चपखल!

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 06:18

इंग्रजी, मराठी, हिंदी अशा स्वतंत्र भाषांमधून आता आपण मिंग्रजी, हिंग्लिश वगैरे भाषांपर्यंत येऊन पोचलोय. भाषेची सर्रास मिसळ करताना मात्र एक जाणवतं, की एका भाषेतला तोच अचूक भाव दुसर्‍या भाषेत मात्र मांडता येत नाही. का, येईल? करायचा का प्रयत्न?

सादर करतोय एक गंमत खेळ 'चपखल'.

chapakhal_0.jpg

ह्यात दिल्या गेलेल्या इंग्रजी अथवा हिंदी वाक्यांचे दोन अनुवाद करायचे आहेत. एक शब्दश: आणि एक भावानुवाद. शब्दशः अर्थातच शब्दश: अनुवाद करायचा आहे. भावानुवादात, वाक्याच्या आशयानुसार शब्द बदलले तरी चालतील.

उदाहरणार्थः What's up? / Wassup?

शब्दशः काय आहे वर?

भावानुवाद: काय मग, कसं काय चाललंय?

या ऐवजी, एखादा अस्सल कोल्हापुरी असेल, तर म्हणेल, 'काय काय आनि?'

आलं लक्षात? मग करूया सुरू..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

May I have the pleasure of this dance with you?
.
आपल्या बरोबर नृत्य करण्याचा आनंद घेउ शकतो का ?
.
.
भवाने ...........नाचतेस का माझ्या बरोबर .....?...

वैभ्या...........
ए डिपाडी डिपांग
एडीबाडी डिपांग
एडीबाडी डिच्चीबाडी डिपांग..टुडु...:)

May I have the pleasure of this dance with you?

कदचित मी घेऊ मजा या नाचाची बरोबर तुझ्या???

चल ना जरा ढिंगचिका नाचु या ना Proud

May I have the pleasure of this dance with you?

मला मिळु शकतो का आनंद तुझ्यासोबत नाचायचा ?
चल ना, नाचु या !

Pages