..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ५)

Submitted by मामी on 14 March, 2013 - 05:41

आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529

काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).

२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्‍या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्‍या भागात विचारलं आहे.

३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.

या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.

आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे ..... Happy

हे धागे यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

०५/००२

केनयाचा डॅनियल ओब्लिसांजोचे लग्न, युगांडाच्या हिना पटेल शी झाले. तो तिला फिरायला म्हणून नैरोबीच्या
कार्निव्होर हॉटेलमधे घेऊन आला. आपल्याला हव्या त्या प्राण्याचे म्हणजे जिराफ, झेब्रा, क्रॉकोडाईल, एलिफंट,
ऑयीस्ट्रीच वगैरेंचे स्टेक तिथे आपल्यासमोर बार्बेक्यू करुन देतात.

तिथेच त्याने एक छोटेसे क्वार्टर पण बूक केले होते. त्याने आपल्या चॉईसचा स्टेक मागवला. आणि दोघे त्या घरात, जेवायला बसणार एवढ्यात त्याला रोमँटीक मूड आला.. तर ते दोघे कुठले गाणे म्हणतील ?

उत्तर -

छोटासा घर, है ये मगर
तूम इसको पसंद करलो
दरवाजा बंद कर लो

चित्रपट : डर, गायक : लता / अभिजीत
कलाकार, जुही चावला / सनी देओल / शाहरुख खान
जुहीचे नाव असते किरन, पण किरण खेर चित्रपटात नव्हती, अनुपम खेर होता !

Happy

ज्याला उत्तर आलेय, त्यानेच पुढचे कोडे द्यावे असा नियम करावा काय ?
<<< नको. Happy गाण्याच्या शब्दांवरून कोड्यात द्यायची सिच्युएशन सुचणे हे माझ्यासाठी महाकठीण.

०५/००३:

पाव ली ; चीनमधला एक गडगंज श्रीमंत माणूस. लम आणि लाइ ही त्याची जुळी मुलं. पैशाकरता गुंबा याडुंबा त्या जुळ्या मुलांचे अपहरण करतो आणि त्यांना एका बेटावर नेऊन ठेवतो. त्या बेटावरच्या एका लहानशा गल्लीत एक पडका वाडा असतो त्यात खालच्या मजल्यावर लमला आणि वरच्या मजल्यावर लाइला डांबून ठेवले असते. पण त्या दोघांना ते माहीत नसते.

जनू बांडे त्या ठिकाणाचा पत्ता शोधतो आणि प्राथमिक पहाणी करण्यासाठी आपली सहाय्यिका जान्हवीला तिकडे पाठवतो. ती बॉलीवुड पद्धतीने गाणे म्हणत लम आणि लाइला आपण त्यांची मदत करण्याकरता आल्याचे सांगते. लमला सांगते, 'वर बघ, लाइ आहे.' तो वर बघतो आणि त्याच्या तोंडून आनंदाचा चित्कार बाहेर पडणार ते ओळखूनच ती त्याला गप्प रहायला सांगते. गाणे ऐकून लाइ पण खाली बघू लागतो. ती त्याला पण गप्प रहाण्याबद्दल बजावते. कुठलं गाणं म्हणत असेल ती?

श्रद्धा, परफेक्ट! तुला ताटभर ओल्या नारळाच्या करंज्या!

०५/००३:

पाव ली ; चीनमधला एक गडगंज श्रीमंत माणूस. लम आणि लाइ ही त्याची जुळी मुलं. पैशाकरता गुंबा याडुंबा त्या जुळ्या मुलांचे अपहरण करतो आणि त्यांना एका बेटावर नेऊन ठेवतो. त्या बेटावरच्या एका लहानशा गल्लीत एक पडका वाडा असतो त्यात खालच्या मजल्यावर लमला आणि वरच्या मजल्यावर लाइला डांबून ठेवले असते. पण त्या दोघांना ते माहीत नसते.

जनू बांडे त्या ठिकाणाचा पत्ता शोधतो आणि प्राथमिक पहाणी करण्यासाठी आपली सहाय्यिका जान्हवीला तिकडे पाठवतो. ती बॉलीवुड पद्धतीने गाणे म्हणत लम आणि लाइला आपण त्यांची मदत करण्याकरता आल्याचे सांगते. लमला सांगते, 'वर बघ, लाइ आहे.' तो वर बघतो आणि त्याच्या तोंदून आनंदाचा चित्कार बाहेर पडणार ते ओळखूनच ती त्याला गप्प रहायला सांगते. गाणे ऐकून लाइ पण खाली बघू लागतो. ती त्याला पण गप्प रहाण्याबद्दल बजवते. कुठलं गाणं म्हणत असेल ती?

उत्तरः
अपलम चपलम चपलाइ रे
दुनिया को छोड तेरी गली आई रे आई रे आई रे

०५/००४

आजच्या पेपरमधली सनसनाटी बातमी.

प.पू. आसारामबापूंना, ऐरोली नगरपालिकेने रंगपंचमीला पाणी न दिल्याने ते भयंकर खवळले आणि त्यांनी नको तो "अतिरेकी" निर्णय घेतला. ( हा निर्णय घेण्याचे धाडस तर महात्मा गांधींनाही झाले नव्हते. )
त्यांचे अनुयायी अंधानुयायी, त्यांनी मात्र आशा सोडली नाही, बापूंच्या नव्या भजनात पण त्यांनी साथ दिली..
तर बापू आणि अनुयायी कुठले गाणे म्हणतील ?

०५/००४

मी उद्या दुपारनंतरच येणार इथे. म्हणून आत्ताच क्लू देतो.

या चित्रपटातली सगळीच्या सगळी गाणी हिट आहेत. पण हे गाणे नाही. चित्रपट बघितल्याशिवाय हे गाणे त्यात आहे हे कळतही नाही. एका अति लोकप्रिय गायिकेचे एकही गाणे या चित्रपटात नाही.

०५/०५ वाणीला ग्रॅज्युएट झाल्या झाल्या एका खाजगी कंपनीत नोकरी लागली. तिचं ऑफिस फोर्टमधल्या एका जुनाट इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर होतं. त्या इमारतीचे प्रशासन यथातथाच होतं. जिन्यात स्वच्छता, दिवे यांची वानवाच होती. कधी संध्याकाळी उशिरापर्यंत थांबायला लागलं, तर ऑफिसातून बाहेर पडताना वाणीला धाकधुक होत राही, त्यामुळे ती उशिरापर्यंत थांबायला तयार नसे. ही गोष्ट तिचा बॉस अजयच्या लक्षात आली. कारण कळल्यावर त्याने वाणीला इमारतीच्या बाहेरून जाणार्‍या नागमोडी/चक्राकार जिना दाखवला. स्ट्रीट लाइट्समुळे, आजूबाजूच्या दुकानांच्या झगमगीत दिव्यांमुळे त्या जिन्यावर चांगला उजेड असे. तिला चर्चगेटपर्यंत सोबत करता यावी, म्हणून अजयही तिच्यासोबतच ऑफिसातून निघू लागला.
अजयचे आभार मानताना वाणी कोणते गाणे म्हणेल?

भरतच्या कोड्यात जीना, रोशन / रोशनी आहे. असलेच तर बोली (वाणी) पण असेल.>>>>>तेढे मेढे, साथ पण आहे. Happy

मला आधी "तेढे मेढे उंचे नीचे लंबे लंबे रास्ते प्यार के" आठवलं. Happy

.

सह्ही है स्निग्धा!!!!! Happy

गगन पे दो तारे टकराए
टकराकर दोनो मुस्काए
चांद ने सुन ली उनकी बात
जा बैठा बादल के पास
सुन बादल ने ली अंगडाई
बूंद बूंद मे बात फैलाई
गगन की बात धरती पे आई
कली ने सुन ली सुनी सुनाई
कली ने फूल को भेद बताया
फूल ने बुलबुल को समझाया
बुलबुल ने भवरा बुलाया
मैने रोक के उससे सुनाया
सुनाया सुनाया
बनके दुल्हनिया आज चली हु,
मै साजन के द्वारे,
शहनाई बजे ना बजे...,..

स्निग्धाला, गरमागरम (जम्बो) वडापाव Happy Happy

Pages