मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युद्ध जीवांचे (गिरीश कुबेर) वाचलं. जैव-रासायनिक अस्त्रांच्या इतिहासाचं माहिती संकलन म्हणता येईल.
दोन्ही जागतिक महायुद्धांतले काही दाखले, उदाहरणं धक्कादायक आहेत. या अस्त्रांचा इतिहास त्याहूनही मागे जातो.

इंटरेस्टिंग विषय आहे. कुबेरांचं टाटायन मला आवडलेलं, बोअर नव्हतं झालं. पण यात लेटेस्ट बायो वेपन बद्दल काही नाहीये का? सीरिया किंवा तत्सम?

22095847_10208980978035844_7014673312314973626_o.jpg. सध्या भालजि च पुस्तक वचल अफलतुन माणुस व मरठि चित्रपट स्रुश्टि चा इतिहास च डोळ्या समोर उभा राहतो ..लता बाइचे भालजि godfather..तसेच राज कपुर चेहि....कमलिचा तत्व वेडा...... रगेल आणि रन्गेल व्यक्तिमत्व....७०-८० वर्शा पुर्वि चे कोल्हापुर डोळ्यसमोर उभे राहते... मानुस मोठ्या पिळाचा.गान्धि हत्ये नन्तर झालेल्या वाताहातित सुध्दा अविचल राहिला...त्यान्चेक्रान्तिकारकाशि हि मैत्र होते विशेष करुन राजगुरु वै. यान्च्या शि.....दादा कोन्ड्के तर त्याने वडिलान्च्या जागि मानत.

गेले काही दिवस बाबुराव अर्नाळकरांची दोन पुस्तके हावरटासारखी वाचून काढली - धनंजय आणि गोलंदाज. मला हा जॉनर खूपच आवडला. फक्त पुस्तकातली भाषा सरळ सरळ भाषांतरीत केल्यासारखी आहे. गोष्ट भारतात घडते आणि "माझ्यासाठी एखादे पेय बनव" अश्यासारखी वाक्य सारखीच खटकतात.

इथे कोणी आहे का अर्नाळकर फॅन?

How to win friends and influence people by Dale Carnegie - फार छान पुस्तक. जरुर वाचा

मि आहे अर्नाळकराचा चाहता...मला गुरुनाथ नाइक पण आवडायचे.......गोलन्दाज कालापहाड इ त्यन्चे नायक अफलातुन.......

22792531_10209129620191805_7639007943424911453_o_0.jpg22792531_10209129620191805_7639007943424911453_o.jpgसध्या प्राण चे आत्मचरित्र वाचतोय फार च अफलातुन........आणि देव आनद चे आत्मचरित्र romancing with life in english... देव आनन्द ने पहिल्या १०-१२ पानात तर मि दचकलो च अतिशय बिन्धास पणे लिहिलय कहिहि आडपददा न ठेवता. वरण भात मन्डळि नि त्याला हात न लावलेला बरा....पण लेखन एखाद्या कसलेल्या लेखका प्रमाणे आहे.....प्राण चे पुस्तक मराठित आहे तर देवाचे english मधे

मि आहे अर्नाळकराचा चाहता...
>> मग तुम्हाला पुस्तकाची भाषा खटकली नाही? की पूर्वी असंच लिहायचे? मी त्यांची आणखी दोन पुस्तकं आणली आहेत. वाचली की बोलूच Happy

ग तुम्हाला पुस्तकाची भाषा खटकली नाही? की पूर्वी असंच लिहायचे? मी त्यांची आणखी दोन पुस्तकं आणली आहेत. वाचली की बोलूच Happy>>>>>>>>पियु तुम्हि कुठल्या वयात ति वाचलि हे मल माहित नहि...मि नाइक व अर्नाळकरान्चि पुस्तके ४० वर्शा पुर्वि वाचलि....त्यावेळि मि लहान शाळकरि विद्यार्थि होतो....मला वाटते ठराविक वयात हि पुस्तके वाचण्यात मौज असते....त्यावेळि गोलन्दाज कथा वाचुन मि त्याच्या सारख्या कोलान्ट्या खाताना पाय मोडुन बसलो होतो हे आठवते..... गोलन्दाझ(तोच का?) हा शत्रु च्या बन्दुकितुन सुटणाअर्या गोळ्या झेलत असे.... आता बोला....... फारच डोक्याचा भुगा करुन घ्यायचे असल्यास dostovasky tolstoy मराठि भाषेत जिए वैगेरे आहेतच

वरण भात मन्डळि नि त्याला हात न लावलेला बरा.. >> म्हणजे कुठल्या मंडळींनी ?
इस्कटून सांगाल तर . कुणाला वरण भात मंडळी म्हणतात ते तरी समजेल Wink Proud

म्हणजे कुठल्या मंडळींनी ?
इस्कटून सांगाल तर . कुणाला वरण भात मंडळी म्हणतात ते तरी समजेल >>>>>>आपण सुज्ञ.....तरि......

देवकी, मीपन घेतल हे पुस्तक..
मग इतर वाचक मंडळींना दावल्यावर मंटो उर्दू किंवा हिंदीतच वाचावा अस त्यांच म्हणनं ठरलं..
मी सुरुवातीच्या काही कथा मराठीत अन काही एका ब्लॉगवर हिंदीमधे वाचल्यावर लगेच फरक कळला..
मराठीत तो आतवर भिडत नाही..

मंटोच्या कथांचे श्री ज जोशींनी (की श्रीपाद जोशींनी) देखील भाषांतर केले आहे. मी अनेक वर्षांपुर्वी वाचले होते तेव्हा आवडले होते.

मग इतर वाचक मंडळींना दावल्यावर मंटो उर्दू किंवा हिंदीतच वाचावा अस त्यांच म्हणनं ठरलं..>>>>> खरंय टीना.

दुर्गा भागवत यांचं " दुपानी " कोणी वाचलं आहे का ? कस आहे ?
आणखीन एक विचारायचं होत काही वर्षांपूर्वी मी एका लेखिकेचं पुस्तक वाचल होत . पुस्तकाचं नाव काहीतरी बिल्डिंग च्या नावाचं होत. ग्रॅन्टरोड /चर्नीरोड वर त्या वेळी जुन्या बिल्डिंग ची जी नाव असायची तेच पुस्तकाचं नाव होत . काहीतरी व्हिला म्हणून . त्या बाईंचा लोणावळ्याला बंगला होता आणि तिथे दरवर्षी मे महिन्यात मुलांना घेऊन सगळं कुटुंब महिनाभर राहायला जात असे . पुस्तकात त्यांनी त्यांच्या एक छंदाचा उल्लेख केला आहे जो अगदी ठळकपणे आठवतोय त्यांना घराच्या खिडकीतून दुर्बिणीतून दूर दूरच दृश्य पाहायला आवडायचं . बरेचदा जेव्हा रिकामा वेळ असेल तेव्हा त्या दुर्बिणीतून बाहेरच्या जगातली माणसं न्याहाळत . त्यातून त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असत . या गोष्टीचा त्यांनी उल्लेख केला होता आणि तेच मला काहीतरी विचित्र पण तरीही मजेशीर वाटलं होत . पुस्तक चांगल लिहिलं होत . यशस्वी लेखिका नव्हत्या . नवोदित . कदाचित एकच पुस्तक असेल त्यांचं ते. कोणाला काही माहित आहे का ? Happy

दुर्गा भागवत यांचं " दुपानी " कोणी वाचलं आहे का ? कस आहे ?>>>>>>> दुपानि मि वाचलय छान आहे ते पुस्तक ..छोट्या छोट्या आठवणि आहेत.फारच. छोट्या अगदि दहा दहा ओळिच्या आठवणि...... वाचायला मजा येते....असच लेखन माधव गडकरि नि चौफेर या पुस्तकात केलय....त्यचे चार खन्ड आहेत

आजपासून बेअर ग्रिल्सचं आत्मचरित्र 'मड,स्वेट अँड टीअर्स' वाचायला घेतलंय.
मला हा माणूस फार आवडतो.

मलापन आवडतो तो..
पण आयुष्याच्या मध्यात आत्मचरित्र या नावाने लोक कसे काय पुस्तक लिहितात याच आश्चर्य वाटते..
आता कोणी अस म्हणु नका कि मग काय मरायला टेकल्यावर लिहायच का ते... पण एखादा व्यक्ती अजुनही त्याच्या फिल्ड मधे अ‍ॅक्टिव्ह असताना ते पूर्ण नसेल ना...

बेअरने त्याच्या लहाणपणाबद्दल आणि मरिन्सच्या निवडचाचणी बद्दल लिहले आहे. फार अफलातून वर्णने आहेत. त्यांचे सिलेक्शन कसे होते या बद्दल.

मॅन वि. वाईल्ड बददल फारसे नाहीये.

अँंडी मरेचं आत्मकथन २००८ साली आलंय. वय २१ . तोवर grand slamएकेरी फायनललाही कधी पोचला नव्हता.
>>>

ही खास इंग्लिश/ऑस्ट्रेलियन रीत दिसते. फार ग्रेट नसलेल्या इंग्लिश क्रिकेटपटूंची देखील खोर्‍याने आत्मचरित्रे/कथने आहेत. अजून कुठल्या दुसर्‍या देशात मला हे फारसे दिसले नाहिये.

खेळत असतानाच पब्लिसिटी कॅश करण्याचा प्रयत्न. आणि ओढून ताणून एखादा वादग्रस्त प्रसंग घुसण्याचा प्रकार हेही त्यात अॅड कर

चला... आहे तर लोक्स..
मला वाटल आले सगळे शिव्या देत मला.. हाहाहा.. माबोवर लिहायला भिती वाटते आजकाल...

मला आजच एक पुस्तक मिळालं वाचयला.. माबोकर इनमिनतिन कडून..
मिशी नरभक्षक आणि इतर शिकार कथा (शिकारीचे दिवस)
- लेखक इ. सी. स्टुअर्ट बेकर
अनुवाद- लालू दुर्वे

डिजिटल फोट्रेस
कादंबरी खूपच थ्रिलर आहे, पहिल्या पानापासून ग्रिप घेत जाते. एकापाठोपाठ एक वेगात होत चाललेल्या घडामोडी अक्षरशः श्वास रोखून धरायला लावतात. मोजून दोन दिवसात या सगळ्या घडामोडी होतात त्यामुळे उसंत अशी मिळतच नाही, प्रेडक्टबल वाटली तरी उत्सुकता टिकून राहते.
कथेचा जीवही अगदी थोडा आहे.
पण यात डॅन ब्राऊन टच फारसा जाणवला नाही. म्हणजे दा विंची आणि lost symbol , angels and demons वाचल्यावर हे जाणवते.
मला तर कित्येक वेळा हे रॉबर्ट लुडलूम चे पुस्तक आहे का असे वाटत होते इतके साम्य आहे
ब्राऊन ची खासीयत म्हणजे गुंतागुंतीचे रहस्य ते इथे कोडिंग, encryption वगैरे मोठा स्कोप असून फारसे नाहीये. म्हणजे जे आहे ते अगदी बेसिक लेव्हल चे आहे, टेक्निकल jargon त्या मानाने नाहीयेत. त्यामुळे मजा येते पण डॅन ब्राऊन वाचल्याचं फील त्यात नाही
आणि त्याला शेवट नीट करता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अत्यंत फिल्मी शेवट करण्याच्या त्याच्या सवयीमुळे पदरी अंती निराशा.
शेवटचा शेंगदाणा कडू यावा तसा.
ओव्हर ऑल पुस्तक एकदा वाचण्या सारखे
रहस्याची उकल होईपर्यंतच पार्ट लई भारी जमलाय, त्यासाठी त्याला फुल्ल मार्कस
शेवटी माती खालीये

मी वाचलंय सिलेक्टिव्ह मेमरीज. लहानपण ते तारुण्य- मॉडेलिंग, जर्नलिझम पर्यंतचा प्रवास हे आत्मकथन आहे. मग मधलं खाजगी आयुष्य बाजूला ठेवलंय. म्हणूनच सिलेक्टिव्ह असावं. पुढे बाकीच्या जगाबद्दल आहे.
मला आवडलेलं हे पुस्तक तेव्हा.

Pages