चपखल!

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 06:18

इंग्रजी, मराठी, हिंदी अशा स्वतंत्र भाषांमधून आता आपण मिंग्रजी, हिंग्लिश वगैरे भाषांपर्यंत येऊन पोचलोय. भाषेची सर्रास मिसळ करताना मात्र एक जाणवतं, की एका भाषेतला तोच अचूक भाव दुसर्‍या भाषेत मात्र मांडता येत नाही. का, येईल? करायचा का प्रयत्न?

सादर करतोय एक गंमत खेळ 'चपखल'.

chapakhal_0.jpg

ह्यात दिल्या गेलेल्या इंग्रजी अथवा हिंदी वाक्यांचे दोन अनुवाद करायचे आहेत. एक शब्दश: आणि एक भावानुवाद. शब्दशः अर्थातच शब्दश: अनुवाद करायचा आहे. भावानुवादात, वाक्याच्या आशयानुसार शब्द बदलले तरी चालतील.

उदाहरणार्थः What's up? / Wassup?

शब्दशः काय आहे वर?

भावानुवाद: काय मग, कसं काय चाललंय?

या ऐवजी, एखादा अस्सल कोल्हापुरी असेल, तर म्हणेल, 'काय काय आनि?'

आलं लक्षात? मग करूया सुरू..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Isn't this a great surprise party?

नाही का हि एक महान आश्चर्यचकित मेजवानी?

काय मग, भारी आहे ना आमची ही मेजवानी ?

Isn't this a great surprise party?

आहे ना हा एक सुरेखसा अनपेक्षित सोहळा?

आवडला ना हा अचानक साजरा केलेला समारंभ?

आहे की नाही हा एक महान आश्चर्यजनक समारंभ??

चकित करुन सोडलं नाही ह्या सोहळ्याने ?

आहे की नाही हा एक मस्त अनपेक्षित कार्यक्रम?

( त्याला/तिला ) पूर्वकल्पना न देता ठरवलेला हा कार्यक्रम मस्त झाला की नाही?

पण संयोजकांनीं सायो चं बरोबर असं म्हंटलंय म्हणून प्रश्न विचारला .. मला ग्रेट = मस्त हे शब्दशः भाषांतर पटत नाही ..

धन्यवाद संयोजक Happy

साती... Lol ग्रेट सर्प्राईज पार्टीला हँग आऊट करुन मला स्वतःला मदत करते Lol

काय तयार आहेत सगळे?

हे घ्या आजच्या दिवसाचं पहिलं वाक्य Happy

मैं एक छोटासा, नन्हासा, प्यारासा बच्चा हूँ|

मी एक छोटुला, तान्हुला, गोडुला बाळ आहे.

मी एक इटुकलं, पिटुकलं, गोडुलं बबलू हाय.

मी एक छोटंस, लहानसं, आवडावं असं मूल आहे
स्वतःच सांगावं लागतंय खरं पण मी अगदी भोळा भाबडा निरागस आहे हो!

मी एक लहानसं, कोवळसं, प्रेमाचं मुल आहे Proud

मी एक छोटसं, इवलसं, गोडुलं बाळ आहे.

Pages