मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ... काय बोलू... शब्द सापडत नाहीत... महालक्ष्मी रेसकोर्स बद्दल फक्त ऐकून होतो. कधी आत जाण्याचा योग आलाच नाही. आमच्या कॉलेज ग्रुप मधे एक मित्र रेसच्या पुस्तकांची डिलिव्हरी करायचा... आज पर्यंत रेस कोर्स बद्दल जी काय माहिती मिळाली ती त्याच्याच कडून.

अशीच एक आठवण तो सांगतो, परळच्या नाक्यावरिल सुप्रसिद्ध हलवाई गौरीशंकर छितरमल मिठाईवाल्याचे सलग ७ गाळे आहेत. ते त्याने रेसकोर्स वर लागलेल्या जॅकपॉटवर खरेदी केले होते.

<< .. ते त्याने रेसकोर्स वर लागलेल्या जॅकपॉटवर खरेदी केले होते >> इंद्रजी, हें अगदींच अशक्य नसलं तरी वडिलोपार्जित सात गाळ्यांचा मालक असलेला रेसच्या नादामुळें दुसर्‍याच्या दुकानात लादी पुसत असताना दिसणं, हें मात्र अगदीं सहज शक्य आहे ! Wink
[इथलं माझं लिखाण/ व्यंचि बहुतेक वेळां माझ्या पत्नीला दाखवून मगच मीं पोस्ट करतों. 'रेसकोर्स'संबंधांतल्या पोस्टवर " कशाला उगीचच हीं भलतीं लेबलं चिकटवून घेताय स्वतःला", हें तिचं भाकीत खरं तर ठरत नाहीय ना !!! Wink ]

>> परळच्या नाक्यावरिल सुप्रसिद्ध हलवाई गौरीशंकर छितरमल मिठाईवाल्याचे सलग ७ गाळे आहेत. ते त्याने रेसकोर्स वर लागलेल्या जॅकपॉटवर खरेदी केले होते
वॉव...हा आमचा पण फेवरिट मिठाईवाला...जवळ्जवळ सगळ्या मावसभावंडांच्या दहावीच्या निकालानंतर इथले पेढे मस्ट :P:

'भाउ पंटर' म्हणायला पाहिजे.>> :d

वेका.. गौरीशंकर नंतर हलवाईच्या यादीत दादरचा डि. दामोदर येतो आणि त्याच्या समोरच चंदू हलवाई. खाण्याचा विषय असल्याने इतकेच थांबतो Wink

आता shoppingचा विषय... दादर पुर्वे कडील दादासाहेब फाळके रोड हा समस्त स्री वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय... फाळके रोडच्या दोन्ही बाजुला होलसेल व्यापार्‍यांची दुकाने आहेत. भारतातल्या बहुतेक सगळ्याच राज्यातून इथे Dress Material येते आणि इच्छित ठिकाणी पोहवले जाते. १९९०च्या आधी अंध शाळे शेजारील किशोर कुमार नाव असलेला होलसेल व्यापारी फार प्रसिद्ध होता.. नंतर मात्र आसोपालव, भरतक्षेत्र सारख्यांनी आपला दबदबा निर्मांण केला. लग्न सराईच्या काळात फाळके रोडला जत्रेचे स्वरुप आलेले असते.

तीथे लग्नाच्या साड्या खरेदी हा महा भयंकर प्रकार असतो. नवरीचा शालू + देण्या घेण्याच्या ६० -७० साड्या खरेदी होत असताना अंत बघितला जातो

इंद्रा, आता पुढच्या वेळी तू कधी भेटशील तेव्हा माझ्यासाठी गौरीशंकरची मिठाई घेऊन ये. Wink
दादरला राहत असूनही मी आत्तापर्यंत कधीही डी. दामोदरची कुठलीही मिठाई खाल्लेली नाहीये. आणि मला खाऊन बघावी असं वाटतही नाही. लहानपणी गुरुवारचे पेढे आणण्यासाठी पहिला नंबर प्रकाश, दुसरा नंबर पणशीकर आणि दोन्ही ठिकाणी मिळाले नाहीत तर दत्तात्रय असे तीन मिठाईवाले ठरलेले होते. आस्वाद आल्यावर मात्र फक्त आस्वादच. आस्वादनेच आम्हाला दुधीवडी, गाजरवडी, खवाबर्फी इत्यादी खाण्याची चटक लावली. पण आता प्रकाशची दुधीवडी जास्त आवडते.

मुंबई बाबतीत मला असे वाटते की इथे सर्वांच्या खिशाची सोय होते. ९३/९४ साली मी दोन वर्षे दादरला रानडे रोड वरिल पोपटलाल चाळीत राहत होतो.(शेअरिंग मधे). त्यावेळी मला फक्त १७००/- रु महिना पगार होता. बाकी कुठल्याही महानगरात एवढ्या कमी पगारात मला नाही वाटत की राहता येईल.
असो बाकी माहिती फार छान आहे

पाटिल या महाभयंकर प्रकाराला 'बस्ता' म्हणतात.

मंजु... पश्चिमेला चौपाटी सोडली तर बाकीच्या खादाडीची माहिती तशी कमीच... प्रकाश मात्र आवडीचे.
गौरीशंकरचा मथुरा पेडा एकदम खास... अगदी जी ललचाए टाईप. पुढे सराफ लाईन मधे धुपकर कडे मिळणारा दुधी हलवा आणि श्रीखंड वडी एकदम बेस्ट.

गौरीशंकरचा मथुरा पेडा एकदम खास... अगदी जी ललचाए टाईप. पुढे सराफ लाईन मधे धुपकर कडे मिळणारा दुधी हलवा आणि श्रीखंड वडी एकदम बेस्ट.>>>>>>>>>>> +१

बाहेरगावाहून पाहुणे आले की त्यांना मुंबईतले टुरिस्ट्स स्पॉट्स, प्रेक्षणीय स्थळं काय, कशी दाखवायला न्यायचं हा एक प्रश्न असतो. कधी कधी एक-दोन दिवसच हातात असतात. अशा प्रेक्षणीय स्थळांबद्दल इथे लिहून झालय का?

उद्यानं- कुलाब्याचं सागर उपवन, माहिमचं महाराष्ट्र नेचर पार्क, मलबारहिलचं हँगिंग गार्डन, राणीचा बाग
म्युझियम्स- छ. शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालय, डॉ.भाऊ दाजी लाड म्युझियम, मणीभवन,
बाणगंगेचा तलाव
गेटवे ऑफ इंडिया, एलेफंटा केव्ह्ज
गोरेगाव फिल्म सिटी
संजय गांधी नॅशनल पार्क, कान्हेरी केव्ह्ज
नेहरु सायन्स सेंटर, नेहरु प्लॅनेटोरियम
माउंट मेरी चर्च
सिद्धीविनायक, महालक्ष्मी देऊळ, बाबुलनाथ

अजुन काय काय?

चंदू हलवाईच्या तूपाच्या क्वालिटीबद्दल मला शंका आहे.
माटुंगाचे संदेश आणि ताडदेवचे आदर्श पण आता अतिगोड मिठाईमूळे आवडेनासे झालेत. माटुंगा स्टेशनसमोर जी मोठी दुकाने आहेत त्यांच्याकडे बेताची साखर घातलेली मिठाई मिळते.
फोर्ट्मधे पण दोन छान दुकाने आहेत. सेंट्रल बँकेच्या जवळच आह्त दोन्ही. सध्या तीच आवडती.

शर्मिला,
प्रियदर्शिनी पार्क, सी लिंक, चालू असेल तर वडाळ्याचे आयमॅक्स, मतमाऊली, बोरीवली जवळचा पॅगोडा, जूचंद्र,
फ्लेमिंगोज असतील तर शिवडी, टाटा थिएटर, सावरकर स्मारक...

धन्यवाद दिनेश.

खरं तर एरियावाईज यादी करायला हवी एक. म्हणजे पाहुण्यांना फिरवायला/फिरायला बरं.

उदा.
जुहू- इस्कॉन मंदिर, पृथ्वी थिएटर, समुद्र किनारा
बान्द्रा- माउंटमेरी, जॉगर्सपार्क, बॅन्ड-स्टॅन्ड, पटवर्धन गार्डन
पेडररोड-
वरळी

शर्मिला, मुंबईबाहेरच्या लोकांना हमखास आणि सगळ्यात आवडणारी रपेट म्हणजे सिनेतारकांची/सचिनची घरं. वांद्र्याला सलमान, सचिन तेंडुलकर, बँडस्टँडला शारुक, रेखा, कार्टर रोडवरचं राजेश खन्नाचं आशिर्वाद, पाली हिलवरचे राजकपूर, दिलिपकुमार चे बंगले करून जुहुला अमिताभच्या जलश्याची तीर्थयात्रा घडवून आणली की मंड्ळी अगदी खुश होतात.

गोरेगाव फिल्म सिटी >>> आत जायला परवानगी लागते. मात्र आहे एकदम मस्त. Happy

सगळ्यात आवडणारी रपेट म्हणजे सिनेतारकांची/सचिनची घरं. >>

मामी, हे मात्र खरंय. एकदा आमच्याकडे जरा वयस्कर पाहुणे आले होते. ६०-७०च्या आसपास वय म्हणुन त्यांना खास मुंबादेवी, महालक्ष्मी, सिद्धीविनायक अशी धार्मिक यात्रा घडवून आणली. परतायच्या एक दिवस आधी म्हणाले की 'तो शारुख कुठे राहतो रे? ती चौपाटी नाही दाखवलीस.'
तेव्हा ट्युब पेटली काकांना मन्नत, जलसा ही तीर्थस्थळेच नाही दाखवली. Happy
मग एकदम सगळे धाम दाखवले, तेव्हा मात्र पाहुण्यांच्या तोंडावर एकदम भरुन पावलो असे भाव होते.

गमभन Rofl

डि दामोदर मिठाई नाही खाल्ली पण दादर पश्चिमेला गेलं की सामंतांचा चक्का किंवा श्रीखंड लिस्ट वर असे. बा़की मंजुडीने लिहिलेली सगळी नावं परफेक्ट आहेत. छेडाची कचोरी पण प्रचंड फेवरिट ...असो खाण्याचा विषय असल्यामुळे थांबलेलं बरं Wink

शारूख सुरुवातीच्या काळात अंधेरीत भाड्याने राहायचा त्यावेळी माझ्या नवर्याला नेहमी दिसायचा या एकमेव भांडवलावर बॉलिवूड पाह्णारी इकडची बरीच एबिसिडी मुलं अशा भक्तिभावाने त्याच्याकडे पाहत ़की यंव Wink

मंत्रालय नव्याने झालं त्यावेळी, मंत्रालय या शब्दावर पेपरमधे वाद झाला होता. मंत्रालय म्हणजे मंत्र + आलय, त्यामूळे तो शब्द मंत्र्यालय असा असावा असे काहींचे म्हणणे होते. पण ते काही झाले नाही.

तसाच वाद बेस्ट वरुन पण झाला होता. पुर्वी त्या बसेस वर BEST ( Bombay Electric Supply & Transport Undertaking ) असे इंग्रजीत लिहिलेले असायचे. ते मराठीत लिहिताना, मुं.वी,पु.द. असे लिहावे, असे काहीम्चे मत होते. ते मानले गेले नाही, ते छानच झाले.

बसची तिकिटे पण पुर्वी इंग्रजीमधेच असत. ते गठ्ठे संभाळणे, त्याचा हिशेब लावणे म्हणजे वाहकांची कसरत असे. त्याला तो खास फुलपाखरासारखा स्क्रू असे. त्या तिकिटाच्या वरच्या भागाचे तूकडे तसेच बसमधे पडलेले असत. आता तिकिट छापणारे यंत्र निघाल्यामूळे त्यांची बरीच सोय झालीय.

१९७१ च्या बांगलादेशी निर्वासितांसाठी ५ पैसे अधिभार लागला, तो मात्र नंतर बरीच वर्षे चालू राहिला.
१९८४/८५ दरम्यान नाणेटंचाई एवढी झाली होती कि बेस्टने कुपन्स छापली होती आणि तीसुद्धा तिकिटासारखीच दिसत. फार गोंधळ व्हायचा तेव्हा.
आता सांगून खरे वाटणार नाही पण दादरला काही भिकारी, सुट्टे पैसे विकायचे.
दहा / वीस पैश्याची नाणी सोनेरी होती. त्यात सोन्याचा अंश आहे अशी आवई पण उठली होती.
मुंब्र्याच्या खाडीत, बाणगंगेच्या तलावात लोक सुट्टी नाणी टाकत ती परत काढणार आहेत, असे पण लोक सांगत.
सुट्ट्या पैश्याच्या ऐवजी चॉकलेट्स वगैरे प्रकार नंतरच सुरु झाले.
फोर्टच्या सुविधा हॉटेलने पण ५० पैशांची कुपन्स काढली होती. आता आता पर्यंत जपून ठेवले होते मी ते.

दिनेशदा मंत्रालय हे नामकरण करायच काम शंकरराव चव्हाणांच अस वाचल
पूर्वी त्याला सचिवालय अस म्हणत
महाराष्ट्राच्या राजकारणात हेडमास्तर म्हणून प्रसिध्द होते ते

<< मंत्रालय नव्याने झालं त्यावेळी, मंत्रालय या शब्दावर पेपरमधे वाद झाला होता. >> दिनेशदा, 'सचिवा'ना आपल्यापेक्षां अधिक महत्व कां, ही देखील राजकारण्यांची पोटदुखी होतीच या नामकरणामागें. पण मंत्रालयासमोरची जिमखान्याची वास्तु मात्र अजूनही ' सचिवालय जिमखाना ' म्हणूनच रुबाबात उभी आहे. बॅडमिंटनची अद्यावत दोन 'वूडन कोर्टस', टेबल टेनिसचीं चार टेबल्स, आठ कॅरम बोर्डस, बुद्धीबळ, पत्ते याकरतां स्वतंत्र कक्ष व लाऊंज हॉल, कॅन्टीन असा थाट असे या टुमदार जिमखान्याचा. शिवाय, ओव्हल मैदानाचा मंत्रालयाच्या समोरचा संपूर्ण भाग ह्याच जिमखान्याच्या ताब्यांत- क्रिकेट,हॉकी करतां. अगदीं माफक फी भरून राज्य कर्मचार्‍याना मुंबईत दुर्मिळ अशी ही अप्रतिम सुविधा उपलब्ध होती/ आहे. माझा भाऊ तिथं तहहयात व सक्रीय सभासद असल्याने मीं ह्या सुविधांचा खूप लाभ घेतलाय. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक खेळाडूंचा खेळही इथं पहाण्याचा योग आला. इथल्या मोठ्या हॉलमधे झालेला कुमार गंधर्वांच्या गाण्याचा कार्यक्रम व त्याला पु.लंची व चिंतामणराव देशमुखांची उपस्थिती [ व मध्यंतराला कॅन्टीनमधें देशमुखांबरोबर चार शब्द बोलायची आम्हीं घेतलेली व त्यानी मोकळेपणाने दिलेली संधी ], ही देखील तिथली एक अविस्मरणीय आठवण !

Pages