी नाहीये.
विसावाच्यासमोर मामा काणे आणि तांबे आरोग्य भवन ना? तिकडे पुर्वी पणशीकर होते?
पणशीकरांची ही वेबसाईट बघा.
हे दादरवाले
आणि हे गिरगाववाले

मुकुंद दादा, अजूनही सगळे तसेच आहे दादर मध्ये अगदी शाळा आणि बापटपुतळ्यासह ! राम गणेश गडकरी पुतळा देखील अजूनही त्या कोपऱ्यावर आहे !
फक्त छबिलदास मुलींची शाळा आता त्या रस्त्यावर नाही

मंजूडी, तुम्ही जे साळगावकर दुकानाच्या लायनीत, पोर्तुगीज चर्चच्या दिशेने सचिन हॉटेलच्या थोडं पुढे म्हणत आहात ते दुकान पणशीकरांचे नसून त्याचे नाव आहे प्रकाश दुग्धालय आम्ही त्याला छोटा प्रकाश म्हणतो. विसावा हॉटेलच्या समोर तांबे आरोग्य भुवन आणि पणशीकर आहेत. मामा काणे दादर स्टेशनच्या समोर.

हां... हो बरोबर नरेश, प्रकाशच ते..
वरती बदलते.
सिटीलाईटच्यासमोर नक्की कुठलं आहे ते तिकडे मुद्दाम जाऊन बघायला लागेल.

आस्वाद सुरू व्हायच्या आधी दादर-शिवाजी पार्क भागात ही दोन-तीन मराठी हॉटेलं होती. आस्वादने सगळ्यांवर मात केली. आणि प्रकाश त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून स्पर्धेत उभं राहिलं. दत्तात्रय थाळीसाठी फेमस होतं, पण आता ते बंद झालं.
बाकी ही दोन दुकानं अजून चालू आहेत, पण आस्वाद-प्रकाशएवढा धंदा तेजीत नाही त्यांचा. रानडेरोडवाले पणशीकरही मिठाईमुळे टिकून राहिलेत. पण ते दुकान आहे, आणि प्रकाश-आस्वाद ही हॉटेलं आहेत.

साबुदाणा वडा हवा असेल तर प्रकाशकडून आणायचा, पण बटाटापुरी (ह्यातही साबुदाणा असतोच) खायची असेल तर ती ह्या प्रकाश दुग्धालयातून आणायची असं आमचं ठरलेलं असायचं. ही बटाटापुरी चपटी असल्याने मस्त कुरकुरीत असायची. पण दाण्याची चटणी मात्र फक्त प्रकाशचीच! त्याला कश्शाचीच सर नाही.

मंजु.. कशी आहेस? अग हे सगळे दादरचे वाचुन शाळेचे दिवस आठ्वले..(आपल्या कँटीनचा बटाटवडासुद्धा!:) ) बापुसाहेब रेगे निधन पावले असे मधे कोणीतरी सांगीतले. पण बापुसाहेब व बाळासाहेब.. हे दोघेही दादांसमोर जरा कमीच पडले असे मला वाटते.. दादांसारखा मुख्याध्यापक मला १० वर्षे लाभला हे मी माझे भाग्य समजतो.असो!

पोपटवाला बिल्डिंग्..पोर्तुगि़ज चर्च.. सिटीलाइट् थिएटर्(अजुन आहे? मला वाटले की ते केव्हाच गेले!).. हे सगळे वाचुन आत्ताच दादरला यावे असे वाटु लागले आहे.

अग मागच्या वेळेला आलो तेव्हा मुंबई प्रचंड बदललेली वाटली.. जुने लँडमार्क्स जाउन सगळीकडे नविन बांधकामे व टोलेजंग बिल्डिंग्स!.. एल्फिस्टनची फिनिक्स कपड्याची गिरणी जाउन तिथे पॉश फिनिक्स मॉल!

म्हणुन म्हटले त्या सगळ्या बदलामधे सेनापती बापटांचा पुतळा वाचला आहे की नाही.. Sad

साबुदाणा वडा हवा असेल तर प्रकाशकडून आणायचा, पण बटाटापुरी (ह्यातही साबुदाणा असतोच) खायची असेल तर ती ह्या प्रकाश दुग्धालयातून आणायची असं आमचं ठरलेलं असायचं. >>>>>१००% अनुमोदन.
मंजूडी, हे वाक्य मी वरती लिहीणारच होतो. साबुदाणा पुरी आणि एक्स्ट्रा चटणी असा माझा मामला असतो.

मुकुंद, तुम्ही म्हणता ते खरे आहे एलफिस्टन, लोअर परळ, लालबाग हा विभाग गेल्या दहा वर्षात अमुलाग्र बदलून गेला आहे. पण अजुन दादरमध्ये तेव्हढे बदल झाले नाहीत पण हळूहळू दादरमध्ये सुध्दा टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. अजुन दहा वर्षांनी काय बदल होतील ते परमेश्वरच जाणे.

हो मुकुंद... बापूसर गेले Sad

मी पाचवीत असेपर्यंत ते मुख्याध्यापक होते. नंतर कित्येक मुख्याध्यापक बदलले. शाळाच बदलली.

सिटीलाईट थिएटर आता नव्याने बांधलंय.
बादल-बिजली-बरखाही नव्याने बांधून कित्येक वर्ष झाली.

आपल्या कँटीनचा बटाटवडासुद्धा! >> आणि चटणी सामोश्यासोबतची I miss it ! Sad
तृप्ती हॉटेल आणि आदर्श दोन्ही दर्जा टिकवून आहेत परंतु मरणाची गर्दी !

बापूसर आणि बाळसर दोघेही गेले Sad

लीलावती.. आपली शाळा जर दादरमधुन गेली तर दॅट विल बी अ बिग शॉक अँड व्हेरी बिग कल्चरल लॉस..:(

राम गणेश गडकरी .. यांचा मिशीवाला व टोपी असलेला अर्धा पुतळा .. शिवाजी पार्कच्या एका एंट्रेंसवर.. अजुनही आठवतो.

शिवाजी पार्क व आपली शाळा यांचे एक अतुट नाते आहे.. आम्ही शनिवारच्या कवायतीला(तेव्हा शनिवारी सकाळी ७ ३० ते १० ४५ अशी शाळेची वेळ असायची) व ८वी ९ वी व १० वीच्या खेळाच्या तासाला.. शिवाजी पार्कमधेच जायचो. संदिप पाटील मला तसा बराच सिनिअर.. पण त्याला, नितीन सांगळेला व शशांक प्रधानला.. आपल्या शाळेच्या टीमला हॅरीस शिल्डच्या मॅचेस जिंकुन देताना.. शिवाजी पार्कवर खुप वेळा पाहीले आहे.

तसेच आपल्या शाळेच्या बालदिनाच्या दिवशी.. शिवाजी पार्कच्या अवती भवती असलेल्या रस्त्यावरुन होणार्‍या प्रभातफेर्‍या सुद्धा आठ्वतात.. घोषणा देत..:)

हो. अहो - जाहो करू नका मी खूपच लहान आहे वयाने.
आदर्श म्हणजे रानडे रोडवरच पण बेडेकर च्या दुकानाच्य लाईनीत. भाजी मार्केटच्या समोर.

आयडियल नावाचे पुस्तकांचे दुकान होते.. ३ गाळ्यांचे.. >> आता मागे सुद्धा २ गाळे आहेत.
एका अगदी निमुळत्या दुकानात श्रिक्रुष्ण लस्सीवाल्याची अमृततुल्य लस्सी मिळायची. >> आहे तो अजुनही..

मंजू .. हे माहीत नव्हते. शिक्षण महर्षी ही पदवी मात्र दादांना अगदी शोभुन दिसते! हाडाचे शिक्षक होते ते.. अतिशय प्रेमळ.. आपल्या शाळेच्या सभाग्रुहातले( तिथला मोठा सरस्वतीचा बॅकड्रॉप असलेला पडदा आठवतो का?)त्यांचे प्रत्येक भाषण.. बाळांनो.. ... या शब्दानेच सुरु व्हायचे..

हे.. मंजु व लिलावती.. आपला बालमोहनचा धागा वर आणा की.. तिथे बोलु शकु आपल्या शाळेच्या आठवणी. मागे १०-११ वर्षांपुर्वी स्वप्ना, अरुण्,सानिका,मी व साथी.. असे सगळे नियमीत बोलायचो त्या धाग्यावर.

इंद्रधनुष्य... तुही दादरचाच! Happy

रानडे रोडवरचं पणशीकर बंद झालं ना बहुतेक? त्यांच्याकडे काजू बर्फी मिळायची. आणि साखरवाले पेढे. आम्ही रवावालेच म्हणायचो. आदर्शची कोथिंबीर वडी. आहा!

पणशीकर (समर्थ दुग्धालय) चालू आहे. तिथली केशर बर्फी आमची फेवरेट.

मी आमची लिहिते तिथे सर्व ठिकाणी आमच्या कुटुंबाची असं वाचणे. मुंबईभरची सगळी खाऊगिरीची ठिकाणं माझ्या बाबांनी दाखवलेली आहेत.

ओ के, मला कोहिनूरच्या सिग्नलजवळ्चं म्हणायचं होतं. आडव्या रस्त्यावर. आता काहीतरी ज्वेलरी शॉप आहे बहुतेक.

Pages